Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे ""| akravi second roundla pravesh n milnyachi karne 2022

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे |akravi pravesh dusrya yadit college n milnyachi karne

आजच्या या अकरावी प्रवेश 2022 23 विशेष लेखांमध्ये आपण अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत कॉलेज न मिळण्याचे कारणे (akravi second roundla pravesh n milnyachi karne 2022) पाहणार आहोत. 

अकरावी प्रवेश दुसरी यादी | akravi pravesh dusri yadi 

अकरावी प्रवेश 2022 23 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. अपवाद ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका होत्या त्यांचा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भरलेल्या ऑप्शन फॉर्म मधील पहिल्या क्रमांकाचे कॉलेज लागून देखील प्रवेश घेतला नाही,त्यांना दुसऱ्या फेरीच्या वेळी ब्लॉक करून ठेवण्यात आले होते, म्हणजे त्यांना या दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश घेता आला नाही. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे आज नीट पाहूया जणेकरून akravi second roundla pravesh n milnyachi karne 2022 आपल्याला पुनः अडचणी येणार नाहीत. 

आजचा लेखा आपण ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रथम क्रमांकाचे कॉलेज घेऊन देखील प्रवेश घेतला नाही व ज्यांना दुसऱ्या यादीमध्ये देखील कोणतेच कॉलेज मिळाले नाही.यामागे जी काय प्रमुख कारणे आहेत? त्यांचा अभ्यास करून तिसऱ्या यादीमध्ये मात्र आपण आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी थोडे दक्ष बनणार आहोत. चला तर मग आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश का मिळाला नाही याची कारणे थोडक्यात पाहूया..........akravi second roundla pravesh n milnyachi karne 2022 व शोध घेऊया . 

अकरावी प्रवेश फेरी दोन मध्ये प्रवेश न मिळण्याची कारणे 

1. अकरावी प्रवेश फॉर्म लॉक न करणे | 11 vi form lock करणे 

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला फॉर्म भरत असताना भाग एक मधील माहिती आणि त्याचबरोबर भाग दोन मध्ये आपण जे पसंती क्रम टाकतो ते टाकल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला दिलेल्या पसंती क्रमामध्ये आता मला कोणत्या प्रकारचा बदल करायचा नाही. यावर संमती दर्शवायचे असते. म्हणजे तशी टिक करायची असते. फॉर्म लॉक करून त्याची प्रिंट आउट काढून ठेवायची असते. तर ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश केला होता, त्यांनी आपला फॉर्म लॉक केला होता का ? ते बघून घ्यायचे आहे.जर केला नसेल तर आठवणीने तिसऱ्या फेरीसाठी मात्र अर्ज करताना आपला फॉर्म अगोदर लॉक करून घ्यायचा आहे. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे याचा शोध आपण घेत आहोत. 
2nd लिस्ट मे कॉलेज क्यू नही मिला हिंदी मे जाणकारी पाने क्लिक करे 

2. कागदपत्रे अपलोड न करणे  | kagdpatre uplod krane 

आपल्याला 11 वी साठी ऑनलाईन प्रवेश घेण्याअगोदर आपल्याकडे असणारे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला यांच्या पीडीएफ बनवून किंवा फोटो अकरावी ऑनलाइनच्या संकेतस्थळावरती अपलोड (अधिक माहितीसाठी क्लिक ) करायचे होते. जर त्या पण अपलोड केल्या नसतील, तरी देखील आपला अर्ज हा नाकारला जाऊ शकतो. अजूनही आपण जर अकरावी प्रवेशामध्ये कागदपत्रे अपलोड केली  नसतील तर ती कागदपत्रे तात्काळ अपलोड करावी. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे यातील हे एक महत्वाचे कारण आहे. 

3. अर्जातील चुका | arjatil chuka

अनेक विद्यार्थ्यांनी आपले जे प्रवेश अर्ज भरलेले आहेत,ते भरत असताना रिझर्वेशन म्हणजेच आरक्षणासंदर्भात काही चुका केल्या असतील आणि आता प्रवेश घ्यायला गेल्यानंतर त्यामध्ये जर तफावत दिसत असेल तर मात्र प्रवेश अर्ज नाकारला जाऊ शकतो. 

4. पसंती क्रम देताना झालेल्या चुका | option form bhrtana zalelya chuka

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पसंती क्रम ऑप्शन  देत असताना आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत पडलेले गुण आणि आपण जे महाविद्यालय दिलेले आहे. त्या महाविद्यालयाचे कट ऑफ म्हणजेच अंदाजे अमुक टक्केवारी पर्यंत विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. याबाबत जर विद्यार्थ्यांनी वाटेल ते कॉलेजे टाकले असतील तरीदेखील तुम्हाला दुसऱ्या यादीमध्ये प्रवेश मिळाला नसेल. 
उदा. 
मुंबई पश्चिम विभागातील पाटकर कॉलेज हे प्रसिद्ध कॉलेज आहे. समजा आपणास दहावीला केवळ 60 टक्के गुण असतील आणि आपण जर एकच कॉलेज पसंती क्रमम्हणून दिला असेल व आपल्याला 60 च टक्के गुण असतील तर म्हणून cut of पाहून college टाका. 

5. आपल्याला पडलेले गुण आणि कॉलेज यांचे मेरिट | ssc marks and college merit

जर आपल्याला दहावीला कमी गुण असतील तर एखाद्या कॉलेजच्या जर मेरिट हाय असेल आणि अशीच कॉलेजेस आपण सिलेक्ट केले असतील तर नक्कीच आपल्याला त्या फेरीमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीच्या वेळी मात्र अशा चुका होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यायची आहे. 

वर सांगितलेल्या कारणांशिवाय असे कोणतेच कारण नाही की त्यामुळे विद्यार्थ्यांचा दुसऱ्या राउंड मध्ये प्रवेश भेटलेला नाही. तर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीच्या वेळी मात्र या सर्व कारणांचा आढावा घेऊन आपला ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरावा. कारण का तर तिसरा राउंड संपल्यानंतर चौथ्या राउंडला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळत नाही म्हणून तिसऱ्या फेरीच्या वेळी एप्लीकेशन फॉर्म भरत असताना अतिशय व्यवस्थित आणि विचारपूर्वक भरावा याबाबत एक स्वतंत्र लेख देत आहे त्यावर ती जाऊन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. 
दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला कॉलेज न मिळण्याची कारणे आपल्या लक्षात आली असतील. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील गरजेचे वाटत असेल कारण ते देखील अशाच कोणत्यातरी कारणामुळे अजून प्रवेशापासून वंचित असतील म्हणून तात्काळ त्यांना ही माहिती पाठवा ही विनंती. 

आमचा अकरावी मार्गदर्शन ग्रुप 

ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरी अगोदरच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला त्या विद्यार्थ्यांना प्रवेशांमध्ये कोणते अडचणी आल्या नाहीत, कारण का तर ऑप्शन फॉर्म भरत असताना होणाऱ्या चुका त्यांनी टाळल्या.आपल्याला देखील आपला अकरावी प्रवेश निश्चित करून त्याचबरोबर अकरावी बारावी अभ्यास याबाबत देखील नेमके काय करायचे असते. हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला अवश्य जॉईन व्हा की ज्यामध्ये नवीन नवीन माहिती आपणाला दिली जाते. 


अकरावी मार्गदर्शन ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा न तात्काळ आपण अकरावी प्रवेशाच्या ग्रुपला जॉईन व्हा! आमचा हा अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत देखील कॉलेज न मिळण्याची कारणे----------हा  लेख कसा वाटला हे नक्की कळवा. 


आमचे हे लेख जरूर वाचा 

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area