Type Here to Get Search Results !

दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण हवेत असा करा अभ्यास dahahavila navad takkepeksha jaast gun havet asaa kara abhyas

 दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण  हवेत असा करा अभ्यास |दहावीला 90 टक्के गुण मिळवण्यासाठी कसा करावा अभ्यास | बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय करू ? | dahahavila navad takkepeksha jaast gun havtet asaa kara abhyas | dahavila 90 takke gun milvnyasathi kasa karava abhyas | board parikshet changle gun kase miltial  

 आजच्या लेखात आपण दहावीला बोर्ड परीक्षेत जास्तीत जास्त कसे मिळतील ? या लेखमाले अंतर्गत पहिल्या लेखात आपण  दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण  हवेत असा करा अभ्यास किंवा दहावीला 90 टक्के गुण मिळण्यासाठी कसा करावा अभ्यास याविषयी माहिती पाहणार आहोत. बऱ्याच मुलाना एक प्रश्न पडत असतो,बोर्ड परीक्षेत चांगले गुण हवेत काय करू? या सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळतील पण ती पाहण्या अगोदर दहावीच्या टक्केवारील एवढे महत्त्व का दिले जाते ते पाहूया.
दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण  हवेत असा करा अभ्यास
दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण  हवेत असा करा अभ्यास 

 

दहावीला जास्तीत जास्त टक्केवारी पाडण्याचे फायदे  dahavichya gunanche mhatav 

1.विविध डिप्लोमा कोर्सेस च्या प्रवेशासाठी vividh diploma korse prveshasathi 

दहावीनंतर बरेच डिप्लोमा कोर्सेस आहेत की ज्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दहावीचे गुण म्हणजेच टक्केवारी विचारात घेतली जाते. काही ठिकाणी entrance exam असली तरी 50 टक्के गुण दहावीचे पकडले जातात.
उदा. 

कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा ,मॅकेनिकल इंजि.,सिविल इंजि. यासारख्या डिप्लोमा कोर्सेसला दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
   

2. अकरावी प्रवेशासाठी akravi pravesh 

बऱ्याच महाविद्यालयामध्ये अकरावीला प्रवेश देत असताना दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाते. विशेष करून मुंबई पुणे यासारख्या शहरी भागांमध्ये तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी टक्केवारी देखील चांगली असणे गरजेचे असते. म्हणजेच काय तर दहावीला जास्तीत जास्त गुण असणे हे गरजेचे आहे. 

3. आयटीआय प्रवेशासाठी iti course pravesh ghenyasathi  

बऱ्याच विद्यार्थ्यांना अकरावी बारावी करण्यापेक्षा तात्काळ नोकरी मिळावी अशी इच्छा असते. असे विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, वेल्डर डिझेल मेकॅनिकल असे आयटीआय कोर्सेस करतात यामध्ये ज्या कोर्सेसला जास्त मागणी आहे त्याला प्रवेश मिळण्यासाठी दहावीला जास्त गुण असणे गरजेचे असते. कारण त्या गुणवरून merrit ठरत असते. 

4. वसतिगृहाची सोय hostel soy 

दहावीनंतर बरेच विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज करण्यासाठी  जातात त्या ठिकाणी शासकीय होस्टेल,म्हणजेच वसतिगृह असतात.  त्यांना प्रवेश देत असताना दहावीच्या गुणांची टक्केवारी पाहिली जाते. यासाठी दहावीला जास्तीत जास्त टक्केवारी असावी

5. नोकर भरती आणि दहावीचे गुण nokar bhartisathi 

शिपाई,हमाल,सवछता कर्मचारी,आया  यासारख्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देखील दहावीला असणारे  गुण विचारात घेतले जातात. भले तो पुढे काय शिकला?किती गुण आहेत हे न पाहता दहावीचे गुण पहिले जातात.  ज्या विद्यार्थ्यांना दहावीला चांगले गुण असतात,त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  आजकाल सरकारी नोकरी मिळणे खूप कठीण झालेले आहे. म्हणून तर मोठमोठ्या डिग्री  घेतलेले विद्यार्थी देखील ज्यावेळी अशी हमाल, शिपाई यासारखी भरती निघते त्यावेळी अर्ज करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो यावरूनच तुम्हाला दहावीच्या गुणांचे किंवा टक्केवारीचे महत्त्व समजले असेल म्हणूनच दहावीला 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी कशी मिळवायची हा विषय आपण आज घेतलेला आहे. 

