मैत्री दिनाच्या शुभेच्छा चारोळ्या माहिती 2022 friendship day mahiti charolya shubhecha
आजच्या लेखात आपण मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे मैत्री दिवस देखील जोरदार साजरा करतो.मैत्री दिवसाच्या म्हणजेच फ्रेंडशिप डे मराठी माहिती ,शुभेच्छा,संदेश आणि काही चारोळ्यांच्या मदतीने यावर्षीचा मैत्री दिवस आपण साजरा करणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम हा मैत्री दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे हा साजरा करण्यामागील जो काही इतिहास आहे तो थोडक्यात पाहूया.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा! चारोळ्या माहिती
मैत्री दिन (toc)
मैत्री दिन साजरा करण्यामागील इतिहास | maitri dinacha itihas | history of frindship day
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो. परंतु मैत्री दिवसाची सुरुवात किंवा संकल्पना नेमकी कशी पुढे आली हे बऱ्याच लोकांना माहित नाही. वर्षभर आपण वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो ते करताना कधी कधी आपली नकारात्मकता असली तरी यातील काही दिवस हे मात्र त्या निमित्ताने आपल्या नात्यांना उजाळा देत असतात. यातीलच एक दिवस म्हणजे मैत्री दिवस.मैत्री दिनाच्या दिवशी या मैत्रीचे महत्त्व सांगणारी कितीतरी माहितीआपण वाचत असतो. तर चला मग या मैत्री दिवसा मागील पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊया.
या मैत्री दिनाच्या बाबतीमध्ये अशी माहिती वाचण्यामध्ये आली की,या दिवसाला म्हणजेच मैत्री दिवसाला विशेष असे महत्त्व आहे ही घटना अमेरिकेमधील आहे. अमेरिकेमध्ये दोन मित्रांची जोडी ही अतिशय प्रसिद्ध अशी जोडी होती. ते मित्र एकमेकांशिवाय राहत नव्हते. काही काम असो, आनंदाचे दुःखाचे क्षण असो आपण ज्या पद्धतीने मित्रांसोबत राहतो. अगदी त्याच पद्धतीने हे दोन मित्र अतिशय सुखा समाधानाने राहत होते. परंतु काही कारणास्तव अमेरिकन सरकारकडून एका मित्रावर आरोप प्रत्यारोप झाले गुन्हे सिद्ध झाले आणि त्यामध्ये सरकारकडून त्या एका मित्राला शिक्षा केली गेली.ही शिक्षा होती मृत्यू दंडाची. या घटनेने दूसरा मित्र की आपला मित्रच या जगात राहिला नाही आता माझा जगून उपयोग काय? असा स्वतःला केला आणि त्या मित्राने आत्महत्या केली. ही घटना घडली त्या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुःखाचे वातावरण तयार झाले. मित्र असावा तर कसा? तर एक मित्र या जगामध्ये राहिला नाही तर दुसऱ्याने त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अमेरिकन सरकारने थोडासा या घटनेबाबत विचार करावा लागला आणि अमेरिकेने या दोन मित्रांच्या मैत्रीचा गौरव म्हणजेच फ्रेंडशिपचा गौरव किंवा त्याची आठवण राहावी म्हणून 1935 साली हा दिवस मैत्री दिन म्हणून अमेरिकेमध्ये साजरा करावा असे आवाहन केले गेले. आणि हळूहळू संपूर्ण जगामध्ये या घटनेची माहिती होत गेली. आता आपण पाहतो की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो.
जरा विचार करून पाहिले तर आपण एखादा दिवस का साजरा करतो ? ते दिवस साधारणपणे शुभ दिन असतात,कुणाचातरी जन्मदिवस, कोणती तरी एखादी नवीन घटना, परंतु तसा विचार केला तर या मैत्री दिनाला जी पार्श्वभूमी आहे ती मित्राच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आहे. असो हा थोडासा विषय बाजूला ठेवूया. सांगण्याचे तात्पर्य असे की जीवनामध्ये मैत्री ही अतिशय गरजेची आहे.
जागतिक मैत्री दिवसाला सुरुवात | jagtik maitri din suruvat
जागतिक मैत्री दिन म्हणजेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून साजरा व्हावा, हा विचार 20 जुलै 1958 रोजी डॉक्टर रामन आर्टीमियो ब्रेको यांच्या मनामध्ये आला. त्यांनी 1958 साली युनायटेड काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा पण नॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करावा,याची घोषणा केली. आणि या राष्ट्रीय मैत्री दिनापासूनच इतर संपूर्ण देशांनी हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली.
