विनायक मेटे यांची संपूर्ण मराठी माहिती |vinayak mete yanchi sampurn marathi mahiti
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक मेटे होय.त्यांचे आज 14 ऑगस्ट 2022 रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झाले. या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्व पातळीवर जर लढा कोणी उभा केला असेल तर ते होते विनायक मेटे. यासाठीच त्यांनी शिवसंग्राम या पक्षाची स्थापना केली होती. विनायक मेटे यांना ज्ञानयोगी व्यासपीठाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.
विनायक मेटे माहिती (toc)
ज्ञानयोगी व्यासपीठाच्या माध्यमातून विनायक मेटे यांची संपूर्ण मराठी माहिती पाहत असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. खरोखरच विश्वासच बसत नाही! की आज विनायक मेटे आपल्यामध्ये नाहीत. मराठा आरक्षणाची बुलंद तोफ म्हणून त्यांचा गौरव केला जातो असे विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू संपूर्ण महाराष्ट्राला शोककळे मध्ये लोटणारी घटना आहे.
विनायक मेटे जीवन परिचय |vinayak mete jivan parichay
विनायक मेटे यांचा जन्म 30 जून 1970 रोजी झाला.ते अवघ्या 52 वर्षाचे होते सध्या विनायक मेटे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदभारी म्हणून कामकाज पाहत होते. आज 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
विनायक मेटे यांच्या गावाचे नाव vinayak mete gaon nav
विनायक मेटे हे राजेगाव केज या गावाचे निवासी आहेत
राजकीय कारकिर्दीसाठी सुरुवात | rajkiy karkirdis suruvat
विनायक मेटे यांची राजकीय कारकीर्द कुठून सुरू झाली? तर विनायक मेटे यांचा मुंबईची संपर्क वाढला करण ते व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आले व इथेच वास्तव्यास होते. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची मराठा महासंघ परिचय आला.
विनायक मेटे यांचे पक्ष | vinayak mete yanche paksh
विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव जर आपणास माहीत नसतील तर त्यांनी दोन पक्ष काढले त्यातील एक राष्ट्रवादीत विलीन केला तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र लोक विकास पार्टी होय. कालांतराने मराठा आरक्षण हा मुद्दा मजबूत करून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी शिवसंग्राम या पार्टीची स्थापना केली.
विनायक मेटे यांची राजकीय कारकीर्द | vinayak mete yanchi rajkiy karkird
विनायक मेटे 3 जून 2016 रोजी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले .त्यांचा जर राजकीय प्रवास आपण पाहिला तर 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सदस्य होते, परंतु काही कारणास्तव 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून बीड विधानसभा मतदारसंघातून ते आमदारकीसाठी उभे राहिले. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
विनायक मेटे अपघात यांचा कसा झाला ? vinayak mete apghat kasa zala?
विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर विनायक मेटे रविवारी सकाळी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करत असताना पुण्यावरून ते मुंबईला येत होते ,त्यावेळी त्यांच्या एसयूव्ही या कारचा अपघात झाला. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु ते इतके रक्तबंबाळ झाले होते की डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा उपचार करण्याची संधी मिळाली नाही.
विनायक मेटे हे पुण्याहून मुंबईला परतत असताना एका अज्ञात वाहनाला त्याचा गाडीने मागून धडक दिली.त्यांच्या गाडीचा पूर्ण डावा भाग निकामी झाला आहे. पुणे मुंबई मेगा हायवे वर भातान बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला.मेटे यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, विनायक मेटे यांचा अपघात कोठे झाला तर त्यांचा अपघात भातान बोगद्याजवळ झाला.
विनायक मेटे यांना अपघातात कुठे मार लागला?
विनायक मेटे यांचा कालचा अपघात अतिशय प्रचंड होता,की विनायक मेटे यांनी एका अज्ञात मानाला मागून धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला ने पायाला गंभीरज इजा झाली झाली.
विनायक मेटे कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते भरती !| vinayak mete hospital
भातान या ठिकाणी अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करतात डॉक्टर धर्मांग यांनी विनायक मेटे मृत पावल्याचे घोषित केले.
विनायक मेटे यांची राजकीय कामगिरी | vinayak mete rajkiy kamgiri
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण ,त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढवावे, मुस्लिमांना देखील आरक्षण मिळावे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये ज्या व्यक्तींनी मराठवाड्यामध्ये चांगले काम केले आहे त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार सुरू करावा अशी मागणी केली. आणि त्यांच्या मागणीनुसार मराठवाडा लोकविकास मंचातर्फे मराठवाडा भूषण पुरस्कार द्यायला सुरुवात झाली याची सर्व श्रेय विनायकराव मेटे यांना जाते.
विनायक मेटे यांच्या वरती कोणत्याही प्रकारचे उपचार करायला वेळ मिळाला नाही ही खेळाची बाब आज विनायक मेटे आपल्या मध्ये राहिलेले नाहीत परंतु त्यातून आपण एक बोध घेऊ शकतो की रस्त्याने गाडी चालवत असताना हळू चालवणे किती गरजेचे आहे.एक मंत्री असणारे किती सुरक्षित असे त्यांचे वाहन असेल तरी देखील त्या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. आज कितीतरी माणसे रस्ता अपघातात जातात या निमित्ताने एकच आव्हान करेन की गाडी चालवताना हळू चालवा.विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.