Type Here to Get Search Results !

ग्रामहित कंपनी मराठी माहिती | gramhit company marathi mahiti

 ग्रामहित कंपनी मराठी माहिती | gramhit company marathi mahiti

आजच्या लेखात आपण जागतिक पातळीवर ज्या कंपनीचे नाव घेतले जात आहे ती कंपनी म्हणजे ग्रामहीत कंपनी याच कंपनीची मराठी माहिती आपण पाहणार आहोत.

ग्रामहित कंपनी मराठी माहिती
ग्रामहित कंपनी मराठी माहिती

ग्रामहित माहिती(toc)

ग्रामहीत कंपनीचे संस्थापक | gramhit sansthapak ,malak

GRAMHIT या कंपनीची स्थापना पंकज महल्ले आणि त्यांची पत्नी श्वेता महल्ले यांनी केले आहे.

GRAMHIT कंपनी कोठे आहे? gramhait compony location thikan

बहुचर्चित अशी ग्रामहीत कंपनी कोठे आहे ?याचे उत्तर आपणाला हवे असेल तर ही कंपनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी  या गावी आहे.

GRAMHIT कंपनी स्थापन करण्यामागील हेतू | gramhit sthapna hetu

कंपनीचे संस्थापक पंकज महल्ले यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ग्रामहीतही कंपनी खेडेगावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचे देखील जीवनमान व राहणीमान उंच व्हावे आणि अगदी एखाद्या नोकरदारासारखे त्याचे जीवन व्हावे याच उद्देशाने स्थापन केलेली ग्रामहीतही कंपनी आहे.

GRAMHIT कंपनीचा लाभ किती जणांना मिळाला| gramhit cha labh kiti lokana milala

आपण जर विचार केला तर या ग्रामहीत कंपनीचा लाभ जवळजवळ 3000 शेतकऱ्यांना मिळालेला आहे या तीन हजार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य असा भाव मिळाल्यामुळे 3000 शेतकरी किंवा कुटुंबी अतिशय खुश आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना उत्कृष्ट असा शेतीमाल भाव मिळवून देणे या उद्देशाने ही संस्था काम करणार आहे.

GRAMHIT संस्थेचे वेगळेपण  | gramhit specility

ग्रामीण इतिहास संस्थेने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून दिला याचबरोबर शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले ही सर्वात मोठी आणि वेगळेपणाची बाब आहे.

GRAMHIT कंपनीची स्थापना कधी झाली? | gramhit kadhi sthapn zali?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ग्रामिती कंपनी 2018 साली स्थापन करण्यात आली.

GRAMHIT चे कामकाज | gramhit kamachi padhti

ग्रामीण या कंपनीमार्फत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून पीक काढल्यानंतर त्या शेतमालाला बाजारपेठेमध्ये भाव कसा आहे त्यातील चढउतार यांची माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळवून दिली.

ग्रामहित कंपनी विस्तार gramhit vistar

ग्रामीण या कंपनीमार्फत यवतमाळ जिल्ह्यातल्या त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठी गोडाऊन उभारल्या असून शेतकरी त्या गोडाऊनमध्ये आपला शेतीमाल ठेवू शकतात आणि त्या बदल्यात त्यांना अतिशय कमी व्याजदराने कर्ज पुरवठा दिला जातो म्हणजे दुहेरी फायदा एक तर आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी राहतो त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणात पैसा देखील मिळतो जेणेकरून ज्यावेळेस शेतमालाला भाव वाढेल त्यावेळेस तो माल शेतकरी तिथून विकू शकतो.

GRAMHIT चे मालक यांचे शिक्षण | gramhit sanstapak shikshn

ग्रामीण संस्था ज्यांनी स्थापन केली त्या पंकज मल्ले यांच्या विषयी सांगायचे झाले तर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एम एस डब्ल्यू चे शिक्षण त्यांनी प्राप्त केले आहे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी त्यांना काहीतरी करायचे होते म्हणून त्यांनी ग्रामीण ती कंपनी स्थापन केली.

त्याचबरोबर त्यांच्या जोडीला काम करणाऱ्या श्वेता मल्ले यादेखील अभियांत्रिकी पदवी घेऊन आयआयटी उत्तीर्ण आहेत म्हणजेच या दोघाही दांपत्यांना अतिशय चांगल्या पगाराच्या नोकऱ्या होत्या तरी देखील शेतकऱ्यांचे हित म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेचे नाव ग्रामहीतही ठेवलेले आहे.

ग्रामहित चर्चेत येण्याचे कारण | gramhit famous honyache karan

फोर्ब्स मार्फत नवीन काही कार्य करणाऱ्या कंपन्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रँकिंग देत असते यावर्षी या निवड प्रक्रियेमध्ये 650 कंपन्याने आपला सहभाग नोंदवला होता यापैकी 100 गुणवंत कंपन्यांच्या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामहीत कंपनीचा सहभाग झाल्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे आणि अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना चांगली राहणीमान त्याचबरोबर शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्यासाठी एक आशेचा किरण दाखवणारी ग्रामीण कंपनी आता शेतकऱ्यांना खूप मोठ्या अशा अपेक्षा दाखवताना दिसत आहे.

कदाचित याच धर्तीवर शासनाला देखील विचार करून यावर अभ्यास करून शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी योग्य अशी दिशा मिळण्यासाठी ही कंपनी मोलाची कामगिरी करेल अशी आशा वाटत असल्यामुळे सर्व स्तरातून या ग्रामीण कंपनीचा कार्यभार कसा चालत होता याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण असणाऱ्या ग्रामहीत या कंपनीची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवली ही माहिती आपणाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area