Type Here to Get Search Results !

तुषार सुमेरा मराठी माहिती | Tushar Sumera Marathi Mahiti

 तुषार सुमेरा मराठी माहिती | Tushar Sumera Marathi Mahiti

                आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण कलेक्टर तुषार सुमेरा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून तुषार सुमेरा कलेक्टर यांचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचत आहे.कारण गोष्ट ही तशीच आहे. दहावी जेमतेम पास होणारे म्हणजे काठावर पास असणारे सुमेरा आज मात्र कलेक्टर आहेत. चला तर ते आपण जाणून घेऊया

तुषार सुमेरा मराठी माहिती
तुषार सुमेरा मराठी माहिती

तुषार सुमेरा(toc)


तुषार सुमेरा कोण आहेत ? | Tushar Sumera Kon Aahet ?

    टीव्ही चॅनेल,युट्युब, इंस्टाग्राम,फेसबुक या सर्वच प्रसारमाध्यमांवर तुषार सुमेरा आणि त्यांचे दहावीचे गुणपत्रक सगळीकडे व्हायरल होत आहे. तुषार सुमेरा Aमराठी मध्ये माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने मी हा लेख लिहीत आहे. तुषार सुमेरा गुजरात राज्यातील भरूच या ठिकाणी  जिल्हाधिकारी म्हणून काम  पाहत आहेत. 


तुषार सूमेरा का होत आहेत वायरल ? Tushar Sumeraa Viral Ka Hot Aahet ? 

          गेल्या तीन-चार दिवसांपासून तुषार सुमेरा हे खूप मोठा प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते व्हायरल का होता आहेत ? हे आपणास माहीत आहे का?माहित नसेल तर जाणून घ्या.तुषार परेरा यांचे मित्र अविनाश शरण हे छत्तीसगड मधील एका ठिकाणी  आय ए एस,IAS म्हणून कार्यरत आहेत. अविनाश शरण व  तुषार सुमेरा जिवलग मित्र आहेत. आपल्या मित्राचा हा प्रवास अनेकणा कळावा यासाठी व बारावीच्या निकालाच्या निमित्ताने किंवा उद्या लागणाऱ्या दहावीच्या निकालाच्या निमित्ताने लोकांना कळावे की गुण किंवा टक्केवारी आणि नोकरी यांचे जे आपण संबंध जोडतो ते किती चुकीचे आहेत. हेच सांगण्याचा पर्यटन शरण करत आहेत. एक प्रकारे अविनाश शरण यांनी आपल्या मित्राच्या उदाहरणावरून ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना सांगितले आहे की व्यक्तीचे गुण न पाहता तिच्या टॅलेंट ला महत्व दिले गेले पाहिजे. 


अविनाश शरण यांची  ट्विटरवरील viral  पोस्ट | Avinash Sharan Viral Post 

       अविनाश शरण या  एका आयएएस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गुणांवरून जो ताण येतो किंवा पालक देखील विद्यार्थ्यांना किती टक्के गुण पडले? यावरून तो काय बनणार असा जो तर्क लावतात तो तर्क  किती चुकीचा आहे.हे आपल्या एका मित्राच्या उदाहरणावरून सर्वांना समजावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  त्यांच्या मते माझा मित्र तुषार सुमेरा हा दहावी मध्ये असताना अतिशय साधारण होता.अगदी तो काठावर दहावी पास झाला  तरी देखील तो आज गुजरातेतील भरूच या  ठिकाणी  जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहे, म्हणून विद्यार्थ्यांना या वायरल पोस्ट च्या माध्यमातून गुण आणि नोकरी यांना दिले जाणारे महत्त्व कमी केले गेले पाहिजे. तर व्यक्ती मध्ये कोणता टॅलेंट आहे? हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 


