Type Here to Get Search Results !

अमृत महोत्सव चित्रकला स्पर्धा |swatntrycaha amrut mahotsav chitrkala spardha


अमृत महोत्सव  चित्रकला स्पर्धा |swatntrycaha amrut mahotsav  chitrkala spardha

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवांतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत अनेक योजना सुरू आहेत.त्याचबरोबर अमृत महोत्सव असल्यामुळे त्या अंतर्गत स्वराज्याचा महोत्सव देखील महाराष्ट्र मध्ये साजरा केला जात आहे.या स्वराज्याच्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .तसेच शासनाकडून नियोजन देखील पाठवण्यात आलेले आहे.

नियोजनाचा एक भाग म्हणून चित्रकला  स्पर्धा देखील आपल्याला आपल्या शाळेमध्ये घ्यायचे आहेत. चित्रकला स्पर्धा घेत असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्या कारणाने चित्राचे विषय देखील तेच द्यायचे आहेत.

चित्रकला स्पर्धेचे विषय  | chitrakala vishay

आम्ही आमच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेसाठीमाझा तिरंगा माझा अभिमानLक आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य अशा अर्थाने विषय दिले होते यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनीप सहभाग घेतला विद्यार्थ्यांची चित्रे आणि कल्पकता पाहून खरोखरच या गोष्टी 10 वाक्यात करत नाही. ते चित्र काम करते 
अशी प्रचिती आम्हाला या चित्रकला स्पर्धेतून आली तर चला मग आमच्या विद्यार्थ्यांनी काढलेली छान छान चित्र जरा पाहूया की त्यामुळे आपल्याला देखील आपल्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेत असताना याचा काही एक उपयोग होऊ शकतो




अशा पद्धतीने आपल्याला विविध स्पर्धांच्या आयोजन करून स्वातंत्र्याचा अमृतत उत्सव अतिशय दुमधडाक्यात साजरा करायचा आहे.
अशा पद्धतीने चित्रकला स्पर्धा आमच्या शाळेमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वापरलेले रंग त्यांची रंगसंगती चित्रातून जाणवत आहे  या चित्रातून मिळणारा संदेश सर्वच काही अजब असे आहे .सगळीकडे  स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असल्याकारणाने संपूर्ण भारतभर जी वातावरण निर्मिती झालेली .आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होत आहे हेच या चित्रकला स्पर्धेचे वैशिष्ट्ये. या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा समूह गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मी जाता जाता एकच म्हणेन की विद्यार्थ्यांपर्यंत या योजना जाऊ द्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या. अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया होतच असते परंतु त्याच्या जोडीला इतर बाबी देखील महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण ही  आनंददायी प्रक्रिया आहे हे त्याला जरा कळू द्या. कारण मागच्या दोन वर्षांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे तो विद्यार्थी खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे .तरी या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा याच्या काही स्पर्धा अमृत महोत्सवानिमित्त साजरा केला जातील यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते.
आमच्या शाळेमध्ये झालेली अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा येथील काही टाकायचे ते आपणास कसे वाटले हे आम्हाला कळवा किंवा कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद.


आमचे हे लेख नक्की आवडतील . 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area