5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना doc . babasaheb aambedkar vishesh anudan yojnaa labh 

दहावी पास झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दहावीला चांगली टक्केवारी असते. त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जवळजवळ अडीच लाखांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ही स्कॉलरशिप दिली जाते.ती स्कॉलरशिप मिळवण्यासाठी देखील दहावीला चांगली टक्केवारी असणे गरजेचे आहे. 

6. विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी vividh vyavsay krnyasathi 

जर आपण दहावी पास असलो तर आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल,तर  त्यावेळी आपण बँकेमध्ये प्रकरण दाखल करतो. कर्ज मागणी करतो  त्यावेळी दहावी पास असणे अतिशय गरजेचे आहे. आणि जर तुम्ही चांगल्या गुणांनी पास असाल तर तुमची फाईल लवकर SANCTION होण्याची शक्यता असते. 

@@ अभ्यासात मन लागत नाही ----- एकतर्फी प्रेम मग जरूर वाचा एकतर्फी प्रेमातील घातकता @@

7. मुंबई महानगरपालिका स्कॉलरशिप मिळवण्यासाठी mumbai manpascholarship milnyasathi 

जे विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांनी जर 90% पेक्षा जास्त गुण मिळवले तर त्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे पुढील शिक्षणासाठी कॉलेजची फी भरण्यासाठी स्कॉलरशिप दिली  जाते.  अलीकडे तर सन्मा. आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष घालून तिचे स्वरूप व्यापक करण्यात आलेले आहे. त्यानुसार जोपर्यंत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही. तोपर्यंत किती महाग  शिक्षण असो, त्या महागड्या शिक्षणासाठी मुंबई महानगरपालिका सर्व खर्च करणार आहे. अशा योजना प्रत्येक महानगरपालिकेमध्ये असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी दहावीला जास्तीत जास्त टक्केवारी असणे गरजेचे आहे. 

8. आत्मविश्वास वाढण्यासाठी aatmvishvas vadhnyasathi 

वरील सर्व मुद्यांपेक्षा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.  दहावीला जर विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळाले तर त्यानंतर आपली विद्याशाखा निवडत असताना असताना आर्ट, कॉमर्स, सायन्स  काय घ्यावे यासाठी मदत होते. नक्कीच आपल्याला मिळालेली टक्केवारी यातून हा निर्णय घेताना आपल्याला दिशा मिळत असते.दहावीनंतर आपण पुढील शिक्षण कसे घेतले पाहिजे? तर दहावीला आपल्याला टक्केवारी कमी असेल तर विद्यार्थी सायन्सला जायला घाबरतात. आणि त्यांचे डॉक्टर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न तिथेच भंगते. म्हणजेच काय तर दहावीनंतर चांगले क्षेत्रात जाण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी दहावीला चांगली टक्केवारी असणे जास्त गरजेचे आहे. मग दहावीला अभ्यास कसा करू हा प्रश्न पडला असेल. 

आता दहावीला जास्त गुण मिळाले पाहिजेत. याचे महत्त्व तुम्हाला समजलेच.परंतु मला किमान 90 टक्के पेक्षा जास्त गुण कसे मिळतील ? यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल केला तर आज करा.  आता जुलै महिना सुरू आहे. आपण जर पुढील दिवसांचे नीट नियोजन केले तर, आपल्याला नक्कीच दहावीला 90% पेक्षा जास्त गुण मिळतील. आपल्या आई-वडिलांननी जे स्वप्न पाहिलेले  आहे ते  स्वप्न सत्यात उतरायला मदत होईल. 


दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी असा करा अभ्यास dahavila 90 takke peksha jast gun milnyasathi asaa kara abhyas 

 
दहावीला 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी असा करा अभ्यास म्हणजे दहावीला नेमका कसा अभ्यास करायचा ? हा प्रश्न डोक्यात घोळत असेल बरोबर ना ? चला तर मग पाहूया की दहावीला जास्तीत जास्त टक्केवारी पाडण्यासाठी कसा करू अभ्यास याविषयी माहिती. सर्वप्रथम तुम्ही दहावी म्हणजे खूप मोठे दिव्य आहे ती जीवनातील सगळ्यात मोठी व  अवघड परीक्षा असते  या गोष्टी डोक्यातून काढा.  यापुढे जे मी करणार आहे, ते मी मनापासून करणार आहे.कारण का तर दहावीला जास्त टक्के असणे का गरजेचे आहे हे मला समजलेले आहे. त्यामुळे मी मन लावून अभ्यास करणार आहे. एवडाच विचार करा. आणि असे जर तुम्ही ठरवले असेल तर तुम्हाला 90% च काय तर दहावीला तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये पहिले देखील येऊ शकता. चला तर मग कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत की ज्यांच्या मदतीने दहावीला जास्तीत जास्त टक्केवारी मिळवता येईल ते आपण पाहूया----------

