Type Here to Get Search Results !

समाजसेवक अण्णा हजारे | Samajsevak Anna Hajare

 समाजसेवक अण्णा हजारे | Samajsevak Anna Hajare

             आजच्या या लेखांमधून आपण  समाजसेवक अण्णा हजारे या लेखातून त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणार आहोत.

        काही व्यक्ती या जन्माला येतातच मुळी काहीतरी जगावेगळे करण्यासाठी. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे किसन बाबुराव हजारे. यांनाच आपण आदराने अण्णा या नावाने ओळखतो. अण्णा हजारे म्हटलं की, त्यांनी केलेली आंदोलने, उपोषणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.आपल्या उपोषण या शास्त्राच्या साह्याने समाजहितासाठी आपला जीव धोक्यात घालणारे अवलिया म्हणजे अण्णा हजारे. समाजसेवा  म्हणजे अण्णा हजारे आणि अण्णाहजारे म्हणजे समाजसेवा.जणू काही अस एक समीकरणच बनले आहे समाजसेवा आणि अण्णा हजारे हे दोन शब्द समानार्थी बनले आहेत. एवढे मोठे योगदान समाजासाठी देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णा हजारे. त्यांचा जन्म 15 जून 1937 रोजी नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. त्यांची कामे हीच ओळख चला तर त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया. 

समाजसेवक अण्णा हजारे माहिती
समाजसेवक अण्णा हजारे माहिती

अण्णा हजारे आणि सैन्य भरती  | Anna Hajare Sainyat Bharati 

         अण्णा हजारे हे शरीराने धष्टपुष्ट नव्हते.परंतु झाले असे की, 1962 चीनने भारतावर आक्रमण केले. यावेळी भारतात खूप मोठी सैन्यभरती होऊ लागली. या सैन्य भरतीसाठी अण्णा हजारे देखील मैदानावरती गेले. शरीरयष्टी मुळे त्यांना नाकारण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणात सैन्य हवेत म्हणून वाहन चालक या पदासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सैन्यामध्ये भरती करून घेण्यात आले. सैन्यात भरती झालेल्या पासूनच अण्णा हजारे यांचा देश सेवेचा वसा सुरू झाला तो आज तगायत सुरूच आहे.

 

अण्णा हजारे यांचा भारत-पाकिस्तान लढाईत सहभाग | bhart Pak Yudhat Sahbhag 

           अण्णा हजारे सैन्यात असताना कोणत्या लढाईत सहभागी झाले होते का ?असा प्रश्न मला पडला तर वाचनात आले की 1965 ला  पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.या आक्रमणाच्या वेळी अनेक भारतीय जवान मृत्युमुखी पडले.या लढाईच्या वेळी अण्णा हजारे स्वतः एका ट्रक मध्ये सैन्यांना इकडून तिकडे नेण्याचे काम करत होते.थोडक्यात काय तर या लढ्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 


अण्णा हजारे यांच्या गावाविषयी | Ana Hjare Yanchya Gavaavishyi  

         अण्णा हजारे यांचा जन्म जरी भिंगार या गावी झाला असला तरी ,तरी कालांतराने ते आपल्या मूळ गावी म्हणजेच पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी याठिकाणी वास्तव्यास गेले.राळेगणसिद्धीमध्ये आल्यानंतरच त्यांनी आपल्या समाजकार्याला सुरुवात केली.अस म्हटले जाते की समाज सेवेची सुरुवात ही समाजातून नाही तर आपल्या घरापासून करायची असते. अगदी तसेच अण्णा हजारे यांनी आपल्या कार्याची सुरुवात करत्ना केले.आपल्या राळेगणसिद्धी या गावापासून  समाजसेवेला सुरुवात केली. राळेगणसिद्धी मध्ये तरुण मंडळींना एकत्र करून एका तरुण मंडळाची स्थापना केली.  या तरुण मंडळाच्या माध्यमातून दारूबंदी, गावाची स्वच्छता ,दुष्काळी गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या साधनांची सोय कशी करता येईल? याबाबत त्यांनी विशेष कार्यक्रम हाती घेतळे व राळेगण सिद्धी चा कायापालट केला.


