Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय क्रीडा दिन मराठी माहिती | rashtriya krida din marathi mahiti

 राष्ट्रीय क्रीडा दिन मराठी माहिती | rashtriya krida din marathi mahiti 

29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो, आजच्या लेखांमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय क्रीडा दिन/ दिवस मराठी माहिती पाहणार आहोत.rashtriya krida din marathi mahiti  आपणास नक्की वेगळी वाटेल हे नक्की ....

राष्ट्रीय क्रीडा दिन मराठी माहिती
राष्ट्रीय क्रीडा दिन मराठी माहिती

राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती (toc)

राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट ला साजरा करण्यामागील कारण| rashtriya krida din 29 august la ka sajra hoto?

संपूर्ण भारतभर राष्ट्रीय क्रीडा दिन हा 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो यामागील कारण काय आहे? तर ज्यांना आपण भारतीय हॉकीचा जादूगार म्हणतो असे मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस 29 ऑगस्ट रोजी असल्याने त्यांची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा  दिन म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद यांचा परिचय | mejor dhyaynchand parichay 

राष्ट्रीय क्रीडा दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा होतो ते म्हणजे मेजर ध्यानचंद या दिनाचे महत्व सजण्यासाठी आपण मेजर ध्यानचंद यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहूया.

 मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना  सर्वप्रथम हॉकीची स्टिक हाती घेतली.त्यांनी अथक  मेहनत घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर ध्यानचंद दाखल झाले. त्यांची लक्षात राहील अशी कामगिरी किंवा ज्यामुळे ते चमकल्यास कामगिरी म्हणजे झेलम या ठिकाणी जो एक हॉकी सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये आपल्या भारतीय संघाला दोन गोलांनी  विजय मिळवून दिला या कामगीरी पासूनच मेजर ध्यानचंद  नाव चर्चेत राहिले. मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 1926 रोजी सुरुवात झाली. पुढे त्यांनी  भारतीय संघाचे नेतृत्व म्हणजेच कॅप्टनशिप त्यांच्याकडे होती.  हे नेतृत्व सांभाळत असताना ऑलिंपिक मध्ये तीन सुवर्णपदक मिळवण्याचा मान त्यांच्या नावावर आहे.त्यांच्याविषयी अजून सांगायचे झाले तर त्यांनी बरेचसे योगदान हॉकी खेळासाठी दिले वयाच्या  42व्या वर्षी देखील ते हॉकी अतिशय उत्कृष्टपणे खेळत होते. 1948 रोजी त्यांनी या हॉकी खेळातून निवृत्ती घेतली.rashtriya krida din marathi mahiti ही आपणाजवळ असणे अतिशय गरजेचे आहे कारण अनेकांना हा दिवस 29 ऑगस्ट का?हे माहीत नसते.

मेजर ध्यानचंद यांना मिळालेले पुरस्कार | mejor dhyaynchand yana milalele purskar 

मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या क्षेत्रामध्ये जी अमूल्य अशी कामगिरी केली म्हणूनवतर त्यांना भारतीय हॉकीचा जादूगार असे संबोधले जाते. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना 1956 साली  भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार दिला.क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे असलेले योगदान पाहून भारतीय पोस्ट खात्याने तर त्यांच्या नावाने त्यांच्या फोटोसह टपाल तिकीट सुरू केले.एवढेच नव्हे तर या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देखील वितरित केले जातात.

 भारताचे क्रीडा क्षेत्रातील योगदान | भारताचे क्रीडा kshetrati yogdan 

जागतिक ऑलिंपिक स्पर्धेचा विचार जर आपण केला तर ,भारताने स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 साली ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला.1900 मध्ये एका ॲथलेटिक ओलंपिक स्पर्धेमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. सांघिक खेळामध्ये भारताचे योगदान पाहिजे म्हटले तर भारताने ऑलिंपिक स्पर्धेसाठी आपला पहिला संघ पाठवला तो म्हणजे 1920 साली  परंतु त्यामध्ये भारताला कुठल्याही प्रकारचे यश मिळाले नाही. त्यानंतर 1928 साली भारताचा हॉकी संघ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये गेला आणि या ऑलिंपिक स्पर्धेतील  हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवले. आतापर्यंत जर आपण ऑलम्पिक स्पर्धेचा विचार केला तर जवळजवळ आठ सुवर्णपदके आपल्या भारताच्या नावावर आहेत. कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांनी एक सुवर्णपदक मिळवून भारताची मान उंचावलेली आहे.त्याचबरोबर अभिनव बिंद्रा नेमबाजीत एक सुवर्णपदक भारतासाठी मिळवून दिलेले आहे.

राष्ट्रीय क्रीडा  दिन संकल्प | rashtriya krida din sanklp 

भारत सरकार सरकार खेळाडूंसाठी विशेष मेहनत घेत आहे, जेणेकरून भारताला जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळावी पण; इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये प्रचंड लोकसंख्या असून देखील भारताला मिळणारी पदके व  योगदान म्हणजेच  भारताला मिळणारे यश तसे कमीच आहे. यासाठी शासनाने या क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे अतिशय गरजेचे आहे.चीन सारख्या  देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुवर्णपदके नेली  जातात त्या पद्धतीने भारताने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भारतामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट सारखा खेळ प्रचंड प्रसिद्धी पावला आहे, त्याच पद्धतीने इतर खेळांना देखील प्रसिद्ध मिळणे अतिशय गरजेचे आहे.  यासाठी शासनाने विशेष अशी मोहीम हाती घेतली पाहिजे. भारताला जास्तीत जास्त सुवर्णपदके कशी मिळतील ? अनेक तरुण किंवा विद्यार्थी या ऑलिम्पिक स्पर्धेकडे करिअरच्या दृष्टिकोनातून कसे पाहतील? जेव्हा खेळ जीव की प्राण होतो तेव्हाच गोल्ड मिडल किंवा सुवर्ण पदके  येत असतात हे अगदी वास्तव आहे. आणि यासाठी देशात शाळा महाविद्यालये यामध्ये वातावरण निर्मिती केली पाहिजे असे मला वाटते.

29 ऑगस्ट आज राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने ही माहिती आपणाला मराठीमध्ये मिळावी यासाठी आम्ही एक विशेष प्रयत्न केला, आपणाला ही माहिती कशी वाटली,ते आम्हाला नक्की कळवा.आमची ही माहिती इतरांना देखील पाठवा न जाणो असे कितीतरी हिरे भारतात असतील पण अशी काही सुवर्ण पदके मिळतात,आपली जगात अमुक एका खेळातून ओळख होऊ शकते कदाचित हेच त्याना माहित नसावे तरी आपण ही माहिती इतरांपर्यंत पाठवावी ही विंनंती.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह  तोपर्यंत धन्यवाद !

HAQ |राष्ट्रीय क्रीडादिन मराठी  अधिक माहिती 

1.राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो?

29 ऑगस्ट

2.राष्ट्रीय क्रीडा दिनी कोणाचा वाढदिवस असतो?

मेजर ध्यानचंद 

3.राष्ट्रीय क्रीडा दिनी कोणता पुरस्कार वितरित  केला जातो?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 


आमचे हे लेख जरूर वाचा 


गणेश जन्माची अंगावर काटा आणणारी कथा जरूर वाचा


आता या पगाराच्या आनंदात असे बनवा उकडीचे best

 मोदक


आमसूल/कोकम ने करा आजारांवर मात 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area