Type Here to Get Search Results !

बापरे ! या मुळे झाला मेटे यांचा अपघात खरे कारण आले समोर ! रोड हिप्नोसिस| road hipnosis mhnje kay?

 ! बापरे ! या मुळे झाला मेटे यांचा अपघात खरे कारण आले समोर ! रोड हिप्नोसिस

दोन दिवसांपूर्वी पुणे मुंबई महामार्गावर विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या अपघाती निधनाच्या निमित्ताने सर्वांच्या तोंडामध्ये एकच विषय आहे तो म्हणजे रोड हिप्नोसिस किंवा हायवे हिप्नोसिस म्हणजे काय ?तर याचाच वेध घेण्याचा प्रयत्न ज्ञानयोगी व्यासपीठाच्या माध्यमातून आज घेत आहोत.
रस्त्यांवरील अपघातांना  कारणीभूत ठरतोय का रोड हिप्नोसिस!
रस्त्यांवरील अपघातांना  कारणीभूत ठरतोय का रोड हिप्नोसिस! 

ज्या पद्धतीने संमोहन शास्त्राचा अभ्यासक  एखाद्याला हिप्नोटाइज करत  असतो. हे करत असताना जी व्यक्ती आपल्याला हिप्नोटाइज करते ती  जे म्हणेल ते आपण ऐकत असतो.त्या पद्धतीने सर्व कृती करत असतो मी देखील असे संमोहन  शास्त्रावरील अनेक प्रयोग पाहिले आहेत.  म्हणूनच या रोड हिप्नोटिसिस या विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

   रोड हिप्नोसिस म्हणजे असते तरी काय? हा विचार मनात घोळू लागला  चला तर मग बघूया रोड हिप्नोसिस म्हणजे काय ?ते इतके भयानक असेल तर  यापासून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे? अशी सर्वच माहिती या निमित्ताने आपण घेणार आहोत.ज्या  पद्धतीने समोहन शास्त्रामध्ये संमोहित झालेली व्यक्ती कृती करत असते पण त्या कृती का घडत आहेत ?आपण अमुक का करत आहोत हे त्या व्यक्तीला समजत नसते.पण तरीही व्यक्ती कृती मात्र करत असते. अगदी तसेच हायवे हिप्नोसिस मध्ये होते.  परंतु या ठिकाणी आपल्याला समोहित करणारा त्रस्त व्यक्ती कोणी नसतो तर आपण जो प्रवास करीत आहोत त्या प्रवासामध्ये सतत आजूबाजूला वाहने जाणे येणे किंवा सतत वाहनांची गती जास्त याचा तो परिणाम असतो . एकच क्रिया सातत्याने घडत राहणे यातून जो काही बदल होतो तो बदल म्हणजेच रोड हिप्नोसिस होय.

या प्रोसेस मध्ये काय घडते याविषयी माहिती पाहण्यासाठी संमोहना वरील एक लेख वाचला आणि त्या लेखात असे लिहिले होते की रोड संमोहन म्हणजे व्यक्ती गाडी चालवत असतो, त्याचे डोळे देखील उघडे असतात परंतु समोर घडणाऱ्या किंवा आपल्यासमोर येणाऱ्या घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण मेंदू करत नाही. मेंदूला एक वेगळीच तंद्री प्राप्त झालेली असते .तंद्री म्हणजेच हायवे किंवा रोड हिप्नोसिस होय होय.विशेष म्हणजे ही झोप नसते.तर डोळे उघडे असतात पण अचानक मेंदू निष्क्रिय बनतो समोरच्या घडामोडी यांचा तो अंदाज लावत नाही.काही काळ तो आळशी बनतो असे म्हटले तरी चालेल.

 डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गाडी चालवणारा ड्रायव्हर सर्व क्रिया करत असतो परंतु असा एक क्षण येतो की त्याचा मेंदू मात्र निष्क्रिय झालेला असतो आणि अशावेळी आपल्यासमोर जर एखादे वाहन असेल त्या वाहनावर आपण जात आहोत आदळत आहोत याचा अंदाज त्याला येत नाही.  गाडी मागून पुढच्या वाहनावरती आदळली जाते किंवा  कोठेही ठोकली जाते. यामध्ये पुढच्या वाहणाचा कोणताही दोष नसतो.

