Type Here to Get Search Results !

दहीहंडी साहसी खेळ म्हणून मान्यताआता हे लाभ मिळतील |dahi handi sahshi khel manyta he labh miltial

 दहीहंडी साहसी खेळ म्हणून मान्यता आता हे लाभ मिळतील| |dahi handi साहसी khel aata he labh miltil

महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन विषय चर्चेला जात आहे. तो म्हणजे इतर खेळाप्रमाणे दहीहंडी सहासी खेळ म्हणून त्याला मान्यता मिळावी तर नेमके काय होईल? म्हणूनच आज आपण आजच्या लेखांमध्ये आपण दहीहंडीला साहसी खेळाची मान्यता मिळाली तर आपल्याला कोणते लाभ मिळतील याची माहिती पाहणार आहोत.

दहीहंडी साहसी खेळ म्हणून मान्यताआता हे लाभ मिळतील
दहीहंडी साहसी खेळ म्हणून मान्यताआता हे लाभ मिळतील

दहीहंडी म्हणजे काय?

दहीहंडीला ची मान्यता मिळण्याचे संकेत राज्य सरकारकडून मिळत आहेत तसा निर्णय लवकरच घेतला जाईल परंतु त्या अगोदर दहीहंडी म्हणजे काय? हे थोडक्यात आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आणि खेडेगावातील लोकांना याविषयी जास्त माहिती नाही,तर असा एक खेळ आतापर्यंत जो गोपाळकाला सणाच्या माध्यमातून खेळला जात होता. असं सांगितलं जातं की श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन असे खेळ खेळत होता. किंवा जर एखाद्याने आपली दही दूध लोणी, उंच शिंके किंवा उंचावर  ठेवले असेल तर त्या ठिकाणापर्यंत कसे पोहोचायचे ?यासाठी कृष्णा आणि त्याची सवंगडी असा गोल करून एकावर एक थर असून माठातील दही दूध मिळवत होते,तरीही काढताना अडचण आली तपरिणामी त्याला फोडत होते. आणि जे लोणी खाली पडेल त्या लोण्याच्या गोळ्यावर सगळेजण ताव मारत होते.म्हणूनच एक आपली संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून एक नवीन विषय चर्चेला जात होता या दहीहंडीला साहसी  खेळाची मान्यता द्या.

आजच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जर दहीहंडी या खेळाला साहसी  खेळाची मान्यता मिळाली तर आपल्याला नक्की कोणते फायदे मिळतील? साहजिकच भरपूर असे फायदे मिळतील त्यातील काही महत्त्वाचे फायदे आपण बघूया

दहीहंडीला साहसी  खेळाचे स्थान मिळाल्यावर होणारे फायदे

1. सरकारी नोकरीत आरक्षण |sarkari nokrit aarkshan

जोपर्यंत एखाद्या खेळाचा समावेश राज्यस्तरावरती एक खेळ प्रकार म्हणून होत नाही, तोपर्यंत सरकारी नोकरीमध्ये त्याबाबत आरक्षण दिले जात नाही. आता जर दहीहंडीला साहसी खेळ  म्हणून मान्यता मिळाली तर तर मात्र कबड्डी, खो-खो, फुटबॉल यासारख्या खेलासारखे   त्याला महत्व प्राप्त होईल. आणि असे झाल्यानंतर साहजिकच इतर खेळाप्रमाणे खेळाडूंच्या जागांमध्ये दहीहंडी खेळणारे खेळाडू यांच्यासाठी काही एक जागा राखीव राहू शकतात. साधारणपणे दहीहंडी साहसी खेळात योगदान देणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.  याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे कदाचित या एक ते दोन दिवसांमध्ये त्याविषयीचा निर्णय लागू शकतो.

2. प्रो गोविंदा स्पर्धा|pro govinda sprdha

ज्याप्रमाणे आपण आयपीएल किंवा प्रो कबड्डी पाहतो अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पथकांच्या प्रो गोविंदा स्पर्धा घेतल्या जातील .या स्पर्धेमध्ये अनेकांना आपल्या मधील होणार दाखवता येईल आणि यातूनच त्यांच्याकडे खरोखरच या खेळाबाबत सखोल माहिती आहे त्यांना मात्र प्रमाणपत्र दिले जातील.

