Type Here to Get Search Results !

14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध भाषण | 14 sepetember hindi diwas mahiti nibandh bhashan

 14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध भाषण| 14 sepetember hindi diwas mahiti nibandh bhashan


संपूर्ण भारतभर 14 सप्टेंबर हा दिवस ' हिंदी दिवस ' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण आज 14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध भाषण म्हणजेच 14 sepetember hindi diwas mahiti nibandh bhashan पाहणार आहोत व हिंदी दिन जोरदार साजरा करणार आहोत.
14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध भाषण

      14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध भाषण



हिंदी दिवस माहिती (toc)

हिंदी दिवस माहिती | hindi diwas mahiti

प्रत्येक राष्ट्रासाठी किंवा देशासाठी भाषा ही अतिशय महत्त्वाची असते. कारण भाषेमुळे तो विशिष्ट समूह किंवा समाज ओळखला जातो. प्रत्येक देशाला किंवा त्या त्या समूहाला आपल्या भाषेचा अतिशय अभिमान असतो.म्हणजेच भाषा एक प्रकारे राष्ट्रीय अस्मितेचे देखील कारण ठरते. आपल्या भारत देशाचा विचार जर केला तर भारतासारख्या विशाल खंडप्राय देशांमध्ये भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले दिसते. भारतामध्ये खूप विविधता आहे. वेगवेगळे जाती ,धर्म,प्रांत, तेथील भाषा अशा अनेक बाबतीमध्ये विविधता दिसते. अशा विशाल आणि  विविधता असलेल्या भूप्रदेशामध्ये भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावते. वेगवेगळ्या जाती ,धर्म असले किंवा त्यांच्या वेगवेगळ्या भाषा असल्या तरी त्यांच्यामध्ये समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता असेल तर तो देश एक राहतो, त्याचा विकासही होतो. आपल्या भारत देशामध्ये सर्व भारतीय भाषांना जोडण्याचा दुवा तो म्हणजे ' हिंदी '  भाषेचा. सर्व भारतीय भाषांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका हिंदी भाषा पार पडताना दिसते.म्हणूनच तिचा गौरव म्हणून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा(पहिला क्रमांक) हिंदी आहे. भारताच्या उत्तरेकडील बहुतांश घटकराज्यांमध्ये (states) हिंदी भाषा ही बोलली जाते. तेथील अनेक राज्यांमध्ये( १० घटकराज्ये) तिला 'प्रादेशिक राजभाषे'चा देखील दर्जा मिळालेला आहे. सध्या भारतामध्ये केंद्रीय भाषा किंवा संघराज्य व्यवहाराची भाषा(घटनेतील कलम ३४३ नुसार) म्हणून इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा उपयोग केला जातो.

हिंदी भाषा इतिहास | hindi bhasha itihas

हिंदी भाषा देखील फार प्राचीन असलेली दिसते.भारतात ज्या  आधुनिक भारतीय भाषा आहेत,(गुजराती,मराठी,बंगाली इ.) त्यांपैकी एक हिंदी भाषा ही देखील आहे. हिंदी भाषेची लिपी ' देवनागरी ' आहे. हिंदी बरोबरच गुजराती ,मराठी ,संस्कृत यासारख्या काही भारतीय भाषांची लिपी देखील देवनागरीच आहे.

हिंदी भाषेला केंद्रीय भाषेचा दर्जा | hindi bhasha kendriy bhasha darja

अशाप्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये हिंदी भाषेला केंद्रीय भाषेचा दर्जा दिल्यामुळे ती मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहारात वापरली जाते. हिंदी भाषा ही जनसामान्यांची भाषा झाली आहे. भिन्न भाषिक व्यक्ती एकमेकांशी संवाद साधताना हिंदी भाषेचा माध्यम म्हणून वापर करतात. दैनंदिन व्यवहारामध्ये प्रांतीय किंवा स्थानिक भाषेबरोबरच हिंदी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. भारत देशामध्ये या प्रांतीय भाषांबरोबरच हिंदी भाषेतील अनेक वृत्तपत्रे (News papers) प्रसिद्ध होतात. देशाची एकात्मता आणि बंधुत्व मजबूत करण्याचे कार्य आपली हिंदी भाषा करत आहे. हिंदी भाषेचा वावर अनेक क्षेत्रांमध्ये दिसतो. ती प्रशासकीय कामकाजाबरोबरच साहित्य ,व्यापार ,बँकिंग,विज्ञान,गणित,मनोरंजन,संगीत अशा सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर दिसते.भारतातील हिंदी चित्रपट(बॉलिवूड) आणि त्यातील संगीत जगभर प्रसिद्ध आहे.

