Type Here to Get Search Results !

लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मराठी निबंध| Lokshahit Matdanache Mhattv Marathi Nibandh

 लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मराठी निबंध | Lokshahit Matdanache Mhattv Marathi Nibandh

आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जी सद्य परिस्थिती उद्भवलेली आहे आणि एकंदरीत  राजकारणामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली आहे. म्हणूनच याला अनुसरून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये लोकशाहीत मतदानाचे महत्व हा निबंध हमखास विचारला जाऊ शकतो.लोकशाहीमध्ये मतदान किती महत्वाचे आहे ? थोडक्यात एक प्रकारे मतदानाचे महत्व असे जरी या निबंधाला म्हटले तरी वावगे ठरणार नाही.Matdanache Mhattv in Marathi हे जाणण्यासाठी चला तर मंग लोकशाहीत  मतदानाचे महत्त्व म्हणजेच  IMPORTENCE OF VITING म्हणजेच काय तर  मतदानाचे महत्व किंवा लोकशाहीत मतदानाचे महत्त्व या निबंधाला सुरुवात करूया.हुशार मुलांची अभ्यास पद्धती 

लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मराठी निबंध
लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मराठी निबंध

लोकशाहीत मतदानाचे महत्व मराठी निबंध | Lokshahit Matdanache Mhattv Marathi Nibandh

संपूर्ण विश्वामध्ये जी लोकशाही राष्ट्र आहेत.त्या  राष्ट्रांमध्ये ज्या राष्ट्र किंवा देशाचे नाव गौरवाने घेतले जाते .ते राष्ट्र किंवा तो देश म्हणजे आपला भारत देश होय.कारण का तर जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची आहे. प्रचंड लोकसंख्या असून देखील आपल्या देशाचा राज्यकारभार हा लोकशाही तत्त्वाने चालतो. म्हणूनच भारत देशाला विशेष असे महत्त्व आहे.लोकशाहीचा विचार करत असताना जे प्रतिनिधी निवडले जातात ते प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेने दिलेला कौल म्हणजेच केलेले मतदान यावरूनच निवडले जातात. सत्ता  कोणाच्या हातामध्ये द्यायची ?किंवा असणार हे मतदानावरून  ठरत असते. म्हणूनच या निबंधामध्ये आपण लोकशाहीत  मतदानाचे महत्त्व काय आहे? हे पाहणार आहोत. Lokshahit Matdanache Mhattv Marathi Nibandh हा परीक्षेसाठी imp निबंध आहे. 


लोकशाहीत मतदान हे खास आहे,

गरिबांनाही सत्तेत येण्याचे अस्त्र आहे,

मग्रूर पुढाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्याचे शस्त्र आहे,

मतदान हे लोकशाहीला बळकट करणारे गुपित आहे,


थोडक्यात काय तर लोकशाहीमध्ये मतदानाला विशेष असे महत्त्व आहे. हे वरील कवितेतून  आपल्याला समजले असेलच.जर आपण विचार करत असू,चिंतन करत असू तर -----कधी आपल्याला असा प्रश्न पडलाय का? की मतदान ही संकल्पना कशी अस्तित्वात आली असेल. तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीच्या व्याख्यानेनुसार आपणच सर्वानी आपल्यातीलच काही लोकाना किंवा लोकांवर आपली यंत्रणा,प्रशासन व्यवस्थित करण्याची जबाबदारी देणे म्हणजे लोकशाही होय. आणि ही जबाबदारी कोणी व्यवस्थित रित्या पार पाडू शकेल याचा अंदाज घेण्यासाठीच जे घेतले जाते ते मतदान होय. मतदान देत असतात आता यापुढे सेवेची संधी कुणाला द्यायची? थोडक्यात मतदार  किंवा मतदान करणारा  हाच  लोकशाहीचा आत्मा आहे. म्हणजेच लोकशाहीत मतदानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मराठी निबंध हा निबंध बोर्ड परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. 

