11 वी प्रवेश तिसरी फेरी कधी होणार सुरू | akravi pravesh tisri feri kadhi hoil suru
आजच्या अकरावी प्रवेश विशेष लेखात आपण 11 वी प्रवेश तिसरी फेरी कधी सुरू होणार ? म्हणजेच तिसऱ्या राऊंडला कधीपासून सुरुवात होणार याची माहिती पाहणार आहोत.
11 वी प्रवेश तिसरी फेरी कधी होणार सुरू |
अकरावी तिसरी फेरी माहिती (toc)
अकरावी प्रवेश फेऱ्या तिसरी फेरी मार्गदर्शन
शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही फेऱ्यांमध्ये प्रवेश लागले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. असे विद्यार्थी अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी कधी लागणार? असे प्रश्न विचारत आहेत.अकरावी प्रवेशाबाबत जे संकेतस्थळावरती संभाव्य वेळापत्रक दिलेले आहे, त्या वेळापत्रकानुसारच यावर्षी संपूर्ण प्रक्रिया सुरूअसल्यामुळे दिनांक 18 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ही तिसरी फेरी किंवा राउंड होऊ शकतो.त्याबाबतच्या अपडेट आल्यानंतर आपल्याला दिल्या जातील परंतु तूर्तास तरी दुसऱ्या फेरीची कॉलेजला जाऊन प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट देण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.
तिसऱ्या राऊंडला पसंती क्रम भरण्याआधी काय करावे?
बऱ्याच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022-23 मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजेस भेटले, कारण पहिली फेरी अतिशय मोठी फेरी असते.या फेरीमध्ये बरेच विद्यार्थी प्रवेश निश्चित करत असतात.परंतु त्यात देखील काही विद्यार्थ्यांनी पसंती क्रम भरत असताना चुका केल्या. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय लागून ,मिळून देखील प्रवेश घेता आला नाही.अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी अटकाव करण्यात आला होता. त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये ब्लॉक करण्यात आले होते.दुसऱ्या फेरीसाठी ब्लॉक केलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे ?
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी ब्लॉक करण्यात आले होते, त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीला अटकाव झाला परंतु तिसऱ्या फेरीमध्ये ते अप्लाय करू शकतात. हे त्यांनी लक्षात घ्यावे आणि आता मात्र पसंतीक्रम भरत असताना व्यवस्थित रित्या पसंत क्रम भरावेत.18 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात होण्याआधी काही गोष्टी डोक्यात ठेवा.
तिसरा राऊंड महत्वाच्या बाबी
1. 11 वी आपला प्रवेश का नाकारला गेला ?
अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला प्रवेश का नाकारला गेला? याबाबतची कारणे तुमच्याकडे असायला हवीत. तरच तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये व्यवस्थितरित्या फॉर्म भरू शकता. या संदर्भात एक स्वतंत्र एकच लिहिलेला आहे. तो आवश्य वाचा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल आणि सर्व कारणे समजतील.2. कागदपत्रे अपलोड केल्याची खातर जमा
तिसऱ्या राऊंड साठी पसंती क्रम भरण्या अगोदर विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला आणि निकाल हे कागदपत्रे अपलोड केले आहेत का? हे अवश्य बघा. याबाबत किल्ले स्वतंत्र लेख लिहिलेला आहे तो व्यवस्थित वाचून आपली कागदपत्रे कुठे व कशा अपलोड करायची? याचा सर्व डेमो देण्यात आलेला आहे.तो वाचा आणि कागदपत्रे पहिल्यांदा अपलोड करा अन्यथा तिसऱ्या फेरीत देखील तुम्हाला डावलेले जाऊ शकते.3. कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत
समजा माझा तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये अमुक एका महाविद्यालयाला नंबर लागला परंतु त्यावेळी प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत का? हे एकदा बघा कारण बऱ्याचदा काही विद्यार्थी विशिष्ट जातीच्या आरक्षणाच्या लाभासाठी अर्ज करतात. सुरुवातीला अर्ज करताना हमीपत्र देतात की प्रवेशाच्या वेळी जातीचा दाखला किंवा इतर एक्स वाय झेड सर्वच कागदपत्रे आम्ही जमा करून पण ती कागदपत्रे आपण जमा करू शकला नाही तर आपला प्रवेश त्यावेळी देखील नाकारला जाऊ शकतो.4. जातीचा दाखला किंवा अन्य कागदपत्रे उपलब्ध नसतील तर काय करावे
जर विद्यार्थ्यांनी अमुक एका जातीच्या आरक्षण मिळावे असा दावा केला असेल, परंतु ते कागदपत्र त्याला मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रिसेट करून घ्यावा. तो अनलॉक करून त्यामध्ये ओपन मधून प्रवेश मिळावा.हा भाग सिलेक्ट करावा त्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क करा. अपवादात्मक परिस्थितीत जातीच्या दाखल्याबाबत जर विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसेल तर पालकांचा जातीचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे.परंतु या संदर्भात सर्व कागदपत्रे अपलोड करा अधिक माहिती मिळवा.5. नॉन क्रिमीलेअर यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
