गुरुपौर्णिमा निबंध | GURUPOURNIMA NIBANDH
आजच्या लेखातून आपण गुरुपौर्णिमा की जी व्यसपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.तसेच आषाढ महिन्यात येत असल्याने आषाढ पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. या दिवसाचे महत्त्व समजावे म्हणून गुरुपौर्णिमा निबंध मराठी आज आपण पाहणार आहोत. GURUPOURNIMA NIBANDH हा आपण मराठी मधून पाहणार आहोत. हा निबंध गुरूचे महत्त्व आला तरी हाच भाग लिहावा.
गुरुपौर्णिमा निबंध Guru Pournima Nibandh
आपल्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय वंदनीय स्थान आहे.अशा या गुरूंना वंदन करण्याचा त्यांनी दिलेल्या ज्ञानरूपी शिकवणीपुढे कृतज्ञ होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.जीवन जगत असताना आपल्याला ज्या ज्या व्यक्ती नव नवीन ज्ञान देतात मग त्या वयाने लहान असो की थोर याला महत्व नाही तर त्या व्यक्तीने आपल्याला विशिष्ट प्रसंगी कोणती तरी चांगली शिकवण दिली आहे म्हणून त्या गुरु स्थानी आहेत. या अर्थाने गुरुपौर्णिमा हा दिवस महत्त्वाचा आहे.
गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे अजून एक महत्व सांगायचे झाले तर महाभारताची रचना ज्यांनी केली असे आद्य गुरु व्यास यांचा हा जन्मदिवस म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हटले जाते .गुरुपौर्णिमा ही केवळ हिंदू धर्मातच महत्त्वपूर्ण मानली जाते असे नाही तर बौद्ध, जैन,शीख धर्मात देखील गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना नमस्कार करतात,वंदन करतात व गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात.
पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती. त्यावेळी गुरुपौर्णिमेच्या आनंदी आनंद असे याच दिवशी गुरु हे शिष्याला कानमंत्र देत असत. आणि शिष्य हा त्या बदल्यात गुरुला गुरुदक्षिणा देत असे. अलीकडे गुरुकुल पद्धती जरी नसली तरी गुरुचे महत्व हे अढळ आहे. आज किती जरी इंटरनेटचा जमाना आला,जग किती जवळ आले तरी गुरूंचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.कारण गुरु जे शिष्याला अनुभव देतात ते अनुभव जीवनात अतिशय उपयोगी पडणारे असतात.जीवन जगत असताना जर काही कठीण प्रसंग आले शिष्य हाताश झाला असेल अशावेळी त्याला मार्गदर्शन करून पुन्हा सामर्थ्याने उभे करण्याची ताकद गुरु वचनामध्ये आहे.किंवा गुरुमध्ये आहे. याला गुरु महिमा असे पण म्हणता येईल.
एखादा छोटा मोठा व्यवसाय जरी आपण करायचे म्हटले तरी तो व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला कोणाचे ना कोणाचे मार्गदर्शन घ्यावेच लागते. हे मार्गदर्शन घेत असताना ज्या व्यक्तीने आपल्याला ते मार्गदर्शन केले ती व्यक्ती देखील जरी आपला मित्र, नातेवाईक असली तरी त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगला मार्ग दाखवला म्हणून ती देखील त्या क्षणपूरती गुरुच आहे अशी भूमिका आपली हवी.
गुरुविण ज्ञान नाही,
गुरुविन मान नाही,
गुरुविण ध्यान नाही,
गुरुविण उद्धार नाही.
अशी ही गुरुची ख्याती वर्णन करायची म्हटले तरी शब्द पुरे पडतील. एवढे गुरुचे स्थान मोठे आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात आपल्याला गुरु प्राप्त होत नाही,तोपर्यंत खरे ज्ञान काय असते? ते आपल्याला कधीच समजणार नाही. गुरूंविषयी सांगायचे झाले तर आजपर्यंतचे कोणतेही गुरु घ्या त्यांच्यात एक सेवाभावी वृत्ती आपल्याला दिसते. आपल्याजवळ असलेले ज्ञान कोणताही गुरु कोणताही गर्व न करता ,हातचा न राखता ते आपल्या शिष्याला देत असतात.बऱ्याचदा गुरुपेक्षा शिष्य मोठा होतो परंतु याचे गुरुला वाईट नाही तर उलट अभिमान वाटतो. यावरूनच गुरुचे महत्व नि मोठेपणा आपल्याला समजतो. गुरु हा शिष्याला वर्तमान काळातील परिस्थिती आणि भविष्याची गरज यांचा विचार करून मार्गदर्शन करत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये चित्र थोडे बदलत चाललेले आहे.गुरुपौर्णिमा निबंध 500 शब्दात लिहा असा देखील प्रश्न येतो.
