Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती | Eknath Shinde Yanchi Mahiti

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती Eknath Shinde Yanchi Mahiti

आजच्या लेखांमधून आपण 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. 

गेल्या दोन ते तीन  दिवसांपासून पासून महाराष्ट्र राज्यात एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे.कोण आहेत एकनाथ शिंदे?असे जर आपणास काही दिवसांपूर्वी विचारले गेले असते तर, कदाचित प्रत्येकाला सांगता आलेच असतेअसे नाही,परंतु आज जर कोणत्याही व्यक्तीला विचारले तर ती व्यक्ती निश्चितच सांगू शकेल कारण का तर ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे ते व्यक्त म्हणजे एकनाथ शिंदे होय. ते सध्या महाविकास आघाडीच्या  सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहत आहेत.या निमित्ताने वाचकांना त्यांचा अल्प असा परिचय करून देण्याचा प्रयत्न.
एकनाथ शिंदे यांची माहिती
एकनाथ शिंदे मराठी माहिती

 एकनाथ शिंदे माहिती(toc)


एकनाथ शिंदे यांचा जीवन परिचय eknath shinde jivan parichay 

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 झाला  असून अतिशय खडतर परिस्थितीतून ते आज शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक ते आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत गेलेले आहेत.त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे नामांकित डॉक्टर व खासदार म्हणून सर्व परिचित आहे.तसेच खासदार म्हणून देखील कार्यरत आहे. 
 

एकनाथ शिंदे यांचे शिक्षण eknath shinde yanche shikshn 

एकनाथ शिंदे यांच्यावर घरच्या जबाबदारी आणि नाजुक आर्थिक परिस्थिती यामुळे 11 वी नंतर आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यातील ठाणे मनपाच्या शाळा क्रमांक 23 मध्ये झाले. त्यानंतर ठाण्यातील ख्यातनाम अशा मंगला हायस्कूलमध्ये त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.आणि त्यानंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. असे असले तरी शिकण्याची प्रचंड जिद्द होती म्हणूनच त्यांनी 2014मध्ये राजकारणाबरोबरच आपले शिक्षण देखील सुरु ठेवले. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राजकारण आणि मराठी हे विषय घेऊन त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

एकनाथ शिंदे यांची राजकीय वाटचाल eknath shinde rajkiy vatchal 

एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेशी जोडले गेले  आणि एक सामान्य कार्यकर्ता ते आज शिवसेनेतील एक प्रमुख नेता अशी त्यांची वाटचाल. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1997 ला केली.अगदी सुरुवातीला नगरसेवक म्हणून ते रिंगणामध्ये उतरले आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांना यश देखील मिळाले. नगरसेवक म्हणून कामकाज पाहिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये यांचा लोकसंपर्क आणि कामाची पद्धत पाहून शिवसेनेकडून ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी जबाबदारी सोपविण्यात आली. या पदावर असून देखील प्रचंड लोक संपर्क सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याची त्यांची लकब यामुळेच ते लंबी रेस का घोडा आहेत हे निश्चित झाले होते. 

एकनाथ शिंदे नगरसेवक ते आमदार eknath shinde ngarsevak te aamdar 

शिवसेनेच्या माध्यमातून एक नगरसेवक पुढे आपला लोकसंपर्क सिद्ध करत त्यांनी प्रचंड लोकसंपर्क वाढवला.ठाणे परिसरामध्ये शिवसेना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. हे काम पाहूनच त्याना 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. आमदारकीची उमेदवारी मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मते मिळाली व त्यांचे नेतृत्व सर्वांनी मान्य केले. त्यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांच्यावरती ठाणे जिल्ह्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली शिवसेनेच्या इतर नेत्यांशी त्यांची तुलना केली तर एकाच वेळी आमदार आणि जिल्हाप्रमुख अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणारा अवलिया म्हणून एकनाथ शिंदे यांची एक वेगळी ओळख 2004 सालापासून झाली.  एकनाथ शिंदे यांची खासियत सांगायची झाली तर एखादा प्रश्‍न हातामध्ये घेतल्यानंतर तो तडीस नेल्याखेरीज ते  शांत न बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ शिंदे होय. 

