Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे संपूर्ण मराठी माहिती Uddhav Thakre Sampurn Marathi

 उद्धव ठाकरे संपूर्ण मराठी माहिती Uddhav Thakre Sampurn Marathi Mahiti 

आजच्या ज्ञानयोगी व्यासपीठावरील राजकारण विशेष या लेखामध्ये आपण अशा काही  व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती पाहणार आहोत. की ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या कार्य कुशलतेमुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची किंमत वाढवली. असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची संपूर्ण  मराठी माहिती आज आपण पाहणार आहोत.

उद्धव ठाकरे संपूर्ण मराठी माहिती
उद्धव ठाकरे संपूर्ण माहिती

उद्धव ठाकरे माहिती(toc)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यासाठी सर्वसामान्य माणूस देखील हळूहळू करतोय असे मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी ठाकरे होय.अनेकांच्या Messag ,Wtp Status यांच्या माध्यमातून त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या  पदावर काम करत असताना देखील अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले उद्धवजी ठाकरे. भाजप सोबत 2019 साली युती झाली नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता त्यांनी मिळवली. जिथे दोन पक्षांचे सरकार असले तरी कुरबुरी होतात.मात्र तीन पक्षांचे सरकार, कोरोना सारख्या महामारी अशा सगळ्या संकट काळामध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय शिस्तबद्ध रित्या पार पाडणारे मुख्यमंत्री म्हणून ते आज सर्वांना परिचित आहेत म्हणून त्यांची .तर आजच्या या विशेष लेखांमधून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 


उद्धव ठाकरे यांचा जीवन परिचय Uddhav Thakre Yancha Jivan Parichay 

उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबई येथे झाला. वडील हिंदुरुदय सम्राट आणि आई मीनाताई ठाकरे. इतक्या मोठ्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला. परंतु कोणत्याही गोष्टीचा अभिमान त्यांनी  बाळगला नाही.उद्धव ठाकरे यांचे शिक्षण मुंबई येथील बालमोहन विद्यालयात झाले. बालमोहन विद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट येथे त्यांनी  आपली पदवी पूर्ण केली.त्याच्या जोडीला आपला फोटोग्राफीचा छंद देखील त्यांनी जोपासला. सुरुवातीच्या काळामध्ये ते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. परंतु आपले वडील आपल्या महाराष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी लढले आहेत.या प्रेरणेतून उद्धव ठाकरे देखील राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यांचा राजकीय प्रवास कसा होता याविषयी देखील एक नजर टाकूया.. 


उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास Uddhav Thakre Rajkiy Prvas Mahiti 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत असताना सर्वप्रथम साधारणपणे 2002 च्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी सहभाग व प्रकाहर सभा घ्यायला सुरुवात केली.शिवसेनेला यश देखील मिळवून दिले. हळूहळू शिवसेना पक्षाने त्यांच्यावरती जबाबदाऱ्या वाढवायला सुरुवात केली.उद्धव ठाकरे  2003 साली  शिवसेना पक्षाचे एक मोठे पद त्यांना  देण्यात आले. ते पद म्हणजे कार्यकारी अध्यक्ष होय.उद्धव ठाकरे यांनी कार्यकारी अध्यक्ष पद घेतल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्यामध्ये मतमतांतरे होऊ लागली. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली हे आपणास परिचित आहेत. Uddhav Thakre Sampurn Marathi mahiti यातून त्यांची संपूर्ण  माहिती देणे हा आमचा हेतु आहे. 


उद्धव ठाकरे यांची राजकीय कामगिरी Uddhav Thakre Yanchi Rajkiy Karkird 

 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत उद्धव ठाकरे मैदानात उतरले व त्यांनी  झंजावाती सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि कोणत्याही पक्षाशी युती न करता 63 जागा शिवसेनेला मिळवून दिल्या.टीकाकारांची तोंडे कायमची बंद केली.त्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले असेच या निकालावरून मानावे लागेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील सर्व पक्ष स्वतंत्रपणे बोलू नका लढत होते स्वबळावर निवडणुका लढत असताना शिवसेना पक्षाला 56 जागा मिळाल्या परंतु मुख्यमंत्री पद कोणाला? या वादावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मतभेद झाले. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष सरकार बनवणार असे सर्व चित्र होते. 


