Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश विशेष फेरीला आजपासून सुरुवात| akravi pravesh vishesh ferila 25 august pasun suruvat

अकरावी प्रवेश विशेष फेरीला आजपासून सुरुवात| akravi pravesh vishesh ferila 25 august pasun suruvat

 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022 23 चौथ्या फेरीला म्हणजे विशेष फेरीला/ राऊंडला आज पासून (25 ऑगस्ट 2022)पासून सुरुवात.
अकरावी प्रवेश विशेष फेरीला आजपासून सुरुवात|
अकरावी प्रवेश विशेष फेरीला आजपासून सुरुवात


अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022-23 मध्ये आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झालेले आहेत आज म्हणजे 25 ऑगस्ट 2022 पासून विशेष फेरीला सुरुवात झालेली आहे, या फेरीला विशेष फेरी का म्हटले आहे ते थोडक्यात समजावून घेऊया.....

चौथ्या फेरीला विशेष फेरी म्हणण्याचे कारण | 4th round know special round

1. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या या अगोदरच्या तीन फेऱ्या झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जात ,खेळाडू ,माजी सैनिक, महिला आरक्षण,प्रकल्पग्रस्त  अशा वेगवेगळ्या आरक्षणाचा फायदा,लाभ घेता येत होता, मात्र या चौथ्या फेरीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसेल.हे ध्यानात घ्या.

2. या विशेष फेरीमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या उरलेल्या उर्वरित जागा आहेत त्या जागा तात्काळ भरण्यासाठी ही चौथी फेरी भर देईल.

3. या विशेष फेरीमध्ये फक्त विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये किती टक्के गुण आहेत. एवढाच विचार केला जाईल इतर कोणत्याही प्रकारचे निकष या प्रवेश प्रक्रियेला नाहीत हे या प्रवेश फेरीचे विशेष वैशिष्ट्य आहे.

4. थोडक्यात ही प्रवेश फेरी म्हणजे खुले मेरिट आहे. विद्यार्थ्यांना दहावीला पडलेले गुण एवढा एकच निकष यामध्ये असणार आहे.

चौथ्या किंवा विशेष फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी या गोष्टी अगोदर करून घ्या

1. विद्यार्थ्यांनी भरलेला पसंती क्रमांक या अगोदरच्या फेऱ्यांमध्ये पहिल्या फेरीत क्रमांक लागला नाही तरी दुसऱ्या फेरीमध्ये तो पसंती क्रमांक ग्राह्य धरला जात होता परंतु या विशेष फेरीमध्ये कसे होणार नाही.आपणास पुन्हा पसंतिक्रम भरायचा आहे.

2. विद्यार्थ्यांनी या चौथ्या फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम आपला प्रवेश अर्ज अनलॉक करून पसंती क्रमांक नव्याने टाकायचे आहेत किंवा ते update करायचे आहेत.

3. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम टाकत असताना त्या कॉलेजचे मेरीट /cut off अवश्य बघावे ,पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण असून देखील चांगले मेरिटची कॉलेज टाकली जात आहेत आणि त्यांचा प्रवेश रखडत आहे असे करू नका. त्यासाठी कॉलेजचे कट ऑफ आवर्जून बघा.आपले गुण पाहून कॉलेज नोंदवा.तर आपला प्रवेश नक्की होऊ शकेल.

4. ज्या विद्यार्थ्यांना या अगोदरच्या फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित म्हणजेच अटकाव करण्यात आला होता ,त्या विद्यार्थ्यांना देखील या फेरीमध्ये भाग घेता येणार आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी देखील आपले पसंती क्रमांक अनलॉक करून नव्याने पसंतिक्रम द्यावेत. यांनातर CONSENT म्हणजे परवानगी देणे अतिशय गरजेचे आहे देणे.अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

5. या विशेष फेरीमध्ये सहभागी होण्याआधी विद्यार्थ्यांनी आपण  जर आपण संमती देत आहोत.हा ऑप्शन क्लिक केला नाही तर त्या विद्यार्थ्यांचा या प्रवेश फेरीमध्ये विचार केला जाणार नाही.थोडक्यात  ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे
6. ही विशेष special 4th round  फेरी सर्वांसाठी खुली आहे हे देखील या फेरीचे वेगळेपण.  या फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षणाचा विचार न करता विद्यार्थ्यांची टक्केवारी एवढा एकच निकष वापरला जाणार आहे

चौथ्या /विशेष फेरीचे वेळापत्रक |speecial round time table

1. पसंती क्रम भरणे

या चौथ्या विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना 25 ऑगस्ट 2022 ते 27 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये म्हणजेच तीनच दिवसांमध्ये पसंती क्रमांक भरावयाचे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरला नसेल त्यांना देखील या कालावधीमध्ये भाग एक भरून या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येईल

2. अर्ज लॉक आणि प्रमाणित करणे

विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले पसंती क्रमांक यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल करावयाचा आहे आणि तो बदल केल्यानंतर आपला अर्ज लॉक करून प्रमाणित करून घ्यायचा आहे तरच आपला या फेरीसाठी विचार केला जाईल

3. कॉलेज निवडणे 

वरील कालावधीतच या विशेष फेरीमध्ये देखील आपल्याला अर्ज करत असताना पसंतीक्रम भरण्यासाठी किमान एक ते कमाल 10 कॉलेजेस निवडता येतील

4. सर्वात महत्त्वाचे संमती देणे

25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत आपण या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला अर्ज प्रमाणित करून पसंती क्रमांक टाकून या सर्वांसाठी संमती देणे सगळ्यात गरजेचे आहे आणि ही संमती दिल्यानंतरच तुमचा या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये विचार केला जाणार आहे.

5.उमेदवारांची गुणवत्ता यादी

विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत अर्ज केल्यानंतर 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल या गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कुठे आहे हे आपण पाहू शकता.

6.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे

ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांची यादी 30 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांनी यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच संबंधित विद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे

7. प्रत्यक्ष प्रवेश घेणे

ज्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट यादीमध्ये कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.एवढे संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवून लवकरात लवकर आपला पसंती क्रमांक पुन्हा नव्याने कट ऑफ चेक करून भरावयाचा आहे आणि त्यासाठी CONSONT संमती द्यावयाची आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

अशा पद्धतीने आज आपण अकरावी प्रवेशाची विशेष फेरी कधी सुरू होणार तिचे वेळापत्रक आणि या फेरीचे वेगळेपण त्याचबरोबर अकरावी प्रवेशाची विशेष फेरी म्हणजे स्पेशल राउंड त्याचे संपूर्ण वेळापत्रक आपल्यासमोर सादर केले आहे त्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी ही विनंती.

  जर  काही अडचण असल्यास 8286515775(प्रशांत शिपकुले सर) या माझ्या मोबाईल नंबर वरती प्रत्यक्ष फोन किंवा व्हाट्सअप मेसेज करून आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकता.
आमचा हा लेख आपणास अकरावी प्रवेशासाठी उपयुक्त वाटतो का हे आम्हाला नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद.


आमचे हे लेख वाचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area