जी व्यक्ती भारत देशाची नागरिक आहे व वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेले आहेत. अशा व्यक्तीला भारतीय राज्यघटनेने म्हणजेच,भारतीय संविधानाने मतदान करण्याचा अधिकार हा दिलेला आहे.  व्यक्ती देत असलेले मतदान हे जरी एक असले तरी अशा एकेका मतांनी मिळून आपला देश कोण चालवणार?इतका भला मोठा निर्णय घेतला जातो.परंतु मला इतकी लोकांमध्ये जागृती झालेली आपल्याला दिसत नाही. अनेक लोक मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मौज - मस्ती करण्यामध्ये घालवतात. ही आपल्या देशाची आणि आपल्या लोकशाहीचे दुर्दैव  आहे. असे केले तर देश चालवण्यासाठी सक्षम लोकांची मदत कशी होणार? हा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? लोकशाहीत मतदान इतके महत्त्वाचे असून देखील मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली बऱ्याच निवडणुकांमध्ये ते 60 टक्‍क्‍यांच्या पुढे जाताना दिसत नाही.ही खेदाची बाब आहे.आणि म्हणूनच लोकशाहीमध्ये मतदाना विषयी जागृती  होणे अतिशय गरजेचे आहे. आपली लोकशाही जर आपल्याला ताकदवान व  मजबूत करायची असेल तर 100 टक्के मतदान होणे ही काळाची गरज बनली आहे. या देशाचे भविष्य कसे असणार?कोणाच्या हातात असणार?हे मतदारांच्या हातात आहे. त्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे अतिशय गरजेचे आहे. मतदान ही आपली जबाबदारी आहे.हे आपले आद्य कर्तव्य आहे.अशी भूमिका ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळीच आपली लोकशाही मजबूत होण्याकडे वाटचाल सुरू आहे असे म्हणता येईल. 

थोडक्यात काय तर लोकशाहीमध्ये मतदान करणे  हे गरजेचे आहे.आज आपण आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या जी परिस्थिती अनुभवत आहोत ती अतिशय भयानक अशी आहे. ज्या पक्षाला आपण मतदान केले त्या पक्षातीलच लोक जर बंडखोरी करत असतील. मग आपली लोकशाही टिकणार कशी? जे विरोधात उभे राहिले तेच जर एकत्र येऊन सत्ता किंवा सरकार स्थापन करत असतील तर मग राजकारणात तत्व राहिले कुठे ?असे होता कामा नये.यासाठी आपल्याला मतदान करत असताना खूप विचार करून आपले मत म्हणजे एक विचारधारा आहे.त्या  विचारधारेचे  आपण समर्थन करत आहोत. ही भूमिका लोकशाहीमध्ये मतदान करत असताना असली पाहिजे. अमुक व्यक्तीने सांगितले म्हणून. मी अमुक अमुक व्यक्तीला मतदान का  केले?तर  ती माझ्या नात्यातली  आहे.या भूमिकेने आपण मतदार करणार लोकशाही ही केवळ नावाला राहणार.हे सर्व बदलायचे असेल तर लोकशाही मध्ये आपले मतदान  काही एक  विचार करून  केले पाहिजे. देशाचे भवितव्य विचारात घेऊन केले गेले पाहिजे. तर आणि तरच भारताची आपली लोकशाही एवढी मोठी असून उपयोगाची नाही.तर ती लोकशाही गुणवत्तापूर्ण लोकशाही म्हणून ओळखली गेले पाहिजे एवढीच अपेक्षा. 

आजचा हा लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व हा मराठी निबंध आपल्याला नक्कीच आवडला असेल. सध्या राजकारणामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावरून लोकशाहीमध्ये मतदान अतिशय महत्वाचे आहे. याची कल्पना आपल्याला यावी म्हणूनच लोकशाहीत मतदानाचे महत्त्व हा निबंध Lokshahit Matdanache Mhattv Marathi Nibandh जाणीवपूर्वक घेण्यात आलेला आहे. 

      महाराष्ट्रातील ही राजकारणातील अशी अवस्था पाहिल्यानंतर दहावी बोर्ड परीक्षा किंवा इतर परीक्षांना देखील लोकशाहीत मतदानाचे महत्व निबंध म्हंजेव importance of voting नक्कीच  आपल्याला विचारला जाऊ शकतो.लोकशाहीत मतदानाचे महत्व यासंदर्भात आपल्याकडे काही अनेक वेगळे संदर्भ असल्यास कमेंट करा.आमचा हा लोकशाही मध्ये मतदानाचे महत्व आणि निबंध  कसा वाटला ते नक्की कळवा!धन्यवाद!


आमचे हे लेख अजून वाचले नाहीत ! अहो जरूर वाचा. 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area