Type Here to Get Search Results !

संत नामदेव मराठी माहिती निबंध कार्ये | sant namdev marathi mahiti nibandh karye

 संत नामदेव माहिती निबंध कार्ये | संत नामदेव कथा| संत नामदेव साहित्य | संत नामदेव गाजलेले अभंग| sant namdev mahiti nibandh karye |  sant namdev katha sant|  namdev gajlele abhang 

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील थोर संत नामदेव महाराज यांची माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहत असताना सर्वसाधारण माहिती आणि विद्यार्थ्यांना संत नामदेव यांच्यावर निबंध लिहिता येईल किंवा माझा आवडता संत संत नामदेव अशी देखील माहिती लिहिता येईल. तसेच संत नामदेव कार्ये आणि संत नामदेव यांच्या जीवनातील एक कथा देखील आपण पाहणार आहोत. दृष्टिकोनातून सदर लेख उपयोगाचा आहे.
संत नामदेव मराठी माहिती

 

महाराष्ट्र भूमी विषयी माहिती |mharashtra bhumivishyi mahiti 

महाराष्ट्र शूर ,वीरांची भूमी आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र या भूमीची अजून एक ओळख आहे ती म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ,संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, नरहरी सोनार,चोखामेळा,विसोबा केसर हे संत कवी होऊन गेले. त्याचबरोबर मुक्ताबाई,जनाबाई कान्होपात्रा यासारख्या संत कवयित्री होऊन गेल्या. यापैकीच एक म्हणजे संत नामदेव महाराज होय यांना वारकरी परंपरेतील किंवा वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत म्हणून ओळखले जाते अशी संत नामदेव यांची माहिती व कार्ये आपण पाहणार आहोत या माहितीच्या आधारे मुले संत नामदेव निबंध छान लिहू शकतात किंवा माझा आवडता संत नामदेव अशा पद्धतीने आजचा हा लेख बहुरंगी माहिती देणारा ठरणार आहे. चला तर संत नामदेव यांच्याविषयी माहिती पाहूया.ही माहिती information in marathi sant namdev तसेच संत नामदेव निबंध किंवा संत नामदेव भाषण या सर्वांसाठी ही माहिती तुम्ही वापरू शकते. फक्त शब्दरचना त्या त्या साहित्य प्रकारची वापरावी. 


संत नामदेवांचा परिचय | sant namdev parichay 

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान नाव म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणे या गावी झाला परंतु त्यांचे बालपण पंढरपूर या ठिकाणी गेले. वडील दामाशेट्टी तर आई गोणाई यांच्या संस्कारात ते वाढले. संत नामदेवांचे वडील दामा शेट्टी हे व्यवसायाने शिंपी होते. ते कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत होते. संत नामदेवांचा  परंतु त्यांचे सर्व बालपण पंढरपूरला गेल्यामुळे त्यांना विठ्ठल भक्तीची आवड लागली.


संत नामदेव महाराज कथा एक किस्सा | sant namdev yanchi ek katha 

 संत नामदेव महाराज यांच्याविषयी एक कथा सांगितली जाते ती म्हणजे ,

एके संत नामदेवांचे वडील काही कामानिमित्त दामाजी शेट्टी बाहेरगावी गेले होते, आणि त्यावेळी विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याचे काम त्यांनी संत नामदेवांना सांगितले होते.त्यावेळी साधारण पाच सहा वर्षाचे असणारे नामदेव  विठ्ठल मंदिरात गेले. विठ्ठलाला नैवेद्य दाखवू लागले, आणि त्याला नामदेवांना असे वाटले की आज विठ्ठल माझ्या हाताने नैवेद्य खात नाही. मात्र माझ्या वडिलांच्या हाताने नैवेद्य खातात. त्यावेळी संत नामदेव विठ्ठलाला म्हणतात , जोपर्यंत तू माझा नैवेद्य खाणार नाही. तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि ते विठ्ठलाच्या पायावरती डोके आपटू लागले.हे पाहून असं सांगितले जाते की त्या लहान नामदेवांचा हट्ट म्हणून पंढरीच्या पांडुरंगानी साक्षात परमेश्वराचे रूप धारण केले. व नामदेवांनी आणलेला नैवेद्य खाल्ला. अजून एक संत नामदेवांविषयी कथा अशी  सांगतात की संत नामदेवांचे कीर्तने इतके लोबस होते की स्वतः पांडुरंग देखील त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत असे. त्याचबरोबर कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेव ही देखील एक कथा किंवा आख्यायिका सांगितली जाते. थोडक्यात संत नामदेव एक महान संत होते हे नक्की. 


