Type Here to Get Search Results !

कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच | kaumaaray chachni avaidnyanikach

 कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच | kaumaaray chachni avaidnyanikach

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आज एक महत्वपूर्ण निर्णय आज दिलेला आहे.की ज्या निर्णयाची इतिहासात नोंद घेतली जाईल. तो निर्णय म्हणजे कौमार्य चाचणी किंवा परीक्षा  ही अवैज्ञानिकच आहे. यावरती राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानेआज शिक्कामोर्तब केलेले आहे.कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच का?ते पटवून देखील सांगितले आहे. आता वैद्यकीय अभ्यासक्रमात देखील कौमार्य चाचणी ही अवैज्ञानिक कशी आहे याविषयी 1 घटक अभ्यासक्रमात असणार आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी उचललेले हे सर्वात महत्वाचे पाऊल आहे.तर कौमार्य चाचणी अवैज्ञानिक का? याविषयी न्यायलयात काय बाजू मांडण्यात आली की ज्यामुळे ते अवैज्ञानिक ठरले याविषयी आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत. 

कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच

कौमार्य  चाचणी अवैज्ञानिक का ठरवण्यात आली | kaumaaray chachni avaidnyanikach ase ka thravnyat aale 

 कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे.असा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिला. या आयोगाच्या मते एखाद्याच्या कौमार्याची परीक्षा किंवा चाचणी  करणे म्हणजे  आपल्याकडे असणाऱ्या अनेक वाईट कु प्रथांपैकी एक कुप्रथा आहे. असे मत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अभ्यास कमिटीने दिलेले आहे. म्हणून कौमार्याची चाचणी अवैज्ञानिक आहे.असा स्वागत करावा असा निर्णय देण्यात आला. 

कौमार्य चाचणी चुकीची पाठपुरावा |  kaumarya chachni chukichi 

कौमार्य चाचणी अंधश्रद्धेला धरून आहे. कौमार्य चाचणीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा  कडाडून विरोध होता . एवढेच नव्हे तर त्याबाबत न्यायलयात कायम पाठपुरावा देखील केला. 

कौमार्य  चाचणी अमानवी kaumaray chachni amanvi 

कौमार्य चाचणी ही अमानवी आहे.लोकांमध्ये भेदभाव करणारी आहे. अमुक असे झाले म्हणून कौमार्य चाचणी पास हे बुद्धीला न पटणारे आहे. म्हणून ही चाचणी अमानवी आहे म्हणजेच कौमार्य चाचणी  अवैज्ञानिकच आहे असा देखील मुद्दा मांडण्यात आला.

कौमार्य चाचणी आणि जातपंचायती |  jaat panchayti aani kaumary chachni 

काही समूहात किंवा जात पंचायतीत कौमार्य परीक्षा घेतली जाते.ज्यावेळी खूप टोकाची स्थिती येते. त्यावेळी न्यायव्यवस्था पण कौमार्य चाचणी करावी असे निर्णय देताना दिसते.थोडक्यात हे सर्व बदलायला हवे म्हणून तर राष्ट्रीय वैद्यकीय मंडळाने एक समिति घटित करून जो अहवाल प्राप्त झाला त्याला अनुसरून निर्णय दिल्याचे दिसते. 

वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि कौमार्य चाचणी |  kaumarya aani vaidyakiy abhyaskram 

पूर्वी कौमार्य चाचणी घटक वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवला जात होता,आता मात्र आता नव्याने अभ्यासक्रमात कौमार्य परीक्षा किंवा चाचणी ही  एक कुप्रथा असून तीअवैज्ञानिक आहे तसेच अमानवी आहे अशा आशयाने शिकवला जाईल. थोडक्यात कौमार्य तपासणी याकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती चुकीचा आहे हे अभ्यासक्रमातून शिकवले जाणार आहे.  

