एक ऑगस्ट पासून या ठिकाणी राष्ट्रध्वज रास्त अणि स्वस्त दरात होईल उपलब्ध | 1 august pasun rashtradhvaj rast darat uplabadh
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत.भारताचा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले गेले आहेत. यातील एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा होय.या ठिकाणी घ्या स्वस्त दरात तिरंगा |
हर घर तिरंगा मोहीम | har ghar tiranga mohim
'हर घर तिरंगा' घरोघरी तिरंगा या नावातच ही मोहीम काय असणार आहे? हे तुमच्या लक्षात आले असेल. तर या आगळ्यावेगळ्या मोहिमेनुसार संपूर्ण भारतातील सरकारी कार्यालये , गृहनिर्माण संस्था,याचबरोबर प्रत्येकाच्या घरोघरी राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. हा राष्ट्रध्वज 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये उभारला जाणार आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून वेगवेगळे प्रश्नमंजुषा कार्यक्रम त्याचबरोबर प्रसार माध्यमांवरती व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम ट्विटर यावरती हॅशटॅगच्या माध्यमातून हा स्वातंत्र्याचा सोहळा अगदी आगळावेगळा साजरा होणार आहे.भारताच्या महाकाय लोकसंख्येचा विचार करता जर आपण हर' घर तिरंगा' ही मोहीम राबवणार असू तर प्रत्येकाला राष्ट्रध्वज किंवा तिरंगा उपलब्ध करून देणे आणि तो कोठून उपलब्ध केला जाणार? याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषणा केलेली आहे, की 1 ऑगस्ट पासून राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जातील. हे राष्ट्रध्वज भारतातल्या जवळजवळ दोन लाख टपाल कार्यालयात उपलब्ध असतील. आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन राष्ट्रध्वज विकत घेऊ शकता. मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज लागणार आहेत म्हणून त्याची किंमत देखील निश्चित करण्यात आलेले आहे.
राष्ट्रध्वज किंवा तिरंग्याची किंमत | tiranga kimat
लोकांना घरोघरी तिरंगा डौलाने फडकवता यावा यासाठी तीन आकारांमध्ये तिरंगा उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वात मोठा तिरंगा हा 20* 3 इंच त्याची किंमत केवळ 25 रुपये असणार आहे.किंमत घोषित करण्यामागील येतो एवढाच की लोकांकडून खाजगी दुकानातून जास्त वसुली केले जाऊ नये त्याचबरोबर त्यापेक्षा खालोखाल छोटे असे अठरा रुपयाने एक व नऊ रुपयांना एक तिरंगा अशा पद्धतीने तीन आकारांमध्ये घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेतआज देखील आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा टपाल खात्यामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला तिरंगा उपलब्ध होऊ शकतो या ज्ञान योगी व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपणास एकच सांगू इच्छितो की राष्ट्रध्वज अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जरूर आना परंतु त्याचा कुठे आव्हान होणार नाही याची दक्षता अगोदर पासूनच घ्या राष्ट्रध्वज आपल्या घरी आल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवा त्याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरासमोर फडकवल्यानंतर तू उचित वेळेत उतरवा राष्ट्रध्वज फडकवत असताना त्याचा अपमान होणार नाही तो असं म्हणतात फडकताना दिसला पाहिजे तेव्हा विनंती करतो की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशा पद्धतीने साजरा करा ही संपूर्ण जगाने याकडे खरोखरच जाज्वल्य देशाभिमान या भावनेतून बघायला हवे चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!