Type Here to Get Search Results !

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे पडेल महागात ! | sarkari karmcharyana dhamkavne padel mahagat

 सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे पडेल महागात ! 

बातमीचे शीर्षक वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असेलच की, यापुढे जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न कराल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे असे समजा.

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे पडेल महागात !
सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे पडेल महागात !

आपण जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घातला त्याला दमदाटी केली आणि  जर का त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी तुमच्या  विरुद्ध तक्रार केली तर , आता ती तुम्हाला  महागात पडणार आहे. याचाच अर्थ तुमच्या या गैरकृत्याची शिक्षा म्हणून  किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.काय आहे हा सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यानंतर शिक्षेबाबतचा कायदा? किंवा तरतूद ती आपण पाहूया.

विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपले काम करीत असताना कधी कधी कोणी दमदाटी करीत होते, तर कधी कोणी मारहाण करीत होते ,या प्रवृत्तीला अटकाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी ठोस असा कायदा असावा अशी मागणी केली होती. यासाठी गेल्या दहा वर्षांपासून हा महासंघ याबाबत  पाठपुरावा करत  होता ,त्यासाठी वारंवार आंदोलने देखील करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या मागणीला दुजोरा  देत  राज्य सरकारने एक कायदा केला आहे.

राज्य सरकारने या महासंघाच्या मागणीचा विचार करून भारतीय दंड संहिता,कलम 332 आणि 353 मध्ये त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता 309 मध्ये सुधारणा व्हावी. याबाबत विधेयक मांडले होते विधानसभेमध्ये याला मंजुरी मिळाल्यानंतर विधानपरिषदेत  देखील यास मान्यता मिळाल्यानंतर हे संपूर्ण विधेयक राष्ट्रपती महोदय यांना पाठवण्यात आले होते. त्याला राष्ट्रपती महोदयांनी देखील मंजुरी दिलेली आहे म्हणजेच काय तर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

राज्यातील कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कार्य बजावत असताना धमकावणे मारहाण करणे किंवा त्याच्यावर दबाव आणणे  अशा प्रकारे जर कोणी कृत्य करताना आढळल्यास यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्याच्या गुन्ह्या अंतर्गत संबंधित आरोपीला  पाच वर्षाचा तुरुंगवास होणार आहे. सांगण्याचे तात्पर्य असे की सरकारी कर्मचाऱ्याला धमकावणे त्याच्या कामांमध्ये आडकाटी आता यापुढे खूपच महागात पडणार आहे.

ही बातमी सर्व सामान्य नागरिकांपर्यत पोहोचवा कधी कधी या गोष्टी माहीत नसतात परंतु नंतर नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

आमचे हे लेख वाचा 

- मुंबई म्हणगरपालिकेत नर्सच्या जागा 


- उकडीचे मोदक हे करा फसणारच नाहीत 


- गणपतीचा जन्म कसा झाला पुराणातील ही कथा वाचा


-ऑनलाइन फसवणूक हा लेख वाचाल तर कोणीच करू शकणार नाही आपली फसवणूक 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area