दहावीच्या निकालाची हार्ड कॉपी कॉपी कधी भेटणार | SSC Nikal Hard Kopy Kadhi Bhetnar
17 जून रोजी दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना SSC बोर्डकडून साधारणपणे दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.होती त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्याला इयत्ता दहावी मध्ये किती गुण मिळालेले आहेत हे देखील समजलेले आहे.परंतु या दहावीच्या म्हणजेच एसएससी बोर्डाच्या निकालाची हार्ड कॉपी कधी भेटणार ? म्हणजेच मूळ निकाल कधी भेटणार? याची प्रतीक्षा संपलेली आहे. एसएससी बोर्ड ने दिलेल्या सूचनेनुसार 4 जुलै 2022 रोजी इयत्ता दहावीचे निकाल गुणपत्रके सकाळी 11 पर्यंत तुमच्या शाळांना बोर्डकडून वाटप केले जाणार आहेत.
दहावीच्या निकालाची हार्ड कॉपी कॉपी कधी मिळणार |
तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेमध्ये साधारणपणे सकाळी 11 वाजता ती गुणपत्रके बोर्डाकडून शाळेला मिळतील. परंतु तुम्हाला 4 जुलै 2022 रोजी दुपारी 3 नंतर ही गुणपत्रके देण्यात यावीत.अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आलेल्या आहेत.त्या संदर्भात बोर्डाने तसे परिपत्रक देखील काढलेले आहे.ते खाली दिले आहे. डाउनलोड करून जवळ ठेवा.
असे असले तरी 4 जुलै 2000 22 रोजी साधारणपणे बाराच्या सुमारास आपापल्या शाळांशी संपर्क करून किंवा शाळेमध्ये लावलेल्या नोटिस बोर्ड पाहून शाळेने काही वेगळे नियोजन केले असेल तर याची माहिती मिळवावी. परंतु बोर्डाकडून मिळालेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश,त्याचबरोबर विविध डिप्लोमा प्रवेश,ITI प्रवेश यासाठी त्यांना निकाल पत्रक आणि दाखले गरजेचे असतात.म्हणून ही कागदपत्रे 4 जुलै 2022 रोजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शाळेसाठी बंधनकारक आहे.तरी विद्यार्थ्यांनी 4 जुलै2022 रोजी आपली मूळ गुणपत्रके म्हणजेच बोर्डाचा ORIZANAL निकाल आपल्या शाळेमधून स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यावा.आणि तो निकाल व्यवस्थित ठेवावा कारण यापुढे कोणत्याही शिक्षणासाठी इयत्ता दहावीचा निकाल अतिशय गरजेचा असतो.
बोर्डाने पाठवलेल्या परिपत्रकाची प्रत मिळवण्यासाठी डाउनलोड शब्दावर क्लिक करा.
11 वी प्रवेश भाग 2 भरण्याच्या तारखा व इतर सर्व माहिती माहिती माहिती पुस्तिकेत दिली आहे .पुस्तिका करण्यासाठी क्लिक करा.