राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार पगाराचा डबल धमाका! | rajya shashnachya karmcharyana pgar milnar ganeshotsva purvich
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार पगार !विश्वास बसत नाही ना ! पण हे खरे आहे तसा आदेश राज्य शासना मार्फत आजच झालाय जाहीर.अहो या आनंददायी बातमीने सर्व स्तरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक होत आहे चला तर मग सविस्तर बातमी बघूया.पगाराच्या डबल धमाक्याची.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार पगाराचा डबल धमाका |
संपूर्ण भारतात 31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांपुढे प्रश्न होता की 31 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार!तर आम्ही गणेशोत्सवाची तयारी कशी करणार?पगार तर नंतर होणार! त्याचबरोबर एक सप्टेंबर किंवा तदनंतर आलेला पगार आम्हाला गणेशोत्सवासाठी काय कामी येणार? यास्तव विविध कामगार संघटनांनी राज्य सरकार पुढे मागणी केली होती की आम्हाला गणेशोत्सवापूर्वीच म्हणजे 31 ऑगस्ट पूर्वीच ऑगस्ट महिन्याचा पगार मिळावा. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील याबाबत घोषणा केलीच होती परंतु तसे आदेश संबंधित खात्याला न मिळाल्यामुळे कार्यवाही सुरू होणार की नाही अशी थोडी चर्चा होते परंतु या चर्चेला विराम मिळालेला आहे ,कारण आजच 24 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि त्या परिपत्रकानुसार गणेशोत्सवापूर्वीच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यात यावा असे आदेश आहेत. या बातमीने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी सर्वांना गणेशोत्सव अगदी आनंदात साजरा करता येणार आहे, कारण पगार गणेशोत्सवापूर्वीच दोनत ते तीन दिवसात मिळणार आहे.खरोखरच राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांचे कौतुक .या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना देखील करण्यात आलेली आहे.
थोडक्यात काय तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पगार कधी होणार? या चर्चेला विराम मिळालेला आहे,कारण गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव सारखा सणाला आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सदर निर्णय घेण्यात आलेला आहे .सदर निर्णयाची प्रत किंवा आदेश आपल्याला पाहिजे असेल तर खाली डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि आदेश प्राप्त करून घ्या.
गणेशोत्सवापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पगार एकत्र निघण्याचा आदेश DOWNLOAD
अशाच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद!
आमचे हे लेख जरूर वाचा
गणेश जन्माची अंगावर काटा आणणारी कथा जरूर वाचा
आता या पगाराच्या आनंदात असे बनवा उकडीचे best
आमसूल/कोकम ने करा आजारांवर मात