Type Here to Get Search Results !

पोक्सो कायदा मराठी माहिती | Pocso Kayda Marathi Mahiti

 पोक्सो कायदा मराठी माहिती | Pocso Kayda Marathi Mahiti 

 आजच्या लेखात शाळा महाविद्यालयात पोक्सो कायदा जनजागृती अभियान राबवायचे आहे त्याबबत माहिती पाहणार आहोत. 26 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासन शालेय व शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे आयोजित पोस्को कायदा मार्गदर्शन वेबिनार मधील मार्गदर्शनानुसार. या कायद्या विषयी शाळांनी तात्काळ मुलांना 'पोक्सो कायदा 2012' याविषयी अवगत करावे.अशा सूचना दिलेल्या आहेत.यासाठी आपल्या परिसरातील पोलिस अधिकारीआपण या कायद्याची  माहिती घेण्यासाठी येऊ शकतात थोडक्यात ह्या कायद्याची माहिती मुलांना तात्काळ देणे गरजेचे आहे.अन्यथा आपल्याला हा उपक्रम का राबवला नाही याबाबत विचारणा होऊ शकते.

@@ आपण जर दहावीला 90 टक्के पेक्षा जास्त गुण काढले तर आपल्याला शासनाची अडीच लाखाची स्कॉलरशिप मिळू शकते,मुंबई महानगरपालिका तर नोकरीला लागेपर्यंत सर्व खर्च पुरवते मग ही टक्केवारी पाडायची कशी अगदी सोपे आहे यासाठी खालील अक्षरांवर क्लिक करून माहिती मिळवा. @@ 


पोस्को कायदा मार्गदर्शन SCERT वेबिनार 


scert ने आयोजित केलेल्या 26 जुलै 2022 च्या वेबिनार मध्ये विद्या राऊत सब इंस्पेक्टर यांनी या कायद्याची माहिती दिली आणि त्यांचे अनुभव देखील सांगितले. त्यांनी असे सांगितले की यात फक्त मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा नसून अनेक मुले boys देखील लैंगिक छळ  सहन करत असतात. शक्यतो झोपडपट्टीतील मुलाणा या समस्येचा खूप सामना करावा लागतो. काही ठिकाणी घरातून,ओळखीच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या  घटना नोंद होत आहेत त्याबबाबत आकडेवारी त्यांनी दिली. थोडक्यात हा गहन प्रश्न आहे शाळांनि यासाठी दक्ष होणे गरजेचे आहे.  

मिशन मनपा स्कॉलरशिप

दहावी संपूर्ण मार्गदर्शन हा ग्रुप जॉईन करा नि मनपा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुदान अडीच लाख स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सज्ज व्हा !अभ्यास करा ---- खालील लिंकवर क्लिक करा.


आजकाल विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर माणसाने नको असलेल्या क्षेत्रात देखील विघातक प्रगती केलेली दिसत आहे नि ही चिंतेची बाब आहे.असली घाणेरडी प्रगती अखिल मानव जातीला अतिशय धोकादायक नि विघातक आहे.आज आपण जर वर्तमानपत्र सहज वाचायला हातात घेतले तर आपल्याला चोरी ,खून, बलात्कार यासारख्या बातम्या वर्तमानपत्रात नाहीत असा एकही दिवस नसतो. अशा अनेक घटनांपैकी एक म्हणजे मुला-मुलींवर होणारे विविध प्रकारचे लैंगिक अन्याय अत्याचार होय. या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच मुलांना त्यांच्यावरती होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा म्हणजे पोक्सो कायदा करण्यात आला. या पोक्सो कायदा मराठी माहिती आपल्याला असायला हवी.म्हणूनच आज आपण posco kayda marathi mahiti पाहणार आहोत. हा पोक्सो act नेमका काय आहे?याची संपूर्ण मराठी माहिती आज आपण पाहणार आहोत

पोक्सो कायदा मराठी माहिती
पोक्सो कायदा मराठी माहिती

.
पोक्सो कायदा(toc)

