प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुनथ यांचे दुःखद निधन |Prashidha Gayak Kk Urf Krushnkumar Kunnath Yanche Nidhan
ना चिट्टी ना कोई संदेश,
जाने वो कौनसा है देश ,
जहा तुम चले गये |
अगदी असेच काहीसे. प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुनथ (अधिक माहितीसाठी क्लिक करा)यांचे दुःखद निधन या श्रद्धांजली पर लेखातून सांगायला दुख होत आहे की गेल्या काही दिवसांपासून कला विश्वाला एका वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे.खूप मोठे कलाकार,गायक,संगीतकार आपल्याला सोडून जात आहेत.एवढेच काय तर अनेक खेळाडू देखील जात आहेत .आजच पहा 1 जूनला वयाच्या अवघ्या 53 वर्षी प्रसिद्ध गायक उर्फ कृष्णकुमार कुननाथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना dnyanyogi.com च्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.
KK / कृष्णकुमार माहिती(toc)
केके यांचा जीवन परिचय | KK Yancha Jivan Parichay
केके उर्फ कृष्णकुमार कुनथ हे एक संगीत विश्वातील अनमोल रत्न होते,के जे आज आपल्यामध्ये राहिले नाही. नियतीने त्यांचा दर्द भरी आवाज या भूतलावरून कायमचा हिरवून घेतला. तरी त्यांच्या अजरामर गाण्यांनी ते कायम लक्षात राहतील अस म्हणतात न व्यक्ती जाते पण तिचे काम मागे राहत असते.तीच त्या व्यक्तीची खरी कमाई असते अशीच गायन विश्वात आपली छान ओळख बनवणारे व्यक्तिमत्व म्हणजे kk उर्फ कृष्ण कुमार होय.त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी भारत देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव केरळ मधील शिरोच या गावी गेले. kk यांनी केवळ हिंदी चित्रपट नव्हे तर तेलगू ,कन्नड ,तमिळ अशा वेगवेगळ्या सिनेमांमध्ये ,वेगवेगळ्या भाषांमध्ये आपली गाणी गायली. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली येथील माउंट सेंट मेरी शाळेमध्ये झाले.त्यांचा गायन क्षेत्रातील प्रवास अतिशय खडतर आहे अगदी सुरुवातीला चित्रपटातील गीत मिळत नाहीत म्हणून त्यांनी जाहिरातींपासून आपल्या गायनाला रंग दिला व तेथून गायनाला सुरुवात केली. त्यांनी जवळजवळ तीन ते साडेतीन हजार जाहिरातींची गीते गायली होती पण म्हणतात, ना प्रयत्न केले की यश मिळते अगदी kkम्हणजेच गायक कृष्णकुमार यांच्या बाबतीत देखील ते तितकेच खरे आहे आणि त्यांचा हा जजबा पाहूनच सिनेमातील गाणी देखील त्यांना मिळू लागली. हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये त्यांनी शेकडो गाणी गायली. त्याच बरोबर तेलुगु आणि इतर भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली यातून त्यांचा व्यासंग आपल्या लक्षात येतो त्यांच्या गायकी कारकिर्दीला कलाटणी मिळाली ती 1999 साली भारत सरकारने 1999 च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय क्रिकेट टीमला उत्साहपूर्ण वातावरन निर्मिती आणि समर्थन देण्यासाठी जोश ऑफ इंडिया `JOSH OF INDAIA, हे गाणे गाण्याची संधी कृष्णकुमार यांना दिली होती.
KKयांच्यावर प्रभाव असलेले गायक | KK Vr Prbhav Aslele Gayak
गायन ही एक कला आहे. आणि या कलेमध्ये योगदान देत असताना आपण नव्याने काही भर घालत असतो परंतु असे असले तरी कोणाचा तरी प्रभाव हा गायक किंवा कोणतीही कला असो हा इतरांचा असतोच अगदी केके यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि आर डी बर्मन यांचा KK यांच्यावर प्रचंड प्रभाव होता आणि हा प्रभाव त्यांच्या गाण्यातून देखील आपल्याला दिसून येतो.KKयांची गायकी ही खूप वेगळा साज आणि बाज असलेली गायकी होती. म्हणून तर आजही तडप तडप के गाणे ऐकताना प्रतेकजन भावनिक होतो का तर त्या गाण्यात तो दर्द ती भावना त्या आवाजाने तीव्र केली आहे म्हणूनच की काय हे गाणे कितीदा ऐकले तरी ऐकत राहवेसे वाटते.
केके यांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश | KK Yancha Bolywood Pravesh
प्रसिद्ध गायक KK यांना बॉलिवूडमध्ये म्हणजेच हिंदी चित्रपटांमध्ये गाण्याची पहिली संधी कोणी दिली, तर ते आहेत विशाल भारद्वाज.ते एक प्रसिद्ध चित्रपट निर्देशक होते आणि त्यांनीच कृष्ण कुमार कुननाथ म्हणजे KK यांना माचिस या चित्रपटात पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी दिली माचीस चित्रपटातील छोड आये हम या गाण्यापासून KK यांना एक वेगळी ओळख मिळाली आणि त्यानंतर मात्र त्यांची हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये एक दर्दी गायक म्हणून ओळख झाली. की जी आज तागायत होती म्हणून तर अलीकडे देखील अनेक नवीन गाणी त्यांना मिळत होती.आज खूप मोठी पोकळी निर्माण करून हा गायक आपल्याला अलविदा करत आहे,पण खरच माझे देखील मन मानत नाही की KK आपल्यात आज नाहीत. असो पण जे वास्तव आहे त्याचा स्वीकार.
