Type Here to Get Search Results !

उकडीचे मोदक रेसिपी!|modak recipe in marathi ukdiche modak

 उकडीचे मोदक रेसिपी!ukadiche modak recipe in marathi

गणेशोत्सव गणेश चतुर्थी पर्वात आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक रेसिपी पाहणार आहोत।
घरच्या घरी बाप्पाच्या आवडीचे मोदक कसे बनवाल?किंवा बनवायचे हा प्रश्न आपणास पडला असेल तर आमचा हा लेख  वाचा अगदी छान उकडीचे मोदक बनतील अगदि मधुरा रेसेपी सारखे आज आपण madhura recipe  उकडीचे मोदक वर सगळे काही पाहतो पण अश्याच किती तरी मधुरा असतात की ज्यांच्याकडे madhura recipe पेक्षा भारी पाक कला असतील त्या व्यक्तीजवळ देखील मोदक किंवा अन्य बनवण्याच्या टिप्स असतात.म्हणून आज आपण मधुरा रेसिपी ला टक्कर देतील असे उकडीचे मोदक बनवणार आहोत.नि आपण सांगायचे आहे की मधुरा रेसिपी मोदक छान की आमचे अनुभव संपन्न माता माऊलीचे छान.
बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक रेसिपी
बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक रेसिपी


मोदक आणि गणेशोत्सव(toc)


 गणपती उत्सवात घरोघरी बनविला जाणारा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणपती बाप्पाला मोदक विशेष प्रिय आहेत. परंतु अनेक गृहिणींना हा पदार्थ जरा अवघड वाटतो. मोदक बनवण्याची कृती आणि काही महत्त्वाच्या टिप्स सहित पुढील उकडीचे मोदक ही रेसिपी दिलेली आहे.तुम्ही एकदा करून पाहाल तर हाताची बोटे चोखत रहाल. म्हणून आमची उकडीचे मोदक ही रेसिपी जरूर करून पहा. 

उकडीचे मोदक बनवण्यासाठी हे साहित्य  जमवून ठेवा


साहित्य- : दीड कप तांदळाची पिठी(पीठ) चवीप्रमाणे मीठ, साजूक तूप (गरजेनुसार), पाणी, गूळ (१ कप),खसखस (१ चमचा),ओले खोबरे (२ कप),सुकामेवा ( बदाम,काजू,मनुके वगैरे),वेलची/वेलदोडा पूड(पाव
 चमचा),केशर,दूध,जायफळ.. यात आपण उकडीचे मोदक कृती आधी उकड बनवूया यावर मोदक टेस्ट अवलंबून असणार आहे.

उकडीचे मोदक साठी उकड बनवण्याची कृती 

१)उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम दीड कप तांदळाची पिठी घ्या. पिठी तयार करण्यासाठी आंबेमोहोर किंवा इतर कोणताही सुवासिक तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. धुतलेला तांदूळ सुती कपड्यावर पांगवून ठेवा. रात्रभर तसाच ठेवून तांदूळ सुका होऊ द्या. उन्हात वाळवू नये. दुसऱ्या दिवशी दळून आणा. गिरणीत दळताना तांदळावर गहू किंवा इतर धान्य दळू नयेत कारण पिठी पांढरीशुभ्र तयार होत नाही.
आता या पिठीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. 

२)एक चमचाभर साजूक तूप आणि पाव कप दूध घाला. वरील मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. दुधामध्ये पिठी मळल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात.

३)पिठी मळताना ती खूप घट्ट किंवा सैलसर मळू नये. पोळी किंवा चपाती साठी जशी मळतो तशीच मळावी. गरज पडल्यास थोडे पाणी घालून गोळा चांगला मळून घ्या.
स्टीमर मध्ये किंवा उकड काढायच्या भांड्यामध्ये तळाशी केळीचे पान किंवा सुती कापड ठेवावे. त्यावर हा मळलेला गोळा पसरून ठेवावा. (जाड पोळीप्रमाणे). स्टीमरच्या खालच्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. एक ते दीड इंच एवढेच पाणी ठेवा. त्यावर हे मळलेले पीठ ठेवून ( मिडीयम हिटवर) मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिटे वाफ काढून घ्या. गॅस बंद करून उकड तसेच दहा मिनिटे कुकरमध्ये किंवा स्टीमर मध्ये तसेच ठेवून द्या.

उकडीचे मोदक  सारण कसे तयार करावे? ukdiche modak saran

तवा गरम करून त्यावर एक चमचा खसखस घाला. ती हलकीशी भाजून घ्या. खसखशीला थोडा सोनेरी रंग यायला लागल्यावर त्यात खवलेले ओले खोबरे घाला. हलकेसे खोबरे भाजून घ्या जेणेकरून खोबऱ्यातील पाणी किंवा आर्द्रता निघून जाईल. आता त्यात गूळ आणि सुकामेवा घाला. सर्व एकत्र परतून घ्या. हळूहळू गूळ वितळू लागेल. खूप वेळ न परतता तीन-चार मिनिटेच परता. त्यामुळे सारण खूप सुके किंवा खूप पातळ होत नाही. वेलची पूड घाला. जायफळ घालताना शक्यतो जायफळ किसून घालावे त्यामुळे त्याची चव आणि सुगंध पदार्थांमध्ये चांगला उतरतो. जायफळाची पूड वापरू नये. वरील सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून परतून घ्या.

