Type Here to Get Search Results !

11 वी प्रवेश कॉलेज कट ऑफ आणि आपली पात्रता पाहणे college cut off and know your eligiblity

 11 प्रवेश 2022 23 कॉलेजचे कट ऑफ चेक करणे आणि KNOW YOUR ELIGIBLITY पाहून पसंती क्रम भरणे


अकरावी प्रवेश 2022 23 या विशेष लेखांमध्ये आज आपण 11 वी  प्रवेश 2022 23 कॉलेजचे कट ऑफ चेक करणे आणि KNOW YOUR ELIGIBLITY पाहून पसंती क्रम भरणे ही माहिती पाहणार आहोत. 
कारण का?तर 11 वी प्रवेश कॉलेज कट ऑफ आणि आपली पात्रता पाहणे हे माहिती नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.  बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेजचे कट ऑफ कसे बघायचे? त्याचबरोबर आपल्याला पडलेले गुण यावरून अमुक एका कॉलेजला आपल्याला प्रवेश मिळू शकतो का? याबाबत काही कल्पना अकरावी संकेतस्थळावरून आपल्याला येऊ शकते त्यासाठी आपल्याला दोन बाबी पहाव्या लागतात, त्या म्हणजे कॉलेजचे कट ऑफ आणि दुसरी आहे KNOW YOUR ELIGIBLITY चला तर मग सुरुवात करूया 11 वी प्रवेश कॉलेज कट ऑफ आणि आपली पात्रता पाहणे  या घटकाला 


कॉलेज कट ऑफ पाहणे 

आपल्याला अकरावी प्रवेश 2022-23 मध्ये कॉलेजचे कट ऑफ पाहत असताना पहिल्यांदा काय करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्ही

1. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाणे

याविषयी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही तरी देखील सांगतो, विद्यार्थ्यांनी कटऑफ पाहण्यासाठी अकरावीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

2. आपला विभाग सिलेक्ट करणे

आपले जे REGION आहे म्हणजे विभाग दिलेला आहे जसे की  मुंबई,पुणे, नागपूर यापैकी आपला जो विभाग असेल,त्या विभागावरती क्लिक करायचे आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉलेजचे कट ऑफ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉगिन करायचे नाही हे लक्षात ठेवा.

3. उजव्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषांवर क्लिक करणे

आपला REGION सिलेक्ट केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वरती जातो, त्याच पद्धतीने लॉगिन न करता देखील आपला विभाग सिलेक्ट केल्यानंतर उजव्या बाजूला आडव्या तीन रेषांवर क्लिक करा त्यानंतर भरपूर ऑप्शन आपल्याला दिसतील यामधील कट ऑफ या ऑप्शन वरती क्लिक करा  हिंदी जनकारी me फोटो दिया है ऊसको देखे 
11 वी cut off demo क्लिक करा .

4. कॉलेज संदर्भात सर्व माहिती भरणे

आपण कॉलेज कट ऑफ वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो येईल. खाली दिलेल्या चित्रात पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, त्यामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा तो एरिया कॉलेजचे नाव, कॉलेज माध्यम ,शाखा या सर्व बाबी टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

आपण ही सर्व माहिती सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर NEW WIMDOW येईल, त्या विंडोमध्ये अपंग, सर्वसाधारण, महिला असे रकाने दिसतील आणि या रकान्यांवरून त्या कॉलेजचे कट ऑफ म्हणजे त्या रेंजच्या पुढे जर मार्क आपल्याला असतील तर आपल्याला त्या मार्गाने प्रवेश मिळू शकतो.
उदाहरणार्थ
पाटकर कॉलेजचे कट ऑफ ओपन साठी  460असेल तरव  मला परीक्षेमध्ये 465  गुण असतील तर माझा त्या ठिकाणी नंबर लागू शकतो, लागेलच असे नाही.असे कट ऑफ पाहिल्यावर काही एक अंदाज नक्की येतो. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरणे आधी CUT OFF  पहावी .पहिल्या व दुसऱ्या यादिवेळी  बऱ्याच विद्यार्थ्यांनी कट ऑफ यादी पाहिली नाही आणि कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील मुंबईमध्ये दर्जेदार कॉलेजेस पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये टाकले साहजिकच त्यामुळे त्यांचा दोन्हीही फेऱ्यांमध्ये विचार केला गेला नाही.

