Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे 2023 24 | akravi pravesh mhtvachii kagdpatre

 अकरावी प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे 2023 24 | akravi pravesh mhtvachii kagdpatre 11th admission important document list 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या लेखामध्ये आपण अकरावी प्रवेशासाठी 2023 24 मध्ये  कोणती कागदपत्रे अतिशय गरजेचे आहेत म्हणजेच अकरावी प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे कोणती लागतात ते आपण पाहणार आहोत. यासाठी 11 वी महितीपुस्तिका जी ऑनलाइन उपलब्ध आहे ती वाचने गरजेचे आहे. 

अकरावी प्रवेश महत्वाची कागदपत्रे
अकरावी प्रवेश महत्वाची कागदपत्रे

 अकरावी कागदपत्रे(toc)

अकरावी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन करणे यानंतर लॉगिन आयडी मिळवणे या सर्व प्रक्रिया आपण पार पाडलेल्या आहेत. त्याचबरोबर अकरावी प्रवेशाचा भाग दोन देखील कसा भरायचा? किंवा तो आपण भरलेला देखील आहे. भाग2  भरल्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे पसंती क्रम किंवा ऑप्शन फॉर्म भरणे ते कसे भरायचे वगेरे सर्व झालेले आहे. यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म देखील भरलेले आहेत.अशाच पद्धतीने वर्षानु वर्षे  कार्यवाही सुरू असते. परंतु यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अकरावी प्रवेशाला गेल्यानंतर किंवा जात असताना कोणती कागदपत्रे आपल्याजवळ असावीत ? म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये अकरावी प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत किंवा अकरावी प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे  याविषयी आपण चर्चा करणार आहोत,ती सर्व कागदपत्रे प्रवेशावेळी सोबत ठेवायची आहेत. importance documents 11th online admission ही आपण पाहूया.गरज वाटल्यास आय वी संकेतस्थळाला म्हणजे 11 वी प्रवेशाच्या website भेट द्यायला हवी. 


💥केंद्रप्रमुख परीक्षा टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट 👈

अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांचे महत्त्व | akravi praveshasathi kagdpatranche mhttva 

अकरावी प्रवेशासाठी जी  महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत ? की कागदपत्रे पाहण्या अगोदर या कागदपत्रांची महत्त्व का आहे ? तर अकरावी प्रवेशाचा ऑनलाइन फॉर्म भरत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण हमीपत्र देत असतो, की सध्या माझ्याकडे कागदपत्रे नाहीत परंतु संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेरिट लिस्ट लागेपर्यंत किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेत असताना ही सदर कागदपत्रे माझ्याजवळ असतील. ही यात मला मान्य आहे असे हमीपत्र आपण देत असतो.  या अटीवरतीच आपला अर्ज हा स्वीकारला जातो. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे की अकरावी प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपल्याला ज्यावेळी आपल्यासाठी कॉलेज अलॉट होते म्हणजेच एखाद्या महाविद्यालयामध्ये आपला नंबर लागतो. आणि आपल्याला त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो, त्यावेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात.  म्हणजेच काय तर अकरावी प्रवेशाला जात असताना कागदपत्रे असतील तरच आपला प्रवेश होऊ शकतो. एवढे महत्त्व या कागद पत्रांचे आहे. एखादे कागदपत्र जर आपल्या जवळ नसेल तर आपला प्रवेश हा नाकारला जाऊ शकतो.  म्हणून विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची आवश्यकती सर्व कागदपत्रे वेळेतच काढून ठेवली  पाहिजेत. चला तर मग बघूया 11 वी प्रवेशासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत. 


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈 


अकरावी प्रवेशासाठी आवश्यक व महत्वाची  कागदपत्रे | akravi pravesh mhtvachii kagdpatre

अकरावी प्रवेशाचा आपण जर विचार केला तर अकरावी प्रवेशासाठी प्रामुख्याने काही ठराविक कागदपत्रे आहेत कि ती कागदपत्रे आपल्याजवळ असणे अतिशय गरजेचे आहे. ती कागदपत्रे कुठून मिळतात. याविषयी देखील मार्गदर्शन मी आपणास करणार आहे.चला तर मग अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी पहिले कागदपत्र कोणते आहे ते आपण बघूया.


1. अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला |school leaving certificate 

अकरावी प्रवेश निश्चित करत असताना आपल्याला जर महाविद्यालयामध्ये सर्वात अगोदर कोणते कागदपत्र मागितले जाते, तर ते म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये दहावीला शिकत होतो त्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला होय. कारण का तर अमुक एका महाविद्यालयामध्ये तुम्ही दाखला जमा केला याचा अर्थ तुमचा तिथे प्रवेश निश्चित झाला. कारण आपल्याला भेटणारा दाखला एकच असतो. म्हणूनच प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपला दहावी पासचा दाखला जवळ ठेवावा.शाळेतून दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आठ ते दहा सत्यप्रती काढून ठेवाव्यात कारण का भविष्यामध्ये या दाखल्याच्या झेरॉक्स आपल्याला वारंवार लागत असतात. म्हणून अकरावी प्रवेश केला जाताना महत्त्वाचे कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिविंग सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी सोबत ठेवायचे आहे.


💥मुलींना मोफत निवासी नर्सिंग कोर्स 2023 24  प्रवेश अर्ज सुरू 👈


2. बोर्ड परीक्षा निकाल  |ssc result

इयत्ता अकरावीसाठी एसएससी, सीबीएससी आय सी एस सी अशा विविध बोर्डाचे विद्यार्थी प्रवेश घेत असतात तर विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करत असताना आपला मूळ निकाल हा सोबत ठेवावा. म्हणजेच इयत्ता दहावी पास ची गुणपत्रिका ही आपल्या जवळ असावी. ही  गुणपत्रिका कॉलेजमध्ये  जरी जमा करून घेतली जात नसली, तरी ती दाखवण्यासाठी आपल्याला आवश्यक असते. म्हणून प्रवेशाला जात असताना आपल्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रति सोबत ठेवाव्यात आणि त्या झेरॉक्स प्रति अटॅस्टेड असाव्यात म्हणजेच त्यावरती तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा तत्सम अधिकारी यांची सहीव शिक्का असावा.


3. अकरावी प्रवेशाचा अर्ज |online admission form

अकरावी ऑनलाइन प्रवेश घेत असताना अतिशय महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्ही केलेला अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज की ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर अमुक एका कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे. हे कशावरून क्रॉस चेक केले जाते ,तर तुम्ही जो अकरावी प्रवेशाचा अर्ज घेऊन जाता किंवा लागलेल्या मेरिट लिस्ट नुसार तुमच्यासाठी कोणते कॉलेज भेटलेले आहे. हे सर्व प्रवेश अर्जावरून समजत असते. तसेच तुम्ही प्रवेशाच्या वेळी भरलेली माहिती आणि प्रत्यक्ष सादर करत असलेली माहिती यांची तपासणी करण्यासाठी अकरावी प्रवेशाचा अर्ज 11th admission application हा तुम्ही प्रवेशाच्या वेळी घेऊन जायचं आहे. प्रवेशाच्या वेळी भरलेली माहिती आणि तशीच कागदपत्रे आपल्याजवळ असणे अतिशय गरजेचे आहे.


4. डोमासाईल प्रमाणपत्र (not compulsory)

अकरावी प्रवेशाच्या वेळी आपल्याला रहिवास दाखला किंवा अधिवास दाखला म्हणून डोमासाईल सर्टिफिकेट सादर करावे लागते.  आपण किती वर्षापासून या महाराष्ट्राचे रहिवासी आहोत.याबाबतचा त्यामध्ये खुलासा केलेला असतो. ते विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या वेळी डोमासाईल काढून घ्यावे.


5. दहा वर्षाच्या रहिवासासाठी काही पुरावे ( not compulsory)

अकरावी प्रवेशासाठी जर आपण अर्ज केला असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये वास्तव्यासाठी किमान दहा वर्षे असणे गरजेचे आहे,यासाठी पुरावे म्हणून आपण आपल्या यापूर्वीच्या इयत्ताचे निकाल आपण सोबत ठेवू शकतो.किंवा विज बिल किंवा  बँकेची पासबुक की जी आपली असो की वडिलांची परंतु आपण महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला होतो हे त्यातून दिसायला हवे.अलीकडच्या काळामध्ये आपले आधार कार्ड देखील पुराव्यासाठी ग्राह्य धरले जाते. किंवा रेशनिंग कार्ड म्हणजे शिधापत्रिका अशा विविध कागदपत्रांच्या माध्यमातून आपण दहा वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. असं पुरावा सादर करावा लागतो शक्यतो विद्यार्थ्यांकडे बोनाफाईड असते त्या बोनाफाईड वर देखील तसा उल्लेख करू शकता की अमुक अमुक इयत्तांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये या या शाळेमध्ये शिकलेला आहात.


6. आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी जातीचा दाखला | cast certificate 

जे विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी विशिष्ट जातीचा किंवा त्या जातीच्या आरक्षणाचा फायदा घेणार आहेत. तसा त्यांनी आपल्या प्रवेश अर्जामध्ये उल्लेख केलेला आहे.अशा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या वेळी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र ते म्हणजे जातीचा दाखला. जर आपण प्रवेशाच्या वेळी अमुक एका जातीचा उल्लेख केला असेल आणि त्यातून किंवा त्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे. अशी माहिती आपण दिलेल्या असेल आणि प्रवेशाच्या वेळी जर आपल्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल तर आपला प्रवेश हा नाकारला जाऊ शकतो.याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बरेचसे विद्यार्थी हमीपत्र भरतात परंतु वेळेत दाखला काढत नाहीत असे न करता विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये शिकत असतानाच जातीचा दाखला हा काढून ठेवला तर फायद्याचे आहे.


7.  नॉन क्रिमिलियर | non cremiliayr 

एससी व एसटी या जातीसाठी उत्पन्नाची कोणती नसल्यामुळे त्यांना प्रवेश घेत असताना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसते. परंतु ओबीसी एनटी,इतर मागास याच्यासह इतर सर्व काही जाती आहेत त्या जातींना आपल्या आरक्षणाचा लाभ घेत असताना जातीच्या दाखल्याबरोबर उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर हे कागदपत्र सोबत ठेवावी लागते. जर विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला आहे परंतु नॉन क्रिमिलियर मिळत नाही किंवा त्यासाठी ती व्यक्ती पात्र ठरत नसेल तर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळत नाही तर यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदरच नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाचा दाखला या आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून काढून ठेवावा यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना मात्र उत्पन्नाची कोणतीही अट नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या कागदपत्राची चिंता करू नये किंवा जातीच्या दाखल्या वरती त्यांचा प्रवेशा निश्चित होऊ शकतो. यावर्षी हमीपत्र भरून 3 महिन्यात आपण उन्नत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलेयर साठी वेळ वाढवून मागू शकता.

💥महाराष्ट्रात होणार मेगा तलाठी भरती जाहिरात  👈

8. जात पडताळणी प्रमाणपत्र (not compulsory,)

शक्यतो जे विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या एंट्रन्स एक्झाम देण्या अगोदर जर आपल्याला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल,तर जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अकरावी प्रवेशाच्या वेळी जातीच्या दाखल्यावर देखील प्रवेश मिळतो, परंतु भविष्यामध्ये आपल्याला त्यात जातीची पडताळणी करावी लागते. म्हणून हे देखील एक 10 वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र आहे, परंतु ते सुरुवातीला तुमच्याकडे असेलच असे नाही पण ते कागदपत्र महत्वाचे आहे अधिकची माहीती म्हणून ही  माहिती देत आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी तुम्हाला ते जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले जाईलच असे नाही .मात्र बारावीला असताना कोणते entrance exam किंवा cet  देताना  आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी गरजेचे असते.  ही आगाऊ माहिती म्हणून लक्षात ठेवावी. 


9. खेळ  संदर्भातील कागदपत्रे| sport reletaed document ,khelachi prmanpatre 

जर आपण स्पोर्ट कोट्यातून प्रवेश घेणार असाल ? तर आपण राज्य स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती अमुक एका खेळामध्ये सहभाग घेतला आहे.त्या सहभागाची कागदपत्रे आपल्याजवळ असायला हवेत. तसेच ते कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केलेल्या सभेत साक्षांकित केलेल्या असावीत हे लक्षात घ्यावे.


10. दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे पुरावे दाखले | divyang apngtv purave 

जे विद्यार्थी दिव्यांग किंवा अपंग आहेत. अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ आहे ,तो लाभ घेण्यासाठी त्यासाठी लागणारे  सर्व दाखले सोबत ठेवावे लागतील. तरच त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. handicaped ,अपंग  विद्यार्थ्यांनी अपंगत्वाचे सर्व सर्टिफिकेट काढून घ्यावेत.  जर ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र आपल्या जवळ नसतील तर मात्र आपला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. 