अण्णा हजारे व  राळेगणसिद्धीत  दारूबंदी | Anaa Hajare Aani Darubndi Aandoln

                          राळेगणसिद्धीतच नव्हे तर संपूर्ण देशापुढे असलेला यक्ष प्रश्न म्हणजे व्यसनाधीनता. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत  प्यायला पाणी नाही, मात्र हात भट्टी म्हणजेच दारू मिळत असे. थोडक्यात काय तर संपूर्ण गावचा व्यवहार हा दारूच्या  धंद्यावरती अवलंबून होता असे चित्र होते. अशा गावाला दारूच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अण्णा हजारे यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या दारूबंदीच्या लढ्याला प्रचंड विरोध झाला. त्यांना प्रसंगी जीवे मारण्याच्या देखील धमक्या आल्या परंतु अण्णा हजारे यांनी अतिशय संयमाने तरुण पिढीला विश्वासात घेतले. त्यांनी दारूबंदी शक्य करून दाखवली. तंबाखू,सिगारेट,विडी यासारख्या व्यसनांपासून देखील अण्णा हजारे यांनी अनेक तरुणांना परावृत्त केले.आज पूर्ण राळेगण व्यसन्मुक्त आहे.  


अण्णा हजारे आणि वृक्षारोपण | Anaa Hjare Aani Vrukshropn

                     झाडे म्हणजे भूमातेचे जणू ह हिरवे हात होय. या साने गुरुजींच्या विचारांना पुढे नेत अण्णा हजारे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतले. डोंगर, पडीक जमीनअशा  ठिकाणी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले यासाठी त्यांनी वनीकरण योजना आणली.


अण्णा हजारे यांचे गाव तिथे क्रीडांगण योजना | Gaav Tithe Kridangn Yojna

                अण्णा हजारे यांच्या मते विरोधी आत्मा हा सदृढ शरीरात वास करतो, त्यामुळे शिक्षणाबरोबरच आरोग्याकडे व्यायामाकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे म्हणून त्यांनी गाव तेथे क्रीडांगण अशी संकल्पना मांडली आणि राळेगणसिद्धी येथे एका मोठ्या मैदानाची निर्मिती केली. आजही लहान थोर व्यायाम करण्यासाठी एकत्र जमतात. 


अण्णा हजारे यांचा अंधश्रद्धा आणि कर्मकांडे यांना विरोध Aana Ani Andhshrdha Nirmulan

                अण्णा हजारे यांचे विचार हे विज्ञाननिष्ठ विचार होते.त्यांच्या मते विज्ञान युगात देखील माणूस भूत,चेटकिन, शकुन-अपशकुन, शुभ - अशुभ यांना सुशिक्षित माणूस देखील घाबरतो. त्यांच्या मते माणूस हा केवळ वरून पुढारलेला आहे. संतांची शिकवण लोकांच्या अंगी रुजली नाही.एके ठिकाणी ते म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाची पताका हातात घेऊन नाचणारे जेजुरीचा खंडेरायाला बकरे कापून रश्यावर ताव मारतात. हा कसला विरोधाभास म्हणून माणसाच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत याविषयी ते आग्रही होते.


अण्णा हजारे यांनी केलेली उपोषणे  | Anaanchi Uposhne

                 अण्णा हजारे यांनी केलेली उपोषने याविषयी  सांगायचं म्हटलं तर त्यासाठी एक स्वतंत्र असा लेख लिहावा लागेल. परंतु त्यातील जी महत्वाची आहेत त्यांचा आढावा याठिकाणी घेत आहे. अण्णा हजारे यांनी सर्वप्रथम जे उपोषण केले हे 1980 साली  गावातील शाळेला मान्यता मिळत नव्हती ती मिळण्यासाठी. ही मान्यता आकस भावनेने मिळत नव्हती हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण केले.  प्रशासनाने लगेच दखल घेऊन या शाळेला मान्यता द्यावी लागली.

