गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन | guru pournima sutra sanchalan
कोणताही कार्यक्रम असो तो कार्यक्रम त्याचे सूत्रसंचालन जबरदस्त असेल तर तो कार्यक्रम देखील बहारदार होतो. म्हणूनच दोन दिवसांवरती आलेल्या गुरुपौर्णिमेचे सूत्रसंचालन कसे करावे किंवा गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन 2022 कशा पद्धतीने करता येईल. याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचालन ही एक कला आहे. मी सांगतोय तसेच गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन आपण केले पाहिजे असे बिलकुल नाही. आपल्या पद्धतीने आपण सूत्रसंचालन करू शकता मी एक नमुनावजा माहिती देत आहे की त्या माहितीच्या आधारे सूत्रसंचालन करताना तुम्हाला नक्कीच मदत होइल. चला तर वेळ न दवडता आपल्या विषयाकडे वळूया गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन जोरदार करूया.
गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन | guru pournima sutra sanchalan
आगतम स्वागतम सुस्वागतम ।
आगतम स्वागतम सुस्वागतम।
(गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन सुरुवात )
मी अ ब क आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमा निमित्त उपस्थित असलेले माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सहकारी जन व अधिकारी जन यांचे स्वागत करून आजच्या आपल्या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तो कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंविषयी नतमस्तक होण्याचा, गुरूंना वंदन करण्याचा, गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
असं म्हणतात ड्रायव्हर शिवाय गाडी चालेल कशी?
अहो अगदी तसेच आहे गुरुशिवाय ज्ञानाची वृद्धी होईल कशी?
बरोबर बोललो ना ! पटले ना मग होऊ द्या जोरदार टाळ्या.गाडीला ड्रायव्हर नसेल तर गाडी योग्य दिशेने जाणार नाही,अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी जर गुरु नसतील तर आपण देखील कोणत्या दिशेने जात आहोत ? हे आपल्याला उमजणार नाही. थोडक्यात काय तर गुरु आहेत म्हणूनच सृष्टीचा हा पसारा दिसत आहे. मला इथे गुरु म्हणजे ऋषीमुनी, शिक्षक, ज्ञान देणारा, असे बिलकुल म्हणायचं नाही तर ज्यांच्याकडून मग तो लहान असो की थोर ज्याने आपल्याला आपल्या जीवन घडणीमध्ये मदत केली ते सगळे आपले गुरु आहेत. छोटीशी मुंगी ज्यावेळी ती झाडावर चढताना हजार वेळा वर चढते आणि हजार वेळा खाली पडते. त्यावेळी ती संदेश देते जीवनात कधी हार मानायची नाही. ही मुंगी देखील आपला गुरुच आहे बर का!
( अशा पद्धतीने थोडेसे गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन प्रास्ताविक आपण आपल्या पद्धतीने करावे. मी एक नमुना दिलेला आहे तुम्ही आपापल्या पद्धतीने साधारण एक मिनिटांमध्ये ज्यासाठी कार्यक्रम आहे ते सूत्रसंचालकाने बोलावे म्हणजे श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते)
पाहुण्यांचे आसन ग्रहण | pahunyanche aasan grahan
रात्री शिवाय दिवस नाही,
दिवसा शिवाय रात्र नाही,
अहो तसेच आहे कार्यक्रमाचे ,
कार्यक्रमाला देखील अध्यक्षांशिवाय,
रंगत नाही.
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ ब क यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्षस्थान भूषवावे.
गुरुपौर्णिमा प्रमुख पाहुण्यांना विनंती pramukh pahune aasansth vinnati
ज्ञान का सागर,
पंडितो के आगर,
जिनका हम करते है आदर.
असे ऋषितुल्य ज्ञानी महाज्ञानी व्यसंगी श्री अ ब क आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मी व्यासपीठावरती विराजमान व्हावे असे मी त्यांना विनंती करतो.
( गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन करताना पाहूणे जास्त असतील तर त्यांचे कार्यकर्तृत्व याविषयी थोडक्यात माहिती मिळवावी आणि त्या प्रत्येक पाहुण्यांना एक एक करून व्यासपीठावरती विराजमान व्हायला सांगावे. मी एक नमुना दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करावे)
गुरु म्हणजे दीपस्तंभ,
गुरु म्हणजे होकायंत्र,
गुरु म्हणजे ताळतंत्र
अहो! गुरुविषयी बोलायचे म्हटले तर शब्द देखील कमी पडत आहेत.गुरु हे दीपस्तंभ आहेत.ज्या पद्धतीने सागरामध्ये एखादी नाव किंवा जहाज भरकटली की तो दीपस्तंभ त्या भरकटलेल्या जहाजाला किंवा नावेला दिशा दाखवण्याचे काम करतो. किनारा किंवा बेट कुठे आहे ते कळायला मदत होते. आकाशात उडणारे विमान दिशा भरकटले ? असेल तर होकायंत्र विमानाला दिशा दाखवण्याचे काम करते.अगदी त्याच पद्धतीने सामान्य माणूस जर कुठे भरकट असेल, चुकत असेल तर त्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचे काम म्हणजे ताळतंत्र देण्याचे काम गुरू करत असतात. म्हणून आजच्या या कार्यक्रमांमध्ये सृष्टी वरील सर्व गुरूंना वंदन करून आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया.
गुरुपौर्णिमा प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन|pratima pujan aani dip prajvalan
मी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ---- आणि अध्यक्ष ------- यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी.
ही ज्योत आहे ज्ञानाची,
ही ज्योत आहे त्यागाची,
ही ज्योत आहे सामर्थ्याची,
ही ज्योत आहे अंधारामध्ये,
मी सोबत आहे .तू पुढे चल,
असे सांगणारी.
अगदी या ज्योती प्रमाणेच गुरु देखील आपल्याला मार्गदर्शन करत असतात.
आता सन्माननीय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची शानदार अशी सुरुवात केलेली आहे. आता या पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत.चला तर मग जोरदार टाळ्या होऊ द्या. मान्यवरांचे स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करूया.
गुरु पौर्णिमा मान्यवरांचे स्वागत | manyavr swagat
जंगलामध्ये मोरांनी केला नाच,
ज्यांना आमच्या भविष्याची,
असते कायम आच ,
तेच आमच्यासाठी आहेत खास,
त्यांच्यामुळेच या गोकुळाला आलाय हा आरास,
या आधी इथे होते ते सर्व भकास,
आता मात्र आहे सर्व खास खास.
अशा या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे अध्यक्ष अ ब क यांचे स्वागत ....….. यांनी करावे. (गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन हा एक नमूना आहे आपण आपल्या परीने छान मांडणी करावी काव्यच असावे असा हट्ट नको)
ज्ञान का गुरुर है हम,
ज्ञान ही हमारा श्वास है,
ज्ञान के बिना कुछ भी नही है हम I
असे आपल्या ज्ञान साधनेच्या बळावर आजच्या आपल्या व्याख्यानातून सर्वांना मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ ब क यांचे स्वागत...... यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
( यानंतर इतर पाहुण्यांना देखील स्वागतासाठी सज्ज करावे पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून द्यावा)
स्वागत गीत | swagat git
दीप प्रज्वलन झाले, प्रतिमा पूजन झाले. पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊनही झाला.अशा या पाहुण्यांचे शब्द सुमनांनी एका छानशा समूहगीताने आपण स्वागत करूया.
स्वागत अतिथी स्वागत तुमचे/
या हो या हो अतिथी गण/
आम्ही आपल्या स्वागता आतुर-------
यापैकी एखादे स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे. शक्य नसल्यास youtube वरील विविध स्वागत गीतांच्या माध्यमातून किंवा स्वागत धूनच्या माध्यमातून पाहुण्यांचे गीताच्या माध्यमातून स्वागत करावे.
गुरु पौर्णिमा प्रास्ताविक | gurupournima prastavik
मी अ ब क यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे.
चला!चला! पुढे जाऊया,
गुरु पौर्णिमेचाआनंद घेऊ या,
गुरु विना शिष्य नाही,
शिक्षा विना गुरु नाही.
अशा या आगळ्यावेगळ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण या कार्यक्रमाला एकत्रित जमलेलो आहोत. तर यानंतर आपण शाळेतील काही विद्यार्थ्यांची भाषणे घेणार आहोत की ज्या भाषणाच्या माध्यमातून विद्यार्थी गुरु पौर्णिमा किंवा गुरुचे महत्व सांगणार आहेत. त्यानंतर गुरुवंदन करणारी काही गीते, त्याचबरोबर सर्वांचे मनोरंजन व्हावे म्हणून काही नृत्य देखील सादर केले जाणार आहेत
( आपल्या गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन करताना कार्यक्रम व त्याची संपूर्ण रुपरेषा प्रस्ताविकामध्ये सांगावी मी एक नमुना दिलेला आहे या पद्धतीने आपण बदल करावेत)
भाषण देणारे विद्यार्थी, नृत्य गीत सादर करणारे असे योग्य ते नियोजन करून त्यांना व्यासपीठावरती बोलवावे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये प्रमुख पाहुण्यांना भाषणासाठी आमंत्रित करावे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे भाषण | gurupornima atithi bhashan
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने का कमी पडावे,
हे देणे घेणे अखंड सुरूच राहावे,
गुरु व शिष्याचे नाते अजरामर व्हावे.
अशा या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ ब क यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या अमोघ ज्ञानवाणीने आमच्या विद्यार्थी मित्रांना आपल्या ज्ञान मंत्रातून जीवन जगण्यासाठी ज्ञानाचे चार थेंब द्यावेत की जे त्यांना जीवनभर कामी पडतील आणि त्यांचे जीवन सार्थक होईल. यासाठी सन्मा. अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करावे.
गुरुपौर्णिमा अध्यक्षीय भाषण | gurupournima adhyakshiy bhashan
घाई नाही आम्हाला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपण्याची,
आता ओढ लागली, आम्हाला आमच्या अध्यक्षांच्या भाषणाची.
आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ ब क यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण करावे.
( अध्यक्षांच्या भाषणातील ठळक मुद्दे अधोरेखित करून त्यांचे कौतुक करावे)
गुरुपौर्णिमा आभार प्रदर्शन | gurupornima aabhar pradrshan
ही घटका संपूच नये,
हे क्षण असेच राहावे,
गुरुच्या पदस्पर्शाने पुनीत व्हावे,
हे जीवन आमचे सार्थकी लागावे,
हे नयनरम्य सुख कधीच न संपावे,
गुरूचे छत्र कायम असावे.
असंच वाटत आहे ना ! माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना देखील.अहो!पण असे असले तरी थांबावं तर लागेलच ना! चला तर मी यापुढे विनंती करतो की आपल्या शाळेतील अबक यांनी आभार प्रदर्शन करावे.
गुरुपौर्णिमा आभार प्रदर्शन | gurupournima aabhar pradrshan
कार्यक्रमाची सांगता | karykram sangta
आता विश्वात्मके देणे ---------------
किंवा
राष्ट्रगीताच्या माध्यमातून --------------
देखील आपण कार्यक्रमाची सांगता करू शकता. एखादी छानसे गुरुवंदन घेऊन आपण कार्यक्रम संपला असे जाहीर करू शकता.
आजचे गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन हा एक केवळ नमुना आहे. या नमुनाच्या साह्याने आपण आपल्या शाळेतील,सोसायटी,कार्यालये किंवा इतर कार्यक्रमात गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन अगदी छानपणे करू शकता. आणि हो सूत्रसंचालन ही एक कला आहे.त्यामुळे यामध्ये आपापल्या पद्धतीने यात भर टाका. आणि कोणतेही सूत्रसंचालन रंगतदार बनवा.आजचे गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन आपणास कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा धन्यवाद !
सूचना | copyright suchna
या गुरु पौर्णिमा सूत्र संचालन नमुन्यामध्ये असलेल्या चरोळ्या,शेर,कविता माझ्या स्वरचित आहेत. आपण यांचा आपल्या सार्वजनिक कार्यक्रमात माझे नाव न घेता वापर केला तरी कौतुकच आहे,मात्र याला छापील स्वरूपात,Youtube किंवा Facbook, Blog यावर प्रकाशित करण्यासाठी माझी परवानगी घ्यावी लागेल. ही विनंती.
आमचा गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन हा लेख कसा वाटला हे जरूर कळवा.कमेन्ट करा. इतराना पाठवा . धन्यवाद!
आमचे हे लेख जरूर वाचा