Type Here to Get Search Results !

जागतिक योग दिन निबंध बातमी शुभेच्छा |Jagtik Yog Din Nibandh Batmi Shubhecha

 जागतिक योग दिन निबंध बातमी शुभेच्छा माहिती मराठी | World Yoga Day Essay News Wishes Information Marathi
 

आजच्या लेखामध्ये आपण आज जागतिक योग दिन या विशेष लेखमाले अंतर्गत जागतिक योग दिन निबंध,जागतिक योग दिन बातमी लेखनआणि जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा पाहणार आहोत. मागील लेखमालेमध्ये आपण योग म्हणजे काय  ? तर शरीर आणि मन यांची जडणघडण जो करतो त्याला योग म्हणतात. हे आपण पाहिलेच आहे.त्याच बरोबर योगा करण्याचे कोणते फायदे होतात? हे ही पहिले आहे.चला तर मग आजच्या जागतिक योग दिनाच्या विशेष लेखाला सुरुवात करूया.


जागतिक निबंध बातमी शुभेच्छा माहिती
जागतिक योग दिन निबंध बातमी शुभेच्छा



 जागतिक योग दिन निबंध | Jagtik Yog Din Nibandh


  विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर निबंध हे परीक्षेत लिहावे लागतात. कोणत्याही परीक्षेमध्ये शक्यतो मानवी जीवनाशी संबंधित विषय विचारले जातात. अशाच निबंधापैकी एक निबंध म्हणजे जागतिक योग दिन निबंध होय. जागतिक योग दिन निबंध आपल्याला खालील प्रमाणे लिहिता येईल.



नका होऊ हीनदीन,

साजरा करूया योग दिन.



माणसाला जीवन जगत असताना अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा तर आवश्यक असतातच या गरजांची कमतरता जाणवू लागली की माणसाला जगणे असह्य होते. या मूलभूत गरजांच्या जोडीला लागणारी गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्यासाठी आपल्याला नियम करायचा आहे तो नियम म्हणजे दररोज योगा करणे. वेगवेगळ्या प्रकारची आसने करणे. म्हणूनच पैसा संपत्ती सर्व असले तरी चांगले आरोग्य जगताआले पाहिजे.आरोग्यम् धनसंपदा या सूविचारातून आपल्याला आपल्या आरोग्याचे महत्त्व कळते. 24 तासापैकी एक तास आपण आपल्या आरोग्यासाठी दिला पाहिजे.म्हणजेच योगासने आणि योगसाधना यांना दिला पाहिजे.



💥महाराष्ट्र शासन 31 शिष्यवृत्ती योजना माहिती 👈




 योग ही भारतातील एक प्राचीन विद्या आहे.आज योगाचे महत्त्व अवघ्या जगाला कळले आहे.म्हणूनच 21 जूनला सर्वत्र जागतिक योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. या जागतिक योग दिनालाच आंतरराष्ट्रीय योग दिन असे देखील संबोधले जाते. भारतामध्ये असणारी आरोग्य विद्या खूप प्राचीन असून ही विद्या अवघ्या जगाला मिळायला हवी.सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभे मध्ये जागतिक पातळीवर योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव मांडला.याबाबत सखोल चर्चा घडवून आणली.2014 मध्ये सप्टेंबर महिन्यात हा प्रस्ताव मांडला गेला.हा प्रस्ताव सादर केला त्यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेचे 193 सदस्य उपस्थित होते. यापैकी 175 सदस्यांनी जागतिक योग दिन साजरा केला जावा. याला अनुमोदन दिले. यानंतरच संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक योग दिन साजरा करण्याला परवानगी दिली.



💥Iti ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायला सुरुवात👈



2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेची परवानगी मिळाल्यानंतर  21 जून 2015 रोजी मोठ्या उत्साहात भारतातच नव्हे तर अवघ्या जगामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. विश्वातील इतर राष्ट्रांप्रमाणे आपल्या भारत देशाकडे देखील जगाला देण्यासाठी काहीतरी आहे ती विद्या म्हणजे योग विद्या होय.जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज सर्वांनाच योगाचे महत्त्व कळत आहे. योगा केल्यामुळे शरीराला बळकटी मिळते.आपले स्नायू बळकट होतात त्याचबरोबर मनाचे स्वास्थ्य देखील चांगले राहते.योगाचे असे दुहेरी फायदे आपल्या शरीराला होत असल्यामुळे व्यक्तीला दीर्घायुषी करण्यामध्ये योगा चांगली भूमिका बजावतो आहे.


आज अवघ्या जगाला आज कळून चुकले आहे की ऊतम आरोग्य केवळ योगाच राखू शकतो.म्हणूनच की काय अलीकडे तर असे चित्र आहे की भारतापेक्षा अमेरिका,इंग्लंड, जपान,नेपाळ यासारख्या अनेक देशांना या योगाचे महत्त्व कळल्यामुळे हे देश 21 जून जागतिक योग दिन म्हणून एक दिवस योग करणे याच्यापुढे जाऊन. योगा ही चळवळ बनली पाहिजे.यासाठी 365 दिवसांपैकी

1 दिवस योगा करणे हे त्यांना मान्य नाही. तर दररोज योग केला पाहिजे.अशी चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


 करायचीय आजारांवर मात,

तर धरावी लागेल योगाची साथ.


हे अगदी खरे आहे.अलीकडे आपण पाहतो ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही त्या व्यक्तीला देखील हृदयविकार,रक्तदाब,मधुमेह यासारखे आजार होत आहेत.अन्नपदार्थातील भेसळ,शारीरिक कसरतीचे काम नसणे व मानसिक तान तनाव अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्‍न ऐरणीवर येत आहेत.व्यक्ती वरून धडदाखट  दिसत असला तरी मानसिक तानतनावा मुळे त्याचे स्वास्थ्य धोक्यात आल्याचे दिसत आहे,म्हणूनच शरीर आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी आपले शरीर आतून मजबूत राहण्यासाठी सर्वांनी योगा केला पाहिजे. 



जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मोठ्या योगी म्हणजे ज्यांना योगाची सखोल माहिती आहार अशा लोकांना आमंत्रित करून सामान्य लोकांना योगाचे धडे दिले जातात.योगाचा प्रचार आणि प्रसार घराघरापर्यंत जाण्यासाठी प्रसार माध्यमांच्या सहाय्याने दूरदर्शन, रेडिओ यांच्या माध्यमातून भारत सरकार जागतिक योग दिनाची जनजागृती करण्याचे काम करत आहे. यावर्षी देखील मन की बात मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये योगाची थीम काय असेल हे सांगत असताना मानवी आरोग्यासाठी योग ही थीम मांडली आहे. म्हणजेच काय तर उत्तम आरोग्य ठेवायचे तर योग केलाच पाहिजे. असाच या मागील उद्देश आहे.



केवळ जागतिक योग दिन आहे म्हणून एक दिवस योगा करून उपयोग नाही. योगा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे, तर आणि तरच खऱ्या अर्थाने या योगविद्येचा आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोग झाला असे म्हणता येईल. जागतिक योग दिन निबंध लेखनातून आपल्याला भारताने आपल्याकडे असलेली योग विद्या जगाला देण्याचे काम कशा पद्धतीने केले त्याची माहिती मिळाली. त्याच बरोबर योग आपल्या जीवनामध्ये का गरजेचे आहे ? हे देखील आपल्याला कळाले असेल.आपल्याला जर आपले मानसिक आरोग्य उत्तम राखायचे असेल त्याचबरोबर शारीरिक आरोग्य देखील जपायचे असेल तर सगळ्यात रामबाण उपाय योग आहे.


जागतिक योग दिन निबंध पाहिल्यानंतर योगाचे महत्व समजलेच असेल. विद्यार्थी मित्रांना या जागतिक योग दिनानिमित्त बरेचदा बातमी तयार करायला सांगितली जाते. बातमी लेखन आदर्श कसे करावे? याविषयी स्वतंत्र लेख येईलच.परंतु सध्या मात्र योग दिनाची बातमी आपण कशा पद्धतीने करू शकतो याविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.



 जागतिक योग दिन बातमी लेखन | Jagtik Yog Din Batmi Tayar Kara


हे बातमी लेखन खालील पद्धतीने करावे.



अशोक नगर मनपा माध्यमिक  शाळेत जागतिक योग दिन
उत्साहात साजरा


दिनांक 22 जून,आमच्या वार्ताहरकडून


 धारणपणे दरवर्षी 15 जूनला शाळा भरत असतात. शाळा भरल्यानंतर योग दिन ही मुलांसाठी एक पर्वणी म्हटले तरी तो दिवस म्हणजे 21 जून रोजी असणारा जागतिक योग दिन होय. यावर्षी अशोक नगर मनपा माध्यमिक शाळा कांदिवली येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक योग दिनासाठी कांदिवली परिसरातील प्रसिद्ध योग अभ्यासक राजू पांडे यांना शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.त्याच बरोबर जे विद्यार्थी उत्कृष्ट सूर्य नमस्कार करतात त्यांचा देखील गुणगौरव जागतिक योग दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.



💥डिप्लोमा प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू👈



 

 साधारणपणे सकाळी आठच्या सुमारास जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम जागतिक  योग दिनाच्या निमित्ताने योगा भ्यासाक राजू पांडे यांचे स्वागत करण्यात आले.स्वागतानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. योगा केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात. याबाबत त्यांनी स्वानुभव देखील सांगितले. विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर ही प्रात्यक्षिके करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे. याविषयी राजू पांडे,योग अभ्यासक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही योगाच्या मदतीने आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी दक्ष असले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.


