Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल | online fasvnuk margdarshan varg v ahavl

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल | online fasvnuk margdarshan varg v  ahavl

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र स्वराज्य महोत्सव हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. हा उपक्रम राबवत असताना शालेय स्तरावर शिक्षण विभागामार्फत आपल्याला परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत.  त्या परिपत्रकातील एक उपक्रम म्हणजे ऑनलाइन फसवणूक या विषयी मार्गदर्शन करणे किंवा चर्चासत्राच्या आयोजन करणे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल

आजकाल आपण पाहत आहोत की सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देखील खूप वाढलेले आहेत.अनेक लोकांना ऑनलाइन फसवणूक कशी होते. हे समजत नाही.म्हणूनच अनेक जण आपल्या खात्यातील पैसे वजा होणे, ब्लॅकमेलिंग,balance 0 होणे ,धमक्या येणे यासारख्या नको त्या उपद्रव्यापामध्ये अडकत जाल.कारण एकच आहे की, लोकांमध्ये ऑनलाईन फसवणूक कशी होते ? याविषयीची माहिती नाही. म्हणूनच स्वराज्याचा किंवा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना,आपल्याला शाळेमध्ये एक चर्चासत्र आयोजित करायचे आहे. आणि त्या चर्चासत्रामध्ये हा विषय चर्चा करायचा आहे त्यासंबंधी पालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे. 

ऑनलाइन फसवणूक | online fasavnuk 

ऑनलाइन फसवणूक म्हणजे आपली फसवणूक करणारी व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या समोर नसते, ती इंटरनेट,व्हाट्सअप, फेसबुक ,इंस्टाग्राम, एसएमएस यांच्या माध्यमातून आर्थिक किंवा मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात आपली ऑनलाइन फसवणूक होऊ शकते. 

ऑनलाइन फसवणुकीची काही उदाहरणे | online fraud example 

ऑनलाइन फसवणुकीमध्ये आपल्या खात्यातील पैसे वजा होणे, आपल्याशी एकादी व्यक्ती अगोदर प्रेमात संवाद साधणे, त्यानंतर मात्र आपल्याशी मैत्रीचे नाटक करून कालांतराने आपल्याकडून नको ते कृत्य करून घेणे .आणि ते व्हायरल करण्याच्या धमक्या देणे आपल्याला ऑनलाईन लॉटरी लागली आहे याबाबतचा फोन करणे त्यासाठी अमुक रक्कम आमच्याकडे जमा करा आम्ही आपणास उर्वरित पाच लाख दहा लाख लगेच खात्यात जमा करतो परंतु त्यासाठी गव्हर्मेंट चा टॅक्स आपल्याला भरावा लागेल अशा अनेक कितीतरी क्लुप्त्या ते वापरत असतात याविषयी लोकांनी विद्यार्थी या दोघांनाही जागृत करायचे आहे

विषय ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन |  online fasvnuk margdarshan 

ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन सत्र  आपल्या शाळेमध्ये राबवत असताना शिक्षक पालक विद्यार्थी असे संयुक्तिकरित्या एखाद्या हॉलमध्ये ऑनलाईन फसवणूक मार्गदर्शन कार्यक्रम राबवायचा आहे.  फसवणुकी बाबतचे सर्व प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी उदाहरण दाखल द्यायचे आहेत. कारण आपल्याकडे येणारे पालक हे ऑनलाईन साधनाच्या वापराबाबत तितकेसे साक्षर नाहीत. याचाच फायदा ऑनलाइन दरोडेखोर घेत आहेत. ?आपली ऑनलाइन फसवणूक कशी होते याबाबतचा एक स्वतंत्र लेख  ज्ञानयोगी  व्यासपीठावर उपलब्ध आहे. तो लेख नक्कीच आपल्याला ऑनलाइन फसवणूक चर्चासत्र पालकापुढे मांडत असताना खूप मदत करेल.ऑनलाइन फसवणूक कशी होते? हा लेख वाचण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा. यात अगदी सविस्तार माहिती ऑनलाइन लूट  कशी होते?

सविस्तर लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षणांवर क्लिक करा अशी होते ऑनलाईन फसवणूक सविस्तर माहिती 


अशी होते ऑनलाईन फसवणूक | ashi hote fasvnuk 

वरील लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असेलच की, कशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक आपली होत असते.ही फसवणूक आपल्याला थांबवायचे असेल तर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून इतरांना द्यायला नको. आपला पिन ,येणारे otp कुणाला का पाठवू नयेत ते पालक वर्गाला पटवून देता येईल.  एवढे जरी पालकांना समजले तरी खूप आहे. 

ऑनलाइन फसवणूक चर्चासत्र तारीख | online fasvnuk varg karyshala 

आपल्याला आपल्या शाळेमध्ये 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आपल्या सोयीनुसार पालक, शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांसाठी अशा चर्चासत्र किंवा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करायचे आहे. वरील लेखातील माहिती वाचून आपल्या शाळेतील एकादा शिक्षक देखील चांगल्या पद्धतीने छान मार्गदर्शन करू शकतो एवढी छान माहिती आणि उदाहरणे या लेखांमध्ये मी दिलेले आहेत. जर आपणास शक्य असल्यास आपण आपल्या परिसरातील सायबर क्राईम या शाखेतील एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या शाळेमध्ये आमंत्रित केल्यास अतिशय छान मार्गदर्शन आपल्याला मिळू शकते. परंतु ते शक्य न झाल्यास एक आणीबाणीची व्यवस्था म्हणून आपल्याला याविषयी माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपली जर ऑनलाईन फसवणूक झाली तर आपण तात्काळ कुठे संपर्क साधायचा असतो याबाबत देखील आपणास माहिती दिलेली आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा स्वराज्याचा महोत्सव या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या कार्यक्रमांचा अहवाल आपल्याला संकलित करून ठेवायचा आहे. म्हणूनच आपल्यासाठी सर्व कार्यक्रमाचे नमुना अहवाल आपल्यासाठी उपलब्ध करत आहोत. याच पद्धतीने आपण आपल्या शाळेचे अहवाल तयार करू शकता.आपल्या शाळेची माहिती टाकून अधिक भर टाकून हा अहवाल आपल्या शाळेत जतन करू शकता. किंवा शासनाच्या सूचनानुसार अमृत महोत्सव या संकेतस्थळावरती सदर कार्यक्रम राबवले याची माहिती upload करायची आहे. चला तर मग पाहूया ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्गाबाबतचा अहवाल पाहूया. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्याचा महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन व अहवाल 

आमच्या शाळेत देखील काही कार्यक्रम सुरू आहेत तर काही पूर्ण झाले आहेत. आपणास अहवाल लेखन नमूना आपल्यापुढे असेल, तर आपण छान माहिती देऊ शकता म्हणून माहितीसाठी हा नमूना आहे यात आपण आपली माहिती अॅड करू शकता. हा अहवाल वाचा व शेवटी ह्या माहितीची वर्ड file आहे ती save करा.

हा एक नमुना आहे आपण आपला छान बनवावा किंवा  यात एडि ट माहि ती केली तरी जमण्यासारखेआहे.

ऑनलाइन फसवणूक कार्यशाळा अहवाल | ahval  suvarn mahotsav ahavaal   DOWNLOAD


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area