Type Here to Get Search Results !

इयत्ता अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेशाबाबत नवीन सूचना | bifocal vishyansathi navin suchana

 इयत्ता अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेशाबाबत नवीन अपडेट | bifocal vishyansathi navin suchana update

इयत्ता अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेश याबाबतची नवीन कार्यपद्धती म्हणजेच बायफोकल प्रवेशाबाबत नवीन अपडेट माहिती समोर आलेले आहे.आज जाहीर करण्यात आली.यानुसार बायफोकल विषय निवडीबाबत व प्रवेश कायम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 कार्यवाहीला सुरुवात झाली असून द्विलक्षी म्हणजेच बायफोकल अभ्यासक्रमाला प्रवेश देत असताना कोणती कार्यपद्धती अवलंबावी याबाबत काही सूचना अपडेट देण्यात आलेले आहेत.  बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नाही तर त्या अवगत करीत आहोत. 
अकरावी बायफोकल प्रवेशाबाबत नवीन माहिती अपडेट
अकरावी बायफोकल प्रवेशाबाबत नवीन माहिती





अकरावी बायफोकल बदल(toc)

इयत्ता अकरावीच्या द्विलक्षी bifocal अभ्यासक्रमाचे नियंत्रण व्यवसाय शिक्षण विभागामार्फत केले जाते द्विलक्षी विषयांचे प्रवेश व्यवसाय शिक्षण विभागाच्या धोरणानुसार होणे आवश्यक आहे त्यासाठी जी कार्यपद्धती दिलेली आहे ती कार्यपद्धती पुढीलप्रमाणे 

अकरावी प्रवेश बायफोकल साठी नवीन कार्यपद्धती | bifocal navin kary padhti 

1. प्रत्येक जिल्ह्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना अकरावी प्रवेश पोर्टलवर लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार ते एच एस व्ही सी व बायफोकल कोर्सेस hsvc and bifocal  याबाबतचे अहवाल पाहून त्यानुसार उचित कार्यवाही करतील. 

2. द्विलक्षी म्हणजेच बायफोकलला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्यांना हवे असलेले विषय ज्या महाविद्यालयांमध्ये चालवले जातात. त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा. सर्वसाधारण फेरीतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालया अंतर्गत द्विलक्षी समांतर प्रवेशांमध्ये सहभागी होता येईल.आणि संबंधित विषयासाठी ऑनलाईन पसंती देता येईल. 

3. द्विलक्षी विषय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा विषय निहाय  तपशील जिल्ह्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये दाखवला जाईल. 

4. सर्वसाधारण फेरीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्या पुढच्या प्रत्येक फेरीच्या वेळी द्विलक्षी विषय प्रवेशासाठी पात्र राहतील अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

5 ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण अधिकारी यांनी संमती  देणे आवश्यक असेल व्यवसाय शिक्षण अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतरच फेरीमध्ये म्हणजेच प्रवेशासाठी दिलेल्या वेळेतच विद्यार्थ्याला प्रवेश करता येईल. 

6. प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना विकल्प देणे या देश मान्यता देणे व विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे यासाठी दिलेल्या निश्चित वेळेमध्येच द्विलक्षी म्हणजेच बायफोकल विषय प्रवेशाची कार्यवाही करता येईल या प्रवेशाचे नवीन  नियोजन खालील प्रमाणे

7. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या पसंतीचे नियोजन | bifocal option form detail 

अ. CAP/ सी ए पी म्हणजेच केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

द्विलक्षी अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पसंती क्रम देणे त्यानंतर डाटा प्रोसेसिंग आणि शेवटी प्रवेश निश्चित केला जाईल. 

आ. बायफोकल कार्यवाही 

यामध्ये सर्वप्रथम पसंती क्रम नोंदवणे वोकेशनल एप्रिल आणि प्रवेश निश्चित करणे असे टप्पे राहतील. 

इ. कोटा प्रवेश

यामध्ये विद्यार्थ्यांना पसंती देता येईल त्यानंतर लिस्ट प्रिपरेशन ज्युनिअर कॉलेज करतील आणि त्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल. 

8. द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी देखील विषय प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण विभागाने आरक्षण लागू केले आहे त्याप्रमाणेच प्रवेश दिले जातील. 

9. बायफोकल साठी विद्यार्थ्याला जर विषय बदलायचे असतील तर तो प्रवेश रद्द करून विद्यार्थ्याला पुन्हा आपला पसंतीक्रम नोंदवावा लागेल आणि त्यानुसार प्रवेश घ्यावा लागेल. 