 कार्यक्रमाच्या शेवटी ज्या विद्यार्थ्यांनी आसनाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके केली. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यानंतर शेवटच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांनी चालता बोलता म्हणजेच दैनंदिन क्रिया करत असताना जी काही मोजकी योगासने करता येतात जसे की ताडासन,वृक्षासन, वज्रासनव पद्मासन अशी सोपी सोपी आसने करायला हवीत.काही मुलांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सारिका भोर यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. पसायदान झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले. थोडक्यात अतिशय प्रसन्न वातावरणात अशोक नगर मनपा माध्यमिक शाळेमध्ये जागतिक योग दिन संपन्न झाला. 



जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा | Jagtik Yog Din Shubhecha


जागतिक योग दिन निबंध आणि जागतिक योग दिन बातमी लेखन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की योगा केला पाहिजे यापेक्षाआपला योगा हा आपला श्वास बनला पाहिजे,असे मला तरी वाटते. जणू काही असा एक नियमच बनवला पाहिजे  योगा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडणारच नाही भले मग तो दहा मिनिटे का होईना. योगा हा केलाच पाहिजे.आज योगाचे महत्त्व जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पाहिल्यानंतर आता आपण शुभेच्छा संदेश किंवा एसएमएस यांच्या माध्यमातून आपण आपले मित्र नातेवाईक यांना पाठवून जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. शुभेच्छा केवळ शुभेच्छा नकोत तर त्यातून असा संदेश गेला पाहिजे की योगा ही eichik गोष्ट न राहता शाळा महविद्यालयातील ती अनिवार्य बाब बनली पाहिजे तर आणि तरच अनेकांचे आरोग्य उत्तम राहील.चला तर मग काही छान-छान जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा पाहूया ------------



1. पळवून लवायचाय तुम्हाला रोग,

 करा की हो मग दररोज योग.

जागतिक योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!



2. आलाय मनावर ताण  तणाव,

घाबरता कशाला घ्या की योगाचे नाव,

जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!




3.  आजारांशी करायची कट्टी,

  करता आळसाची करा बुट्टी,

 नको आता योगाला सुट्टी, 

सांगू सगळ्या जगाला योगाची महती,

 जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!



4.   जून आला, जुन  आला

 पावसाळा सुरू झाला,

 आता करा बोल बाला,

 21 तारखेला योग दिन आला.

 जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा



5. ताई, दादा, अक्का विचार करा पक्का

योगाला नका करू एक्का दुकका,

दररोज योगा करणार हा निर्धार करा पक्का.

जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा



जागतिक योग दिनाचा निबंध,बातमी व शुभेच्छा पाहिल्यानंतर आता पाहूया जागतिक योग दिनाच्या थीम बद्दल माहिती पाहूया .



जागतिक योग दिन 2023 थीम |


जागतिक योग दिना निमित्त दरवर्षी एक थीम निवडली जाते.नि त्यानुसार योगाचा प्रचार आणि प्रसार केला जातो.यावर्षी म्हणजे 2022 या वर्षी जागतिक योग दिनाची थीम आहे.मानवतेसाठी योग.म्हणजेच अखिल मानव जातीचे कल्याण योगा करू शकतो. मागील वर्षी कोरोना संकट म्हणून 2021 जागतिक योग दिनाची थीम होती योगासह घरी रहा.त्या अगोदर म्हणजे 2019 साली योगा फॉर हार्ट.या थीमच्या माध्यमातून दरवर्षी योग हा अनेक लोकांपर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे. यावर्षी 2023 वसुधैव कुटुंबकम साठी योगा


आजचा हा लेख जागतिक योग दिन शुभेच्छा,निबंध व बातमी,आपल्याला नक्कीच आवडला असेल. तर यातील योग दिनाची बातमी,जागतिक योग दिन यावर आधारित निबंध व संदेश सगळे मिळेल.



FAQ | योग दिनावर काही प्रश्न

1. जागतिक योग दिन कधीपासून साजरा केला जात आहे ?

जागतिक योग दिन 21 जून 2015 पासून साजरा केला जात आहे.

2. 2022 चा योग दिन कोणत्या वारी आला आहे ?

2022 ला योगदिन मंगळवारी आला आहे.


3. 2023 यावर्षी जागतिक योग दिनाची थीम कोणती आहे ?

2023 यावर्षी योग दिनाची थीम मानवतेसाठी योग ही आहे.


आमचे इतर लेख वाचा


योग दिनाचे सूत्रसंचालन


मुलींना मोफत निवासी नर्सिंग कोर्स 2023 24  प्रवेश अर्ज सुरू





                   


                  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area