 थोडक्यात काय तर या रस्त्यावरील सततच्या वाहन चालवल्यामुळे मेंदूला काही एक आरामाची गरज असते. आणि मेंदू तो आपल्या पद्धतीने घेत असतो. रोड हिप्नॉसिस साठी आपण काय करू शकतो? सरळ साधी सोपी गोष्ट आहे.प्रवासाला निघाल्यानंतर दोन तासानंतर पाच ते दहा मिनिटे गाडी बाजूला घ्यावी,चहा पण करावे आणि नंतर आपल्या प्रवासाला लागावे.ज्या व्यक्तींना टारगेटेड गाडी चालवायची सवय आहे. म्हणजेच अमुक तासात मी या ठिकाणी पोहोचायलाच पाहिजे.  पुण्याहून निघाल्यानंतर तीन तासात मुंबई.अशी जी काय पद्धत आहे.ही बदलायला हवी प्रवास वेगात नको सुरक्षित हवा.

माझ्या मते शासनाने त्याबाबत एकेका तासाचे काही थांबे करून की ज्या ठिकाणी गाडी दोन मिनिट उभी राहील आणि नंतरच गाडी पुढच्या प्रवासाला निघेल अशी उपाययोजना करायला हवी कदाचित खूप लवकर हे झाले असते सूत्र शिवसंग्राम चे संस्थापक मराठा आरक्षणासाठी लढणारे महामेरू विनायक मेटे आज आपल्यात असते. मेटे यांच्या ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये जर हायवे  हिप्नोसिस कारणीभूत असेल तर आपण यावर विचार करायलाच हवा. त्यांचा अपघात देखील असाच एका आयशर टेम्पोला मागून त्यांच्या कार  गाडीने धडक दिली. याचा अर्थ चुकी मेटे यांच्या  ड्रायव्हरचीच असावी असे वाटते.जरा विचार केला तर एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या गाडीवरील ड्रायव्हर हा अनुभवी तर नक्कीच  असणार ! मग नेमके काय झाले यावर चर्चा म्हणून एक विषय पुढे आला की त्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर डुलकी आली असावी?परंतु सकाळची वेळ कुठल्याही प्रकारचा थकवा नाही,मग डुलकी  कशी असेल ?मग त्यातून ज्या काही गोष्टी पुढे आल्या त्या म्हणजे रोड हिप्नोसिस किंवा हायवे हिप्नोसिस होय.हायवे वरून जात असताना गाडीचा वेग हा प्रचंड असतो आजूबाजूला येणारी बोर्ड, इमारती ,झाडे  समोरून वेगात जात असतात.हायवेला 100 ते १२० या वेगाने गाडी चालव असते  आणि अशावेळी जर ती गाडी दोन तासांपेक्षा सलग चालत असेल तर मात्र विचार करण्यासारखी बाब आहे। म्हणूनच सामान्य लोकांनी प्रवासाला निघाल्यानंतर ही गोष्ट लक्षात घेऊन प्रवासादरम्यान मध्ये थांबवणे हा साधा सरळ झोपा उपाय आहे  हिप्नोसिस वरती  हा रामबाण उपाय आहे.

असं म्हणतात गोष्ट छोटी डोंगराएवढी !अशी सर्व अवस्था  आहे.मेटे यांच्या अपघाताच्या घटनेच्या  निमित्ताने  सर्वांनी संकल्प करूया आणि प्रवासाला निघाल्यानंतर किमान  एका तासाने थोडा तरी  विश्राम करूनच पुढे जाऊया.... ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी देखील चांगले आहे. हा एक आगळावेगळा लेख ज्ञानयोगी व्यासपीठावरून आपल्यासमोर मांडला तो आपल्याला कसा वाटला? हे मला नक्की कळवा धन्यवाद


  आमचे हे लेख जरूर वाचा 

- काटकसर करून करोडपती बनता येते 


- माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या


@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area