महा विकास आघाडीतील मंत्रीपद mhavikas aghdit mantri 

महाविकास आघाडीच्या वतीने सरकार स्थापनेची घोषणा करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले.मुख्यमंत्री यांच्या विश्वासातीलम्हणून  एकनाथ शिंदे यांच्या वरती सार्वजनिक बांधकाम मंत्री ही जबाबदारी सोपवण्यात आली. ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले.

एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे eknath shinde yanchi kame 

एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे केली त्या त्या कामांचा थोडक्यात आढावा घेऊया.

1. आरोग्य मंत्री म्हणून कामगिरी aarogymntri mhnun kam 

एकनाथ शिंदे आणि काही काळ साधारपणे 2019 मध्ये आरोग्यमंत्री म्हणून देखील कामकाज पाहिले. परंतु त्या अल्पशा कालावधी देखील त्यांनी आरोग्यमंत्री या पदाला साजेशे काम केले. आरोग्य खात्यातील अनेक प्रलंबित मागण्या त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पुर्ण केल्या. जसे की ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत,म्हणून जवळ जवळ  900 च्या  आसपास त्यांनी डॉक्टरांची भरती केली.आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये कार्य करणाऱ्या डॉक्टरांना कितीतरी दिवस कंत्राटी तत्वावर राबवून घेतले जात होते. या डॉक्टरांची गेल्या दहा ते बारा वर्षापासूनची सेवेत कायम करण्याची मागणी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धूळ खात पडली होती.अशा कंत्राटी डॉक्टरांना कायम म्हणून सामावून घेण्याचे काम आरोग्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केले. 
आशा सेविका की ज्यांनी कोरोना काळामध्ये सर्वेक्षणाचे खूप मोठे काम केले.त्याचबरोबर लसीकरणाचे पोलिओ डोस अशी कितीतरी कामे अशा सेविकांनी करून देखील त्यांना मिळणारे  वेतन अल्प होते. आशा सेविकांनी आंदोलन केले त्यावेळी एकनाथ शिंदेच आरोग्य मंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मानधना मध्ये भरघोस अशी वाढ त्यांनी केली. कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी मेळघाट पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे आपल्या सगळ्यांचा दवाखाना ही संकल्पना अवघ्या महाराष्ट्रामध्ये गतिमान करण्याचे काम त्यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेली कामे bandhkam mantri mhnun kam  

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री पदावर कार्य करत असताना एकनाथ शिंदे यांनी वेगाने काही कामे हाती घेतली पुढील प्रमाणे

1. समृद्धी महामार्ग samrudhi mahamarg 

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून असताना एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताच्या गौरवाची बाब म्हणजे हे लक्षात घेऊन या कामामध्ये जातीने लक्ष घालण्याचे केले. सर्वसामान्य लोकांच्या जमिन रस्ते बांधण्यासाठी हस्तगत करत असताना लोकांवरती अन्याय होणार नाही, यासाठी स्वतः लक्ष दिले.या मार्गाचे बर्‍यापैकी काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील प्रगतीपथावर असल्याचे आपल्याला दिसते.आतापर्यंत झालेल्या रस्ते विकासातील जमीन अधिग्रहनामध्ये लोकांना सर्वाधिक मोबदला मिळाला आहे .एक आगळा वेगळा प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेणारा परंतु नेत असताना लोकांची कुठेही गैरसोय व अन्याय होणार नाही यासाठी खास खबरदारी घेण्यात आली आहे.  

2. मुंबई पुणे मेघा हायवे दूरूस्ती  mumbi pune high way 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे त्या द्रुतगती मार्गावर देखील क्षमता वाढावी यासाठी अनेक नवीन बोगदे, तसेच रस्ता रुंदीकरण व अनेक वळणे कमी करून भुयारी मार्गाची आखणी केलेली आहे. याचीदेखील काम पूर्ण झालेले आहे अपघातांचे प्रमाण कमी करणे माती यामागे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा हेतू दिसतो. 

3. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग thane borivli bhuyari marg 

ठाणे आणि बोरिवली मार्गावर प्रचंड प्रमाणात ट्राफिक होते.खूप मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागतो.यासाठी एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे ते बोरवली या ठिकाणी भुयारी मार्गाच्या माध्यमातून ठाणे आणि बोरिवली अंतर केवळ दहा ते बारा मिनिटांमध्ये गाठता येणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या विचाराधीन नाही याचाही पाठपुरावा एकनाथ शिंदे करत आहे.

4. ठाणे ते घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण

ठाण्यावरून घोडबंदरला येत असताना ही वाहतूक कोंडी होते अतिशय भयानक आहे. यावर उपाय म्हणून हा रस्ता चौपदरीकरण व्हावा यासाठी एकदा शिंदे यांनी  प्रयत्न केले परंतु बराचसा भाग हा सामाजिक वनीकरणाच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे वनविभाग यासाठी अडचणी निर्माण करत होता. कारण मोठ्या प्रमाणात झाडांची होणार होती. यावर पर्याय म्हणून उन्नत मार्गाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हाती घेतला आहे. खरोखरच लोकांना कशाची गरज आहे.याची संपूर्ण जाण आपले मंत्रीपद  संभाळत असताना एकनाथ शिंदे यांना असलेले आपल्याला दिसते. 

5. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामगिरी rste vikas mandal adhyksh 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम. एस.आर. टी. सी. चे अध्यक्षपद 2014 साली  एकनाथ शिंदे यांना मिळाले. ज्यावेळी त्यांनाही पद मिळाले त्यावेळी रस्ते विकास महामंडळ म्हणजे कर्जाचा डोंगर. असे सर्व चित्र होते परंतु असे असले तरी उत्तम नियोजनाच्या माध्यमातून मुंबई पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, सी लिंक त्याचबरोबर इतर अनेक रस्त्यांचे रुंदीकरण अशी कितीतरी कामे त्यांनी अध्यक्ष म्हणून हाती घेतलेल्या आपल्याला दिसतात.

6. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामगिरी thane palak mantri mhnun kam 

ठाण्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जर कोणते महत्त्वाचे काम केले असेल? तर ते काय  म्हणजे ज्या इमारती धोकादायक आहेत.त्या इमारतीतील लोकांचे पुनर्वसन करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम,त्याचबरोबर ठाण्यात घरकुल योजनेच्या माध्यमातून अनेकांना घरी उपलब्ध करून देण्याचे काम एक पालक मंत्री म्हणून त्यांनी केले.ठाण्यात अनेक लोक अनधिकृत इमारतीत राहत असले तरी त्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट या योजनेच्या अंतर्गत पूर्ण केल्याचे आपल्याला दिसते. लोकांना सार्वजनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी विशेष असे नियोजन केल्याचे आपल्याला दिसते.

ठाणे शहरासाठी काही आगामी प्रकल्प thane agami yojna 

एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय इमारती असल्यामुळे तसेच मुंबई लगतचे एक उपनगर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळते,म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी रस्ते रुंदीकरण प्रकल्प हाती घेतला आहे.त्यासाठी ते लोकांना विश्वासात घेत आहेत. ज्या इमारती अधिकृत आहेत मात्र तरीदेखील रस्त्यांच्या सोयीसाठी त्यांना तिथून हलवावे लागणार आहे. त्यांना 25 टक्के अधिकची जागा देऊन त्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडवून एक सुंदर ठाणे, सुरक्षित ठाणे,स्वच्छ ठाणे या दिशेने त्यांची सर्व वाटचाल सुरू आहे. 