उकडीचे मोदक कृती उकडीचे मोदक मुख्य कृती | ukdiche modak mukhya kruti

१) उकड थोडी गरम असतानाच ती पुन्हा मळून घ्या. मळताना थोडा गार पाण्याचा हात घ्या. गोळा चांगला मळून घ्या. एका बाऊलमध्ये हा गोळा मळून झाकून ठेवा.

२) छोटा गोळा घेऊन हातावर पारी करता येते. किंवा लाटूनही घेता येते. छोटासा गोळा घेऊन तो पुरीप्रमाणे लाटून घ्या. लाटल्यामुळे पारी एकसारखी होते तसेच ती जाडसर ना राहता सगळीकडून सारखी लाटली जाते.बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक रेसिपी आम्ही अगदी सोप्या भाषेत देत आहोत.

३) लाटलेली पुरी हातावर घेऊन तिला दुमडा. दुमडताना त्याच्या पाकळ्या किंवा चुण्या व्यवस्थित पाडा. या चुन्या पाडताना त्या खालपर्यंत पाडत चला त्यामुळे मोदकाला आकारही छान येतो. मोदक सुबक दिसतो.

४) सारण या पारीतील पाकळ्यांमध्ये खालपर्यंत भरून घ्या. सारण भरल्यानंतर हलक्या हाताने पाकळ्या न मोडता मोदक वळायला घ्या. मोदकाचे तोंड व्यवस्थित बंद करा.

५) तयार झालेले मोदक पुन्हा स्टीमर मध्ये ठेवा. स्टीमरपात्रात केळीच्या पानावर हे मोदक ठेवा. केळीच्या पानांचा सुवास मोदकांमध्ये नक्कीच उतरतो आणि ते आरोग्यदायी असतात.

६) मोदक ठेवल्यानंतर त्यावर केशर भिजवलेले दूध थेंबभर प्रत्येक मोदकावर घाला. केशरयुक्त दूध घातल्यामुळे केशराचा रंग आणि सुवास मोदक वाफवताना त्यामध्ये उतरतो. मोदकाला रंगही छान येतो. कृत्रिम रंग वापरण्यापेक्षा केशराचा रंग हा नैसर्गिक आणि रोगप्रतिकारक असतो.

७) दूध घातल्यानंतर  मोदक पुन्हा स्टीमर मध्ये दहा मिनिटे वाफवून घ्या. (मध्यम आचेवर)

उकडीचे मोडकाची डिश सजवताना/ सर्व्ह करताना :- 


एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये केळीचे पान ठेवा. त्यावर हे वाफवलेले मोदक ठेवा. या मोदकाचा रंग आणि टेक्चर खूप छान येते. पाकळ्या सुरेख दिसतात. केशराचा रंग आणि सुगंध यामध्ये उतरलेला असतो. पुन्हा थोडेसे केशरीयुक्त दूध मोदकावर थेंबभर घाला. चमचाभर साजूक तुपाची धार सोडा. गरमागरम मोदक खायला तयार!! गणपती बाप्पाला असा नैवेद्य नक्की करून दाखवा.

उकडीचे मोदक तयार करताना काही महत्त्वाच्या टिप्स किंवा सूचना| ukdichya modak sathi tips

१)पिठीसाठी नेहमी चांगला सुवासिक तांदूळ वापरा .बारीक दळून आणा.

२) साजूक तूप वापरल्यामुळे पिठी मऊ होते.

३) तांदळाच्या पिठीमध्ये साबुदाण्याची पिठी घातल्यास चिकटपणा राहील.

४) उकळत्या पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यास मोदक पांढरेशुभ्र होतील.

५) पिठी मध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घातल्याने मोदकाची पारी बाजूने चिरणार नाही.

६) हाताने पारी करता येत नसेल तर मोदकाचा साचा वापरता येतो.
७) मोदक करताना चुण्या किंवा पाकळ्या विषम संख्येने घ्या. म्हणजेच ३,५,७,...

८) चुण्यांतील/ पाकळ्यांतील अंतर सारखे ठेवा अन्यथा मोदकाचा आकार बिघडेल.

९) सारण भरपूर गोड करा कारण मोदकाची वरची पिठीची पारी गोड नसते
.
१०) मोदक काढल्यानंतर केळीचे पान वापरल्यामुळे मोदकांचा स्वाद व मऊपणा टिकून राहतो.

अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी आपणास कसी वाटली हे आम्हाला नक्की कळवा वर सांगितलेल्या कृतीप्रमाणे आपण मोदक केल्यानंतर ते मोदक छानच होतील अशी आम्हाला खात्री आहे मात्र एक विनंती मोदकाचा बेत छान जमल्यानंतर आम्हाला कमेंट मध्ये अशा प्रतिक्रिया द्या, कारण आपल्या कमेंट याच आमच्या लेखाची उंची वाढवत असतात
ज्ञानयोगी  व्यासपीठाच्या माध्यमातून आपण गणपती पर्वामध्ये श्री गणेशाच्या जन्माची गोष्ट पाहिली, त्यानंतर गणेश आणि कार्तिकीय यांच्यामधली शर्यत आपण पाहिली आणि आज आपण उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी पाहिली आमची माहिती आपणास कशी वाटते हे नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे हे लेख जरूर वाचा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area