राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 | rashtriy nvopkram purskar prastav 2022
आजच्या लेखात आपण NIEPA नवी दिल्ली शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 पाठवण्याबाबत सूचना/परिपत्रक आलेले आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत.
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 |
नवोपक्रम पुरस्कार (toc)
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव |rashtriy nvopkram purskar prastav
दरवर्षी निप्पा नवी दिल्ली यांच्यामार्फत नॅशनल अवॉर्ड फॉर इनोवेशन इन एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी देशभरातून जिल्हा व तालुकास्तरीय शैक्षणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असतील त्याबाबत प्रस्ताव मागवले जातात. त्यातील उत्कृष्ट ठरलेल्या नवोपक्रमास राष्ट्रीय स्तरावरून पुरस्कार दिला जातो ,तो म्हणजे राष्ट्रीय उपक्रम पुरस्कार होय. यासाठीच म्हणजे राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत 2 सप्टेंबर रोजी परिपत्रक निघालेले आहे.
नवोपक्रमाची क्षेत्रे | nvopkram kshetre
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कारासाठी नवोपक्रमची काही क्षेत्रीय सांगितले आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे.
1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विचार आणि शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम.
2. पारदर्शक उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित प्रशासन सुनिश्चित करणे.
3. प्रशासनाच्या सुलभतेसाठी प्रोत्साहन देणे.
4. शाळांचे प्रभावी आणि नाविन्यपूर्ण रीतीने पर्यवेक्षण आणि देखरेख याबाबत उपक्रम.
5. शाळा व्यवस्थापनात समुदायाचा यशस्वी सहभाग.
6. चांगल्या शाळा व्यवस्थापनासाठी आणि शाळेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक त्याचबरोबर एनजीओ यांच्यासोबत समन्वय आणि शाळेची गुणवत्ता वाढ.
7. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित समाजातील विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणामध्ये समानतेला प्रोत्साहन देणे.
8. शिक्षणासाठी परिणाम आधारित दृष्टिकोनाच्या अंतर्गत प्रवेश आणि सहभाग आणि शिकवण्याच्या परिणामात सुधारणा करणे.
9. शिक्षकांचा विकास नियमितता वक्तशीरपणा त्याचबरोबर शिक्षकांचा व्यावसायिक विकास शिक्षक प्रेरणा या संदर्भात शिक्षकांचे व्यवस्थापन या क्षेत्रातील उपक्रम राबवणे.
10. मध्यान भोजन आणि इतर प्रोत्सांवर योजनांचे प्रभावी वितरण व व्यवस्थापन.
11. दुर्गम भागातील शाळांचे योग्य व्यवस्थापन.
12. सरकारी शाळा प्रति लोकांचा विश्वास वाढवणे.
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव पाठवत असताना वरील क्षेत्रे विचारात घेऊन आपले प्रस्ताव तात्काळ पाठवावेत.त्याचबरोबर आपल्या प्रस्तावांमध्ये उपक्रमांची सविस्तर माहिती असावी.
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 मुदत | rashtriy nvopkran purskar prastav 2022 mudat
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची मुदत ही 15 सप्टेंबर 2022 आहे. म्हणूनच तत्पूर्वी आपले सर्व प्रस्ताव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडे 10 सप्टेंबर 2022 पूर्वी पाठवावेत.जेणेकरून 15 सप्टेंबर 2022 पर्यंत ते राष्ट्रीय स्तरावरती पुढे योग्य वेळेत पाठवता येतील.
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 20220पाठवण्याची पद्धत |nvopkram prstav pathvnyachi padhti
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 पाठवण्यासाठी विहीत अशी पद्धती जाहीर करण्यात आलेली आहे परिपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार 10 सप्टेंबर 2022 पर्यंत नव क्रम प्रस्तावाची हार्ट कॉपी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांना सादर करावी त्याचबरोबर सॉफ्ट कॉपी संशोधन विभागाच्या ईमेल आयडी वर पाठवावी असे आवाहन विकास गरड प्राचार्य समन्वयक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून केलेले आहे.
नवोपक्रम पुरस्कार सविस्तर परिपत्रक
राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्रस्ताव 2022 परिपत्रक pdf | rashtriy nvopkram purskar prastav 2022 priptrak pdf
तरी राष्ट्रीय नवोक्रम हा प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार असून त्यासाठी प्रस्ताव मागवले जात आहे तरी संबंधित अधिकारी वर्गांनी लवकरात लवकर आपले प्रस्ताव सादर करून या पुरस्काराचा लाभ उठवावा ही विनंती पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळवून देणारी कंपनी यवतमाळ - फोर्ब्स ने दिले पहिल्या 100 मध्ये स्थान
- गणेश स्थापना विधी ,उत्तरपूजा व विसर्जन
- सरकारी कर्मचाऱ्यास धमकावले तर .....ही शिक्षा0 होणार
- शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती