अकरावी ऑनलाइन2022 प्रवेशाची तिसरी यादी उद्या होणार जाहीर|akravi online praveshachi tisari yadi honar jahir 22 august 2022
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या असून तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक भरलेले आहेत.विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या फेरीची यादी कधी लागणार? याची उत्सुकता लागली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ! तिसऱ्या फेरीची प्रवेश यादी उद्या म्हणजे सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरती लागणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी यादी उद्या होणार जाहीर |
आपण अकरावी प्रवेशाच्या वेळी ऑनलाइन अर्ज सादर करताना जो संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर दिलेला असेल, त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला लागलेल्या कॉलेजचा कोड प्राप्त होईल. तो कोड प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन आयडी ने अकरावी संकेतस्थळावरती लॉगिन करून नेमके कोणते कॉलेज लागलेले आहे. याची खातरजमा करून जर प्रवेश निश्चित झाला असेल तर पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे.
तिसऱ्या फेरीत प्रवेश करा निश्चित tisrya ferit pravesh kra nischit
सोमवारी तिसरी फेरी लागल्यानंतर जर आपण दिलेल्या पसंतीक्रमापैकी एखादे कॉलेज आपल्याला लागल्यास शक्यतो प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा, कारण यानंतर येणारी शेवटची चौथी फेरी ही या तीन फेऱ्यांपेक्षा वेगळे असणार आहे. ती कशा पद्धतीने वेगळे असणार आहे, ते आपण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की, जे विद्यार्थी कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहेत. त्यांनी तिसरी फेरी ही सुसंधी मानावी आणि आपला प्रवेश पक्का करावा.अकरावी ऑनलाइन चौथ्या प्रवेश फेरीचे वेगळेपण| akravi prvesh chauthya yadiche veglepan
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार पहिल्या तीन फेऱ्या या सर्व आरक्षणांचा विचार करून कॉलेजच्या जागांचा विचार करून लागत असतात. परंतु अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कॉलेजला जाता यावे या दृष्टिकोनातून चौथी फेरी ही तीन फेऱ्यांपेक्षा वेगळी ठेवण्यात आलेली आहे.या चौथ्या फेरीचे वेगळेपण म्हणजे, या चौथ्या फेरीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण विचारात घेतले जात नाही. तर तुम्हाला दहावीला किती टक्के गुण मिळाले आहेत, केवळ या टक्केवारीचा म्हणजे गुणवत्तेचा किंवा मेरिटचा विचार करून ही यादी लागत असते. त्यामुळे जे एखाद्या आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तिसरी फेरी अतिशय महत्त्वाची आहे.चौथ्या फेरीमध्ये कदाचित मेरिट देखील वाढण्याची शक्यता असते. कारण बरेच विद्यार्थी आपल्याला हवे त्या कॉलेजला प्रवेश मिळावे यासाठी वाट बघत असतात, म्हणून शक्यतो जे विद्यार्थी आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा असे मला वाटते.
अकरावी प्रवेश यादी मध्ये आपल्याला कोणते कॉलेज मिळाले कसे चेक करावे? | aaplyala konte college milale he kase check krave.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांकडून पसंती क्रमांक मागवले जातात. त्यांनी दिलेले पसंती क्रम मेरिट आरक्षण जागा या सर्वांचा विचार करून प्रवेशाच्या तीन याद्या लागत असतात. आता तिसऱ्या फेरीचे सांगायचे झाले तर सोमवारी यादी लागणार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणते कॉलेज मिळाले किंवा कॉलेज मिळाले की नाही ? मिळाले याबाबत मी ज्या स्टेप सांगतोय तेव्हा तुम्ही फॉलो करायचे आहेत.आपल्याला कोणते महाविद्यालय मिळाले हे पाहण्यासाठी खालील कृती करा |aallot zalele colege kashe pahave
1. संकेतस्थळावर लॉगिन | sanket sthalavr log in karne
अकरावी प्रवेशासाठी जे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे. त्या संकेतस्थळावरती लॉगिन करा आपला लॉगिन आयडिया आणि पासवर्ड व्यवस्थित टाका आणि आपण ज्या विभागातून म्हणजेच रिझन मधून फॉर्म भरलेला आहे त्यामधून आपण अकरावी संकेतस्थळामध्ये लॉगिन करायचे आहे.
2. डॅशबोर्ड वरती जाणे | dashboard var jane
अकरावी ऑनलाइन संकेतस्थळावर आपण गेल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या तीन रेषांवरती क्लिक केल्यानंतर आणि लक्षात ठेवा तीन डॉट वरती क्लिक न करता ज्या तीन आडव्या रेषा आहेत त्यावरती क्लिक करून डॅशबोर्ड वरती जायचे आहे.हा डॅश बोर्ड आपण ओपन केलेल्या वेबसाईटच्या म्हणजे त्या पेजच्या डाव्या बाजूला उभ्या दिशेमध्ये येतो.अशा पद्धतीने डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पर्याय आपल्यापुढे उपलब्ध होतील त्या पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय यावर क्लिक करायचे या संदर्भात सविस्तर डेमो म्हणजे प्रत्यक्ष फोटो इमेज तुमच्यासाठी दिलेले आहेत ते इमेज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आणि आपल्याला कोणते महाविद्यालय लागले आहे याची खातर जमा करून संबंधित कागदपत्रांची प्रिंट काढायचे आहे आणि दिलेल्या मुदतीतच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
3. अकरावी प्रवेश कोणते कॉलेज मिळाले ? हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा | check allot college third list
online admission go to third list page click
अकरावी प्रवेशाला जाताना ही कागदपत्रे सोबत न्या.
जर समजा एदा कदाचित तुमचा तिसरी यादीमध्ये देखीलj क्रमांक लागला नाही, त्यामागे कोणते कारण असेल ? हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा खालील एक वाचा आणि आपले कारण जाणून घ्या आणि चौथ्या फेरीसाठी तयार राहा.
अकरावी प्रवेश बाबतची आमची माहिती आपणास कशी कशी वाटली? हे नक्की कमेंट करा. आम्हाला सांगायला स्वाभिमान वाटतो की ,यावर्षी ज्ञानयोगी व्यासपीठाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश आम्ही निश्चित केले. जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून आमच्याशी जोडले गेले त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत. कारण का तर त्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना अतिशय विचारपूर्वक ऑप्शन फॉर्म भरणे, परंतु ज्यांना याचे गांभीर्य नव्हते ते बरेच विद्यार्थी चांगल्या गुणांची टक्केवारी असून देखील अजून प्रवेशासाठी संघर्ष करीत आहेत.सांगण्याचा हेतू हा यापुढे देखील अकरावी बारावी शैक्षणिक वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडी नोकरीच्या संधी किंवा अकरावी बारावी करत असताना त्याच्या जोडीला आपण काय काय करू शकतो? की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला चांगले शिक्षण,चांगले नोकरी मिळेल. याबाबत आम्ही काम करणार आहोत. याचा लाभ घेण्यासाठी अकरावी मार्गदर्शन या आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील व्हाट्सअप लिंक वरती क्लिक करा या व्हाट्सअप ग्रुप वरती हजार विद्यार्थी आमच्या सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत.
चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद
आमचे हे लेख जरूर वाचा