Type Here to Get Search Results !

आता महाराष्ट्रात फोनवर बोलताना हॅलो न म्हणता वंदे मातरम | ata maharashtrat phonavr hello n bolta vande mataram ne suruvat

 आता महाराष्ट्रात  फोनवर बोलताना हॅलो न म्हणता वंदे मातरम | ata maharashtrat phonavr hello n bolta vande mataram ne suruvat

आता महाराष्ट्रात  फोनवर बोलताना हॅलो न म्हणता करावी लागेल वंदे मातरम ने सुरुवात एकूण धक्का बसला काय?  पण हे खरे आहे. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया..........

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली,म्हणूनच संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये विविध कार्यक्रम होत आहेत.जसे की हर घर झेंडा,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध रॅलीज, चौक, रस्ते यावरील विद्युत रोषणाई. या सर्वांमधून एकच विचारधारा दिसत आहे, ती म्हणजे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याचा अमृत महोत्सव आम्ही अतिशय उत्साहाने साजरा करणार आहोत. 

आपण विविध पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत,त्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी केले आहे, त्यांनी आज 14 ऑगस्ट 2022 रोजी एक आदेशच काढणार असल्याचे सांगितले.त्यांच्या मते  यापुढे फोनवर बोलत असताना म्हणजे संभाषण करत असताना 'हॅलो' या शब्दाने सुरुवात न करता वंदे मातरम या शब्दाने महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी यांनी फोनवर संभाषण करावयाचे आहे. 

आपल्याला जर कोणाचा फोन आला तर हॅलो न म्हणता वंदे मातरम बोला. या पद्धतीने आपल्याला संभाषण करायचे आहे. हे अंगवळणी पडेपर्यंत लोकांना थोडा त्रास होणार आहे, परंतु कार्यालयीन कर्मचाऱ्यांना हे बोलणे बंधनकारक असल्यामुळे त्यांनी बोलत असताना जाणीवपूर्वक हॅलो न बोलता वंदे मातरम बोलावे अशा सूचना देण्यात आलेले आहेत.


वंदे मातरम या घोषणा बोलताना  मनगुंटीवार म्हणाले, " आपली देशभक्ती केवळ एक दिवस नव्हे तर एक जानेवारी ते 31 डिसेंबर अशी संपूर्ण वर्षभर टिकायला हवी. आपण ज्यावेळी गुलामीत होतो, त्यावेळी आपल्याला हॅलो या शब्दाची इंग्रजांनी देणगी दिली. आता आपण स्वतंत्र झालो आहोत, तेव्हा खुल्या दिल्याने आपल्याला आता वंदे मातरम म्हणता यायला हवे. म्हणूनच मी तर आज असा संकल्प केला आहे, यापुढे फोनवर बोलताना मी माझ्या संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करणार. आणि या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की त्यांनी देखील फोनवर बोलताना परकीय शब्द हॅलो ऐवजी वंदे मातरम ह्या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या गीताचा उद्घोष करायचा आहे.


 15 ऑगस्ट या दिवशी सर्वांनी प्रतिज्ञा करा यापुढे मी संभाषण करत असताना तोंडामध्ये हॅलो हा शब्द न घेता वंदे मातरम ने माझ्या संभाषणाची वंदे मातरम ने  सुरुवात करणार. ही हॅलो  महाराष्ट्रापासून झालेली सुरुवात संपूर्ण भारतभर पसरली जाईल, तेव्हा मी आवाहन करतो की सर्वांनी संभाषण करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम हा शब्द वापरावा' अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला संभाषण करताना हा बदल करावा ही विनंती केली आहे. थोड्या दिवसातच त्याबाबतचे परिपत्रक किंवा जीआर निघणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.

वंदे मातरम का तर 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत गायले.या वंदे मातरम गीताने भारतीयांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करण्याचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढी आंदोलने झाली ते आंदोलनामध्ये वंदे मातरम! गीत सर्वांच्याच मुखी होते वंदे मातरम मधील एकेक शब्द आपल्या अंगावर शहारे आणतात.आपल्या भारत भूमीचे त्या गीतामध्ये अतिशय सुंदर असे वर्णन आहे, असं म्हणतात की जनगणमन याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करणे अगोदर वंदे मातरम हेच आपले राष्ट्रीय गीत होते परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनगणमन या गीताचे राष्ट्रगीत म्हणून निवड करण्यात आली. 

हॅलो या शब्दाला विरोध करून वंदे मातरम हा शब्द स्वीकारण्यामागे अजून एक कारण सांगितले जात आहे, ते म्हणजे हॅलो हा इंग्रजी भाषेतील शब्द आहे.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना आपण मात्र परकीय शब्दांचा एवढा सोस बाळगायला नको ही देखील यामागे भूमिका आहे आपल्याला ज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी जाहीर केले आहे की या वरचा जीआर म्हणजे परिपत्रक लवकरच निघेल परंतु सध्या त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस अगोदर की आज पासून तुम्ही फोनवरती हॅलो न बोलता वंदे मातरम बोला अशा तोंडी  सूचना केल्या आहेत. 


या त्यांच्या निर्णयावर उलट सुलट चर्चा होत आहेत, असो परंतु आपण मात्र या उलट सुलट चर्चांच्या भानगडीमध्ये न पडता उद्या आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. म्हणूनच उद्याच्या दिवशी अगदी आनंदमय वातावरणात देशभक्तांची आठवण येत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. 

हॅलो ऐवजी वंदे मातरम का यामागील पार्श्वभूमी ज्ञान योग्य व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area