या अमेरिकेतील घटने प्रमाणेच या मैत्रिणींना विषयी अजून एक घटना सांगितली जाते ती म्हणजे 1930 च्या सुमारास जोयस हॉल या एका उद्योगपतीने किंवा बिझनेसमन ने आपला व्यवसा, आपली प्रसिद्धी इतकी मोठी आहे पण आपण आपल्या मित्रांसाठी काहीतरी करायला हवे? या हेतूने मित्रांना काही कार्ड्स वाटली. की ज्यामध्ये मैत्रीचे महत्व सांगणारे संदेश होते त्याचबरोबर फ्रेंडशिप गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू देखील दिल्या. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या मित्राला या दिनाच्या निमित्ताने खुश करण्याचा हा दिवस.जगातील अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे किंवा मैत्री दिन म्हणून साजरा होऊ लागला. यावर्षी 7 ऑगस्ट 2022 या दिवशी जागतिक मैत्री दिन आहे
मैत्रीचे महत्त्व | maitriche mhttva
मैत्री ही जीवनामध्ये अतिशय गरजेची आहे, या मैत्रीचे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे.
आज सर्वत्र मैत्री दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. यामागचे कारण प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मित्र किंवा मैत्रीचे महत्व समजलेले आहे. मी तर असं म्हणतो की एक वेळ माणूस रक्ताच्या नात्याने परका झाला तरी चालेल परंतु तो मैत्रीच्या नात्याने पारखा झाला तर त्यासारखे मोठे दुःख नाही. साधे एवढेच बघा ना ! आपल्याला शिक्षणासाठी आपले गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले,तर सगळ्यात जास्त दुःखी होणारा आपला मित्र असतो. कारण का तर आपले सुख दुःख या सर्व गोष्टींचा तो सोबती असतो.म्हणूनच या मैत्रीला जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या जीवनातील ताण-तणावाच्या वेळी किंवा आनंदाच्या वेळी आपल्याला नेहमी आपला मित्र हा जवळ असावाअसे वाटते. यातूनच मैत्रीचे महत्व आपल्याला समजले असेल. जीवन जगत असताना चढ उतार हे येतच असतात. या चढउतारांच्या वेळी मित्रच आपल्या सोबत खंबीरपणे उभे असतात. आपल्याला आधार देत असतात. हे पण दिवस जातील असे सांगून जीवनातील सकारात्मकता शिकवत असतात.
कधी कधी हे जिवलग मित्र ज्यावेळी मस्तीच्या मूडमध्ये असतात त्यावेळी आपल्या मित्राची खूप जास्त टर उडवतात. एखाद्याची जास्त खेचत असतात. परंतु त्या टरउडवण्यातून देखील एक प्रकारचा आनंद इतर मित्रमंडळी घेत असतात. म्हणजेच काय मैत्रीमध्ये भांडणाचे चेष्टा-मस्करीचे देखील कौतुक होते यापेक्षा अजून वेगळे काय हवे? या सर्व गोष्टी इतर नात्यांमध्ये कधीच शक्य नाहीत परंतु मैत्रीमध्ये शक्य आहे.
प्रत्येकाला आपले आई-वडील हे आपली अस्मिता वाटत असतात,या जगत आजही काही कफ्फलक मी माझ्या बापाचे देखील ऐकत नाही असा इगो धरून असतात.पण या मित्रांच्या दुनियेत मात्र हेच मित्र बोलता बोलता मला आठवले म्हणून सांगतो, की साधारणपणे कॉलेजला अकरावी - बारावीला असताना मित्रांचा ग्रुप एकमेकांना त्यांच्या वडिलांचे नावाने हाक मारायचे आज हसू येते. कोणी चिडले तर बोलता बोलता म्हणायचो की तुझं नाव घ्यायला तू काही कर्तुत्व केले आहेस का? ज्यावेळी काही असमान्य काम करशील त्यावेळी तुझे नाव घेऊ ! सध्या तू बापाच्या नावाने जग. असा टोमणा देखील मित्र एकमेकांना मारायचे. हा झाला मस्तीचा भाग पण - त्यातील एक वाक्य जर विचारात घेतले की या जगात तुला काहीतरी अस्तित्व निर्माण करायचे आहे, तर आम्ही तुला मित्र म्हणून एक स्थान देऊ. थोडक्यात आपण कायतरी करून दाखवायचे हा भाव त्यात हे आज उमगत आहे. या मैत्री दिनाच्या निमित्ताने सांगायला अभिमान वाटतो की, आमचा जो काही चार-पाच जणांचा मित्रांचा ग्रुप होता तो आज त्याच्या त्याच्या परीने प्रत्यक क्षेत्रामध्ये माहिर आहे. कोण शिक्षक, कोण इंजिनियर, एक मित्र तर अपंग असून देखील आज नावाजलेला डॉक्टर म्हणून तालुक्यात नाव आहे.
