अकरावी प्रवेश 2022 23 दुसऱ्या फेरीसाठी करण्याचा आजचा शेवटचा दिवस 11th second round application last day
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये पहिल्या फेरीमध्ये ज्यांना प्रवेश लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी 6 ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश हा निश्चित केलेला आहे. ज्यांना आपल्याला हवे ते कॉलेज लागलेले नाही ते दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करत आहेत. अपवाद जे की ज्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रथम क्रमांकाचे कॉलेज लागून त्यांनी प्रवेश घेतला नाही त्यांना या दुसऱ्या फेरीसाठी अटकाव केलेला आहे.मात्र हे विद्यार्थी तिसऱ्या फेरीमध्ये अर्ज करू शकतात तेव्हा त्यांनी काळजी करू नये.
अकरावी प्रवेश दुसरी फेरी पसंतिक्रम dusri feri pasnti kram
अकरावी ऑनलाइन प्रवेश दुसऱ्या फेरीसाठी अर्ज कसा करावा dusri feri asa kra araj
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2022 23 यामध्ये दुसऱ्या फेरीला जर आपल्याला अर्ज करायचा असेल म्हणजेच आपण केलेला अर्जात जर आपल्याला काही बदल करावयाचा असेल त्यांच्यासाठीच ही सूचना आहे.ज्यांना आपल्या अर्जात कोणताही बदल करायचा नाही. पसंतिक्रम बदलायचे नाहीत......... त्यांनी कोणतीही प्रक्रिया करायची नाही.सिस्टीम मध्ये तशी व्यवस्था केलेली आहे.तरी देखील मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपला फॉर्म एकदा फॉर्म अनलॉक करून त्यात थोडेफार बदल असतील तर ते करायला हवेत .आज 9 ऑगस्ट तारीख प्रवेश वेळेच्या दुसऱ्या टप्प्यातील आजचा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे .
$$ option फॉर्म भरण्या आधी हा लेख वाचा $$
दुसऱ्या फेरीला प्रवेश घेण्यापूर्वी dusrya feris psnti kram taknya adhi he kra
1. अकरावी संकेतस्थळावर लॉगिन 11th website log in
अकरावी प्रवेशासाठी जे अधिकृत संकेत स्थळ दिलेले आहे त्या संकेतस्थळावर लॉगिन करा. आता आपणाला लॉगिन कसे करायचे याविषयी माहिती आहे त्याविषयी मी जास्त काय सांगणार नाही.लॉग in केल्या नंतर उजव्या बाजूला dashborad वर वलीक करा.
2. अर्ज अनब्लॉक करणे application unlok karne
लॉगिन करून डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला CAT सेकंड राऊंड मध्ये अनलॉक एप्लीकेशन या ऑप्शन वरती क्लिक करा, तरच तुम्हाला पसंतीक्रम बदलता येणार आहेत. किंवा नव्याने भरता येणार आहेत. तर खाली दिलेल्या फोटोमध्ये image तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपण अनलॉक वरती क्लिक करून पुढची सर्व प्रक्रिया करायचे आहे.
अर्ज unlok करणे |
अशा पद्धतीने अर्ज अनलॉक करून घ्या. त्याशिवाय तुम्हाला पसंती क्रम टाकण्यासाठी म्हणजेच ऑप्शन फॉर्म टाकण्यासाठी जो टॅग दिलेला आहे तो दिसणार नाही.
3. पसंतिक्रम टाकणे pasantikram takne
डॅशबोर्ड वरती जाऊन आपण आपला अर्ज अनलॉक केल्यानंतरच या राऊंडमध्ये तुम्हाला चेंज प्रेफरन्स म्हणजेच आपले पसंती क्रम बदला असा ऑप्शन येईल. पुन्हा एकदा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही, त्यांनी आपला फॉर्म अनलॉक करू नये. तर प्रेफरन्स म्हणजेच पसंती क्रम बदलण्यासाठी खालील दिलेल्या इमेजची तुम्हाला मदत होऊ शकते त्या पद्धतीने क्लिक करा.
second round option form |
अशा पद्धतीने वरील बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण पहिल्या फेरीच्या वेळी ज्या पद्धतीने कॉलेजेस सिलेक्ट केली होती ती कॉलेजेस सिलेक्ट करावेत आणि त्यांना आपल्याला हवा तसा क्रम द्यावा..