तुषार सुमेरा दहावीचे गुण |Tushar Sumera Dahavi Gun 

‌    आज जरी तुषार सुमेरा  एक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे जर आपण दहावीचे गुण पाहिले तर इंग्रजी विषयांमध्ये त्यांना 100 पैकी केवळ 35  गुण होते म्हणजेच काठावर पास होते. गणित  या विषयांमध्ये त्यांना केवळ 36 गुण होते तर विज्ञान या विषयांमध्ये 38 गुण होते. म्हणजेच काय तर कलेक्टर तुषार सुमेरा हे दहावीपर्यंत अतिशय सामान्य विद्यार्थी होते. परंतु कालांतराने त्यांनी आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन केले आणि पुढे ते प्रयत्न,जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर 2012 मध्ये आय ए एस या पदावर नियुक्त झाले. सध्या ते कलेक्टर या पदावर भरूच येथे  कार्यभार सांभाळत आहेत. 


तुषार सुमेरा या पोस्ट viral करण्यामागील शरण यांचा हेतू |  Sharan Yani Sumera Yanchyavr Ka Keliy Post 

          आपल्या एका मित्राची दहावीचे गुण ट्विटरच्या माध्यमातून शेअर करून स्वतः देखील यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएस पदावर कार्यरत असणारे अविनाश शरण आपला परम मित्र तुषार सुमेरा यांच्या दहावीतील गुणांवरून आजच्या तरुण पिढीला हे सांगू इच्छित आहेत की, तुम्ही गुण पत्रिकेतील गुण,घोकमपट्टि यांना जास्त महत्त्व देऊ नका.तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहे त्या क्षमतांचा पुरेपूर वापर करा. परिस्थिती कोणतीही आली तरी हार न मानता जिद्दीने संघर्ष करा आणि पुढे जा. 


तुषार सुमेरा यांच्या यशामागील कारणे | Tushar Sumera Yashamagil Karne 

    दहावी काठावर पास झाल्यानंतर नातेवाईक गावातील मित्रमंडळी तुषार सुमेरा पुढे काहीच करू शकणार नाहीत. का तर खूप कमी गुण त्यांना दहावीला  मिळालेले आहेत अशी अशी टीका टिप्पणी देखील करत होते. परंतु या टीका टिपणीला आपण उत्तर आपल्या शैक्षणिक प्रगती करून द्यायचे असे तुषार सुमेरा यांनी ठरवले.अकरावीपासून पुढील शिक्षण घेत असताना शिक्षणाचे महत्त्व जाणून जिद्द आणि चिकाटीने अभ्यासाला सुरुवात केली आणि स्वतःच्या पायावर ती उभे झाले.


      तुषार सुमेरा  कलेक्टर होण्याआधी कोणती नोकरी करत | Tushar Sumera Klektr Honya Adhichi Nokari 

           तुषार सुमेरा दहावी काठावर पास झाले असले तरी पुढील शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी बीएड केले व बीएड केल्यानंतर एका संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते नोकरी करत असताना आपण आपले शिक्षण चालू ठेवले पाहिजे.आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे.या प्रेरणेतून ते यूपीएससीच्या परीक्षा देत राहिले. प्रयत्न करत असताना अतिशय प्रामाणिकपणे  प्रयत्न केले आणि आपला शिक्षकी पेशा सांभाळत सांभाळत त्यांनी भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा समजल्या जाणाऱ्या यूपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यास आणि प्रयत्न इतके प्रामाणिक होते की त्यांचे दहावीचे गुण आणि त्यांचे पुढचे यश यांचा कसलाही संबंध आपण जोडू शकत नाही.म्हणूनच ते 2012 साली आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झाले. आज ते भरूच याठिकाणी कलेक्टर म्हणून रुजू आहेत. 

तुषार सुमेरा यांच्या अंगी असलेले गुण |Tushar Sumera  Yanche Gun 

            दहावी काठावर पास झालेला माणूस आज कलेक्टर आहे.सहाजिकच त्यांच्या अंगी काहीतरी विशेष गुण असतील त्या विशेष गुणांचा परिचय आपण करून घेऊया


1. प्रचंड जिद्द |  Prachand Jidd 

            कलेक्टर तुषार सुमेरा ज्यावेळी दहावी काठावर पास झाले आणि एक प्रकारे आजूबाजूचे सगळे लोक हे हा मुलगा नुसता  पास झालाय .आता पुढे काही करू शकणार नाही अशी सर्व अंदाज किंवा कयास लोकांकडून मांडले जात होते. अशावेळी मी आता यापुढे जिद्दीने अभ्यास करणार आहे. आतापर्यंत मी मन लावून अभ्यास केलाच नाही. यानंतर मात्र मी जिवाचं रान करणार आहे. असा संकल्प करून तुषार सुमेरा यांनी अभ्यासाला सुरुवात केली. 