                      महाराष्ट्र शासनाने 20 कलमी कार्यक्रम तात्काळ राबवला जावा. सिंचन सुविधेसाठी विद्युत पुरवठा तात्काळ मिळावा. महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याकडून झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले.अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये पाठवून दिले.अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी केलेले उपोषण, लोकपाल विधेयकासाठी केलेले उपोषण यातून आपल्या लक्षात येते की अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र सरकार यांना कायदे करने  भाग पडले. 


अण्णा हजारे व  माहितीचा अधिकार | Anaa Hjare v Mahiticha Adhikar

                 आपल्याला विविध शासकीय यंत्रणा, शासकीय कार्यालय यांच्याकडून हवी ती माहिती मिळवता येते. हे सर्व अण्णा जर यांनी केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या आंदोलनामुळे शक्य झाले. या माहितीच्या अधिकारामुळे एक पारदर्शकता आणण्याचे काम या माहितीच्या अधिकाराने केले आहे.  शासकीय कामात भ्रष्टाचार होत होता तो कमी व्हायला या माहितीच्या अधिकारामुळे मदत झाली. अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळेच 2003 साली महाराष्ट्र राज्यमध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला. तर 12 ऑक्टोबर 2005 मध्ये संपूर्ण देशामध्ये या माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात आली.


सेवा हमी कायदा आणि अण्णा हजारे | Sevaa Hmi Kaydaa V Anaa Hjare

                  कोणते कार्यालयाकडून मिळणारी सेवा किती दिवसांमध्ये दिळी गेली  पाहिजे. यासाठी अण्णा हजारे यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी  उपोषण केले त्यातून सेवा हमी कायदा तसेच दप्तर दिरंगाई कायदा आला. म्हणजेच काय तर कोणतीही कागदपत्रे पुरवत असताना  ती किती किमान दिवसांमध्ये  देणे अपेक्षित आहे याविषयी मांडणी करण्यात आली आहे.तसेच सेवा ठराविक काळात देणे त्या कार्यालवर बंधनकारक झाले यातून लाच प्रकरणे खूप कमी झाली.

 

अण्णा हजारे यांनी लोकपाल कायदा | Anaa Hjare V Lokpal 

        अण्णा हजारे यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलन व उपोषणाचे फलित म्हणजे 2013 साली लोकसभेमध्ये लोकपाल आणि लोकायुक्त हे विधेयक मांडण्यात आले.हे  विधेयक  म्हणजे भारतामधील भ्रष्टाचार बंद करण्या साठीचा प्रभावी कायदाच होय. हे विधेयक पारित झाल्यानंतर लाच प्रकरणे उघडकीस आणली जातील.उद्योगधंद्यांमध्ये ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत असतात त्या गोष्टींना अटकाव करण्यासाठी लोकपाल विधेयक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. थोडक्यात काय तर अण्णांची ही आंदोलने सामान्य माणूस आणि राष्ट्र हित याना चालना देणारी आहेत. 

                नुकताच राळेगण सिद्धी या ठिकाणी अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार कार्यकर्ता यांचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाराष्ट्रातून अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते हजर होते. यावेळी मार्गदर्शन करत असताना अण्णा हजारे यांनी जे उद्गार काढले ते उद्गार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. अण्णा हजारे या वेळी म्हणाले की सरकारी कामांमध्ये भ्रष्टाचार संपूर्णपणे नष्ट करून पारदर्शकता आणण्याचे काम तसेच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या माहितीच्या अधिकाराबरोबर,लोकायुक्त आणि लोकपाल कायदा सुद्धा ब्रह्मास्त्र म्हणून काम करतील असा ठाम विश्वास त्यांनी मांडला. मात्र हे सांगत असताना त्यांनी सांगितले की माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी याचा उपयोग हा योग्य कामासाठीच केला पाहिजे. थोडक्यात काय तर अण्णा हजारे यांचे असे म्हणणे आहे की कायदे हे जनतेच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.