14 सप्टेंबर हिंदी दिवस  निबंध|14 sepetember hindi diwas nibandh

हिंदी दिवस निबंध लिहीत असताना आपल्याला हिंदी भाषेविषयी सविस्तर माहिती द्यावी लागेल चला तर मग 14 सप्टेंबर हिंदी दिवस निबंध अतिशय छानपणे लिहूया त्याचा एक नमुना

भारत देशात सर्वत्र समानता हे तत्त्व दिसते.त्यामुळे विविधतेने समृद्ध असलेल्या आपल्या देशात सर्वच भाषांना समान मानाचे स्थान दिलेले आहे.त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.भारतीय राज्यघटनेनुसार २२ भारतीय भाषा या अधिकृत भाषा आहेत.
१४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाने हिंदी भाषेला संघराज्याच्या राजभाषेचा दर्जा देऊन एक ऐतिहासिक निर्णय दिला.या गौरवाचे प्रतीक म्हणून दरवर्षी आपण १४ सप्टेंबर हा दिवस ' हिंदी दिन ' म्हणून साजरा करतो.

हिंदी साहित्य किंवा हिंदी वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. अमीर खुस्रो, कबीर, जायसी, तुलसी, सूर मीरा,रहीम, दिनकर, मोहन राकेश, महादेवी, प्रेमचंद, यशपाल असे अनेक थोर लेखक -  कवी हिंदी भाषेमध्ये उत्तम वाङ्मयनिर्मिती करताना दिसतात. या साहित्यामुळे हिंदी भाषेबरोबरच भारतीय संस्कृतीची ओळख पूर्ण जगाला झालेली आहे. तसेच,जगातील इतर भाषेतील साहित्य हिंदी भाषेद्वारा अनुवादित केले जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी देखील आहे हिंदी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखले होते. विल्यम कॅरी या भाषाभ्यासकाने असे म्हटले होते की, " हिंदी ही केवळ एका प्रांतापुरतीच मर्यादित भाषा नाही तर ती संपूर्ण भारतभर तिचा प्रसार आहे." 
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदी भाषेने अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले होते. कारण आपल्या देशामध्ये त्या काळात जनसामान्यांची जागृती करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्रातून या भाषेचा उपयोग केला जात होता. ब्रिटिशांच्या इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर केल्यामुळे देशात एक प्रकारे राष्ट्रप्रेमाचे वारे वाहू लागले. राजाराम मोहनरॉय, केशव चंद्रसेन, स्वामी दयानंद सरस्वती, बंकिमचंद्र चटर्जी, सुभाषचंद्र बोस, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. भांडारकर, काका कालेलकर, गोपाळ गोखले,श्री. राजगोपालाचारी, सी.पी.रामस्वामी अय्यर इत्यादी देशभक्तांनी हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते.
हिंदी भाषेमुळे भारतातील वेगवेगळी राज्ये ही सामाजिक -  सांस्कृतिक स्तरावर एकमेकांशी जोडलेली दिसतात. देशाची अखंडता आणि बंधुता यासाठी भाषिक स्तरावर होणारे हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ' हिंदी अकॅडमी' आहेत. यासारख्या संस्था हिंदीच्या प्रसाराला मदत करत आहेत. दक्षिण भारतात ' दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, चेन्नई' ही संस्था हिंदीच्या प्रसाराचे कार्य करत आहे. महाराष्ट्रात ' महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे व मुंबई हिंदी विद्यापीठ' यासारख्या अनेक संस्था हिंदीच्या प्रसारासाठी कार्यरत असल्याचे दिसून येते.
हिंदी साहित्य संमेलनांनी हिंदी भाषा भारतात आणि भारताबाहेर पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले दिसते. आतापर्यंत नऊ विश्व हिंदी साहित्य संमेलने झालेली आहेत. हिंदी संमेलन हे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सप्टेंबर २०१२ मध्ये आयोजित केले होते. आपले हिंदी भाषा ही आता संपूर्ण विश्वातील अनेक समृद्ध भाषांपैकी एक आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे.
अशा पद्धतीने आपण हिंदी दिवस माहिती आणि निबंध लिहू शकता.आता आपण एका नवीन विषयाकडे बोलतोय ते म्हणजे हिंदी दिवस भाषण चला तर मग त्याला सुरुवात करूया.

