Type Here to Get Search Results !

गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे pdf | ganpati stotra marathi arth fayde

 गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे pdf | ganpati stotra marathi arth fayde 

गणेशोत्सव विशेष पर्वाध्ये आपण आज गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे व पीडीएफ,pdf अशी सर्व माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे pdf
गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे pdf

आपणास सांगण्यास आनंद होत आहे की आपण आंतरजालावर म्हणजे इंटरनेट वरती जर गणपती स्तोत्र मराठीमध्ये शोधायला गेला तर आपल्याला ते उपलब्ध होत नाही. इंटरनेट वरती जे गणपती स्तोत्र उपलब्ध आहेत ती सर्व संस्कृत भाषेतील आहेत आणि म्हणूनच आम्ही आज आपणास नारद रचित व कवी श्रीधर अनुवादित मराठी गणपती स्तोत्र उपलब्ध करून देत आहोत.या गणपती स्तोत्राबरोबर अर्थ व फायदे देखील देत आहोत. या लेखात  सर्वप्रथम आपण ganpati stotra पाहणार आहोत, त्यानंतर गणपती स्तोत्राचा अर्थ व शेवटी गणपती स्त्रोत केल्याचे फायदे पाहणार आहोत. त्याचबरोबर या सर्वांची म्हणजे गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे यांची पीडीएफ pdf आपणास मिळणार आहे. जेणेकरून आपण हे गणपती स्तोत्र दररोज घरी पठण करावे आणि त्याचे होणारे असंख्य फायदे जे मी स्वतः अनुभवले आहेत. आपण देखील त्याचा अनुभव घ्यावा हीच अपेक्षा. चला तर मग सर्वप्रथम गणपती स्त्रोत आपण मनोमन बोलूया आणि त्यानंतर त्याचा मराठी अर्थ व फायदा याकडे वळूया ....


गणपती  गणेश स्तोत्र मराठी  माहिती|ganpati ,ganesh stotra marathi  mahiti


हे मराठी गणपती स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले आहे.चला तर मग marathi ganpati stotra पाहूया........ 

 

गणपती स्तोत्र मराठी |

ganpati stotra marathi


साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |

भक्तीने स्मरता नित्य आयु : कामार्थ साधती ||१||


प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते |

तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र ते ||२||


पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव ते |

सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते ||३||


नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक |

अकरावे गणपती बारावे श्रीगजानन || ४||


देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर|

विघ्नभीती नसे त्याला,प्रभो ! तू सर्व सिद्धी||५||


विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन |

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र,मोक्षार्थ्याला मिळे गती || ६||


जपता गणपतीस्तोत्र सहा मासांत हे फळ|

एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय ||७||


नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्त्रोत हे |

श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ||८||


गणपती स्तोत्राचे पठण कधी करावे | ganpati stotra pathan kadhi krave

अशा पद्धतीने आपल्याला पद्धतीने हे गणपती स्तोत्र आपण दररोज सकाळी म्हणजे पहाटे प्रातःकाळी गणेश स्तोत्र म्हणजेच श्री गणपतीचे स्तवन असे म्हटले तरी चालेल. हे आपण दररोज नित्यनेमाने केल्यानंतर याचे आणखीनच फायदे आपल्याला होऊ शकतात म्हणून हे गणपती स्तोत्र आपण दररोज सकाळी म्हणायचे आहे. या गणेशोत्सवाचा एक संकल्प म्हणून दररोज सकाळी आपल्या दिनचर्येचा भाग म्हणून आपण गणपती स्तोत्र म्हणू शकतो चला तर मग या गणपती स्तोत्राचा मराठी अर्थ पाहूया.


गणपती स्तोत्र मराठी अर्थव फायदे| ganpati stotra marathi arth v fayde

गणपती स्त्रोत मराठी अर्थ देत असताना शब्दशः अर्थ न देता एकंदरीत या गणपती स्त्रोताचा अर्थ आपणास दिला आहे हे लक्षात घ्यावे.

या गणपती स्त्रोताच्या सुरुवातीलाच आपण गौरीचा पुत्र विनायक म्हणजेच गणेशाला वंदन केले आहे.याचाच अर्थ गणेशाला नमस्कार करून रचनाकार हे लिहीत आहेत. आणि आपल्या गणेश स्त्रोताला सुरुवात करत आहेत. म्हणजे सर्वप्रथम आपण हे गणपती स्त्रोत बोलत असताना हात जोडायचे आहेत आणि त्या गणेशाला वंदन करायचे आहे. हेच या गणपती  स्तोत्राच्या  पहिल्या चरणामध्ये सांगितले आहे, की नित्यनेमाने जर आपण गणेश स्तोत्र पठण केले तर नित्य आयु कामार्थ साधती म्हणजेच पठण करणारा  दीर्घायु बनतो एवढी मोठी शाश्वती या गणपती स्त्रोताची सांगितली आहे.

यानंतरच्या काही कडव्यांमध्ये किंवा पदांमध्ये गणपती स्त्रोतामध्ये श्री गणेशाची नावे सांगितले आहेत. कोण कोणत्या नावाने गणपतीला ओळखले जाते. हे यामध्ये वर्णन केलेले आहे. त्यामध्ये,वक्रतुंड,एकदंत,कृष्णपिंगाक्ष,गजवक्र,लंबोदर,विघ्नराजेंद्र, भालचंद्र, गणपती , गणेश अशी श्री गणेशाची बारा नावे आपल्या तोंडातून या गणपती स्त्रोताच्या माध्यमातून यावीत असा यामागील हेतू आहे. जर आपण दररोज न चुकता  गणेशाची बारा नावे आपल्या मुखातून दररोज आली  तर काय होईल? हे पुढच्या कडव्यामध्ये सांगितले आहे.