महा विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे mahavikas aaghdai aani uddhav thakre 

भाजप पक्ष जर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देत नसेल तर युती होणार नाही.अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्याचवेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पद भाजपकडेच हवे अशी भूमिका घेतल्याने आता नेमके सरकार कोण स्थापन करणार ? असे चित्र असताना महाराष्ट्रामध्ये सत्तेचे एक वेगळेच समीकरण आपल्याला दिसले ते म्हणजे महाविकास विकास.आघाडी सरकारमध्ये काँग्रेस ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी मिळून एक सामायिक कार्यक्रम ठरवून सरकार स्थापन केले. आणि या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन माझा शिवसैनिक मी मुख्यमंत्री पदावर ती विराजमान करेन आणि ते स्वप्न स्वतः उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवले.जर उद्धव ठाकरे यांना कुठल्याही पदाचा अभिमान नव्हता किंवा पदाची लालसा नव्हती,अनेकांना प्रश्न पडू शकतो, की ते मुख्यमंत्री का झाले?तर त्याचे उत्तर आहे.महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री बनले.परंतु अडीच वर्षे ही महाविकास आघाडी नीट चालली अलीकडे शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले. 


उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा uddhav tahkre mukhyamntri padacha rajinama 

आपल्याच पक्षातील काही लोक आपल्याला विरोध करत आहेत.अशावेळी कुठल्या प्रकारे आग पाखड न करता पक्षातील लोकांनी परत यावे. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. यातूनच त्यांना सत्ता आणि पदाचा मोह नव्हता हे स्पष्ट होते. शिवसेना पक्ष मोठा करायचा आहे. हीच यामागील भूमिका दिसते. परंतु त्यांच्या या मागणीला शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी पाठिंबा दिला नाही.आणि साहजिकच अविश्वास ठराव न मांडू देता स्वत राजीनामा त्यांनी राज्यपालाकडे सुपूर्द केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे शिवसैनिक माझ्या विरोधात मतदान करतील ही भूमिका त्यांच्या मनाला पटत नव्हती.म्हणूनच त्यांनी अविश्वास ठराव ही प्रक्रिया समोर येणे अगोदरच आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज आपण राजकारणामध्ये बघतो की अखेरच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते असे सर्व असताना देखील आपल्या शिवसैनिकांचे मन वळत नाही. आमदार आपल्याला पाठिंबा देत नाहीत या भावनेतून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.


लोकांचे सर्वात प्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे sarvat priya mukhyamntri 

मी नेता आहे.पुढारी आहे.असा कोणताही अविर्भाव नाही.चालण्या- बोलण्यात आणि पोशाखात देखील साधेपणा असलेले एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत.असं म्हणतात की ऑफिशियल पोशाखात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणारे एकमेव मुख्यमंत्री असावेत.



मुख्यमंत्री म्हणून निर्णय Mukhya Mantri Mhnun Nirnay  


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी, त्याचबरोबर मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आरोग्य विषयक सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले.त्याचबरोबर तीन पक्षांचे सरकार एकत्र घेऊन राज्यकारभार अगदी व्यवस्थितरीत्या चालवला. त्याचबरोबर आपल्याच पक्षात बंडाळी झाली आहे आणि आपण आपल्या शिवसैनिकांना काही वचने दिलेले आहेत त्याचाच भाग म्हणून की काय औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देण्यात आले. थोडक्यात काय तर माझ्या पदापेक्षा माझा शिवसैनिक नाराज होता कामा नये  ही भूमिका उद्धव ठाकरे यांची दिसते.म्हणूनच हसत हसत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिला.एवडेच नाही तर शिवसैनिकांना आवाहन केले महाराष्ट्रामध्ये शांतता राहील यासाठी दक्ष रहा!


महाराष्ट्र मध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. यापुढेही होतील परंतु अतिशय संयमी,शांत, हुशार आणि सर्वांना सामावून घेणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांचे नाव कायम घेतले जाईल. 


FAQ प्रश्न 

1.उद्धव ठाकरे यांच्या मुलांची नावे सांगा?

उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे नि तेजस ठाकरे अशी दोन मुले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area