अण्णा हजारे यांना मिळालेले पुरस्कार | Anaa Hajare यanaa Milalele Purskar

                      अण्णा हजारे यांचे समाजसेवेतील योगदान पाहून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार सांगायचे झाले तर 1989 सारी त्यांना कृषिरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले. 1990 चाली पद्मश्री, 1992साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने त्यांना गौरविले. 

                                 वरील सर्व कार्य पाहिल्यानंतर खरोखरच अण्णा हजारे हे एक थोर समाज समाजसेवक आहेत याचा प्रत्यय आपल्याला येतो. आजही आपल्या उतारवयात मध्ये विविध आंदोलने ते  हाती घेत आहेत. उपोषण करीत आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हे विधान अण्णा हजारे यांना यांना तंतोतंत लागू होते.आज अण्णा हजारे यांनी आपल्या राळेगणसिद्धीमध्ये जो कायापालट केलेला आहे तो कायापलट पाहण्यासाठी जगभरातून अनेक व्यक्ती तिथे भेटी देतात त्यावेळी त्या सगळ्यांचे श्रेय अण्णा हजारे स्वतः न घेता ते गावातील तरुणाईचे  ते श्रेय आहे असे सांगतात. यातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला दिसतो.थोर समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात जोपर्यंत माझी भारत माता खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत मी माझ्या आयुष्याच्या मातृभूमीसाठी कणाकणाने लढत राहणार.आपल्या समाजकार्याबद्दल अण्णा हजारे म्हणतात मी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करीत असतो .हेच माझ्या जीवनाचे खरे तत्त्वज्ञान आहे. एका लेखांमधून अण्णा हजारे यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणे म्हणजे एक भलामोठा सागर मुठीत पकडन्यासारखे आहे. मला काय म्हणायचं असेल तुमच्या लक्षात आले असेल.अण्णा हजारे यातील हजारे म्हणजेच हजारो कामे करणारा एक सचा समाजसेवक म्हणजे अण्णा होय.  

                    आज खरोखरच आपल्या देशापुढे भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार, व्यसनाधिनता, पर्यावरणाची हानी यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत. अण्णा हजारेप्रमाणे आपल्याला पूर्ण वेळ समाजसेवा जरी करता आले नाही तरी आपल्या दैनंदिन कार्यमग्न वेळेतून  काहीएक वेळ काढून आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भूमिकेतून आपण समाजकार्यासाठी सजग झाले पाहिजे.आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी समाजसेवा करण्याचा संकल्प केला पाहिजे.स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु थोडे दुसऱ्यांसाठी देखील जगता आले पाहिजे. हीच प्रेरणा आजच्या या एक थोर समाजसेवक अण्णा हजारे या लेखातून सर्वांनी घ्यावी हा लेख आपल्याला कसा वाटला ते कमेंट करा हा लेख आपल्याला आवडल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद!



आमचे हे लेख वाचायलाच हवेत का तर खूप अप्रतिम आणि काही तरी tourninig पॉइंट देऊन जाणारे आहेत. 


  1.उद्योग जगतात पेट्रोल पंपावर साधी नोकरी ते आज Relaince Group च्या माध्यमतून आपल्या भारताची ओळख साता समुद्रा पलीकडे नेणारे उद्योगपति कै. धिरुभाई अंबानी यांच्या यशा मागील रहस्य जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

उद्योगपति कै. धिरुभाई अंबानी 


2. दहावी नापास पण आज आहे कम्प्युटर इंजिनियर ,इंग्रजी विषयात नापास नि आज इंग्रजीवर आहे प्रभुत्व कोण आहे ही व्यक्ती जी मेहनतीने यशस्वी झालीय 

दहावी फेल ते नोयडा 


3.राजेपद म्हणजे समाजसेवा हेच ज्यांचे आहे सूत्र .. तर मग जरूर क्लिक करा.. 


शाहू महाराज 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area