 गणपती स्तोत्राचे पठण केल्यानंतर आपल्याला नक्की काय मिळेल? म्हणजे गणेश स्तोत्र फायदे याविषयी वेगळी माहिती वाचण्याची गरज नाही. कारण या स्तोत्राच्या शेवटच्या काही पदांमध्ये किंवा चरणांमध्ये याविषयीची अगदी सविस्तर माहिती आलेली आहे.या गणेश स्त्रोतांतच असे सांगितले आहे की, जो कोणी हे गणेश स्तोत्र मनापासून गणेशाला वंदन करून पठण करेल त्याला कुठल्याही प्रकारची भीती असणार नाही.त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे आरिष्ट येणार नाही.

यापुढे जाऊन अतिशय सविस्तर अशा गणेश स्त्रोतांचे फायदे सांगितलेले आहेत. जर विद्यार्थ्यांनी हे गणपती स्तोत्र मनोभावे पठण केले किंवा बोलले तर विद्यार्थ्याला विद्या मिळेल. म्हणजेच काय तर त्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील गती ही प्रचंड वाढेल. त्याचबरोबर एखाद्या धनी म्हणजे श्रीमंत माणसाने पैशाच्या अपेक्षेने हे गणपती स्तोत्र बोलले तर त्याच्या संपत्तीमध्ये म्हणजेच धनामध्ये प्रचंड वाढ होईल.जर एखाद्या भक्ताने आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून हे गणपती स्तोत्र बोलले तर त्या भक्ताला मोक्ष मिळवून देण्याची ताकद देखील या गणपती स्तोत्र मध्ये आहे. या पलीकडे जाऊन ज्याला कोणाला आपत्य होत नसतील तर त्याला ती आपत्य देण्याचे काम देखील किंवा त्याचा संसार फुलवण्याचे काम देखील गणपती स्तोत्र करू शकते. अशी ग्वाहीच्या गणपती स्तोत्र मध्ये दिलेली आहे.यातील कोणत्याही फायद्याचे आम्ही समर्थन करत नाही ......जे स्तोत्रात आहे त्याचा भाव किंवा अर्थ आपणास सांगत आहोत. याची वाचकांनी नोंद घ्यावी.

हे गणपती स्तोत्र इतके सुरचित आहे यामध्ये वेगळे असे सांगण्याची काहीच गरज नाही. काय केल्यानंतर काय मिळेल? याचबरोबर किती दिवसांनी मिळेल? म्हणजेच गणपती स्तोत्र आपण नित्यनेमाने पठण किंवा बोलायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणजेच त्याचे फायदे कधी मिळतील? याबाबत शेवटच्या पदांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की,या गणपती स्त्रोताचे फायदे आपल्याला अवघ्या सहा महिन्यांमध्ये मिळतील. फक्त आपण इमाने इतबारे सहा महिने हे गणपती स्त्रोत म्हणण्या अतिशय गरजेचे आहे. आणि जर का हे गणपती स्तोत्र एक वर्षभर नित्यनेमाने पठण केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. एवढी ताकद या गणेश स्तोत्रा मध्ये आहे. असे असे वर्णनच या गणेश स्त्रोतामध्ये केलेले आहे.नाररदमुनी यांनी रचलेले हे गणपती स्तोत्र कवी श्रीधर यांनी संस्कृत मधून  मराठी मध्ये अनुवादित केलेले आहे.

अशा पद्धतीने गणपती स्तोत्राचा अर्थ आपल्याला समजावून घेऊन नित्य नेमाने याचे पठण करण्याचे जे आव्हान केले आहे त्याची नेमकी फलश्रुती काय आहे?हे आपण पाहू शकता. परंतु हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे.आमचा यामागील हेतू  हाच होता की, हे गणपती स्तोत्र जे इंटरनेट वरती मराठीमध्ये उपलब्ध नाही ते आपणासाठी उपलब्ध करून देणे.त्याचबरोबर गणपती स्त्रोत मराठी अर्थ व पीडीएफ आपल्याला देऊन आपण ते नित्यनेमाने मनोभावे पठण करावे हीच अपेक्षा.

मागील काही वर्षांपूर्वी एक संशोधन झाले,त्या संशोधनानुसार जर एखादा मुलगा तो तोतरा असेल तर नक्कीच त्याचा तोतरेपणा काही दिवसांमध्ये कायमचा जाऊ शकतो एवढी ताकद या गणपती स्तोत्रामध्ये आहे असा दावा त्या लेखामध्ये केला होता. असो याची सत्यता आपल्याला माहिती नाही, परंतु माझा स्वानुभव असा आहे गणपती स्तोत्र बोलल्यानंतर मनाला खूप समाधान मिळते. आणि एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता आपल्यामध्ये येते.


गणपती /गणेश  स्तोत्र मराठी  pdf |ganpati stotra marathipdf

गणपती किंवा गणेश स्तोत्र मराठी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि गणपती स्तोत्र पीडीएफ आपणाजवळ कायमसंग्रह ठेवा.


गणपती स्तोत्र मराठी pdf - DOWNLOAD 

अशा पद्धतीने आज आपण गणेशोत्सव पर्वात गणपती स्तोत्र मराठी अर्थ फायदे pdf अशी सर्व माहिती पाहिली, ही माहिती आपल्याला कशी वाटली? हे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !


आमचे हे लेख वाचा


- हरतालिका शास्त्रोक्त पूजा माहिती व pdf 



- यापुढे पुस्तकातच वहीची पाने काय आहे शालेय शिक्षण मंडळाचा विचार 














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area