Type Here to Get Search Results !

सामाजिक शास्त्र विषय तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभ यांचा राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन करण्याबाबत | samajik shastra vishay tadnya margdarshak sulbahak rajyastariy vichar mantahn gat sthapn 2022

सामाजिक शास्त्र विषय तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक यांचा राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन करण्याबाबत |  samajik shastra vishay tadnya margdarshak sulbahak rajyastariy vichar mantahn gat sthapn 2022 | socilogy subject team scert 2022 

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी काढलेल्या 12 ऑगस्ट 2022 च्या परिपत्रकानुसार सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभ यांचा राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक शास्त्र विषयात राज्यस्तरीय विचारमंथन गटात सहभागी होण्याची संधी
सामाजिक शास्त्र विषयात राज्यस्तरीय विचारमंथन गटात सहभागी होण्याची संधी



समाजशास्त्र विचार मंथन गट माहिती(toc)

तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक यांचा गट स्थापन करण्यामागील भूमिका | gat stahpn krnyamagil bhumika

सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभ यांचा राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन करण्यात येणार आहे.हा स्थापन करण्यामागे सामाजिक शास्त्र विभागाचा हेतू हाच आहे की सामाजिक शास्त्र विषयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे. सामाजिक शास्त्र  विषयात  वेगवेगळे कार्यक्रम या सामाजिक शास्त्र या विभागामार्फत घेतले जातात. त्याचबरोबर NEP TASK अंतर्गत देखील टास्क पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम आपले जाणार आहेत.राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण 2021 NAS 2021 नुसार कमी संपादनूक असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित कृती कार्यक्रम यावर देखील या सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक यांच्यामार्फत काम केले जाणार आहे.

सामाजिक शास्त्र विचार गटात सहभाग samajik shastra vichar gatat sahbhag 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत सामाजिक शास्त्र हा विभाग समाजशास्त्र विषयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून राज्यातील अनुभवी, व्यासंगी, प्राथमिक माध्यमिक त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील अध्यापक,प्राचार्य मुख्याध्यापक अशा सर्वांचा मिळून एक अभ्यास गट स्थापन करणार आहे.या गटामध्ये जाण्यासाठी एकच अट आहे की आपल्याला समाजशास्त्र या विषयांमध्ये रुची असले पाहिजे.या विषयासाठी आपण काहीतरी करू इच्छिता हीच भूमिका यामागे आहे.

समाजशास्त्र विचारमंथन गट कार्यवाही samajshastra vichar manthan gatache kam 

समाजशास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक यांचा जो विचार मंथन गट स्थापन केला जाणार आहे. तो गट व्हाट्सअप च्या माध्यमातून स्थापन केला जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षणप्रेमींना गुगल लिंक दिली जाईल त्या लिंक वर जाऊन आपली नोंदणी या उपक्रमासाठी करता येईल.

समाजशास्त्र विचार मंथन गटात काम samajshastra mantahan gatat kam 

अनेकांना प्रश्न पडला असेल की आपण या समाजशास्त्र विचारमंथन गटात गेल्यानंतर आपल्याला कोणते काम करावे लागेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजशास्त्र या विषयाची गुणवत्ता त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अशा विषयांचा समावेश होतो.त्याचबरोबर सामाजिक शास्त्र विभागामार्फत घेतली जाणारी प्रशिक्षण वेगवेगळ्या कार्यशाळा अभ्यासक्रम प्रशिक्षण साहित्य त्याचबरोबर समाजशास्त्र विषयातील संशोधन अशा बाबीं वर अभ्यास करावा लागेल.

समाजशास्त्र विषय विचारमंथन गट स्थापन करण्याबाबतची परिपत्रक   DOWNLOAD क्लिक करा.

गुगल लिंक भरावयाची माहिती

सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचा जो राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन केला जाणार आहे त्या गटामध्ये सहभागी होण्यासाठी एक गुगल लिंक करायचे आहे त्या गुगल लिंक मध्ये खालील बाबी तयार ठेवायचे आहेत. इतर विषयांचे देखील गत तयार आहेत. 

शिक्षकाचे नाव

पदनाम

शाळेचे नाव

संपर्क क्रमांक

कर्मचाऱ्यांचा ईमेल आयडी


शैक्षणिक पात्रता


अध्यापनाचा विषय


आपण शिकवीत असलेली इयत्ता


अध्यापनाचा अनुभव


संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रात केलेले काम


समाजशास्त्र या विषयासाठी राबवलेले वेगळे उपक्रम

शैक्षणिक पुरस्कार


आणि आपण स्वेच्छेने संमती आहात का

सामाजिक शास्त्र विचार मंथन गटासाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ देऊ शकाल का?
असे सर्व प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहेत. 

समाजशास्त्र विचार मंथन गटासाठी अधिक माहिती अधिक माहिती 

विचार मंथन गटासाठी संपर्क क्रमांक

जर आपल्याला राज्यस्तरीय सामाजिक शास्त्र विचार मंथन गटामध्ये सहभागी व्हायचे असेल तर आपल्याला डॉक्टर सचिन जाधव 9623023027453, ज्योती राजपूत8888739807 या क्रमांकावर ती आपण आपल्या काही शंका असतील तर त्या विचारू शकता. 

समाजशास्त्र विषयाचा विचार मंथन गट स्थापन करावा याबाबत जे पत्र काढलेले आहे ते पत्रक नेहा बेलसरे उपसंचालक सामाजिक शास्त्र कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी 12 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले आहे सदर विचार मंथन गटाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अशा पद्धतीने आपणास जर समाजशास्त्र विषय आवडत असेल तर आपणास नव काही शिकण्यासाठी ही नामी संधी आहे. चला तर पुनः भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद ! 


आमचे हे लेख वाचायला काय हरकत आहे. 
















राष्ट्रध्वजाचा म्हणजेच तिरंग्याचा करार अपमान तर होऊ शकते ही भयंकर शिक्षा
 














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area