3. प्रो गोविंदा माध्यमातून पैसा कमावण्याची संधी |pro govinda psise kmavnyachi sandhi

आज आपण आयपीएल प्रो कबड्डी प्रो खो खो यांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होत आहे.त्यांना खेळण्याची संधी मिळत आहे.अगदी त्याच पद्धतीने गोविंदा पथकात काम करणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळे स्पॉन्सर मिळतील त्यांच्यावरती बोली बोलल्या जातील आणि खरोखरच या तरुण पिढीसाठी तो अतिशय भाग्याचा दिवस असेल.

4. उत्पन्नाचे साधन |rojgar sadhan

गोरगरीब घरची मुले दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान प्रचंड वेळ खर्च करून, एक आवड म्हणून या दहीहंडीकडे पाहत असतात, मात्र यानंतर करिअर म्हणून ते बघू शकतात. इतका मोठा बदल किंवा दही हंडीला साहसी खेळाचा दर्जा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर होणार आहे. आज अनेक जण गोपाळकांच्या मुहूर्तावर याबाबत श्रीकृष्णाला साकडे घालत आहेते खरोखरच या तुझ्या आगळ्यावेगळ्या दहीहंडी खेळाला साक्षी खेळाची मान्यता मिळू दे आणि असे झाल्यानंतर खेळाडूंच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.

5. विमा कवचाचा लाभ |vima kavach

कधी कधी दुर्दैवाने हा थोडासा खेळ असल्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे जर दुर्घटना झाली तर त्या परिवाराला काय मदत केली जाईल तरी याबाबतही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे की जर असे काही अनेक घडले,तर त्या कुटुंबाला दहा लाखांचे विमा कवच खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून कितीतरी स्पर्धक म्हणजेच गोविंदा पथकामध्ये सहभागी असतात कितीतरी ठिकाणी असे अघटीत प्रकार घडतात आणि आता त्यांना एक विमा कवच असल्यामुळे गोविंदांच्या परिवारातील लोकांना देखील नाही म्हटलं तरी थोडासा त्यातून आधार वाटू शकतो.

त्याचबरोबर किरकोळ जखमी झाल्यानंतर देखील कशा पद्धतीने मदत केली जाईल याविषयीची सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे.परंतु एवढे लक्षात घ्या की यापुढे गोविंदा जखमी झाले किंवा काही दुर्घटना झाल्यानंतर ते त्यामध्ये दगावले तर त्यांचा परिवार आता वाऱ्यावर येणार नाही एवढे मात्र नक्की.

दहीहंडीला पिरॅमिड किंवा मनोरा ओळख | dahi handila navi olkah

जपान स्पेन यासारख्या देशांमध्ये किंवा ऑलिंपिक स्पर्धेत वेगवेगळ्या खेळांना साहसी खेळाचा दर्जा दिला जातो. त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची ओळख किंवा भारताची ओळख म्हणून पिरॅमिड तयार करणे किंवा मानवी मनोरा या स्वरूपात आपला साहसी खेळ जागतिक स्तरावरती प्रदर्शन करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.

अनेक वृत्तपत्रांचा हवाला घेतल्यानंतर त्यांचे वाचन केल्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच निर्णय घेतलेला आहे यापुढे दहीहंडी ची ओळख साहसी खेळ मनोरा अशी असणार आहे हे निर्णयाचे स्वागत करूया.साहसी खेळाचे लाभ त्याचा फायदा घेऊ या इतरांना देखील ही माहिती सांगूंया. आमचा हा प्रो गोविंदा किंवा नोकरीच्या आरक्षणासंदर्भात दहीहंडी हा साहसी खेळ झाल्यानंतर काय बदल होऊ शकतात. हे सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल ही माहिती इतरांना देखील पाठवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

आमचे हे लेख वाचा

गोपाळकाला सणाची सम्पूर्ण माहिती


शिवराज्याभिषेक सोहळा

 

दहावी नापास आज कलेकटर 


5 वी 8 वी स्कॉलरशिप उत्तरसूची 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area