11 वी प्रवेश 2023 24 कागदपत्रे कोणती व कशी अपलोड करायची माहिती
आजच्या लेखात आपण 11 वी प्रवेश 2023 24 साठी कोणती कागदपत्रे व ती कशी अपलोड करायची आहेत याची माहिती पाहणार आहोत.गुणवता यादी पाहत असताना आपल्याला अकरावी संकेत स्थळावर 1 टॅब दिला आहे त्या ठिकाणी ती माहिती आपल्याला अपलोड करायची आहे.आज आपण 11 वी प्रवेशाची कागदपत्रे कशी अपलोड करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हे पाहत असताना आतापर्यंत आपण 11 वी प्रवेश प्रक्रियेत काय काय केले ? याची माहिती थोडक्यात पाहूया. म्हणजे अजून जर काही विद्यार्थी भाग 1 व 2 भरायचे बाकी असतील त्यांनी दुसरा राऊंड सुरू झाल्यानंतर आपला भाग 1 व 2 भरायचा आहे.
अकरावी प्रवेश 2023 24 च्या अंतिम टप्प्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. आपण अगदी सुरुवातीला लॉगिन आयडी मिळवण्यापासून पसंती क्रमांक टाकण्यापर्यंतचे काम अतिशय व्यवस्थितरीत्या पूर्ण केले आहे, त्यानंतर गुणवत्ता यादीतील आपला क्रमांक देखील आपण पाहिलेला असेल,जर तो पाहिला नसेल तर निळ्या अक्षरांवर क्लिक करून पहा. अकरावी प्रवेश अंतिम गुणवत्ता माहिती. अवश्य पहा.
11 वी प्रवेश 2023 24 साठी कागदपत्रे अपलोड करण्याबाबत सर्व माहिती
चला तर उशीर कशाला ? आजच्या लेखात आपण प्रवेश घेण्या आधी कोणकोणती कागदपत्रे आणि कशा पद्धतीने अपलोड करावयाची आहेत? याबाबतची माहिती पाहूया. त्या अगोदर अकरावी प्रवेश याबाबत कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत हा लेख जरूर वाचा.( निळ्या अक्षरांवर क्लिक करा)
आपल्या लक्षात आलेच असेल की अकरावी प्रवेशासाठी बरीच कागदपत्रे ही अतिशय महत्त्वाची आहेत. तर आता आपल्याला प्रवेशाच्या अंतिम टप्प्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. अगदी सुरुवातीला आपण जातीचा दाखला वगैरे आपल्याकडे नसेल तर त्याबाबत हमीपत्र भरून दिलेले होते .आता मात्र आपल्याला काही कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.याबाबत अकरावी वेबसाईट वर सुरुवात झाली आहे.
11 वी प्रवेश 2023 24 ही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपल्याला कोणत्या टॅब वरती जायचे याच्या स्टेप लक्षात घ्या आणि कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करा.
1. अकरावी अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी ज्या अधिकृत संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावरती लॉगिन करून घ्या. https://11thadmission.org.in/ यानंतर पुढील बाबी अगोदर मन लाऊन वाचा स्टेप किंवा पायऱ्या नीट करा.अकरावी प्रवेश वेबसाईट संकेत स्थळ |
2. उजव्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषांवर क्लिक करणे| ujvya kopryat aadvya reshaa clik
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतरती 3 टिंबांच्या वरती ज्या आडव्या तीन रेषा आहेत. त्यावरती क्लिक करा.आपल्यासमोर डाव्या बाजूला लगेच डॅशबोर्ड येईल.
अकरावी प्रवेश dash board |
3. डॅशबोर्ड मधील अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक कर करणे |
पहिले दोन डॅशबोर्ड हे प्रोव्हिजनल व मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट यासाठी आहेत. परंतु तिसऱ्या विभागांमध्ये आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्याबाबत सुविधा देण्यात आलेली आहे या अपलोड सेक्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पर्याय उपलब्ध आहे.अकरावी प्रवेश कागदपत्रे अपलोड |
अकरावी प्रवेश कागदपत्रे
1.शाळा सोडल्याचा दाखला
यामध्ये विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आपल्या शाळेतून मिळालेला असेलच .त्या दाखल्याची सत्यप्रत जर आपल्याकडे असेल तर ती सत्यप्रत आपण अपलोड करायची आहे.2.. दहावी गुणपत्रिका
बोर्डाकडून प्राप्त निकाल याठिकाणी अपलोड करायचा आहे.3.जातीचा दाखला (जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणारे)
यामध्ये आपल्याला जर एखाद्या जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणारा असाल ,तर त्या आरक्षणाबाबतचा तुमचा स्वतःचा जातीचा दाखला संबंधित अधिकाऱ्याने दिलेला असेल तो जातीचा दाखला इकडे आपल्याला अपलोड करायचा आहे.
4. नॉन क्रिमीलेयर (ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी)
जे उमेदवार सामाजिक आरक्षणाचा लाभ घेतात त्यापैकी एस.सी आणि एस. टी उमेदवार सोडून बाकी ओबीसी, एन. टी,विशेष मागास यांनी हे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.जर प्रमाणपत्र नसेल तर पावती अपलोड करावी.प्रवेश घेतल्यापासून 3 महिन्याच्या आत आपल्याला नॉन क्रिमीलेयर अपलोड करायचे आहे.अन्यथा आपला प्रवेश रद्द होऊ शकतो.
अशा पद्धतीने आपल्याला अकरावी प्रवेशाच्या अंतिम टप्प्याकडे वळत असताना पहिली प्रवेश यादी लागण्या अगोदर ही कागदपत्रे अपलोड करण्याचे काम करावयाचे आहे. जेणेकरून आपल्याला प्रवेश घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनी हे काम तात्काळ करावयाचे आहे.
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत सवलत
अकरावी प्रवेश यामध्ये काही विशिष्ट जातींना ओबीसी इतर मागासवर्गीय, एन टी या जातींना आपण उन्नत म्हणजेच प्रगत गटांमध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावयाचे असते ,परंतु शैक्षणिक वर्ष 2023 24 अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि आपले शैक्षणिक नुकसान टाळू शकतात परंतु तीन महिन्याच्या ते विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे त्याचे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.
अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक 👈क्लिक
अशा पद्धतीने कागदपत्रे तात्काळ अपलोड करावीत.यानंतर भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद.
आमचे हे लेख वाचा
अकरावी माहिती पुस्तिका संपूर्ण माहितीसाठी जरूर वाचा