Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश विशेष फेरी एक सुधारित तारकांबाबत | akravi admission 2022 23 special round time table

 अकरावी प्रवेश विशेष फेरी एक सुधारित तारकांबाबत | akravi admission 2022 23 special round time table

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये केंद्रीय प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष फेऱ्यांना सुरुवात झालेली आहे. या विशेष फेरीतील पहिली फेरी हिच्या तारखांमध्ये गणेशोत्सवामुळे बदल झाला आहे.तो लक्षात घ्या.

अकरावी प्रवेश विशेष फेरी एक सुधारित तारकांबाबत

अकरावी प्रवेश विशेष फेरी एक सुधारित तारकांबाबत


अकरावी प्रवेश पहिली विशेष फेरी  सुधारित वेळापत्रक | special round new time table

1. 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट अर्ज करणे 

अकरावी प्रवेश 2022 23 मध्ये पहिल्या तीन फेऱ्यानंतर आता जे विशेष फेऱ्या होत आहे. त्यातील पहिल्या विशेष  फेरीमध्ये दिनांक 25 ऑगस्ट 2022 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पसंती क्रम किंवा भाग दोन भरण्यासाठी हा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भाग एक देखील भरलेला नाही ते विद्यार्थी देखील भाग एक भरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. यासाठी 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही कारणास्तव ज्यांना प्रवेशापासून प्रतिबंधित करण्यात आले होते असे विद्यार्थी देखील या विशेष फेरीमध्ये भाग घेऊ शकतात.

विशेष फेरीमध्ये हे अगोदर करा

या विशेष परीचे वैशिष्ट्य म्हणजे या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी अगोदरच्या तीनही फेऱ्यांमध्ये जे पसंती क्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरले होते ते अनलॉक केले जाणार आहेत. आणि आपण अनलॉक केलेले आपले अर्ज पुन्हा नव्याने पसंतीक्रम भरून पुन्हा लॉक करायचे आहेत. जे विद्यार्थी आपले फॉर्म पुन्हा लॉक करणार नाही म्हणजे संमती देणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही. या अगोदर तसे नव्हते या अगोदर विद्यार्थ्यांनी पसंती क्रम यात कोणताही बदल केला नाही तरी त्यांना प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात होते, परंतु आता विशेष फेरीमध्ये प्रवेश अर्ज लोक करणे आणि CONSENT देणे म्हणजेच संमती देणे अतिशय महत्त्वाचर आहे हे लक्षात घ्यावे.

2. 30 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022

अकरावी प्रवेश 2022 23 च्या पहिल्या विशेष फेरीमध्ये 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये डाटा प्रोसेसिंग व पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

3. एक ऑगस्ट 2022

एक ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, त्याचबरोबर विद्यार्थी लॉगिन मध्ये त्याला प्रवेशासाठी कोणते महाविद्यालय मिळालेले आहे ते महाविद्यालय समजेल आणि या फेरीचा कटऑफ प्रदर्शित केला जाईल.

4. 1 सप्टेंबर 2022 ते 6 सप्टेंबर 2022 महत्वाच्या तारखा  प्रवेश घेण्याच्या तारखा 

विद्यार्थ्यांसाठी या तारखा अतिशय महत्त्वाच्या ही कारण ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांनी एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

थोडक्यात काय तर ज्या  विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी सहा पर्यंत  29 ऑगस्ट पर्यन्त आपले प्रवेश अर्ज विशेष फेरीसाठी दाखल करावयाचे आहेत आणि वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यवाही करावयाचे आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील चार्ट पहा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area