महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती आता एमपीएससी मार्फत घेतली जाणार|mharashtra rajyatil shikshk bharti mpsc marfat ghetli janar
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती यापुढे एमपीएससी मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार. अशी चर्चा आहे त्याविषयीच आपण माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती एम पी एस सी मार्फत का
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार आहे. परंतु ही बातमी वाचल्यानंतर ही परीक्षा एमपीएससी मार्फत का घेतली जाणार. आहे असा अनेकांना प्रश्न पडू शकतो, कारण का तर यामध्ये पारदर्शकता यावी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा या एमपीएससी मार्फत घेतल्या जातात आणि स्पर्धा परीक्षेचे नियोजन हे अतिशय व्यवस्थितरीत्या पार पाडले जाते. त्यातील गोपनीयता वाकविण्याजोगे आहे आणि तीच गोपनीयता शिक्षक भरती मध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र शासन मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा प्रस्ताव देखील शिक्षणायकांकडे पाठवलेला आहे .त्या प्रस्तावाला मंजुरी मिळता मिळताच यापुढील सर्व शिक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवले जाणार महाराष्ट्र टीईटी एक्झाम एमपीएससीमार्फत घेतली जाणार आहे.mahatet या परीक्षेची जबाबदारी एमपीएससी कडे सोपवली जाणार आहे या सर्व प्रक्रियेला पूर्णत्व मिळण्यास किती वेळ जाईल हे सांगता येत नाही मात्र तसे हालचाली या सुरू आहेत.
शिक्षक भरती प्रक्रियेत झालेले गैरकारभार
शिक्षक भरती असेल टीईटी परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचे दिसलेले आहे. आणि म्हणूनच ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जावी आणि डीएड बीएड करून आपले नशीब आजमावणारे शिक्षकांना चांगली नोकरी लागावी या दृष्टिकोनातून शिक्षण प्रक्रियेतला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल आहे. या अगोदर झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गुणांमध्ये तफावत आढळलेली आहे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेमधील गुण बदलण्यात आल्याचे चित्र समोर आले होते. त्याविषयी अजून तपास सुरू आहे परंतु यापुढे असे सर्व घडू नये यासाठीच राज्य सरकार मार्फत ते पाऊल उचलले जात आहे आणि साहजिकच महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून किंवा डीएड बीएड करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराकडून या निर्णयाचे स्वागतच केले जाईल.
या बातमीच्या सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा
शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याबाबत एमपीएससीची भूमिका
वृत्तपत्रातील बातमीनुसार शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यासाठी एमपीएससी चे सचिव यांनी सकारात्मकता दाखवले आहे. जर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आम्ही जर ती पारदर्शकता देत असो तर आम्ही विद्यार्थ्यांसाठी महाटीईटी परीक्षा घेऊ असे मत मांडण्यात आलेले आहे परंतु त्याला पूर्णत्व कसे येईल याचा आराखडा तयार व्हायला वेळ लागेल परंतु जे विद्यार्थी नोकरीचा प्रत्यक्ष होते त्या विद्यार्थ्याला नक्कीच दिलासा मिळाला असेल हे आता आम्हाला पारदर्शकपणे नोकरीची संधी मिळेल महा सरकार ऑनलाईन न्यूज ग्रुप तर्फे या शिक्षकांच्या भरती बाबत बातमी देण्यात आलेले आहे साहजिकच यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे तरी आपण च्याwatch and wet भूमिकेत राहूया.
या अगोदर कोण घेत होते शिक्षक भरती प्रक्रिया
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या अगोदर शिक्षक भरती प्रक्रिया ही झालेली आहे आणि त्यामध्ये गैरकारभार आढळल्याचे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. म्हणूनच की काय एमपीएससीकडे हे कामगिरी देण्याचा विचार समोर आलेला आहे.
शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रिये बाबत काय दिली माहिती
शिक्षण आयुक्त सुरज माणधरे यांनी अशी माहिती दिली आहे.की जोपर्यंत एमपीएससी कडून पूर्ण प्रारूप प्राप्त होत नाही तोपर्यंत पूर्वीच्याच पद्धतीने शिक्षक भरती केली जाईल म्हणजे लगेचच एमपीएससी मार्फत शिक्षक भरती होईल. असे नाही तर त्यासाठी वेळ जाईल परंतु भविष्यामध्ये साधारणपणे एक ते दोन वर्षांमध्ये होणाऱ्या परिसरा या एमपीएससी मार्फत होतील असे सर्व चित्र दिसत आहे.
शिक्षक भरती एमपीएससी कडे दिल्यावर काय होईल
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक होईल.शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत होईल कोणत्या प्रकारचे गैरकारभार होणार नाही असे सर्व एमपीएससी मार्फत शिक्षक भरती झाल्यानंतरच होईल.
अशाप्रकारे आजचे ब्रेकिंग न्यूज यापुढील शिक्षक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत हे आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला.ही माहिती आपणास कशी वाटली यासंदर्भात तात्काळ काही माहिती मिळाल्यास त्यामध्ये ऍड केले जाईल चला तर मग एमपीएससी मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होणार ही एक सकारात्मक आणि आनंदाची बाब आहे. साहजिकच यामुळे शिक्षकेकडे शिक्षक भरतीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाईल तर या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करूया आणि लवकरात लवकर व निर्णयाची अंमलबजावणी व्हावी संपूर्ण कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा करूया धन्यवाद.