11. एसएससी परीक्षेचे हॉल तिकीट |ssc pariksha haal tikit 

जर एखाद्या महाविद्यालयाला गरज वाटल्यास दहावीच्या निकाला बरोबर तुम्हाला एसएससी परीक्षेचे हॉल तिकीट किंवा त्याचे झेरॉक्स देखील मागितले जाऊ शकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटच्या सत्यप्रती सोबत ठेवाव्यात. प्रत्येक महाविद्यालयामध्ये मागितला जातील असे नाही परंतु त्या सोबत असणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा. 


12 आधार कार्ड किंवा ओळखपत्र | adhar card 

अकरावी प्रवेश घेण्यासाठी अबक ही व्यक्ती तुम्हीच आहात. हे कशावरून समजणार तर त्यासाठी आपले ओळखपत्र सोबत ठेवा. की ज्यावरून ती व्यक्ती तुम्हीच आहात ही तुमची ओळख पटेल आणि तुम्हाला प्रवेश देणे निश्चित होईल. यासाठी अकरावी प्रवेशाचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून आपल्या शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड घेऊन जायला विसरू नका. 


13. फोटो photo 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी ज्या महाविद्यालयामध्ये आपला क्रमांक लागेल.त्यावेळी त्यांच्याकडून देखील काही फॉर्म तुम्हाला दिले जाऊ शकतात. तर त्या फॉर्म वरती फोटो लावायला विसरू नाक.  आय कार्ड साईज फोटोहे  त्याच्या  पाच ते सहा प्रती सोबत ठेवा. कारण वेगवेगळी कार्ड्स वेगवेगळ्या नोंदी तुमच्या तिथे ठेवावे लागतात. त्यामुळे एक आगाऊ तयारी म्हणून तुम्ही फोटो देखील काढून ठेवू शकता. 


14 इतर कागदपत्रे |other documents 

जे विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी भूकंपग्रस्त ,प्रकल्पग्रस्त खेळाडू किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे पालक असा ल किंवा तुम्ही अनाथ म्हणून जर प्रवेश घेत असाल तर म्हणजेच काहीतरी कागदपत्रे विशिष्ट अशा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी सादर करायचे आहेत. इतर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांना कोणते कागदपत्रे सादर करायची नाहीत. म्हणजेच काय तर फॉर्म भरतेवेळी आपण जी कागदपत्रे टाकलेले असतील ते कागदपत्रे विद्यार्थ्यांनी यावेळी सादर करायचे आहेत हे लक्षात ठेवावे. 


15स्टुडेंट आय डी | STUDENT ID 

विद्यार्थी नोंदणी सरल मध्ये करण्यासाठी स्टुडेंट आय डी ची आवश्यकता असते. तो दाखल्यावर असतो पण खात्री करा नाहीतर शाळेतून तो नोंदवून घ्या. अन्यथा परत तुम्हाला तो id आणण्यासाठी शाळेत  जायला लागू शकते.  


अशा पद्धतीने अकरावी प्रवेशासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही जवळ ठेवायचे आहेत.  थोडक्यात सांगायचे झाले तर ,अकरावी प्रवेशाचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या ज्या कागदपत्रांच्या नोंदी अर्जात केलेल्या आहेत. तिची कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध आहेत. ते सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति म्हणजेच ओरिजनल प्रति सोबत ठेवायच्या  आहेत. त्याचबरोबर त्या प्रत्येक कागदपत्रांच्या काही सत्यप्रती सोबत ठेवा.कारण शाळेचा दाखला याची मुख्य प्रत जमा करून घेतली जाते. परंतु इतर कागदपत्रांच्या सत्यप्रती या जमा करून घेतल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो आजची 11 वी प्रवेशासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंट करा जर काही विशेष विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त काही कागदपत्रे लागत असतील तर त्याबाबत कमेंट करा म्हणजे आपल्या इतर मित्र मैत्रिणींना याबाबत आपल्याला अपडेट करता येईल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


आमचे हे लेख जरूर वाचा

 दहावी नापास ते आज 2 लाख पगार कसे केले जरूर वाचा 

*जास्त टक्केवारी हवीय असा करा अभ्यास 

मुलांवरील लैंगिक अन्याय थांबवेत यासाठी कडक कायदा पोक्सो माहिती

तत्काळ नोकरीसाठी अकरावी करत करत हे iti कोर्सेस  करा 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area