अनुसूचित जाती जमाती म्हणजेच एस सी एस टी विद्यार्थी सोडता बाकी तर ओबीसी, एनटी ,एसबीसी या सर्वांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळी जमा करावी लागते. परंतु विद्यार्थ्यांकडे ते जर ते नसेल तर त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे ,परंतु या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की, जर समजा एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न नॉन क्रिमिलियर साठी लागते त्यापेक्षा जास्त असेल म्हणजेच काय तर तीन महिन्यानंतर देखील तुम्हाला नॉन क्रिमीलेअर मिळणे शक्य नाही. असे वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर या आरक्षणाचा लाभ घेऊ नये. अन्यथा कॉलेज सुरू होऊन तीन महिन्याने तुम्ही जर नॉन क्रिमीलेअर दिले नाही तर त्या टप्प्यावर देखील तुमचा प्रवेश हा रद्द केला जाऊ शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नॉन क्रिमिनल काढून घ्या ते मिळेल का नाही याची शक्यता तपासून पहा कारण आता तिसरा राउंड आहे त्यामुळे ही माहिती महत्त्वाची समजावी.6. अर्जाची बारकाव्याने तपासणी
आपण भरलेला अर्ज क्रमांक व त्यातील भाग एक आणि दोन यामधील सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्या. त्यामध्ये जर काय फरक दिसत असेल तर आपल्या शाळेला भेट द्या मार्गदर्शन केंद्राला भेट द्या मात्र काही चूक जर ठेवून तुम्ही अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर कॉलेजला जाल त्यावेळी देखील तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर सर्व माहिती व्यवस्थित असणे अतिशय गरजेचे आहे.तिसऱ्या राऊंडच्या तारखेबाबत 11 वी प्रवेश तिसरी फेरी कधी सुरू होणार ?
11 वी प्रवेश तिसरी फेरी कधी सुरू होणार ? माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे यावर्षी सर्व फेऱ्या होत आहेत तिसरी फेरी देखील 18 ऑगस्ट पासूनच सुरु होण्याची दाट शक्यता आहे.परंतु यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर थोडाफार बदल एका दुसरा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो याबाबतच्या अपडेट आपल्याला नक्कीच दिला जातील .चौथ्या फेरीचे वेगळेपण
चौथ्या फेरीची वाट न पाहता तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी प्रयत्न करा. तिसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अतिशय गांभीर्याने विचार करावा ,कारण अकरावी प्रवेश फेरी एक दोन तीन प्रमाणे चौथी फेरी असणार नाही.या तिन्ही फेऱ्यांमध्ये आपल्याला आरक्षण किंवा इतर लाभ यांचा फायदा घेता येत होता मात्र चौथ्या फेरीमध्ये फक्त आपल्याला मिळालेले गुण यांचाच विचार केला जातो म्हणून विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीमध्येच आपला प्रवेश कसा निश्चित होईल. यासाठी व्यवस्थित पसंती क्रम टाकावेत ते टाकत असताना आपल्याला मिळालेले गुण आणि कॉलेजचे कट ऑफ हे पाणी अतिशय गरजेचे आहे यासाठी देखील एक स्वतंत्र लेख दिलेला आहे तो आपण एकदा जरूर वाचावा.अकरावी प्रवेश च्या बाबतीत कोणतीही शंका त्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी ज्ञानयोगी व्यासपीठ आपले योगदान देत आहे.तरी विद्यार्थ्यांनी अकरावी मार्गदर्शन आज आमचा व्हाट्सअप ग्रुप आहे यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आम्ही आपल्या सर्व समस्या सोडवून घेऊन अतिशय आनंदामध्ये अकरावीचा प्रवेश निश्चित करत आहोत .जर आपल्याला देखील आमच्या अकरावी मार्गदर्शन या व्हाट्सअप ग्रुप चा फायदा घ्यायचा असेल तर खाली लिंक वरती क्लिक करा
अकरावी प्रवेश मार्गदर्शन व्हाट्सअप ग्रुप अधिक मार्गदर्शन
खाली दिलेल्या निळ्या अक्षरांवरती क्लिक करताच आपोआप आपण आमच्या अकरावी मार्गदर्शन या ग्रुप मध्ये जॉईन व्हा !आमच्या लेख मालिका मराठी बरोबर आता आम्ही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हिंदीमध्ये देखील प्रकाशित करीत आहोत. जर विद्यार्थ्यांना या शंका व्यतिरिक्त जर अजून काही शंका असतील तर विद्यार्थी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकतात. किंवा त्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होणे योग्य वाटत नाही असे विद्यार्थी मला वैयक्तिक संपर्क करू शकता. यासाठी माझा जो नंबर देत आहे तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 8286515775 या क्रमांकावर ती व्हाट्सअप मेसेज करा किंवा फोन केला तरी हरकत नाही. हे तो आज की विद्यार्थीचे चिंताग्रस्त आहेत अकरावी परीक्षा बाबत माझे काय होणार तर विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. आमची ही माहिती कशी वाटली नक्की कमेन्ट करा. इतराना देखील पाठवा. पुन्हा भेटू एका नवीन विष्यासासह धन्यवाद !