लोकमान्य टिळक मराठी भाषण निबंध | Lokmanya Tilak Marathi Bhashan |Lokmanya Tilak marathi Nibandha | lokmanya tilak marathi speech | lokmanya tilak marathi essay lokmanya tilak information in marathi |lokmanya tilak yanchi marathi mahiti
लोकमान्य टिळक भाषण ,निबंध,मराठी माहिती |
लोकमान्य टिळक मराठी भाषण | Lokmanya Tilak Marathi Bhashan
चला तर मग लोकमान्य टिळक मराठी भाषण अगदी जोशात कसे देता येईल याचा एक नमूना मी आपल्याला देत आहे आपण आपल्या जवळ असलेली माहिती व मी या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे नक्कीच लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील भाषणाच्या माध्यमातून श्रोते वर्गाच्या टाळ्या नव्हे तर बक्षीस देखील मिळवु शकता चला तर आपले lokmanya tilak marathi speech ला सुरुवात करूया. सुरुवात ही आकर्षक असावी -----
लोकमान्य टिळक मराठी भाषण
अध्यक्ष ! महाशय ! गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एका महान व्यक्तिमत्वबद्दल दोन शब्द सांगणार आहे. ते दोन शब्द तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती.
स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है I
और मै उसे लेकर रहूंगा I
किंवा
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी मिळवणारच !
अशी इंग्रजांविरुद्ध ललकारी देणाऱ्या लोकमान्य टिळकांविषयी मी आज भाषण देणार आहे.
लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होय. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका छोटेखानी चिखली या गावांमध्ये झाला.टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर पंत होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय स्वाभिमानी असे व्यक्तिमत्व होते. त्यांना लबाड बोलणे, खोटे बोलणे, अजिबात आवडत नसे. त्यांच्या खरेपणा बाबत एक किस्सा नेहमी सांगितला जातो. की ते प्राथमिक शिक्षण घेत असताना म्हणजेच शाळेमध्ये शिकत असताना, एके दिवशी मुलांनी शाळेमध्ये भुईमुगाच्या शेंगा खाऊन त्याची टरफले वर्गामध्येच टाकली लोकमान्य टिळक यांना शिकवायला असणारे गुरुजी मधल्या सुट्टी नंतर वर्गामध्ये आले. त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितली. नाहीतर संपूर्ण वर्गाला शिक्षा करणार ! अशी तंबी देखील लोकमान्य टिळक यांच्या गुरुजींनी दिली. अशावेळी आपल्या गुरुजींना देखील ठणकावून सांगणारे मी जर शेंगा खाल्ल्याच नाहीत तर मी टरफले का उचलू यातूनच त्यांचा स्वाभिमानी स्वभाव आपल्याला दिसून येतो. यामुळेच किंवा या स्वभावाचे फलित म्हणून राष्ट्र भक्तीसाठी टिळक नेहमी आग्रही राहिले.
लोकमान्य टिळक यांनी आपले प्रारंभीचे शिक्षण मराठी भाषेतून घेतले प्राथमिक शिक्षण कम्प्लीट झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी आले. पुण्यातील प्रसिद्ध अशा डेक्कन महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. आणि बॅचलर ही पदवी मिळवली. लोकमान्य टिळक यांना अभ्यासामध्ये प्रचंड रुची होती. गणित आणि संस्कृत हे विषय म्हणजे त्यांचे जीव की प्राण होते. डेक्कन महाविद्यालयात शिकत असताना एक थोर समाज सुधारक आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी त्यांची मैत्री झाली. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी मिळून समाज सुधारण्यासाठी खूप बहुमूल्य असे काम केले. सांगायचे झाले तर 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने या दोघांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्याचबरोबर पुण्यामधील ख्यातनाम असे फर्ग्युसन कॉलेज देखील लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. आज देखील या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लावतात थोडक्यात काय तर दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावी ही भूमिका लोकमान्य टिळकांची त्याकाळी होती ही आपल्याला यातून दिसते.
लोकमान्य टिळक यांनी पत्रकार म्हणून देखील काम पाहिले. आपली पत्रकारिता करत असताना वर्तमानपत्रे, मासिके यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय चळवळी उभारल्या लोकांमध्ये देशप्रेम व समाजभान निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा यासारखी वर्तमानपत्रे सुरू केली. आपल्या जहाल अशा कलमाने अग्रलेख लिहून इंग्रजांवरती सडकून टीका त्यांनी केली .लोकमान्य टिळकांविषयी अजून सांगायचे झाले तर, या इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावले पाहिजे असे ठाम भूमिका लोकमान्य टिळक यांनी घेतली होती. परंतु सर्व लोकांना एकत्र कसे आणायचे कसे? या कल्पनेतूनच त्यांनी शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे कार्यक्रम किंवा उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळेच लोक एकत्र येऊ लागले. आणि यातूनच अप्रत्यक्षरीत्या पडद्यामागून स्वातंत्र्याचा लढा तीव्र होत गेला लोकमान्य टिळक आपल्या वर्तमानपत्रातून इंग्रज सरकारवर कायम टीका करीत होते, म्हणूनच ब्रिटिश सरकारने त्यांना 1897 साली राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली जवळजवळ दीड वर्ष तुरुंगामध्ये ठेवले. हा राजगृहाचा खटला बरेच दिवस चालला आणि राजगृहाच्या गुन्ह्याबद्दल त्यांना मंडले या तुरुंगात सहा वर्ष तुरुंगवास देखील भोगाव लागला.