आजच्या या कलियुगामध्ये माणूस स्वार्थी बनत चालला आहे. शिक्षण किंवा ज्ञानदानाच्या क्षेत्रात देखील टेक्नॉलॉजीने जागा घेतली आहे. वेगवेगळे ॲप्स, युट्युब चॅनल्स, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, ऑनलाइन शिक्षण यांच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम केले जात आहे. या सर्वांमुळे प्रत्यक्ष गुरुचे महत्व थोडे कमी झाले असे वाटत असले तरी गुरुशिवाय घेतले जाणारे ज्ञान केवळ पोपटपंची आहे. असे तंत्रज्ञानाच्या साह्याने घेतलेले ज्ञान माणसाला कधी दगा देईल ते आपण सांगू शकत नाही.म्हणून गुरूच्या सहवासात ज्ञान घेतले पाहिजे.आज सर्व क्षेत्रात झालेले बाजारीकरण ज्ञानदानाच्या क्षेत्रात देखील होताना दिसत आहे खेदाची बाब आहे. (Guru Pournima Nibandh)
आपण आपल्या भारत वर्षाचा इतिहास जर पाहिला तर आपल्या भारतामध्ये खूप मोठी गुरु शिष्य परंपरा आपल्याला दिसते.अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य,चंद्रगुप्तांचे गुरु चाणक्य त्याचबरोबर खूप मोठी शिष्यांची देखील परंपरा आपल्याला पाहायला मिळते.
गुरूंचे महत्त्व ओळखूनच आपल्या भारत देशामध्ये गुरूंच्या नावाने पुरस्कार देण्याची पद्धत सुरू झाली आहे आहे. जसे की खेळाच्या क्षेत्रामध्ये जर ज्या व्यक्तीने चांगले खेळाडू बनवले तर त्या व्यक्तीला द्रोणाचार्य या पुरस्काराने गौरवित केले जाते. आज आपण क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरचे नाव घेतो,परंतु सचिन तेंडुलकर का घडले ? तर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे. म्हणजेच गुरूंच्या मार्गदर्शनामुळेसचिन हा एक महान खेळाडू बनला हे आपल्याला विसरून चालणार नाही.परंतु सचिनच्या मध्ये एक चांगला क्रिकेटर बॅट्समन दडला आहे. हे ओळखण्याचे काम त्याचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांनी केले. अशी कितीतरी आपल्याला उदाहरणे देता येतील की त्यांच्या गुरूंमुळे शिष्य उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत.
आपल्याला चार भिंतीच्या आत किंवा लिहायला, वाचायला, शिकवतात ते आपले शिक्षक म्हणून तेच आपले गुरु असे आहे का? तर नाही. शिक्षकांबरोबरच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी हे देखील आपल्याला वेळप्रसंगी काही ना काही शोध बोध देत असतात. त्याचबरोबर आपले आई-वडील जर आपण चुकीचे वागलो तर आपला कान पकडण्याचे काम करत असतात. म्हणजेच ते देखील आपले गुरु आहेत. संत मंडळी देखील गुरुच आहेत.एवढेच काय एखादे निर्जीव पुस्तक देखील त्यातून जर आपण एखादा चांगला बोध किंवा विचार घेतला तर त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळाले तर ते पुस्तक देखील आपला गुरुच आहे. म्हणजे गुरु ही खूप व्यापक संकल्पना आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सुसंस्कारी बनायचेय? तर गुरु हवा
ज्ञानी बनायचेय ? तरी देखील गुरु हवा,
संकटात अडकलाय ? तरी देखील गुरूच हवा,
ज्ञानाचा गर्व झालाय? तो उतरवायला देखील गुरूच हवा,
अवघ्या जगाचा उद्धार करायचाय ? आहे तरी गुरुच हवा.
थोडक्यात काय तर काहीही असो गुरुशिवाय गत्यंतर नाही हे अगदी तितकेच खरे आहे.
गुरूंची जर आपल्यावर कृपादृष्टी असेल तर या जगात आपल्याला अशक्य काहीच नाही.चंद्रगुप्त मौर्यांना त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद मिळाला आणि ते महान सम्राट बनले.ही झाली एक बाजू तर गुरु चाणक्य यांचा कोप गणानंद राजा वरती झाला व तो राजा संपूर्ण कुळाचा नाश करून बसला. याला देखील इतिहास साक्ष आहे. थोडक्यात काय तर गुरु हाच आपल्या जीवनाचा उद्धार करत असतो. हे आपल्याला विसरून चालणार नाही.
गुरु तुमच्या उपकारांचे कसे फेडू ऋण,
तुम्हीच की ओ केले माझे जीवन अनमोल.
यावरील ओळी गुरु विषयी कितीतरी माहिती देऊन जातात अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा निबंध तुम्ही छान पद्धतीने लिहू शकता. हा गुरुपौर्णिमा निबंध एक नमूना आहे तुम्ही याच पद्धतीने अनेक संदर्भ देऊन गुरुपौर्णिमा निबंध छान लिहू शकता. (तुम्ही
आजच्या लेखात आपण गुरुपौर्णिमा निबंध मराठी पहिला तो आपल्याला कसा वाटला?ते कमेन्ट करून नक्की सांगा. आपल्याकडे काही सवनिर्मित kotesion असतील तर ती कमेन्ट करा. तिची भर टाकून अजून छान गुरुपौर्णिमा निबंध लिहिता येईल.
छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा