लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती 2023 Lokmanya Tilak Sampuran Marathi Mahiti lokmanya tilak marathi information 2023
नमस्कार !आजच्या या लेखात आपण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.अशी ब्रिटिश सरकारविरुद्ध ललकारी ठोकणारे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांची मराठी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
लोकमान्य टिळक मराठी माहिती |
लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध पहिला. त्याचबरोबर लोकमान्य टिळक मराठी भाषण या सदरात आपण आपण टिळकांचे देशप्रेम पहिले तर टिळकांचे एकंदरीत विचार जाणून घेण्यासाठी टिळकांचे प्रेरणादायी विचार देखील पहिले आजच्या या लेखातून आपण lokmany tilak marathi all information म्हणजे टिळकांची संपूर्ण माहिती आणि ती देखील आपल्याला समजेल उमजेल अशा मराठी भाषेतून पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती पाहूया.
लोकमान्य टिळक(toc)
लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती | tilak marathi mahiti Lokmanya Tilak Sampoorna Marathi Information 2023
टिळकांची मराठी संपूर्ण माहिती काही मुद्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत त्यातील पहिला मुदा लोकमान्य टिळक यांचे बालपण पाहूया.
💥लोकमान्य टिळक यांचे बालपण | lokmanya tilak yanche balpan
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी लोकमान्य टिळक यांची बालपणापासून ओळख होती.
💥लोकमान्य टिळक यांचे आवडते विषय | lokmanya tilak avdte ,fevriot vishhay,subject
गणित आणि संस्कृत या दोन विषयात लोकमान्य टिळक नेहमी प्रथम क्रमांकाने पास होत. तेच त्यांचे आवडते विषय. एके दिवशी अंक गणिताच्या तासाला टिळकांनी गुरुजींना विचारले की जर मराठीत एकवीस 21 हा आकडा आपण एकवीस उच्चारतो. त्यावेळी आपण बोलताना प्रथम एक आणि वीस नंतर असा क्रम असतो,परंतु इंग्लिश मध्ये मात्र ट्वेंटी म्हणजे 20 अगोदर म्हणजे प्रथम आणि वन नंतर असे का?हा फरक का आहे?हा प्रश्न ऐकून गुरुजी विचारात पडले. थोडक्यात काय तर टिळक सर्जनशील व कुशाग्र बुद्धिमतेचे होते.
टिळकांचे महाविद्यालयीन शिक्षण कोठे झाले | Where did Tilak's college education take place?
टिळक कॉलेज किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आले. पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये टिळकांनी प्रवेश घेतला.कॉलेजात गेल्यावर त्यांची किरकोळ शरीरयष्टी पाहून मित्र त्यांची चेष्टा करू लागले. टिळकांनी मित्राना काही न बोलता आपले शरीर किंवा शरीर प्रकृती सुदृढ व धडधाकट होण्यासाठी एक वर्षभर अभ्यास थोडा कमी करून व्यायाम केला.त्यांच्या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देश सेवा करताना शारीरिक कष्टांना हसत असं तोंड दिले.
💥💥एकच पुस्तक की जे तुमची इंग्रजी भाषेची अकारण भीती कमी करेल 👈
टिळक आणि भारताचा स्वातंत्र्य लढा | Tilak and India's Freedom Struggle
टिळकांनी भारताच्या स्वतंत्र्य लढ्यात टिळकांनी जे कार्य केले त्याला तोड नाही.अमोघ वाणी ,ज्वलंत लेखणी आणि हजरजबाबी यामुळे टिळकांनी लोकांना राष्ट्रप्रेम शिकवले.टिळकांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. टिळकांना हिंदुस्तानी असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.कारण आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव टिळकांनी लोकांना करवून दिली.
लोकमान्य टिळक यांची त्रिसूत्री | lokmanya tilak kamachi trisutri
लोकमान्य टिळक यांनी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे निखारे फुलवले. अंगार पेटवला. स्वदेशी, स्वराष्ट्रव स्वराज्य या तीन सूत्रीने ब्रिटिशांची त्यांनी झोप उडवली.त्यांच्या या लढ्याला प्रचंड लोकबळ लाभले व टिळक हे हे भारतातील महान व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.
टिळकांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे | Newspapers started by Tilak
मराठा व केसरी या वर्तमान पत्रातून सामान्य जनतेला जागरूक करण्याचे काम केले.टिळकांचे अग्रलेख म्हणजे पेटती मशाल होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.त्यांच्या या जहाल लेखनाबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला व गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 1908साली मंडाले येथे त्यांनी ही शिक्षा भोगली तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला.
शिवजयंती व गणेशोत्सव सुरुवात | shiv jayanti ganesh utsav suruvat
भारतात लोक जागृती म्हणजे ब्रिटिश सरकार विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले.देशभक्तीपर व्याख्याने व प्रबोधनपर भाषणे यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आपण आपले स्वातंत्र्य मिळवायला हवे यासाठी आवाज उठवला. ही Lokmanya Tilak Sampuran Marathi Mahiti 2022 माहिती मन लाऊन वाचा.
टिळकांचे लेखन | lokmanya tilak lekhak kinva likhan
टिळकांनी मंडाले तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.कालांतराने आर्टिक होम इन द वेदाज हे ग्रंथ त्यांनी लिहिले.
लखनऊ करार | lokmanya tilak v lakhnau karar
लाल- बाल- पाल म्हणजे भारताच्या किंवा आपल्या देशाच्या प्रथम पंक्तीतील नेते होत. यातील बाल; म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय. यातून ते किती महान व्यक्ती होते याची कल्पना आली असेल..टिळकांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी लखनऊ करार घडवून आणला.
💥💥कॉलेज बंद अभ्यास सुरू अकरावी सर्व विषयांची पीडीएफ डाउनलोड करा 👈
टिळकांचे निधन | tilkanche nidhan
प्रखर बुद्धिमता,विद्वत पत्रकार,जहाल देशभक्त,थोर समाजसुधारक असे लोकपुरुष व लोकमान्य म्हणून ज्यांचा गौरव होतो अशा लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्ट 1920 सरदार गृह मुंबई या ठिकाणी निधन झाले.
FAQ काही प्रश्न
1. लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला?
- 1895 साली लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.
2. लोकमान्य टिळक यांनी इंग्रजी भाषेतील कोणते वर्तमानपत्र सुरू केले ?
लोकमान्य टिळक यांनी इंग्रजी भाषेतील मराठा हे वृत्तपत्र सुरू केले.
3. लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला ?
लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव याठिकाणी झाला.
आमचे हे लेख जरूर वाचा नक्की आवडतील
दहावी सेमी इंग्रजी /इंग्रजी माध्यम गणित भाग 1 प्रकरण 3 रे सर्व सोडवलेली उदाहरणे
दहावी पास मुलांसाठी 2 लाख रुपयांची स्कॉलरशिप आपण आहात काय पात्र हे माहीत करून घेण्यासाठी क्लिक करा.