गुरुपौर्णिमा भाषण व शुभेच्छा संदेश कविता | GURUPOURNIMA MARATHI BHASAHN SHUBHECHA SANDESH KAVITA
गुरुपौर्णिमा विशेष लेखांमध्ये आपण गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन आणि गुरुपौर्णिमा निबंध पाहिल्यानंतर आज आपण गुरुपौर्णिमा भाषण,गुरुपौर्णिमा शुभेच्छा व गुरुपौर्णिमा कविता पाहणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा होतात या वक्तृत्व स्पर्धांमध्ये हे गुरुपौर्णिमा भाषण तुम्हाला अतिशय उपयुक्त असे ठरणार आहे. या ठिकाणी गुरुपौर्णिमा भाषण मराठी,गुरुपौर्णिमा संदेश व कविता याचा एक नमुना मी देत आहे. इथे दिलेले भाषण जसेचा तसे वाचन करावे किंवा त्याची तयारी करावी असे नव्हे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कल्पकता वापरून गुरुपौर्णिमा भाषण म्हणजेच Gurupournima Speech In Marathi अगदी चांगल्या पद्धतीने तयार करावे. चला तर मग गुरुपौर्णिमा भाषणाला सुरुवात करूया.
गुरुपौर्णिमा मराठी भाषण | GURUPOURNIMA MARATHI BHASAHN
नमस्कार! मी अबक.
अध्यक्ष, महाशय! गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो तसेच उपस्थित असलेले गुरुजन वर्ग यांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
आज आपल्या शाळेमध्ये जो गुरुपौर्णिमे निमित्त जो वक्तृत्व स्पर्धेचा म्हणजे गुरुपौर्णिमा भाषण हा कार्यक्रम होत आहे. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला गुरुपौर्णिमेचे भाषण करण्याची संधी मिळाली. हे मी माझे सौभाग्य मानतो. मी आपणासमोर गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणाच्या माध्यमातून जे काही दोन शब्द सांगणार आहे. ते आपण सर्वानी शांतचित्ताने ऐकावे ही विनंती.
गुरुची महिमा सांगताना एक संत म्हणतात,
करता करे न कर सके,
गुरु करे सब होय,
सात द्वीप नव खंड मे,
गुरु से बडा न होय I
खरोखरच हे विचार अगदी खरे आहेत. या भुतालावरती किंवा संपूर्ण विश्वामध्ये गुरुपेक्षा कोणीच मोठे नाही. हेच या संतवाचनांमधून मला आपल्याला सांगावयाचे आहे.
गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर असा दिवस की ज्या दिवशी संपूर्ण शिष्य परिवार आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये चांगल्या कामासाठी वापरण्याची आपल्या गुरूंना हमी देतो. असा हा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा होय.याच पवित्र दिवशी गुरु हा शिष्याला जीवन जगण्याचा कानमंत्र देत असतो. आणि त्या बदल्यामध्ये शिष्य हा गुरूला काहीतरी गुरुदक्षिणा देत असतो. म्हणून हा विशेष असा दिवस आहे.
खरोखरच आपली हिंदू संस्कृती ही किती महान आहे,
की ज्या संस्कृतीमध्ये गुरूंना खूप आदराचे स्थान आहे.
गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेला येत असल्यामुळे या दिवसाला आषाढ पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. महाभारत या पुराण ग्रंथांची निर्मिती ज्या व्यासमुनी यांनी केली त्या व्यासमुनींचा जन्मदिवस म्हणून या दिवसाला व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. साधारणपणे जून किंवा जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येत असते. गुरु शब्दाची जर आपण फोड केली तर गु म्हणजेच अंधार आणि रु म्हणजेच प्रकाश. थोडक्यात काय तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट जो दाखवतो तो म्हणजे गुरु. यावरून गुरु या शब्दाचे महत्त्व जर एवढे असेल तर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्या त्या गुरूंचा अधिकार किती मोठा असेल. एखादी व्यक्ती जर नावारूपाला येत असेल खूप मोठी बनत असेल तर ती व्यक्ती महान बनण्यामागे त्याच्या गुरुचा वाटा हा अतिशय महत्त्वाचा नि मोठा असतो.
गुरुपौर्णिमा केवळ हिंदू धर्मामध्येच साजरी होते असे नाही, तर जैन,बौद्ध, शीख धर्मामध्ये देखील गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. पूर्वीपासूनच या दिवशी गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. आपल्याला शाळेमध्ये ज्ञान देणारे शिक्षक हे देखील आपले गुरु आहेत पण केवळ शिक्षकच गुरु आहेत का ? असे म्हणणे उचित ठरणार नाही.
आपले आई-वडील,आपले पालन पोषण करतात, लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात, जर आपण काही चुकीचे केले तर वेळप्रसंगी आपल्यावरती रागावतात. म्हणजेच काय तर आई वडील देखील एक अर्थाने आपले गुरुच आहेत. त्याचबरोबर आपले मित्र मैत्रिणी जर आपण कधी चुकत असू तर आपल्याला रागावत असतील चांगला उपदेश करत असतील तर ते देखील त्या क्षणापुरतेआपले गुरुच आहेत.
इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर अनेक गुरूंमुळे कितीतरी लोक उत्तम मार्गाचा स्वीकार करून सदमार्गावरती आलेले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर महर्षी वाल्मिकी यांचे उदाहरण आपल्याला देता येईल. महर्षी वाल्मिकी हे ऋषीपद प्राप्त होण्यापूर्वी एका जंगलामध्ये येणाऱ्या - जाणाऱ्यांची लुटमारी करत होते. लोकांजवळ असणाऱ्या किमती वस्तू ते हिसकावून घेत होते व त्याना ठार देखील मारत होते. एके दिवशी त्या जंगलातून नारद मुनी चाललेले असताना नारद मुनिनी वाल्मिकी म्हणजे पूर्वाश्रमीचा वाल्या कोळी याला विनंती केली की तू हे सर्व पाप कोणासाठी करतोय? त्यावेळी वाल्या कोळी याने उत्तर दिले,की मी सर्व माझ्या परिवारासाठी करत आहे.यावर नारदानी हसून विचारले. या तुझ्या पापा मध्ये तुझे कुटुंबीय तुझे वाटेकरी बनतील का ? हा प्रश्न ऐकून वाल्या कोळी चक्रावून गेला. आणि त्याने नारद मुनी याना एका झाडाला रशीच्या साह्याने बांधून ठेवले. आणि वायू वेगाने आपल्या घरी आला पत्नी यांच्याकडे जाऊन विचारले की, तुम्ही माझे पाप घेणार का?माझ्या पापाचे वाटेकरी होणार का? त्यावेळी वाल्या कोल्याची बायको बोलली, मी तुमची अर्धांगिनी आहे. आणि मला हवे नको ते पाहणे ही तुमची जबाबदारी आहे. मुले देखील बोलली, बाबा आमचा संभाळ करणे, आमचे लाड पुरवणे, हे तर तुमचे कामच आहे. परंतु या बदल्यात आम्ही तुमचे पाप नाही घेणार. हे ऐकून वाल्या कोळी हतबल झाला. घरापासून पुन्हा जंगलाच्या दिशेने नारद मुनीकडे कडे धावत आला आणि नारद मुनींना वंदन करून तुम्हीच आता यावर मार्गदर्शन करा1अशी क्षमा याचना करू लागला. त्याला भेटलेले गुरु नारद यांनी त्याला राम राम मंत्र दिला, परंतु पापांचा डोंगर इतका वाढला होता की,त्याला राम राम म्हणता येत नव्हते. राम म्हणत असताना तोंडातून मरा शब्द येत होते. कालांतराने या मरा मरा मरा मरा मरा मरा मरा या शब्दाचे रूपांतर राम राम यामध्ये झाले आणि वाल्या कोळी महर्षी वाल्मिकी बनला.व त्याने एक अनमोल असा ग्रंथ लिहिला किंवा त्याची रचना केली तो ग्रंथ म्हणजे रामायण होय. आजही ज्या राम राज्याचे नाव घेतले जाते. ते रामराज्य कसे असावे? याची सर्व मांडणी महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणमध्ये केलेले आहे.
सांगण्याची तात्पर्य काय तर रंकाला राजा बनवण्याचे सामर्थ्य गुरु मध्ये असते. आपल्या शिष्याला मार्गदर्शन करून त्याला उंचीवरती पोहोचवणे हीच गुरुची तीव्र इच्छाशक्ती असते.
भारतीय संस्कृतीत तर गुरूंना इतके आदराचे स्थान आहे, की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. खूप मोठे कार्यक्रम गुरुपौर्णिमे निमित्त होत असतात. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये गुर पॉर्णिमा साजरी केली जाते, पण अलीकडे कुठेतरी या तंत्रज्ञानाच्या किंवा टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये युट्युब, फेसबुकच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान मिळवताना दिसत आहेत. हे ज्ञान मिळवत असताना कुठेतरी गुरूंचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. असे असले तरी जर आपल्याला निखळ आणि निखालस म्हणजे शुद्ध ज्ञान मिळवायचे असेल,तर त्यासाठी जीवनामध्ये गुरु असणे अतिशय गरजेचे आहे. मी तर म्हणेल तंत्रज्ञानामध्ये फोर जी आले फाईव्ह जी आले यापुढे कदाचित सिक्स जी पण येईल परंतु आमचे गुरुजी म्हणजेच गुरु यांचे महत्व कधीच कमी करू शकणार नाहीत. कारण गुरुजी जो अमृतानुभव आपल्याला देत असतात ते अमृतरूपी ज्ञान जीवनभर कामाला येणारे असते. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या या गुरुपौर्णिमा भाषणामध्ये माझ्या वाणीला विराम देता देता एकच सांगेन,
गुरु पाठीराखा,
गुरुच असतो सखा,
गुरु म्हणजे सावली,
गुरु म्हणजे आपला उद्धारकर्ता ,
गुरु म्हणजे सुखाचा सागरू,
गुरु म्हणजे कल्पतरू.
माझे हे गुरुपौर्णिमा भाषण आपण शांत चित्ताने आपण एकूण घेतले त्याबद्दल आभार.
जय हिंद! जय महाराष्ट्र.