मला या मैत्री दिनाच्या निमित्ताने एकच सांगायचे आहे की, जे कोणत्याच नात्यात नसते ते मैत्रीमध्ये असते. म्हणून मैत्रीचे नाते ,best friend चे नाते आहे. या मैत्रीत कोन जवळचा,कोन लांबचा, असे नसते कोण जीव की प्राण असे सर्व काही असते. कधी कधी तो मित्र आज आपल्या जवळ राहत नसला तरी आठवणी मात्र कायम येत असतात.
कधी कधी ज्या मित्राशी आपले पट्त नाही पण विचार केला तोच आपला प्रिय मित्र किंवा बेस्ट फ्रेंड असतो. म्हणजे काय तर ,
तुझ माझ पटेना ,
तुझ्याशिवाय करमेना .
अशी अवस्था मैत्रीत अनुभवायला मिळतो. पण तरी त्या मित्रा शिवाय आपण राहू शकत नाही ,म्हणून मैत्री हे अतिशय sensative नात आहे . सर्व वाचक मंडळी याना friend ship च्या निमित्ताने खूप खुप शुभेचा. अशा पद्धतीने हे मैत्रीचे नाते नीट जपा.
मैत्री दिन शुभेच्छा चारोळ्या | maitri din shubhecha charolya
मैत्री दिन मराठी माहिती पाहिल्यानंतर या दिवसाच्या शुभेच्छा! ,शायरी व चारोळ्या याविषयी माहिती पाहूया.चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया. frindship day information in marathi shubecha,charolya
1.मैत्री स्वभाव पाहून होते,
संपत्ती पाहून नाही.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
2. जो चिडतो ,
जो भांडतो,
जो तंडतो,
तोच आपल मन जाणतो ,
तोच खरा मित्र.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
3. मैत्रीत मैत्री कळतच नाही ,
पण मित्र दूर गेल्यावर
ज्याच्याशिवाय चैन पडत नाही
ती असते मैत्री
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
4. मैत्रीत जरूरी नाही रोजच भेटावे,
पण आठवण काढली की रुडे देखील भरून यावे.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
5. मित्र माझा सखा,
मित्र माझा पाठीराखा,
मित्र माझा सारथी,
मित्र माझा सर्व काही.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
6. रूसतो तो मित्र,
रडवतो तो ही मित्र
पण दुखात जवळ घेतो तो ही मित्र
आणि संकट आल्यावर मी आहे आस म्हणतो
तो देखील मित्र
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
7. आपली सावली आपल्याला कधी सोडत नाही,
तसा मित्र आपल्या शिवाय कोठे राहू शकत नाही.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
8. बागेत फुले खूप आहेत ,
रस्त्याने काटे खूप आहेत ,
नि जगताना देखील मित्र खूप आहेत.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
9.मित्र !मित्र! मित्र !
मग काय आनंद ,
सर्वत्र सर्वत्र .
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
10. जगन्यासाठी श्वास हवा,
नि जीवन जगण्यासाठी
एक खास मित्र हवा.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
अशा पद्धतीने मैत्री दिन मराठी माहिती ,मैत्री दिन शुभेच्छा व चारोळ्या आपणास कशा वाटल्या. हे नक्की कळवा. ज्ञानयोगी या व्यासपीठावर भरभरुन प्रेम करणाऱ्या आमचे वाचक आता आमचे मित्र बनले आहेत.शिक्षण क्षेत्रातील व उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञानयोगी व्यसपीठाशी wtp जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे ,
घेणाऱ्याने एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावे.
मैत्री बद्दल किती बोलक्या ओळी आहेत.हेच बंध आपले या विविध लेखातून जुळले आहेत.लांब कशाला अकरावी प्रवेश मार्गदर्शन करताना कितीतरी विद्यार्थी मित्रांचा परिचय झाला.
चला पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
Mutual फंड काढण्याचे फायदे व तोटे