2. टीकेला अभ्यासातून उत्तर | Tikela Abhyasatun Uttar  

             मी दहावीला काठावर पास म्हणून लोक मला हसत आहेत. याला फारसे मनावर न घेता आता या टीकेला मी माझ्या अभ्यासातून उत्तर देणार आहे.असा संकल्प करून त्यांनी दहावी नंतरचे सर्व शिक्षण घेतले. सहाजिकच पदवीनंतर बीएड करून ते एका संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. एक काठावर दहावी पास असलेला विद्यार्थी शिक्षक होऊ शकतो.हे देखील त्यांच्या जिद्दीचे उदाहरण आहे. एवढेच नव्हे तर शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर देखील त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवलेला  होता. 


3. आत्मविश्वास | Aatmvishvas 

                असं म्हणतात की ज्या व्यक्ती जवळ आत्मविश्वास आहे त्या व्यक्तीला कोणी हरवू शकत नाही.असाच आत्मविश्वास तुषार सुमेरा यांच्याजवळ होता.मी काहीतरी करू शकतो. फक्त मी पूर्ण ताकतीने प्रयत्न केले पाहिजेत.असे त्याना वाटत होते आणि ते खरे देखील आहे.ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे.आज काल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा आत्मविश्वास दिसत नाही. अभ्यास करणारे विद्यार्थी देखील परीक्षेच्या वेळी डळमळीत होतात. अभ्यासात तुषार सुमेरा कमी असले तरी  त्यांच्याजवळ होता तो केवळ एक आत्मविश्वास. या आत्मविश्वासाच्या जोरावरच दहावी काठावर पास होऊन पुडे  बी एड उत्तीर्ण होऊन शिक्षक आणि शिक्षकी पेशा सांभाळत सांभाळत यूपीएससीचा अभ्यास व कलेक्टर पदापर्यंत मजल यातून त्यांच्या अंगी असलेला आत्मविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतो.


4. जीवनाचे ध्येय | Jivnache Dhey 

         आज अनेक विद्यार्थ्यांना आपण शिक्षण का घेत आहोत?आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे? याविषयी सांगता येत नाही परंतु दहावी काठावर पास झाल्यानंतर  मला काहीतरी बनायचं आहे? या प्रेरणेतूनच कलेक्टर तुषार सुमेरा यांनी बीएड करून ते स्वतःच्या पायावर ती उभी राहिले. नंतर मात्र नोकरी करत करत युपीएससीचा अभ्यास त्यांनी केला. 


5. नकारात्मक विचारांचा प्रभाव न पडू देणे | Nakaratmk Vichar N Karane 

   तुषार सुमेरा यांनी आपल्यावरती नकारात्मक विचारांचा प्रवाह कधीच पडू दिला नाही.लोक काय म्हणतात? याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.या उलट मला काय करायचे आहे ?आता मी समजदार झालो आहे याच भूमिकेतून ते पुढे वाट चालत राहिले

               दहावी काठावर पास होणारे आणि आज कलेक्टर असणारे तुषार सुमेरा हे सर्व कशामुळे करू शकले?तर एक विशिष्ट वय झाल्यानंतर आपल्यामध्ये समजदार पण आल्यानंतर आपली काही एक स्वतःची मते बनायला हवीत व  एकदा ती मते बनली मग मात्र त्या व्यक्तीला कोणीच रोखू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 