पोक्सो जनजागृती कार्यक्रम| pocso kayada janjagruti karykram 


मुली आणि मुलांवरील लैंगिक अन्याय आणि अत्याचार यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कित्येकदा लहान मुले मुली यांना आपल्यावरती अन्याय आणि अत्याचार होत आहे. हे देखील समजत नसते. का तर---------- ते याविषयी अनभिज्ञ असतात.त्यांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक GOOD TOUCH AND BAD TOUCH कळायला हवा. पालक,शिक्षक यांनी त्याना त्याविषयी माहिती द्यायला हवी त्यांना ते समजावून सांगायला हवे.म्हणजेच जनजागृती करायला हवी.म्हणूनच शासनाने शाळा ,महाविद्यालयामध्ये पोक्सो कायदा जनजागृती कार्यक्रम राबवायला सांगितला आहे.आपण देखील ते राबवयाचे आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने आपण देखील विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याविषयी माहिती द्यायची आहे. पोक्सो कायदा जनजागृती कार्यक्रम करत असताना या कायद्याची माहिती असलेला एखादा वकील आणि त्याच बरोबर पोलीस अधिकारी शाळेमध्ये आणून मुलांना या पोक्सो कायद्याची माहिती सांगायची आहे. मुलांना आपल्यावर अन्याय होत आहे हेच समजत नाही.ही मोठी चिंतेची बाब आहे.आणि काहीना होत असेल तरी तक्रार कोणाकडे करायची याची माहिती नाही. म्हणून प्रत्येक शाळेने पोक्सो कायदा जनजागृती कार्यक्रम सकारात्मकतेने राबवायला हवा. चला तर मग पोक्सो कायदा म्हणजे नेमकं काय ?हे आपण पाहू या.



 पोक्सो कायदा म्हणजे काय | pocso kayda mhanje kaay

पॉक्सो कायद्यालाच इंग्रजीमध्ये  POCSO ACT असे म्हटले जाते.पॉक्सो अॅक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ओफएनसेस म्हणजेच potection of children from sexual offenses थोडक्यात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणे म्हणजे पोक्सो कायदा होय.


आज आपण अनेकदा पाहतो लहान मुला- मुलींवरती देखील लैंगिक अन्याय आणि अत्याचार केले जातात. या अत्याचारांना अटकाव करण्यासाठी किंवा अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी जो कायदा केला गेला आहे. त्याला पॉक्सो अॅक्ट म्हणजेच पोक्सो कायदा असे म्हटले जाते.



  पोक्सो कायदा किती साली तयार केला गेला ? | pocso kayda kadhi karnyat aala


पोक्सो कायद्याविषयी बरेच जण ऐकून असतात परंतु या कायद्याची सखोल अशी माहिती नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना माहिती देत असताना शिक्षकांची देखील गडबड होते. भारत सरकारने 2012 साली पोक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा करण्यात आला .लैंगिक अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा देणे व बालकांची लैंगिक कुचंबणा थांबवणे हीच या कायद्या मागील मुख्य भूमिका आहे.


पोक्सो कायदा म्हणजे काय ? तर लैंगिक अत्याचारापासून बालकांना संरक्षण देणारा कायदा 2012. एवढे लक्षात ठेवले तरी आपण या कायद्याची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो.लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.


 

पोक्सो कायदा का करण्यात आला ?| pocso kayda ka karnyat aala


1. लैंगिक हल्ले | laingik halle


आज समाजामध्ये काही माथेफिरू असे आहेत की त्यांना कोणत्याच प्रकारचे भान नसते. आणि हे माथेफिरू कोणत्याही वयाचे असू शकतात.बऱ्याचदा ते प्रौढ नि परिचयच्या व्यक्ती असतात ही भयानक बाब आहे . संधी मिळताच लहान मुले मुली यांच्यावरती जोर जबरदस्ती करण्याचा ते प्रयत्न करतात. मुला-मुलींशी अश्लील चाळे ते करतात. याला अटकाव करण्यासाठी म्हणजेच लैंगिक हल्ले बंद करण्यासाठी पोक्सो कायदा करण्यात आला आहे.