कौमार्य चाचणीबाबत न्यायालयाची भूमिका kaumarya chachni aani nyaylyachi bhumika  

कौमार्य चाचणी बाबत विविध प्रकरणात न्यायालय देखील लोकांना ही पद्धत कशी चुकीची आहे. हे पटवून देणार आहे हे कसे अमानवी नि भेदाभेद करणारे आहे याविषयी माहिती दिली जाणार आहे. 

थोडक्यात काय तर कौमार्य परीक्षा किंवा चाचणी आता एक कुप्रथा आहे ती बंद झाली पाहिजे याची जाणीवजागृती केली जाणार आहे.

कौमार्य अवैज्ञानिक ठरवणारी समिती | kaumarya avidnyanik thravnarya samitiche ghatna  

कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे असा निर्णय देणाऱ्या तज्ज्ञ समितीची नेमणूक राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी यासाठी एक समिती घटित केली होती या म्हणजे 27 जुलै 2022 ला निर्णय किंवा अभिप्राय न्यायलयात सादर केला.त्यानुसार कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे.असे प्रतिपादन करण्यात आले. 

आजच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.पण जी कौमार्य चाचणी केली जाते म्हणजे नेमके काय ? किंवा कौमार्य चाचणी म्हणजे काय ? हे पाहिल्याशिवाय यातील गांभीर्य आपल्याला समजणार नाही.  

कौमार्य चाचणी म्हणजे काय? | kaumarya mhnje kaay what is meaniang of kaumaarya 

काही समाजांमध्ये नववधूला कौमार्य चाचणी द्यावी लागते. म्हणजेच कौमार्य चाचणी म्हणजे काय तर   ज्या स्त्रीचे नवीन लग्न झालेले आहे त्या स्त्रीशी किंवा नववधूशी तिचा पती ज्यावेळी लग्नानंतर पहिल्यांदा शरीर संबंध ठेवेल. त्यावेळेस जर रक्तस्त्राव झाला तर ती स्त्री कौमार्य परीक्षा पास झाली. किंवा चाचणी पास झाली असे म्हटले जाते.  एका प्रकारे त्या विवाहला तो समूह किंवा समाज मान्यता देत असतो. आणि जर असे घडले नाही----------रक्तस्त्राव झाला नाही तर. त्या स्त्री कौमार्य चाचणी  नापास झाली म्हणून तिच्यासोबत संसार देखील थाटला जात नाही. हे किती चुकीचे आहे याची यातून कल्पना येते.

कौमार्य चाचणी माहिती व video  

कौमार्य चाचणी सविस्तर माहितीसाठी खालील vedeo जरूर पहा chennel subscribe करा



 

खरोखरच आपल्या या पुढारलेल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अशा अनिष्ट प्रथा सुरू आहेत.  खरोखरच ही  खेदाची बाब आहे. राष्ट्रीय वैद्यकीय मंडळांनी आज जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे. कारण असे काही असणे कौमार्य चाचणी घेणे हेच किती चुकीचे आहे हे या सर्व कौमार्य चाचणी वरून लक्षात येते.  

कंजर भट या जातपंचायत मध्ये किंवा या समूहात राहणारे  लोक आजही लपून छपूनअशा चाचण्या घेताना दिसतात. म्हणजेच आजही महत्व दिले जाते. खरोखर हे सर्व बदलणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील केवळ अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या लोकांनीच पुढे नको यायला तर समाजातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आज आपण पाहतो ज्या पद्धतीने जात पंचायतीच्या दबावाखाली अनेक स्त्रियांना कौमार्य  चाचणी द्यावी लागते.अगदी तसाच एक भीषण प्रश्न म्हणजे 18 वर्षाखालील मुले मुली यांची देखील लैंगिक पिळवणूक नको ते यासाठी जो pocso कायदा करण्यात आलेला आहे.  त्या कायद्याविषयी देखील आपण लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे. 

तर आजच्या लेखतील कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच यातून हा निर्णय घेणे किती गरजेचे होते याची कल्पना येते. 

आमचे काही  लेख म्हणजे शब्दरूपी अमृत आहेत जरूर वाचा. 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area