                     ज्याप्रमाणे त्या गरुडाच्या पिल्लाला त्याची आई उंच आकाशामध्ये स्वतःच्या पाठीवरती बसवून  घेऊन जाते मात्र खूप उंचावरती गेल्यावर त्याला आपल्या पाठीवरून खाली ढकलते.आता ते पिल्लू दणकन जमिनीवर आदळणार आणि मारणार याचा ती जरादेखील विचार करत नाही. सुरुवातीला पिल्लू घाबरलेल्या अवस्थेत असते परंतु त्याचे लक्ष आपल्या आइकडे जाते आपली आई पंखांची हालचाल करत आहे हे पाहून ते पिल्लू देखील पंख हलवण्याचा  प्रयत्न करते आणि त्याच्या लक्षात येते की मी देखील आता हवेमध्ये तरंगत आहे. तरंगू शकतो. अशीच काहीशी अवस्था तुषार सुमेरा यांच्या बाबतीत झाली होती. कमी गुण म्हणून घरातील मंडळी , नातेवाईक, मित्र,मंडळी सगळे जण त्यांच्या भविष्य विषयी नकारात्मक बोलत होते. काठावर पास झालेला विद्यार्थी आता पुढे काय करणार? खूप काही मोठं करू शकणार नाही. अशा सर्व चर्चा घरामध्ये रंगत होत्या, पण अशावेळी मला काहीतरी करून दाखवायचे आहे? ही स्वत्वाची भावना सुमेरा यांच्यामध्ये आणि आणि ते दहावी काठावर पास ते एक यशस्वी शिक्षक आणि आज एक यशस्वी जिल्ह्याचे प्रमुख म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून गुजरात राज्यामध्ये अतिशय जबाबदारीने कामकाज पाहत आहेत. 


तुषार सुमेरा यांच्याकडून कोणता बोध घ्यावा | Tushar Sumera Bodh 

            आजच्या विशेष लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांनी तसेच शिक्षकांनी त्यांच्या डोक्यामध्ये असलेला गुण आणि नोकरी यांचा जो काकतालीय संबंध जोडला जातो तो संबंध मोडून काढला पाहिजे.दहावीला जास्त टक्के असतील. बारावीला जास्त टक्के असतील.तरच तो यशस्वी होऊ शकतो हे धादांत खोटेआहे. आपल्या मुलाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले विद्यार्थ्यांवर रागे भरू नये. दहावी -  बारावी म्हणजे जीवनातली शेवटची परीक्षा नाही,तर त्यानंतर देखील स्वतःची मते तयार झाल्यानंतर प्रयत्नांच्या जोरावर आपली मुले जीवनात यशस्वी होऊ शकतात. असा विश्वास आपण दाखवायला हवा. विद्यार्थ्यांना देखील तुषार सुमेरा यांच्या माध्यमातून फक्त घोकंपट्टी काही कामाची नाही तर ज्ञानारथी  म्हणून कोणती गोष्ट शिकायला पाहिजे?आपल्या मध्ये कोणते टॅलेंटआहे?हे  ओळखायला हवे व  त्या टॅलेंटला न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा हा बोध विद्यार्थ्यांनी व पालकांनी देखील घ्यावा. Tushar Sumera Marathi Mahiti यातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 


टक्केवारी आणि भविष्य यांना छेद | Takkevari Aani Bhvishya Yana Ched 

              कलेक्टर तुषार सुमेरा आपल्याला पडलेली कमी टक्केवारी आणि आपले भविष्य यांचा कुठलाही संबंध नाही असे मानतात.त्यांच्या मते आपली तीव्र इच्छाशक्ती कायआहे? यावरच आपण कोण बनणार आहोत? हे ठरत असते.आतापर्यंत परंपरेने आपण जो विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या पाल्याचा संबंध त्याच्या टक्केवारीची जोडत होतो तो आता थोडा बदलायला हवा आपल्या पाल्याच्या अंगी विविध गुण कसे विकसित कसे होतील यासाठी आपण दक्ष राहायला हवे. 

  अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यानी आपल्याला कमी गुण पडले म्हणून खचून न जाता तुषार सुमेरा यांच्या विषयी मराठी माहिती वाचून मोठी स्वप्न बघायला हवीत.

 

* आमचे हे लेख आपण वाचायलाच हवेत इतके अप्रतिम आहेत











टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area