लोकमान्य टिळक हे आणि बेझंट यांच्या कार्याने प्रेरित झाले. आणि म्हणूनच त्यांनी होमरूल लीग संघटनेची स्थापना केली. टिळकांचे भाषेविषयीचे योगदान सांगायचे झाले तर हिंदी आपली राष्ट्रभाषा बनायला हवी. यासाठी त्यांनी हट्ट धारला आणि म्हणूनच हिंदी आपली राष्ट्रभाषा बनली.अखिल भारतामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम किंवा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. इंग्रजांविरुद्ध प्रचंड जनक शोक तयार करण्याचे काम कोणी केले असेल ते लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्या या विचारांमुळेच भारतातील जनता ही त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला खूप मोठा पाठिंबा देत होती.
लोकमान्य टिळकांचा एक विचार मनाला आजही भावत आहे, आपल्या भाषणातून किंवा अग्रलेखातून लोकमान्य टिळक म्हणतात,
अन्याय करणारा जितका दोषी नसतो,
तितका अन्याय सहन करणारा दोष असतो
थोडक्यात काय तर आपल्यावर कोण अन्याय करत असेल तर आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे. असे विचार लोकमान्य टिळक यांचे होते , म्हणूनच त्यांच्या मनामध्ये इंग्रजांविषयी प्रचंड रोष होता.
लोकमान्य टिळक यांनी केवळ राष्ट्रप्रेम वाढवण्यावर भर दिला असे नाही,तर अंधश्रद्धा व अस्पृश्यता यावर देखील त्यांनी सडकून टीका केलेली आपल्याला दिसते. म्हणून तर ते एके ठिकाणी ते म्हणतात,
जर का देव अस्पृश्यतेला मानत असेल,
तर मी त्या देवाला देव मानत नाही.
थोडक्यात काय तर माणसा माणसांमध्ये भेद करणे लोकमान्य टिळक यांना पसंत नव्हते. राष्ट्रप्रेम आणि समाजसुधारणा अशी भूमिका टिळक यांची पाहायला मिळते.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर आपल्या भारतीय जनतेने, भारतीय तरुणांनी काय केले पाहिजे? याविषयी एके ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणतात, ''गरम हवेच्या लाटांना सामोरे न जाता, कष्ट न करता, तळपायाला फोड न येता, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही.'' कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. यातून लोकमान्य टिळक किती प्रयत्नवादी होते. कष्टांना महत्त्व देणारे होते हे आपल्याला दिसून येते.
असे हे महान व्यक्तिमत्व इंग्रजांशी कडा संघर्ष देत असताना आपल्या लेखणीच्या,आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक 1920 साली आसमंतात विलीन झाले. खरोखरच तो दिवस इतिहासातील एका अतिशय दुःखद असा दिवस होता. की ज्या व्यक्तिमत्त्वाने देशाला स्वाभिमान शिकवला. ते व्यक्तिमत्व आपल्याला सोडून कायमचे गेले. आज या भाषणाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नागरिकांमध्ये तो स्वाभिमान ते देशप्रेम निर्माण व्हायला हवे ! की जे लोकमान्य टिळक यांच्यामध्ये होते. निरभीडपणे बोलण्याची त्यांची शैली आजच्या पुढार्यांमध्ये दिसत नाही. जाता जाता एवढंच म्हणे असा लोकमान्य होणे नाही.
माझे आजचे लोकमान्य टिळकांविषयी चे दोन शब्द सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद.
अशा पद्धतीने लोकमान्य टिळक मराठी भाषण आपण अधिकची तयारी करून छान करू शकता.लोकमान्य टिळक जयंती ,लोकमान्य टिळक पुण्यतिथी च्या वेळी लोकमान्य टिळक मराठी भाषण किंवा lokmanya tilak marathi speech नक्कीच छान देऊ शकता.
लोकमान्य टिळक मराठी निबंध lokmanya tilak marathi nibandh lokmanya tilak marathi essay
आपण आजच्या लेखात लोकमान्य टिळक मराठी भाषण यात लोकमान्य टिळक यांची बरीचशी माहिती पहिली याच माहितीचा उपयोग करून लोकमान्य टिळक मराठी निबंध तुम्ही तुमचे कौशल्य वापरुन छानपणे लिहू शकता फक्त भाषणाची शैली वेगळी असते आपण कोणाशी तरी बोलत आहोत अशी असते तर निबंध शैलीत माहिती द्यायची असते वरील महितीतील काही ठळक बाबी घेऊन आपण lokmanya tilak marathi essay कसा लिहिता येईल तर पुढीलप्रमाणे