संत नामदेवांचा परिवार|  sant namdevanacha parivar 

संत नामदेवांचा जर आपण परिवार पाहिला तर त्यांच्या पत्नीचे नाव राजाई, संत नामदेवांची मोठी बहीण ही आऊबाई. संत नामदेव यांना चार पुत्र होते नारा, विटा ,गोंदा ,महादा ही त्यांच्या चार मुलांची नावे होत.तर नामदेवांना एक मुलगी देखील होती मुलीचे नाव लिंबाइ होते. संत नामदेवांचा परिवार हा अतिशय मोठा होता. आणि संत नामदेवांच्या घरी घरकाम करणारी एक संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई .या नामदेवांच्या मार्गदर्शनाखालीच अभंग रचना करू लागल्या किंवा त्यांची विठ्ठल भक्ती फुलली. 


संत नामदेवांचे वारकरी संप्रदायासाठी योगदान| varkri samprdayasathi sant namdev yogdan 

संत नामदेव माहिती पाहत असताना ही माहिती संत नामदेव निबंध किंवा संत नामदेव कार्ये लिहिताना देखील तुम्ही वापरू शकता. आपल्याला त्यांचे म्हणजे संत नामदेव यांचे वारकरी संप्रदायासाठी असलेले योगदान लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे. संत नामदेवांची अभंग गाथा यात  जवळजवळ अडीच हजार अभंग आहेत. यावरून ते किती थोर संत किंवा साहित्यिक होते. आपल्या ध्यानात येते संत नामदेवांचे विचार इतके व्यापक होते की;शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये देखील त्यांची काही पदे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कीर्तन हा प्रकार आणण्याचे श्रेय जर कोणाला द्यावे द्यायचे असेल तर ते संत नामदेवांना जाते. संपूर्ण आयुष्यभर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी याच न्यायाने संत नामदेव विठ्ठल भक्ती साठी नावारूपाला आले. 


संत नामदेवांचे गुरु |sant namdev yanche guru  

संत नामदेव हे एक श्रेष्ठ संत होते. हे आपण पाहिलेच पण त्यांच्या गुरु करण्या  विषयी एक दंतकथा सांगितली जाते.ती अशी की संत गोरा कुंभार यांच्या घरी संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा,विसोबा खेचर अशा अनेक संतांचा संत मेळा भरला होता.  या मेळ्यामध्ये सर्व संत मंडळी विठ्ठलाचे नाव घेत होती. चर्चा ,वादविवाद करत होती.प्रमाण देत होती. विठ्ठलाच्या भक्तीविषयी आपापली मते मांडत होती. ही मते मांडताना असं सांगतात की संत मुक्ताबाई सर्वात लहान ती सर्व संतांच्या डोक्यावरती टपली मारून मडके कच्चे की पक्के असा खेळ खेळत होती. आणि त्याचवेळी संत मुक्ताबाई यांनी नामदेवांच्या डोक्यावरती टपली मारली आणि मडके कच्चे आहे असे सांगितले. या घटनेने नामदेवांना थोडा राग आला परंतु कालांतराने त्यांना समजले की खरोखरच मला देखील गुरुची गरज आहे. आणि नंतर त्यांनी विसोबा केसर यांना गुरु केले आणि अखंड अशी अभंगारचना केली. 


संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार | sant namdev varkri sampradaay prasar 

आपण वारकरी संप्रदाय विषयी माहिती पाहिली तर आपल्या लक्षात येते की,संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप्रदाय अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपली वाटचाल करत होता. सर्वसामान्यांचा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाला एक वेगळी ओळख होती.परंतु या संप्रदायाचा कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचलं पाहिजे या भूमिकेतून कोण झटले असेल तर त्यात संत नामदेव. संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर  पंजाब प्रांतापर्यंत आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला म्हणूनच त्यांना संत शिरोमणी ही उपाधी दिली जाते. किंवा भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हटले जाते.नामदेवांची कार्य यात हा मुद्दा आवर्जून आपण नामदेव माहिती किंवा निबंध यात लिहायला विसरू नका. 


पंढरपूर आणि संत नामदेव पायरी | sant namdev payri mahiti 

पंढरपूर मध्ये  विठ्ठल दर्शनाला  गेल्यानंतर विठ्ठलाच्या अगोदर संत नामदेव यांचे दर्शन आपल्याला घ्यावे लागते. याविषयी असे सांगितले जाते की 3 जुलै,  1350 रोजी पंढरपूर या ठिकाणी संत नामदेव हे जग सोडून देवाघरी गेले पंचभुतात  विलीन झाले.  आणि त्यांची शेवटची इच्छा होती की विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी माझ्या पायरीवर पाय ठेवून भक्तांनी पुढे जावे त्यांच्या पायाची धूल माझ्यावर पडत राहावी.  आणि ती पायरी म्हणजे नामदेव पायरी. म्हणून ओळखली जाते खरोखरच वारकरी संप्रदायातील एक महान संत म्हणून आपल्याला संत नामदेव यांच्याकडे पाहावे लागते. 


संत नामदेव महाराज गाजलेले अभंग | sant namdev gajlele abhang 

संत नामदेवांनी जवळजवळ अडीच हजार अभंग लिहिले. त्यापैकी त्यांचे काही अभंग हे प्रचंड गाजलेल्या अभंग म्हणून ओळखले जातात ते आपण थोडक्यात पाहूया संत नामदेव अभंग 


संत नामदेव महाराज अभंग 1


आधी रचिली पंढरी  I

मग वैकुंठ नगरी II१ II

जेव्हा नव्हते चराचर I

तेव्हा होते पंढरपूर II2II

जेव्हा नव्हती गोदा गंगा I 

तेव्हा हाती चंद्रभागा II3II



संत नामदेव अभंग २ 

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा I

मन माझे केशवा का बा नेघे II



संत नामदेव अभंग 3 


देह जावो अथवा राहो I

पांडुरंगी दृढ भावो II१ II

चरण न सोडी सर्वथा I

तुझी आन पंढरीनाथ II२ II

 
संत नामदेवांच्या अभंगाची वैशिष्ट्ये |sant namdev abhang vaishishte 

संत नामदेवांनी व्यापक प्रमाणात लेखन केले. त्यापैकी त्यांच्या अभंगाविषयी सांगायचे झाले, तर उत्कट ईश्वर भक्ती ही त्यांच्या अभंगांमध्ये दडलेली दिसून येते. परमार्थामध्ये समता असावी, समानता असावी अशी मांडणी त्यांचे अभंग करताना दिसतात.

संत नामदेवांचे  कार्य |sant namdev karay |संत नामदेव भाषण | sant namdev bhashan 

करता असताना आपण या संत नामदेव कार्याचा आढावा घ्या. तसेच संत नामदेव निबंध लेखनात देखील या बाबी यायला हव्यात. 

संत नामदेवांनी मोठ्या प्रमाणात अभंगारचना. तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र बाहेर पंजाब पर्यंत प्रचार आणि प्रसार देखील केला.परंतु हे करत असताना त्यांनी सामाजिक कार्य देखील केली मुस्लिम शासक त्याकाळी हिंदू धर्मियांना त्रास देण्याचे काम करत होते. अशा काळामध्ये समाजाला दिशा देण्याचे काम संत नामदेवांनी केलं. संत नामदेवांचा काळ असा होता की ब्राह्मण वर्गातील लोक कर्मकाकांड च्या  नावाखाली सर्वसामान्य लोकांना भक्तीपासून वंचित ठेवत होते. अशा काळामध्ये कीर्तन या सोप्या भक्ती मार्गातून संत नामदेवांनी सर्वसामान्य जनतेला उपदेश करून परमेश्वराचे नाम ही साधी भोळी भक्ती करावी. अशी शिकवण दिली भक्तीच्या मार्गातून एकात्मता टिकावे. अशी भूमिका त्यांची होती म्हणूनच पंजाबमध्ये देखील आपला भागवत संप्रदाय प्रसार व्हायला हवा अशी त्यांची भूमिका होती. 


