अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध| aksmat पडलेला पाऊस
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध| aksmat padlela paus marathi nibandh
पाऊस तसा दर वर्षीच येतो, कारण ते ऋतु चक्र आहे. पाऊस नाही आला तर पृथ्वीवर सजीव सृष्टी राहणार नाही. सजीवांसाठी वरदान असणार हा पाऊस त्यादिवशी त्यांच्यासाठी शाप बनेल काय असे वाटत होते. हो तो दिवश मी कधी विसरणार नाही. त्यादिवशी सकाळी सर्व काही सुरळीत चालले होते. आम्ही त्यादिवशी शाळे मध्ये होतो. त्यादिवशी भंयकर गरम होत होते. सकाळ पासून घामाच्या धारा येत होत्या असे गरम कधी झाले नव्हते, पण ही येणाऱ्या भंयकर पाऊसाची चेतावणी आहे असे कुणाला स्वप्नातपण वाटले नव्हते.
साधारण दुपारी एक वाजता आकाशात अचानक काळे कुट्ट ढग जमा झाले सगळी कडे अंधारुन आले. भरदिवसा सगळी कडे अंधार पडला. आकाशातील पक्षांचा सुध्दा गोधंळ उडाला ते पण आपल्या घरी जायला निघाले काही समजायच्या आत धो धो पाऊस पडायला सुरूवात झाली.पाऊसा बरोबर जोराचा वारा सुध्दा सुटलेला, थोडया वेळाने गारांचा टप टप आवाज येयला लागला. गारांचा आकार सुध्दा इतका मोठा होतो की जो आम्ही या आधी पाहायला नव्हता. थोडयाच वेळात सर्वीकडे पाणी साचू लागले. पाऊस आता थांबेल मग थांबेल पण तो थांबण्याचे नाव घेत नव्हता. शाळा सुटण्याची वेळ झाली तरी पाऊस थांबत नव्हता. सगळेचिंतेत होते आता घरी कसे जायचे. पण आम्हा मुलांना मजा वाटत होती गारा बरोबर येणारा पाऊस. आम्ही त्या गारांच्या पाऊसात नाचू लागलो. गारां वेचून खाउ लागलो. खूप मज्जा आली, कधी नव्हे ते आज माझ्या मैत्रीणी माझ्या बरोबर पाऊसात नाचायला होत्या.
अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी
सगळी कडे पाणी साचले शेतात मध्ये शाळेच्या आवारात. परंतु जस जशी संध्याकाळ व्हायला आली तस तसा पाऊसाचा जोर कमी झाला. आम्ही घरी जायला निघालो, जाताना आम्हाला रस्त्यावर साचलेले पाणी दिसत होते, आम्ही त्या पाण्यातून मार्ग काढत घरी जात होतो. आमचे मन त्या पाऊसाने सुखावले होते. अंगाची लाही लाही करण्याऱ्या उकाडयापासून पाऊसाने आम्हाला थंड केले होते.निसर्गाचे ते रुप पाहून आम्ही सुखवलो होतो, मनोमन ईश्वाराचे आभार मानून आम्ही घरी परतलो.
आमचा आजचा निबंध वाचल्यानंतर आपल्याला नक्कीच अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी अतिशय छानपने लिहिता येईल.