दहावीला जास्त गुण मिळवण्यासाठी टिप्स व ट्रिकस  dahavila jast gun milvnyasathi tips triks 

 1.शिकण्याची  तळमळ shiknyachi talmal  

शिकण्याची तळमळ हा मुद्दा ऐकून तुम्हाला असे वाटलेअसेल की याचा आणि अभ्यासाचा काय संबंध. अभ्यास ही वेगळी गोष्ट आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ! तसे नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये तळमळ असणार नाही,तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. आपल्या मनाने आतून सांगायला पाहिजे की मला दहावीला 90% पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत.मला माझे स्वप्न माझे आई-वडिलांचे स्वप्न माझ्या गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आणि त्यासाठी मी अगदी सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास करणार आहे. अशी जर शिकण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल तर आज जरी तुम्ही 50% गुणांनी नववी पास झाला असाल. तरीदेखील तुम्ही 90% नी दहावी उत्तीर्ण होऊ शकता यात शंकाच नाही. म्हणजेच काय तर शिकण्याची तळमळ हे तुमच्या मध्ये असणे जास्त गरजेचे आहे. आमच्या शाळेतील निखिल जवळ ही तळमळ म्हणून तो 94 टक्के गुण मिळवून पास झाला 

@@ काय सांगता इतकी तळमळ की 10 वी 36 टक्के गुण आज आहेत कलेक्टर @@

2. जास्तीत जास्त सराव jastit jast sarav 

विद्यार्थी मित्रांनो! दहावीच नव्हे तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट असूद्या,सराव म्हणजेच काय तर प्रयत्न. आपण दहावीचा अभ्यास करत असताना एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती आपल्या लक्षात राहत नसेल तर ती दोनदा वाचण्याची तयारी हवी  दोनदा वाचल्यानंतर लक्षात राहत नसेल  तर ती तीन वेळा वाचण्याची आपली तयारी. यावी कारण आपल्याकडे वेळ नाही असे नाही तर आपल्याकडे  एक नाही दोन नाही तब्बल 24 तास आपल्या हातामध्ये आहेत. जोपर्यंत मी वाचलेला भाग मला समजत नाही माझ्या लक्षात राहत नाही तोपर्यंत मी तो वाचत राहणार, लिहीत राहणार. म्हणजेच त्याचा काय करणार  तर सराव करणार. असे जर आपण केले तर आपल्याला दहावी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण नक्कीच मिळतील. दहावीला जास्तीत जास्त गुण किंवा टक्केवारी मिळवण्यासाठी हे ध्यानात ठेवा.  

3. संकल्पना समजून घेणे sanklpna samjun ghene 

गणित, विज्ञान यासारख्या अवघड विषयांमध्ये विविध संबोध, संकल्पना असतात. त्या संबोध संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजेत. एखादी संकल्पना आपल्याला समजली नाही तर त्याविषयी शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. या पलीकडे जाऊन आपल्याला समजत नसेल तर युट्युब वरती जाऊन हजारो व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या मदतीने आपण ते समजून घ्यावे ते कसे थोडक्यात सांगतो.  
उदा. 

 मराठी विषयांमध्ये पत्रलेखन,जाहिरात लेखन, कथालेखन,सारांश लेखन, बातमी लेखन व  निबंध लेखन यांची तयारी कशी करायची यातील बारकावे समजून कसे घ्यायचे याविषयी  माहिती मिळवली पाहिजे.व  तसा सराव देखील केला पाहिजे. ज्ञानयोगी यूट्यूब चैनल च्या माध्यमातून ही सर्व माहिती मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला वेळ असेल त्यावेळी आवर्जून भेट द्या. यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अशाच पद्धतीने youtube वरुण  तुम्ही इतर विषयांच्या संकल्पना स्पष्ट करू शकता. समजून घेऊन अभ्यास हे जास्त गरजेचे आहे. 

