सेतू अभ्यासक्रम 2022 23 इयत्ता नववी दहावी उत्तर चाचणी|setu abhyaskram iytaa 9 vi 10 vi uttar chachni
नमस्कार आजच्या या लेखातून आपणास माहित आहेच की आपण जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे पायाभूत ज्ञान किंवा मागील इयत्तेचे ज्ञान तपासण्यासाठी सेतू अभ्यासक्रम 2022 23 अंतर्गत एक पूर्व चाचणी घेतली होती. आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना 30 दिवसांच्या अध्यापन केलेले आहे, आणि आता आपल्याला या सेतू अभ्यासक्रमावर आधारित उत्तर चाचणी घ्यायची आहे. तर या लेखातून इयत्ता नववी दहावीच्या मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयांच्या म्हणजे एस आर टी ने ज्या विषयांच्या उत्तर चाचण्या घ्याव्यात अशी घोषित केलेले आहे.अशा सर्व विषयांच्या उत्तर चाचण्या आपणास देत आहोत.
सेतू अभ्यासक्रम प्रयोजन कशासाठी | setu abhyas yenya magil pryyojan
अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पडलेला एक प्रश्न की आम्हाला वर्गातील अभ्यासक्रम शिकवायचा ते सेतू अभ्यासक्रम का शिकवला जातोय? तर विद्यार्थी मित्रांनो कोरोना काळामध्ये शाळा या व्यवस्थित भरत नव्हत्या. शाळा ऑनलाईन भरत होत्या. शाळेचा कालावधी देखील खूप कमी होता. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेट यासारख्या सुविधा नव्हत्या. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. असे निष्कर्ष शासनाला सर्वेक्षणातून प्राप्त झालेले आहेत. कुठेतरी ही दरी कमी करता यावी, याच उद्देशाने सेतू अभ्यासक्रम राबवला जात आहे. म्हणूनच सेतू अभ्यासक्रम किती यशस्वी झाला हे समजण्यासाठी उत्तर चाचणी अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हा ती विद्यार्थ्यांनी अतिशय दक्षतेने ती सोडवायची आहे. यात काय जर उणिवा राहिल्या तर नंतरच्या टप्प्यावर शिक्षक त्यावरती काम करतील,परंतु विद्यार्थ्यांना किमान पायाभूत ज्ञान असलेच पाहिजे. ही या सेतू अभ्यासक्रमामागील भूमिका किंवा प्रयोजन आहे. हे प्रयोजन यासाठी सांगितले की कोणती गोष्ट आपण का करतोय? हे जर माहीत असेल तर ते आपण अतिशय प्रामाणिकपणे करतो. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सेतू अभ्यासक्रम 2022 23 च्या उत्तर चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सेतू अभ्यासक्रम विषय निहाय चाचण्या|setu abhyas vishay nihay chachnya
आजच्या या लेखाच्या माध्यमातून केवळ माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी यांच्या चाचण्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्वच माध्यमांच्या चाचणी एकत्रित उपलब्ध करून दिल्यानंतर त्या डाऊनलोड करणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शिक्षकांसाठी जिकिरीचे जात होते, म्हणूनच इयत्ता नववी आणि दहावी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या चाचण्या आपणास उपलब्ध करून देत आहोत. खाली दिलेल्या तक्त्यामधील आपला विषय पाहून त्या पुढे असलेला डाऊनलोड बटणावर क्लिक करा. उत्तर चाचणी डाऊनलोड होईल. त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.चला तर मग आपण इयत्ता नववी दहावी सेतू अभ्यासक्रम 2022 उत्तर चाचणी डाऊनलोड करूया.
सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी दहावी उत्तर चाचणी | पीडीएफ setu abhyas uttar chachni pdf
ए सी आर टी ने या चाचण्या म्हणजेच सेतू अभ्यासक्रम चाचणी पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे. त्या चाचण्या इयत्ता नववी आणि दहावीच्या उत्तर चाचण्या मी पीडीएफ स्वरूपात आपणास देत आहे.
अ.क्र. | विषय | इयता 9 वी | इयता10 वी |
---|---|---|---|
1 | मराठी | DOWNLOAD | DOWNLOAD |
2 | इंग्रजी | DOWNLOAD | DOWNLOAD |
3 | इतिहास | DOWNLOAD | DOWNLOAD |
4 | भूगोल | DOWNLOAD | DOWNLOAD |
5 | गणित म | DOWNLOAD | DOWNLOAD |
6 | maths S | DOWNLOAD | DOWNLOAD |
7 | विज्ञान 1 | DOWNLOAD | DOWNLOAD |
8 | विज्ञान 2 | nil | DOWNLOAD |
9 | science 1 | DOWNLOAD | DOWNLOAD |
10 | science 2 | nil | DOWNLOAD |