हिंदी दिवस भाषण | hindi diwas bhashan

हिंदी दिवस माहिती आणि महत्व पाहिल्यानंतर आपल्याला या हिंदी दिवसा वरती जर छान असे हिंदी दिवस भाषण द्यायचे असेल तर ते देखील आपण वरील माहितीच्या आधारे देऊ शकता. चला तर मग हिंदी दिवस भाषण एक नमुना पाहूया.

हिंदी दिवस भाषण नमुना | hindi diwas bhashan namuna

अध्यक्ष ! ,महाशय! आणि इथे उपस्थित माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज 14 सप्टेंबर हिंदी भाषा दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो आणि म्हणूनच मी आज आपणास हिंदी दिवस याविषयी माझे विचार भाषण रूपाने आपणापुढे सादर करीत आहे तरी माझे हे हिंदी दिवस भाषण आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती मी जे आपणास hindi day speech in marathi देत आहे यातून नक्कीच आपल्याला  हिंदी दिनाची माहिती आणि महत्व समजेल.
आपल्याला माहितीच आहे भाषा कोणतीही असो भाषा ही अतिशय जीवनामध्ये महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपण त्रिभाषा सूत्राचा अवलंब आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये केलेला आहे महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाले तर आपण मराठी ही प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा म्हणून हिंदी आणि काही पायाभूत ज्ञान म्हणून तृतीय भाषा म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केलेला आहे यातीलच सर्वात महत्त्वाची भाषा म्हणजे हिंदी कारण या भाषेत आपण राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलेले आहे.

हिंदी हमारी जान है ।
हिंदी हमारा स्वाभिमान है।

आज आपण जर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलो तर आपल्याला इंग्रजी शिवाय पर्याय नसतो अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारत देखील बहुभाषिक असा देश आहे म्हणून आपण जर आपले राज्य सोडून गेलो आणि इतर राज्यातील लोकांशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर इंग्रजी ही परकीय भाषा असल्यामुळे प्रत्येकाला ती येईलच असे नाही त्यावेळी आपल्याला मुख्य आधार किंवा संभाषणाची भाषा म्हणून जी भाषा कामाला येते ती भाषा म्हणजे हिंदी भाषा होय म्हणूनच हिंदी भाषेला भारतामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
हिंदी दिनाच्या निमित्ताने मी आपणास एकच आव्हान करतो की आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतोच परंतु आज आपण हिंदी दिनाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभाषा म्हणून आपण गर्वाने ते हिंदी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. हिंदी आपली राष्ट्रभाषा असून देखील आपल्या भारतातील काही राज्य अजून देखील तिला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देत नाहीत किंवा तसे मानत नाहीत परंतु हे चुकीचे आहे आज आपण चीन जपान सारखे देश पाहिले तर ते देश आपल्या भाषेचा किती उदो उदो करतात आणि त्याविषयी प्रेम दाखवतात अगदी त्याच पद्धतीने आपण देखील एक राष्ट्रभाषा म्हणून संपूर्ण राष्ट्राला समजते अशी भाषा म्हणून हिंदी भाषेचा स्वीकार केला पाहिजे.
हिंदी दिनाच्या निमित्ताने मला जी भाषण करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद जय हिंद !जय महाराष्ट्र!

अशा पद्धतीने आज आपण 14 सप्टेंबर हिंदी दिवस माहिती निबंध आणि भाषण अशी एकत्रित माहिती पाहिली ही माहिती आपणाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे हे लेख वाचा


जागतिक साक्षरता दिन माहिती व निबंध


शेतकऱ्याच्या शेतमालाला  भाव मिळवून देणारी कंपनी यवतमाळ - फोर्ब्स ने दिले पहिल्या 100 मध्ये स्थान


योगा व योगाचे प्रकार


- शिक्षक दिन बातमी लेखन 


-  सॅलरी खाते असण्याचे फायदे 


- गणेश स्थापना विधी ,उत्तरपूजा व विसर्जन


- सरकारी कर्मचाऱ्यास धमकावले तर .....ही शिक्षा होणार


- शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती




          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area