संत नामदेवांची ग्रंथसंपदा किंवा त्यांच्या जीवनावर आधारित साहित्य | sant namdev granth 

संत नामदेवांनी विपु¥℅ल असे साहित्य लिहिले, त्यामध्ये संत नामदेव गाथा ,संत नामदेव चरित्र अशा अनेक ग्रंथांमधून संत नामदेव यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. 


संत नामदेवांविषयी थोर अभ्यासकांची मते | sant namdev samiksha kinva abhyask mate 

थोर इतिहास अभ्यासक संत साहित्य अभ्यासक  वि अ.इनामदार संत नामदेव यांच्या विषयी म्हणतात,"नामदेव हे थोर भक्त होते ते कुशल संघटकही होते वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या आयातीत तर केले पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही 50 वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा ध्वज फडकवला."

हे इनामदारांचे मतच खूप काही सांगून जाते. यातूनच आपल्याला संत नामदेवांचे योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी किती आहे हे लक्षात येते. 


संत नामदेवांचे विविध भाषेलेखन |sant namdev vividh bhashetil lekhan 

संत नामदेव यांचा भाषाभ्यास प्रचंड होता.म्हणून संत नामदेवांनी मराठीमध्ये अनमोल अशा अभंगांची रचना केली त्याचबरोबर शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथासाठी देखील अनेक कवणे देणे. ती कवणे नामदेव जी की मुख वाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर संत नामदेवांनी हिंदीमध्ये देखील अभंग रचना केल्याच्या नोंदी आपल्याला आढळतात. यावरून विविध भाषांमध्ये लेखन करणारे संत नामदेव हे एकमेव संत होते म्हणूनच त्यांना महान किंवा श्रेष्ठ संत म्हटले जाते. 


FAQ संत नामदेवांविषयी काही प्रश्न

1. संत नामदेवांचे संपूर्ण नाव सांगा?

संत नामदेवांचे संपूर्ण नाव नामदेव दामा रेडेकर होते.

२. भागवत धर्माचे आद्य प्रचारक कोण?

संत नामदेव.

3. संत नामदेवांच्या गावाचे नाव सांगा?

नरसी बामणी.

4. वारकरी संप्रदायाचा किंवा भागवत संप्रदायाचा महाराष्ट्र बाहेर पंजाब पर्यंत प्रचार आणि प्रसार करणारे संतांचे नाव सांगा?

संत नामदेव.

5. कोणाची कवणे शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत?

संत नामदेव

6. संत नामदेव कोणत्या संप्रदायाचे होते?

संत नामदेव नाथ संप्रदाय वैष्णव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या संप्रदायात भक्त होते.

7. संत नामदेवांचे गुरु कोण होते?

विसोबा खेचर 

8. नाम्याची दासी म्हणून घेणाऱ्या संत कवयित्री कोण?

संत जनाबाई

9. संत नामदेवांनी कोणत्या भाषेमध्ये अभंग रचना केल्या?

मराठी, हिंदी

10. किर्तन परंपरेचे प्रवर्तक किंवा प्रणेते कोणाला मानले जाते?

संत नामदेव.

11 संत नामदेवांनी किती अभंगांची रचना केली?

2500. 

12 संत नामदेवांनी कोणता ग्रंथ लिहिला?

संत नामदेवांची अभंग गाथा

13. संत नामदेवांचे प्रसिद्ध सुवचन सांगा?

नाचू कीर्तनाचे जगी I रंगी ज्ञानदीप लावू जगी I


आमचे हे लेख जरूर वाचा






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area