महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेतील बदलाबाबत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी घेतल्या जातात यावर्षी म्हणजे 2022 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेले आहेत.
5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत बदल |
शिष्यवृत्ती परीक्षा का पुढे ढकलल्या
एकंदरीतच महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बंद झालेले आहेत अनेक नद्यांना पूर आलेले आहेत हे लक्षात घेऊनच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म्हणजेच तिच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा किती तारखेला होणार होती
इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही 20 जुलै 2022 रोजी वार रविवारी होणार होती
पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार आहे
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही 31 जुलै 2022 रोजी होणार आहे याबाबत वर्तमानपत्रातून तसेच दूरदर्शन आकाशवाणी यांच्या माध्यमातून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी 14 जुलै 2022 च्या परिपत्रकात तसा उल्लेख केलेला आहे
शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातली ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा साहजिकच विद्यार्थ्यांना अधिकचे पंधरा दिवस या अभ्यासासाठी मिळालेले आहेत त्यामुळे विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी साठी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीसाठी या परीक्षेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील अशी आशा व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो की पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा जी होणार होती ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी होणार आहे याची नोंद घ्यावी ही माहिती विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावी सोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे परिपत्रक जोडण्यात आलेले आहे ते डाऊनलोड करून घेण्यात यावे.