4. वर्षभरामध्ये किमान पाच वेळा उजळणी varsh bhrat kiman 5 vela ujalni 

  आपण वर्षांमध्ये आपण जे टॉपिक शिकतोय, विषय शिकतोय त्या विषयाची कमीत कमी पाच वेळेस उजळणी झाली पाहिजे.म्हणजे पाच वेळेस पाठांचे किंवा त्याखालील प्रश्नांचे वाचन झाले पाहिजे.जर आपण उजळणी केली तर आपण प्रत्येक उजळणीमध्ये आपण अंडरस्टँडिंग स्पीड वाढत जाईल.ते घटक आपल्याला समजत जातील .आपल्याला पहिल्यापेक्षा वेगाने  उजळणी करता येईल म्हणजे, पहिल्या उजळणीला आपल्या जेवढा वेळ लागला तर  दुसऱ्या उजळणीला त्यापेक्षा खूप कमी वेळ लागेल. दुसऱ्याला  कमी  तिसऱ्या उजळणीला फारच कमी आणि पाचवी उजळणी आपण अतिशय जलद म्हणजे  एक ते दोन दिवसात करू शकतो. म्हणजे आपल्याला नंतरच्या उजळण्यासाठी वेळ लागणार नाही. 

5.किमान 5 प्रश्नपत्रिका सोडवा kiman 5 prashnptrika sodava 

केवळ 5 वेळा उजळणी करून चालणार नाही तर आपण प्रत्येक विषयाच्या किमान  पाच ते सहा प्रश्नपत्रिका सॉल्व केल्या पाहिजेत.म्हणजेच सोडवल्या पाहिजेत.सुरुवातीला आपला अभ्यास नसेल त्यावेळी पहिल्या दोन प्रश्नपत्रिका बघून सोडवा. पुस्तके, गाईड व  शिक्षक या सर्वांची मदत घ्या. मात्र आपला पेपर वेळेत सोडवून होतो का ? याची सवय लावा.बरेच विद्यार्थी अभ्यास भरपूर करून देखील बोर्ड परीक्षेमध्ये पाच ते दहा  गुणांचे प्रश्न वेळेअभावी लिहायचे ठेवतात व असे सांगतात  की वेळ पुरला नाही . साहजिकच इथेच ते 90% मिळवण्याच्या स्पर्धेतून अशी मुले बाद होतात. यावर उपाय काय तर------  घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा. 

 6. दिलेल्या वेळेत उत्तर पत्रिका सोडवण्याची सवय velet uttarptrika sodvnyachi savay 

आपण सराव परीक्षा किंवा उत्तरपत्रिकांचा सराव करत असताना बोर्ड परीक्षेला ज्या उत्तरपत्रिका आहेत त्याना किती गुण आहेत? वेळ किती आहे? याचे सर्व कॅल्क्युलेशन करून योग्य असे नियोजन केले पाहिजे. अभ्यास असून देखील पेपर लिहायचा राहणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. यावर विद्यार्थ्यांनी नीट विचार करावा. तर 90 टक्के गुण मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा हे पण कळेल. 

7. पाठांतराचा बागलबुवा pathantar bagalbuva 

बरेच विद्यार्थी दहावीचा अभ्यास करत असताना केवळ पाठांतरावर भर देतात. असे न करता विज्ञानासारख्या विषयाला पाठांतर करून उपयोगाचे नाही. कारण पाठाखाली प्रश्न परीक्षेत येतील याची खात्री नसते.म्हणूनच पाठांतराचा बागलबुवा न करता दहावीला 90% गुण मिळवण्यासाठी विज्ञान विषयाचा अभ्यास करीत असताना ते पाठ्यपुस्तक त्यातील संकल्पना समजावून घ्या! तरच तुम्ही त्याची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहू शकता. पोपटपंची करू नका. 

8. सुंदर हस्ताक्षराची सवय sundar hastakshar 

फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हे अगदी खरे आहे. पेपर तपासणाऱ्या परीक्षकांनी आपला पेपर हातात घेतल्यानंतर आपल्या हस्ताक्षराची छाप त्याच्यावरती पडली पाहिजे.त्यासाठी आपल्या हस्ताक्षर सुंदर हवे. जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर किमान पंधरा दिवसांमध्ये तुमच्या हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर येऊ शकते.यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या.अक्षर गोलाकार काढायचे, उभे काढायचे, की एका बाजूला झुकवायचे, अक्षराचा आकार याकडे जरा बारकाव्याने बघा. नक्कीच तुमची हस्ताक्षर सुंदर होईल. या हस्ताक्षरामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांमध्ये किमान पाच टक्के गुण तरी वाढ होऊ शकते म्हणून सुंदर हस्ताक्षर काढा. 

9.अभ्यासाचे वेळापत्रक abhyasache velaptrak 

शिक्षक जो आपल्याला अभ्यास देतात तेवढे केले म्हणजे झाले असे नाही. माझ्यामते शिक्षकांनी दिलेला अभ्यास हे काम असते तो अभ्यास असतो म्हणून  तुम्ही जो स्वतःहून करता तो अभ्यास असतो जसे की
शिक्षकांनी अभ्यास दिला नाही परंतु तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकातील आकृत्या न बघता काढण्याचा प्रयत्न करत आहात कारण का तर तुम्हाला या आकृत्यांचे गुण जाऊ नयेत असे वाटत आहे हे लक्षात ठेवा.