( @ आमच्या शाळेतील निखिल ने कोणताही क्लास न लावता स्वयं अध्ययन नि आमचे मार्गदर्शन यांच्या जोरावर कसे मिळवले 94 टक्के जरूर वाचा आपण देखील मनपा स्कॉलरशिप मिळवू शकता यासाठी क्लिक करा.

https://www.dnyanyogi.com/2022/05/ashoknagr-abhyasu-nikhil.html )


2. लैंगिक छळ | laingik chal


 न्यायालयामध्ये आणि पोलिस स्टेशनमध्ये सर्वात जास्त केसेस म्हणजेच नोंदवलेले गुन्हे कोणते आहेत ?तर लैंगिक छळाचे. लैंगिक छळ अतिशय क्रूर स्वरुपाचे असल्याचे निदर्शनास येत आहे.अगदी सामूहिक बलात्कारासारख्या घटना अंगावरती काटा आणतात. आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी एखादा चांगला कायदा करणे गरजेचे होते म्हणूनच जो कायदा केला गेला तो म्हणजे पोक्सो कायदा होय.


3.  पॉर्नोग्राफी pornography


 लहान मुलांचे कळत-नकळतपणे त्यांचे अश्लील व्हिडिओ काढले जातात आणि ते व्हायरल करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. अश्या पॉर्नोग्राफीला अटकाव करण्यासाठी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012. म्हणजेच पोक्सो कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पॉर्नोग्राफी व्हिडिओ बनवणे सोडा ते जवळ असतील तरी तो गुन्हा आहे. अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती त्या प्रत्यक्ष पॉर्नोग्राफीत सहभागी नसेल परंतु त्या गटाच्या सोबत जरी असेल तरी त्या व्यक्तीवर ती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. म्हणून मुलांनी जरा भानावर राहणे हाच यावर पर्याय आहे.


4.  बालकांचा विनयभंग | balkancha vinaybhang


 अनेकदा मुलगा असो की मुलगी असो त्यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल किंवा वाईट नजरेने पहिले जात असेल तर तो बालक संबंधित व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करू शकतो.



गुन्हा दाखल न करणारा देखील गुन्हेगार gunha dakhal n krnaraa gunhegar

 pocso कायदा मुलांचे संपूर्णता लैंगिक शोषण थांबावे ह्याच भूमिकेतून तयार करण्यात आला आहे. अनेक घटनांमध्ये अशी चित्र दिसते की घरातील आई-वडील आपल्या मुला-मुलींच्या इज्जतीचा विचार करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात. परंतु नंतर खुलासा झाला किंवा लक्षात आले की आई वडिलांनी सदर घटनेची माहिती लपवलेली आहे. तर त्यांच्यावर ती देखील पॉक्सो कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. थोडक्यात पालक देखील दक्ष हवेत.खरोखर मुलांवर लैंगिक अत्याचार होऊ नयेत म्हणून हा कायदा करण्यात आला आहे.



 पोक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी | pocso kaydyatil tartudi


1.  या कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीने तक्रार दाखल केली असेल तर त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. कुठे त्या नावाची पब्लिसिटी केली जात नाही.


2. एखाद्या ठिकाणाहून तक्रार आली तर एक महिला पोलीस अधिकारी किंवा पोलीस पुरुष पोलीस अधिकारी अगदी साध्या कपड्यांमध्ये संबंधित व्यक्तीला भेट देतात.


4. थोडक्यात काय तर ज्या व्यक्ती अशा समस्येने पीडित आहेत त्यांची ही खाजगी बाब इतरांना समजेल असा न्यूनगंड मनात बाळगू नयेत. आपल्या होणारा अन्याय अत्याचार सहन करू नये.तर त्याला वाचा फोडली पाहिजे नाहीतर ती व्यक्ती सातत्याने तसाच अन्याय करण्याची शक्यता आहे.


5 . आरोपी आणि आरोप करणारे याबाबत pocso कायद्यांतर्गत खूप मोठी खबरदारी घेण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीने तक्रार केलेली आहे ती व्यक्ती आणि आरोपी यांना समोरासमोर कोर्टामध्ये हजर केले जात नाही.


6.  ज्या बालक किंवा बालिकेवर अन्याय झालेला आहे.त्यांना न्याय मिळवून देणे. आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणे यासाठीच पोक्सो कायदा करण्यात आलेला आहे.



पोक्सो कायद्यात वयाची अट | posco kayda vayachi at


 पोक्सो कायद्यानुसार संरक्षण मिळण्यासाठी अठरा वर्षाच्या खालील बालक किंवा बालिका यांना या कायद्यानुसार संरक्षण देण्यात आलेले आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे मतिमंद अपंगत्व किंवा इतर बाबी अशा गोष्टींचा यामध्ये विचार केला जाणार नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीचे शारीरिक वय 18 पेक्षा कमी असेल त्यांना कायद्यानुसार संरक्षण देण्यात येते.



