Type Here to Get Search Results !

यापुढे पाठ्यपुस्तकातच असतील वहीची पाने ! | yapudhe pathya pustkatch astil vahichi pane

Top Post Ad

 यापुढे पाठ्यपुस्तकातच असतील वहीची पाने ! |yapudhe pathya pustkatch astil vahichi pane!

 यापुढे पाठ्यपुस्तकातच असतील वहीची पाने ! ही बातमी वाचून आश्चर्य वाटले असेल ना! तर हे खरे आहे. काहीही करून मुलांच्या पाठीवर असणारे दप्तराचे ओझे कमी झालेच पाहिजे ! यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत.  याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचा शालेय  शिक्षण विभाग वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. या संकल्पनेतूनच एक विचार पुढे आला आहे, तो म्हणजे यापुढे विद्यार्थ्यांना वेगळ्या वह्या न देता त्याच्या पाठ्यपुस्तकामध्येच शेवटी व वह्यांची पाने जोडले जातील. त्या वह्यांच्या पानावरती विद्यार्थी आपला अभ्यास किंवा नोट्स काढू शकतात. चला तर मग सविस्तर बातमी पाहूया.

यापुढे पाठ्यपुस्तकातच असतील वहीची पाने !
यापुढे पाठ्यपुस्तकातच असतील वहीची पाने !

राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झालेच पाहिजे, यासाठी यापुढे पाठ्यपुस्तकाचे तीन भाग केले जाणार आहेत आणि विशेष सांगायचे झाले तर या पाठ्यपुस्तकाचा शेवटचा तिसरा भाग हा कोऱ्या पानांचा असेल म्हणजेच हा वहीचा भाग असेल.या भागावर विद्यार्थी आपला अभ्यास करू शकतील. विद्यार्थ्यांना जर अशी पाठ्यपुस्तकातच वहीची पाने मिळाली तर विद्यार्थी वेगळ्या वह्या खरेदी करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा हा नक्कीच कमी होणार आहे. याबाबत आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत विचारविनिमय व काम सुरू असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुलाच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केवळ पुस्तकाचाच विचार नव्हे तर त्याच्या दप्तरामध्ये इतर कोणती साधने असतात? तर त्या साधनांमध्ये असणाऱ्या वह्या.मग यावरती एक नामी शक्कल योजली आहे. ती म्हणजे पुस्तकांमध्ये शेवटी वहीची पाने देणे होय. यामुळे विद्यार्थ्याला वेगळ्या वया खरेदी कराव्या लागणार नाहीत एक प्रकारे विद्यार्थ्याला दप्तराच्या बोजापासून मुक्तता तर होईलच त्याचबरोबर पालकांच्या खिशाला देखील हातभार लागेल.कारण यापुढे वेगळ्या वया घेण्याची आवश्यकता नाही.

शालेय शिक्षण विभागाने अशा प्रस्तावावर काम सुरू केलेले आहे थोड्या दिवसात यावरती अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो खरोखरच शालेय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावा बाबत करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


आमचे हे लेख वाचा 


- मुंबई म्हणगरपालिकेत नर्सच्या जागा 


- उकडीचे मोदक हे करा फसणारच नाहीत 


- गणपतीचा जन्म कसा झाला पुराणातील ही कथा वाचा


-ऑनलाइन फसवणूक हा लेख वाचाल तर कोणीच करू शकणार नाही आपली फसवणूक 



Below Post Ad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area