10. अभ्यासाची पद्धत abhyas karnyachi padht 

या लेखामध्ये याविषयी सविस्तर सांगणे उचित होणार नाही कारण अगोदरच हा लेख खूप मोठा झालेला आहे. परंतु यावरती मी एक स्वतंत्र असा लेख लिहिलेला आहे तो पाहण्यासाठी  ज्ञान योग्य डॉट कॉम वर जाऊन शैक्षणिक विचार या सदरातील अभ्यासाची पद्धत हा लेख तुम्ही वाचू शकता. किंवा या लिंकवर क्लिक करा.

11. हुशार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचे निरीक्षण  hushar mulanchi uttraptrika pahne 


आपल्या शाळेमध्ये जे अतिशय कुशाग्र किंवा ज्यांना शंभर टक्के गुण मिळणार आहेत असे जे विद्यार्थी असतील ते उत्तरपत्रिकेची मांडणी कशी करतात ती जरा पहा. कधी कधी असे असते  की कमी अभ्यास असून देखील केवळ मांडणी चांगली आहे. म्हणून त्यांना जास्त गुण मिळत असतात. आणि आपला अभ्यास जास्त असून देखील आपल्याला गुण हे कमी मिळत असतात. हा माझा अनुभव आहे म्हणून हुशार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचे निरीक्षण करा. शक्य झाल्यास बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका यूट्यूब वरती असतात. त्या त्यांनी कशा सोडवलेल्या  आहेत याचा देखील आढावा घ्या. 

अशा पद्धतीने बरेच ते विद्यार्थी बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवत आहेत; पण सर्वांनाच ते शंभर टक्के गुण मिळवणे शक्य नाही. परंतु किमान 90% गुण तरी आम्हाला कसे मिळतील?  किंवा आम्हाला महानगरपालिकेच्या स्कॉलरशिपचा लाभ कसा मिळेल? आमचे भविष्य उज्वल कसे होईल?  भविष्यामध्ये आम्हाला चांगली महाविद्यालय ,चांगले डिप्लोमा कोर्सेस कसे मिळतील या दृष्टिकोनातून दहावीच्या गुणांचे महत्त्व तुम्हाला नक्कीच समजले असेल. एवडेच नाही दहावीला चांगले गुण मिळण्यासाठी कसा अभ्यास किंवा नेमके काय करायचे हे देखील ध्यानात आले असेल  हा लेख तुम्हाला नक्की कसा वाटला याविषयी कमेंट करा.तुम्हाला 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळावेत ह्या शुभेचा व्यक्त करतो नि थांबतो. 


दहावीतील यश आणि आपल्या नोट्स  dahavitil yash V aaplya notes 

आपण जर गाइड अपेक्षित जशीच्या तशी पाठ केली तर आपल्याला जास्त गुण मिळतील असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे यासाठी तुम्ही तुमच्या स्वतच्या नोट्स काढायला हव्यात त्या नोट्स कशा काढायच्या याबाबत मी तुम्हाला ते skill शिकवायला तयार आहे त्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून wtp ग्रुप जॉइन करा त्यात संपूर्ण दहावी सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला तुमच्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातील सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका देखील पुरवल्या जातील आस नको व्हायला संधी आली होती पण मी तिचे सोने केले नाही पटापट खालील लिंकवर क्लिक करा नि 90 टक्के मिळवण्याचे दहवावीचे स्वप्न पूर्ण करा.

दहावी स्कॉलरशिप ग्रुप 




 अहो आमचे हे लेख वाचले की नाही ? जरूर वाचा खूप काही शिकवून जातील कसे वाटले कमेन्ट पण करा. 




18 वर्षाच्या आतील मुला मुलींची लैंगिक पिळवणूक थांबावी यासाठी आहे एक कडक कायदा pocso पोकसो  कायदा आपण वाचा आपल्या मुलांना सांगा good टच bad टच  याची माहिती 




 दीपस्तंभ फाऊंडेशन आपल्या परिचयाचे कोणी अपंग असतील त्याना ही लिंक पाठवा अशी संस्था जी अपंगाचा सर्व खर्च तर कर्ते शिवाय त्याना कलेक्टर तशीलदार अशा परीक्षांची मोफत तयारी करून घेते संपूर्ण महाराष्ट्रभर ही माहिती पोहोचवा 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area