पसंती क्रमसाठी सूचना psanti kram bhrnyasathi suchna
विद्यार्थ्यांना जर अमुक XYZ एका महाविद्यालयाला प्रवेश घ्यायचाच नसेल तर विद्यार्थ्यांनी कृपया त्या महाविद्यालयाचे नाव आपल्या पसंती क्रमामध्ये टाकू नये. त्याचबरोबर पसंती क्रम देताना त्या कॉलेजचे मागील वर्षाचे कट ऑफ याचा देखील विचार करावा. तसेच बायफोकल विषयासाठी आपल्याला जे विषय घ्यायचे ते विषय त्या कॉलेजमध्ये आहेत का? याची सर्व माहिती काढूनच पसंती क्रम भरावा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन देखील त्यांना हवे ते विषय त्या कॉलेजमध्ये मिळत असल्यामुळे अनेकांची गैरसोय झालेली आहे. तर या दुसऱ्या फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी कॉलेजेस टाकत असताना विचारपूर्वक टाकावीत. समजा आपल्याला दुसऱ्या फेरीत देखील सर्वात आधी टाकलेले कॉलेज भेटले आणि त्याला आपण जर प्रवेश घेतला नाही तर आपल्याला देखील तिसऱ्या फेरीसाठी अटकाव केला जातो हे लक्षात घ्या. म्हणजे पसंतिक्रम विचारपूर्वक भरणे गरजेचे आहे.
@@ अडीच लाखाची स्कॉलरशिप काय आहेत अटी वाचा नि अर्ज करा@@
थोडक्यात अकरावी प्रवेश घेत असताना ऑप्शन फॉर्म आपल्याला ज्या विद्यालयामध्ये शिकायचे आहे, तीच महाविद्यालय यामध्ये टाकावीत याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. अनेक हुशार विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना दक्षता बाळगलेली नाही व महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी आम्ही सांगितलेला ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हा लेख वाचला आणि आपल्या चुका टाळल्या.यापुढे देखील आपले मित्र मैत्रिणी किंवा आपण प्रवेशाच्या कोणत्याही पातळीवर येणाऱ्या अडचणींपासून वाचण्यासाठी आमच्या खालील लिंक वर क्लिक करून अकरावी संपूर्ण मार्गदर्शन या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा.
11 वी सम्पूर्ण मार्गदर्शन ग्रुप 11 th admisdion group
https://chat.whatsapp.com/CCiMQuRDfQ67k7jvOKqjSE
ऑप्शन फॉर्म लॉक करणे बंधनकारक option form lok compulsory
विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म अनलॉक केल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने कॉलेजेस हवे आहेत. ते वरील सूचनांचा विचार करून पसंती क्रमांक टाकावेत एक, दोन, तीन, चार असे क्रमांक टाकल्यानंतर तो फॉर्म पुन्हा लॉक करायचा आहे.
अशा पद्धतीने आपल्याला आपला फॉर्म हा लॉक करायचा आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 प्रवेश फेरी दोन ऑप्शन फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे. 9 ऑगस्ट 2022 नंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म दुसऱ्या फेरीसाठी भरता येणार नाही यानंतर तिसरी फेरी देखील होणार आहे याची देखील नोंद घ्यावी.
दुसऱ्या फेरीची मेरिट लिस्ट dusri feri merit list
9 ऑगस्ट 2022 नंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम टाकता येणार नाहीत. या विद्यार्थ्यांच्या माहिती वरती 10 ऑगस्ट 2022 ते 11 2022 कालावधीत प्रक्रिया केली जाईल. आणि त्यानंतर 12 ऑगस्ट 2022 साधारणपणे सकाळी दहा वाजता ही यादी लागेल.
दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख second list admission date
पहिल्या फेरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश न घेतल्यामुळे किंवा न मिळाल्यामुळे तसेच काही वेळत प्रवेश घ्यायला न गेल्याने त्यांचा आपला प्रवेश हाताने रद्द करून घेतलेला आहे. अशी चूक टाळण्यासाठी हे वेळापत्रक नीट समजून घ्या. 12 तारखेला दुसरी मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला जे महाविद्यालय मिळालेले आहे त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयाला भेट द्यायचे आहे त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे.
दुसऱ्या फेरीत अर्जाची संधि नसलेले 2 nd roundla jyana araj krnyachi sandhi naslele
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रथम क्रमांकाचे कॉलेज मिळून देखील प्रवेश घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अर्ज करता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांनी 17 तारखे नंतर ही दुसरी फेरी संपल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी मात्र आपल्याला एक संधी मिळणार आहे. ही संधी मिळाल्यानंतर जागा या कमी असतील त्यासाठी कॉलेजचे कट ऑफ टक्केवारी यांचा विचार करून पसंती क्रम टाकावा ही विनंती.
अशा पद्धतीने आजच्या लेखामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 11 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये प्रवेश फेरी दोन दोन साठी अर्ज कसा करावा? किंवा पसंती क्रम बदलायचा ?असेल तर तो कशा पद्धतीने बदलावा ? सर्वप्रथम फॉर्म अनलॉक करून त्यानंतर आपले पसंती क्रम बदलून पुन्हा फॉर्म लॉक करायचा आहे.
कागदपत्रे अपलोड करण्याबाबत kagdpatre upload
अकरावी प्रवेशाच्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला एक टॅब देण्यात आलेला आहे. त्यामध्ये अपलोड डॉक्युमेंट अंतर्गत तुम्ही तुमचे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अगोदर अपलोड करायचा आहे/ बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो अपलोड न केल्यामुळे अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत आहेत/ तर पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेले आहेत ते विद्यार्थी या चुका सुधारतील परंतु त्यांना अजून कॉलेजेस लागले नाही त्यांचे दुसऱ्या फेरीमध्ये लागू शकते त्या विद्यार्थ्यांनी मात्र सर्वप्रथम आपले कागदपत्रे ही अपलोड करावी.कशी करायची उपलोड क्लिक करा कागदपत्रे अपलोड.
अकरावी प्रवेशाची आमची माहिती आपल्या उपयोगाला येत आहे का ?ते आम्हाला कमेंट करून कळवावे. त्याचबरोबर तुमच्या जर कोणत्या याव्यतिरिक्त अजून कोणत्या शंका असतील तर तुम्ही आमच्या अकरावी मार्गदर्शन या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा .आपणास व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होणे शक्य नसल्यास8286515775 प्रशांत शिवकुले या नंबर वरती कधीही संपर्क साधून आपल्या शंकेचे समाधान करून घ्या. हेतु हाच आहे की अकरावी प्रवेशाचा खडतर मार्ग आपणास सुखकारक व्हावा हाच हेतु आहे.
आमचे हे लेख किंवा त्याच्या लिंक आपल्याजवळ येत आहेत, त्या लिंक्स आपले मित्र मैत्रिणी यांना देखील अडचणी आहेत असा विचार करून आपल्या परिचयाच्या आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे ही लिंक कशी जाईल यासाठी प्रयत्न करा तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या हजारो मुलांना येत आहेत याचा विचार कराआणि आय सर्वांपर्यंत ही माहिती लिंकद्वारे पाठवा. त्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये तुम्हाला जे हवे ते कॉलेज मिळावे या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह .
आमचे हे लेख जरूर वाचा
*प्रवेश घ्यायला जाताना ही कागदपत्रे सोबत न्या....
@ याव्यतिरिक्त काही माहिती हवीय तर 11 वी प्रवेश महितीपुस्तिका वाचा
# कॉलेजला जाताय निखळ मैत्री ठेवा कशी तर
कॉलेजचे जीवन म्हणजे काय तरी करून दाखवणे आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याचा काळ पण मुले ..... ?? हे करतात आणि नुकसान करतात
- दहावीला कमी गुण घाबरू नका आत्मविश्वासाने अभ्यास करा
कारण 36 टक्के गुण मिळवून 1 व्यक्ती आज आहे कलेकटर