Type Here to Get Search Results !

उद्या हे आमदार घेतील मंत्रीपदाची शपथ ! | udya he mantri ghetil mantri padachi shapath

 उद्या हे आमदार  घेतील मंत्रीपदाची शपथ ! | udya he mantri ghetil mantri padachi shapath !

संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे लक्ष लागून असलेला विषय म्हणजे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार. फडणवीस आणि शिंदे सरकार स्थापन होऊन जवळजवळ सव्वा महिना झाला तरी देखील अजून मंत्रिमंडळात  या दोघां व्यतिरिक्त अजून कोणालाच मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्यात आलेले नाही.

उद्या हे आमदार घेतील मंत्री पदाची शपथ !
उद्या हे आमदार येथील मंत्री पदाची शपथ !

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाची शिवसेना की माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना यात नेमके काय होईल? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही ? महाराष्ट्रामध्ये पुराने थैमान घातले आहे. अशावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे ही निंदनीय बाब आहे असे शब्दात त्यांनी फडणवीस व  शिंदे सरकारवर टीका केलेली आहे.

     विश्वसनी सूत्रांच्या माहितीनुसार उद्या शिंदे -  फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे.  या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किमान बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली भेटीतून जागा वाटपाबाबत कोणता ना कोणता फॉर्मुला नक्कीच ठरला असेल! नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परत आलेले आहेत त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार होऊन काही आमदारांना मंत्रिमंडळामध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री स्वतःकडे गृहमंत्री येऊ शकतात त्याचबरोबर भाजपातील अनेक ज्येष्ठ नेते कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.  शिंदे गटात असणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना देखील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी करून घेतले जाऊ शकते यामध्ये उदय सामंत बच्चू कडू दीपक केसरकर यासारख्यांची नावे चर्चेत आहेत त्याचबरोबर फडणवीस यांच्या गटातून चंद्रकांत दादा पाटील मनगुंटीवार यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेट दर्जाची मंत्री पदे मिळू शकतात आणि त्याचा उद्या सकाळी 11 पर्यंत शपथविधी होऊ शकतो अशा सर्व चर्चा आहेत. 

     अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये  सुरू असलेला मंत्रिमंडळाचा पेच  लवकर सुटावा आणि खातेवाटप व्हावे?पण हे नेमके कधी घडणार!  या विषयाच्या सर्व या शक्यताच आहेत.परंतु जनतेचा विचार करता शिंदे फडणवीस सरकारने लवकरात लवकर निर्णयघेऊन मंत्रीमंडळ विस्तार करावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला गेल्या सहा महिन्यापासून रखडलेली कामे योजना आहेत त्या लवकरात लवकर सुरुवात कराव्यात.आम्ही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.आमच्याकडे खात्रीदायक माहिती येताच आपल्यापर्यंत ती येण्यासाठी  आमच्या ज्ञानयोगी ऑनलाइन वृत्तला follow करा. म्हणजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींची बातमी आपल्याला तात्काळ मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area