आजच्या विशेष लेखाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या विषयी माहिती व त्यांच्या  कार्याचा परिचय करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.जेणेकरून आजच्या राजकीय घडामोडीचा आपल्याला काही एक अंदाज लावण्यास हा लेख नक्की मदत करेल. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या तीन पक्षांनी मिळून जे सरकार स्थापन केले त्या सरकारकडून महाराष्ट्राचा हवा तेवढा विकास झालेला दिसत नाही. त्याचबरोबर अनेक कामे करत असताना तीन पक्ष्यांच्या सरकारमुळे अडचणी येत आहेत. प्रकल्प पूर्ण करताना अडचणी येत आहेत व निर्णय घेताना विलंब होत आहे.असे ट्विट एकनाथ शिंदे यांचे असून त्यांच्या मते जर  महाराष्ट्राला प्रगती करायची असेल तर शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापून महाराष्ट्राच्या जनतेला एका विकासाच्या दिशेने घेऊन जावे.अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेऊन  आज तरी थोडा वेगळा मार्ग स्वीकारत असल्याचे सध्या तरी चित्र आहे.असे असले तरी ,मी एक सच्चा शिवसैनिक आहे या त्यांच्या  विधानातून त्यांना काय सूचित करायचे आहे हा पुढचा काळच ठरवेल.सामान्य लोकांना या लेखाच्या माध्यमातून घडणाऱ्या घडामोडीची माहिती देणे हा एकमेव हेतू आहे.

महराष्ट्रातील  आणि देशातील राजकीय घडामोडीच्या निमित्ताने rajkiy ghdamodi maharashtra 

     महाराष्ट्रातल्या राजकारणाची गुंतागुंत पाहता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्या अगोदर महाराष्ट्रात झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि आज पुन्हा महाविकास आघाडीत बिघाडी. असे काही होताना दिसत आहे. खरे तर जनतेच्या विकासाचे राजकारण नुसते बोलून उपयोग नाही. तर ते व्हायला हवे.मग केंद्रात असो की राज्यात. पक्ष कोणता याविषयी मला बोलायचे नाही. म्हणून म्हणतोय ,सुजान नागरिकानो !दक्ष व्हा! ह्या  लोकशाहीची बळकटी आपल्यावर अवलंबून आहे. जे घडत आहे त्याचे माझ्याशी काही देणे घेणे नाही. ही भूमिका सोडा व राज्य असो की देशातील निवडणुका यापुढे जाऊन अगदी म्हणेन की  गावातील ग्रामपंचायत  निवडणुका असो,आपण केवळ एक मत देत असतो हे डोक्यातून काढा.आपले एक मत म्हणजे कोणत्यातरी विचारधारेचे समर्थन असते.की जी विचारधारा देशाला कोठे नेणार हे ठरणार असते . हे विसरू नका.सजग व्हा ! जागे व्हा !अलीकडे काही वर्षात सतत राजकारणात येणारे चढ उतार आपल्या भारत देशाच्या विकासासाठी नि जगातल्या सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय लोकशाहीसाठी  घातक आहेत हे धडधडीत सत्य नाकारून चालणार नाही.चला तर  संकल्प करूया,नि ही लोकशाही बळकट बनवूया. जाता जाता एकच खंत व्यक्त करतो मला वाटायचे गरीब मतदार एका दारूच्या बाटलीपायी ,कोणी गरीब भगिनी छोट्या भेटवस्तूपायी आपले मत विकतात. हे पाहून वाईट वाटायचे ;पण अलीकडे जे काही घडतआहे.ते पाहून कळले की  कोणी किती गबरगंड म्हणजे श्रीमंत असो.आज तत्व नाही स्वार्थ मध्ये येतोय. मग तो सत्तेत असो की आपल्या जगण्या - वागण्यात असो, की नात्यात असो.आजकाल या मायेने(संपत्तीने)नात्यातील मायेला(प्रेम)देखील पातळ करून टाकले आहे.जरा नीट विचार करा.नि सजग नागरिक बना.अश्या नागरिकांची माझ्या भारत मातेला गरज आहे.भारत माता की जय.धन्यवाद !
    
अहो! आमचे हे लेख देखील वाचा फक्त निळ्या अक्षरांवर क्लिक लेख हजर 








 



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area