केके यांची भावनाप्रधान आणि इतर गाणी | KK Yani Gayleli Gani
भावनाप्रधान गाणी म्हणजेच इमोशनल सॉग या अनेकांना आवडत असतात त्यात खासकरून ही गाणी प्रेमावर असतील तर ऐकणाऱ्याच्या हृदयावर ती लगेच पकड घेतात अशीच काही गाणी केके यांनीदेखील गायली.हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला चित्रपट म्हणजे हम दिल दे चुके सनम आणि याच सिनेमातील, पिक्चर मधील तडप तडप के हे गाणं कोणी गायले असेल ते गाणे गाणारे गायक आहेतKk उर्फ कृष्णकुमार यांनीतुम मिले, बचना ऐ हसीनो,आशिक बनाया आपने, तेरे नाम, सच कह रहा है दीवाना, तुम हो मेरा प्यार, ओम शांती ओम, तुम मिले हमको प्यार हुआ, अशी कितीतरी गाणी गायली गाण्यांमधून त्यांनी गायक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली
कृष्णकुमार यांचे निधन वार्ता, बातमी | KK Nidhn Varta
कृष्णकुमार कुनथ म्हणजेच गायक KK कोलकातामध्ये गुरुदास महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात कॉन्सर्ट साठी गेले होते, त्या कॉन्सर्टमध्ये आपला गायनाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. ते मंचावरून वारंवार मागे जात येत होते यावरूनच ते अस्वस्थ आहेत अशी काही लक्षणे दिसत होती परंतु काय माहीत असे होईल? कार्यक्रम आटोपल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलच्या पायऱ्या चढत असता अचानक त्यांच्या छातीमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या.सहकाऱ्यांच्या हे लक्षात आले . त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये तात्काळ हलवले ,परंतु डॉक्टरांना कोणताही उपचार करण्याची संधी नियतीने दिली नाही. आणि डॉक्टरांकडून कृष्णकुमारकुणनाथ यांना मृत घोषित करण्यात आले.असा अंदाज आहे की हा हृदय विकाराचा झटका असावा.परंतु खरे काय ते त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर म्हणजेच शवविच्छेदनानंतर समजेल पण एक खरे की आज KK हे गायकी विश्व सोडून गेलेत.
श्रद्धांजली पर संदेश | KK Nidhn Shok Sandesh
एक महान गायक आज आपले गायकी विश्व सोडून कायमचा गेला. तो ही अचानक ही खूप मोठी घटना आहे.आणि सोडून गेले ते पण अचानक, कोणताही आजार नसताना, त्यामुळे मनाला चटका लावणारी बातमी. बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यामधील प्रातिनिधिक स्वरूपात काही श्रद्धांजली पर संदेश आपण पाहूया यातून KKकिती महान गायक होते हे समजेल.
1. अरमान मलिक | Arman Malik Shok Sandesh
कृष्णकुमार यांच्या प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक म्हणजे अरमान मलिक यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केके सर या जगात नाहीत यावर विश्वासच बसत नाही असा संदेश ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याविषयी माहिती हवीय
2. राहुल वैद्य | Rahul Vaidya Shok Sandesh
राहुल वैद्य यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की मैने सुना की गायक के के का अभी निधन हुआ, है भगवान वास्तव मे क्या हो रहा है. थोडक्यात काय तर अनेक चांगले लोक हे विश्व सोडून चाललेले आहेत.असं का होत आहे समजत नाही.या शब्दात राहुल वैद्य यांनी श्रद्धांजली वाहिली आहे
3. हर्शदीप कौर | Harshdip Kaur Shok Sandesh
हर्षदीप कौर यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून विश्वासच बसत नाही आमचे सगळ्यांचे प्रिय केके आम्हाला सोडून गेले आहेत.आज आमच्यातून केके सर गेले नाहीत, तर एक प्रेमाचा आवाज निघून गेला आहे.अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
जीवन म्हणजे दोन घडीचा डाव हे अगदी खरे आहे. अस म्हणतात माणसाला येण्याचा दिवस माहीत असतो मात्र त्या निर्मात्याने जाण्याचा दिवस कोणता? हे गुपित ठेवले आहे.आजचा दिवस तो आपला उद्या कोणी पाहिलाय?हे अगदी खरे आहे.आज KK उर्फ कृष्णकुमार यांच्या निधनाच्या निमित्ताने एवडेच सांगेन. हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. चांगली कर्मे करत रहा,कारण नंतर तीच आपली ओळख म्हणून शिल्लक राहत असतात.कायम आंनदी रहा इतराना आनंदी ठेवा.
या लेखाला विराम देताना एकच म्हणेन गायकी विश्वातील एक तारा आज निखळला त्या ताऱ्याच्या आतम्यास शांती लागो हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
जीवनात ताणतणाव आहे ?कोरोना, साथीचे आजार,अपघात,छळ व निधन या बातम्या आपले मन हेलवतात. अस काही ऐकले की मन दुखी होते.आपल्याकडे काय आहे ?यापेक्षा काय नाही? यातच आपले बरेचसे आयुष्य निघून जाते. आणि सुख म्हणजे काय असते?हे आपल्याला कळतच नसते. चला तर हे सुख म्हणजे नेमके काय?ते कसे मिळते हे जाणून घेण्यासाठी आमचा सुख म्हणजे काय? हा लेख एकदा जरूर वाचा. नक्कीचआजपासून जीवन जगताना एक वेगळाच परमानंद आपल्याला मिळेल आणि हो लेख वाचल्यावर प्रतिक्रिया नक्की द्या.दिल्याने वाढते म्हणतात,तर एकमेकाना साथ देऊया सुख देऊया.. सुख म्हणजे काय ?हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.