10. द्विलक्षी म्हणजे बायफोकल विषयाचा प्रवेश निश्चित केल्यानंतर अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्याचवेळी विद्यालय पोर्टलवर अपलोड करतील त्याचा तपशील संबंधित विद्यार्थी व व्यवसाय शिक्षणाधिकारी यांना पाहता येईल. 

11. द्विलक्षी विषयाचे प्रवेश नियमित फेरी दोन पासून सुरू करता येईल सदर प्रवेश प्रत्येक प्रवेश फेरी सोबत करावे जात व तीन नियमित केल्यानंतर करायचे याचा निर्णय तसेच एप्रिल याबाबत निर्णय संबंधित व्यवसाय शिक्षण कार्यालयाचा असेल.

अकरावी प्रवेश नवीन सूचना | akravi prvesh navin suchna  

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया याबाबत काही अतिरिक्त मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेले आहेत तर आपण अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 साठी अतिरिक्त सूचना कोणत्या आहेत ते पाहूया. 

1. प्रवेश अर्ज मागे घेणे |withdrawal of application 

ज्या विद्यार्थ्यांना अकरावा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मधून बाहेर पडण्याची असेल किंवा दुसऱ्या कोणत्यातरी कोर्सेस ला प्रवेश घ्यायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनीwithdrawal of application या बटणावरती क्लिक करून आपला प्रवेश रद्द करायचा आहे जर या बटनावरती चुकून हात पडला असेल तर un withdraw करण्याची सुविधा देखील उपसंचालक लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 

2. अनब्लॉक सीट नंबर |unblok seat number

अनलॉक सीट नंबरच्या बाबत एक सूचना देण्यात आलेली आहे, की त्यानुसार समजा एखाद्या विद्यार्थ्यांचा सीट नंबर स्टुडन्ट रजिस्ट्रेशन करत असताना यापूर्वीच कोणीतरी वापरला असेल आणि त्यामुळे जर नोंदणी होत नसेल अशा विद्यार्थ्यांनी अनब्लॉक सीट नंबर या सुविधेचा वापर करून मार्गदर्शन केंद्रामध्ये जायचे आहे आणि तो सीट नंबर अनब्लॉक केल्यानंतर त्या नंबर वर याला मूळ अर्ज रद्द होईल आणि विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरता येईल हा एक महत्त्वाचा बदल आहे. 

3. प्रोसिड टू ऍडमिशन
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील जागांच्या बाबतीमध्ये पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक करणे आवश्यक आहे मात्र एवढे करून आपला प्रवेश झाला असे नाही तर आपण संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. 

4. पसंती क्रमातील बदलाबाबत 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये विद्यार्थ्यांना नियमित फेऱ्या एक दोन तीन मध्ये जर अर्ज तसाच ठेवायचा असेल तर तोच पसंती क्रम ठेवता येईल किंवा प्रत्येक फेरीच्या वेळी पसंती क्रमामध्ये बदल करता येईल. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी यासाठी पसंतीक्रम पुलावरल्या वरती फॉर्म पुन्हा लॉक करणे मात्र बंधनकारक आहे. 

5. महाविद्यालयांसाठी सूचना

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अतिरिक्त सूचनांमध्ये महाविद्यालयाने देखील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तसेच शाळा सोडल्याचे मूळ दाखले तपासून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देण्यात आल्या असेल तर त्याबाबतही कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत. 

6. एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश कधी 

जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना दहावीची जी पुरवणी परीक्षा आहे तिच्या निकालानंतर एटीकेटी प्रवेशासाठी अर्ज करता येईल. 

अशा पद्धतीने अकरावी प्रवेश याबाबत सन्माननीय महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक यांनी अतिरिक्त सूचनांचे परिपत्रक काढलेले आहे या सूचना बारकाव्याने वाचल्यानंतर दुर्लक्ष अभ्यासक्रम तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये ज्या काही त्रुटी किंवा समस्या जाणवत होत्या त्या समस्यांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल तर विद्यार्थ्यांनी वरील सूचनांचे पालन करून आपला प्रवेशा लवकर निश्चित करायचा आहे विशेष करून बायफोकल विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत असताना कोणती खबरदारी घ्यावी तसेच विषय कशा पद्धतीने  प्रवेशित केले जातील याबाबत माहिती देण्यात आलेले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area