कॉलेजचे कट ऑफ पाहण्याचे फायदे

वरील परिच्छेदात आपण पाहिलेच आहे की कट ऑफ पाहिल्यामुळे आपल्याला किती गुणांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो ,याविषयीची ढोबळ माहिती आपल्या समोर येते. आणि साहजिकच पसंती क्रम भरत असताना ही माहिती पाहणे अतिशय गरजेचे आहे. तेव्हा आता तिसऱ्या फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी हे कटऑफ पाहून आपले पसंती क्रमांक द्यावेत असे  मला वाटते.मित्राने दिले ते आपण देणे चुकीचे आहे .कारण दोघांच्या गुणात तफावत असेल  तर दोघांना एकच कॉलेज कसे मिळेल? याचा विचार करून तिसऱ्या फेरीचे पसंती क्रम निवडा. 

आजच्या या लेखातून सर्व विद्यार्थ्यांच्या 90% शंका आताच  क्लिअर झाले असतील.कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी कट ऑफ न पाहता अकरावीचे फॉर्म भरले होते, ज्या  विद्यार्थ्यांनी आमचा अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप जॉईन केला त्या विद्यार्थ्यांना मात्र या समस्येचा सामना करावा लागला नाही, कारण त्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कोणत्या प्रकारची घाई करू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 
 यापुढे आपल्याला देखील अकरावी प्रवेश बाबत मार्गदर्शन हवे असल्यास खाली लिंक वर क्लिक करून आमचा अकरावी मार्गदर्शन हा ग्रुप जॉईन करा.

अकरावी मार्गदर्शन WTP ग्रुप

फक्त निळ्या क्षणांवर क्लिक करा लगेच आपण ग्रुप मध्ये दाखल व्हाल. 
आता आपण KNOW YOUR ELIGIBLITY हा घटक पाहूया. 

 आपली पात्रता तपासा know your eligiblity

आपल्याला किती गुण आहेत? यावरून आपल्याला XYZ  कॉलेज मिळू शकते का?याबाबत अंदाज येण्यासाठी अकरावी संके
know your eligiblity अशी चेक करा 

तस्थळावर अजून एक ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे  KNOW YOUR ELIGIBLITYया  वरती जाण्यासाठी खालील कृती करा. 

1. सर्वप्रथम अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरती जा

2. संकेतस्थळावर गेल्यानंतर लॉगिन न करता आपले रीजन निवडा जसे की मुंबई

3. ज्या पद्धतीने आपण कट ऑफ हा ऑप्शन निवडला त्याच पद्धतीने तिथे दिसणारा  KNOW YOUR ELIGIBKITY ऑप्शन वर क्लिक करा
know your eligiblity अशी चेक करा
know your eligiblity अशी चेक करा 


4. आपली सर्व माहिती त्या ठिकाणी फीड करा.


आपले परीक्षेचे गुण टाकल्यानंतर त्या ठिकाणी रेंज दिलेले आहे त्या रेंज नुसार आपल्याला जर 400 गुण असतील तर त्याच्या अलीकडे पलीकडे किती गुण किंवा मेरिट लागू शकते.याबाबत दहा पंचवीस यापैकी एका नंबर सिलेक्ट करा. व कॅपच्या कोड टाकून ती माहिती सबमिट करा. त्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीन वरती आपण ज्या महाविद्यालयासाठी पात्र होऊ शकता असे काय कॉलेजस दाखवले जातील. हा देखील एक अंदाज आहे ,त्यामुळे केवळ पसंती क्रम भरण्यासाठी मदत म्हणून  KNOW YOUR ELIGIBLITY या पर्यायाचा उपयोग करा,

अशा पद्धतीने आजच्या लेखामध्ये तुम्हाला पसंतीक्रम भरण्याआधी कॉलेजचे कट ऑफ कसे व का पहायचे ?आणि आपली पात्रता अमुक एका कॉलेज साठी  पात्रता आहे का ते KNOW YOUR ELIGIBLITY ने  कशा पद्धतीने चेक करायची?हे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे.खरोखर तुम्ही पहिल्यापासून आमच्याशी जोडले गेले असता तर---- या अडचणी तुम्हाला आल्या  नसत्या. असो देर है दुरुस्त है. लवकरात लवकर कॉलेजचे कट ऑफ आणि आपली एलिजिबिलिटी पाहून कॉलेजचे पसंतीक्रम भरा. कारण का तर तिसऱ्या फेरीनंतर चौथ्या फेरीसाठी कुठल्या प्रकारचे आरक्षण विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे चौथ्या फेरीचे मेरिट प्रचंड वाढण्याची शक्यता असते म्हणून तिसऱ्या फेरीच्या वेळी विचारपूर्वक फॉर्म भरा कॉलेजचे पसंती क्रम व्यवस्थित द्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत. धन्यवाद .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area