पोक्सो कायद्याचे महत्व | pocso kaydaa mhaattav


 पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक अत्याचरपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012. या कायद्यानुसार नुसार 18 वर्षाखालील मुले मुली यांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण केले जाईल.या कायद्याची माहिती केवळ मुलांनाच असून उपयोगाचे नाही तर त्यांचे पालक,शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्या कायद्याची माहिती असेल तर व्यक्ती गैरवर्तन करत असताना एकदा नाही हजारदा विचार करेल. म्हणून पालकांनी सजग होऊन या कायद्याविषयी समाजामध्ये चर्चा केल्या पाहिजेत . आपल्या मुलांना याविषयी बोलायला हवे.असे केले तरच लैंगिक गुन्हेगारीला आळा बसेल.आज असंख्य कळ्या किंवा असंख्य लहान मुले लैंगिक पीडितेचा बळी होत आहेत. याला अटकाव आणण्याचे काम हा कायदा नक्कीच करेल.

पोक्सो कायदा शिक्षेची तरतूद | pocso kaydyat shikshechi tardut

 पोक्सो कायद्यानुसार पीडित म्हणजे ज्या व्यक्तीवर बलात्कार किंवा अन्याय झाला आहे तिचे वय जर 12 वर्षापेक्षा कमी असेल तर आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल व 16 वर्ष असेल तर गुन्हा करणारास 10 ते 20 वर्षां पर्यंत कारावास ही शिक्षा दिली जाईल. अशी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.



पोक्सो कायद्याविषयी शाळा महाविद्यालयांची भूमिका | Pocso Kaydyat Shalechi Bhumika

शाळा महाविद्यालयांमधून शिक्षण घेतअसलेल्या विद्यार्थ्याना या कायद्याची माहिती नसेल तर त्याची अंमलबजावणी कशी होणार ?आज कितीतरी घटना अशा असतात की मुलांना आपल्यावर लैंगिक अत्याचार होत आहे याची कल्पनाच नसते.कालांतराने झालेला अन्याय समोर येतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण याविषयी जाणीव जागृती नाही म्हणूनच ना. म्हणूनच मी माझ्या वाचक वर्गाला विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांमधून या कायद्याविषयी किमान POSCO कायद्याची किमान तोंडओळख तरी आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यावी. पालक सभांच्या माध्यमातून माहिती द्यावी. जेणेकरून लैंगिक पीडितेचा सामना कोणीही करणार नाही.


 अशा पद्धतीने आज आपण पोक्सो कायदा म्हणजे काय ? पोक्सो कायद्यामध्ये कोण कोणत्या तरतुदी आहेत? पोक्सो कायदा कधी सुरू करण्यात आला? या कायद्याची माहिती शाळेमधून कशा पद्धतीने द्यायची ? अशा सर्व घटकांवर आपण आज संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की तुम्ही या कायद्याविषयी समाजामध्ये, आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती नक्की कराल.

पोक्सो कायद्याबाबतचा हा vedeo जरूर पहा.




आपल्याकडे काही अधिक माहिती असल्यास नक्की कमेंट करा.अधिकची माहिती या लेखामध्ये भर टाकणारी असेल तर ती या लेखात समाविष्ट करण्यात येईल .पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

चला तर मग लवकरात लवकर आपल्या मुलांना हा कायदा अवगत करूया . या उपक्रमासाठी आपणास खूप खूप शुभेचा.


आमचे हे लेख देखील वाचा

- राज्यातील सद्य वातावरण बघता हा निबंध परीक्षेला येण्याची शक्यता लोकशाहीत मतदानाचे महत्त्व


बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना - 2 लाख स्कॉलरशी


दहावी नंतर नेमके काय करावे? या चिंतेत आहात मग


दहावी नंतर कॉलेज नको तात्काळ नोकरी हवीय तर मग जरूर वाचा विविध कोर्स माहिती  


तुम्हाला देखील 90 टकेपेक्षा जास्त गुण हवेत... तर मग कसा केला होता 92 टक्के पाडण्यासाठी आमच्या शाळेच्या निखिल देशमुख या विद्यार्थ्याने अभ्यास विशेष कोणताही class नसताना



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area